पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहावे? लेखक-प्रसाद ताम्हनकर

book
एकूण पृष्ठसंख्या:६४
किंमतः ६० रू फक्त

मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे. अशा वेळेस दणादण लेख, प्रतिसाद आणि मेगाबायटी खरडी टाकणार्‍यांसमोर कित्येकदा लोटंगण घालायची इच्छा व्हायची. (तेव्हा व्हायची, आता नाहीय. नाहीतर ढीगभर पायांचे फोटो यायचे व्यनि-खरडींमधून.)

आजकाल मला इतक्या सहजपणे मराठी लिहिताना पाहून इतरांच्या चेहर्‍यावरचा आदरभाव दिसतो. त्यांनाही मी "हे खूप सोपं आहे, तुम्हालाही सहज जमेल" असं सांगते. उदाहरण दाखवलं, की त्यांनाही पटतं, पण स्वत:ला जमेल की नाही याचा अंदाज येत नाही. अशांसाठी सन्माननीय* श्री. प्रसाद ताम्हनकर यांचे 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' हे सहज-सोपं-छोटेखानी पुस्तक उपयोगी पडेल.
आपण सगळेच मराठीत लिहितो. त्यामुळे पुस्तकात नक्की काय वेगळे असेल ही उत्सुकता सर्वांनाच आहे म्हणून हा लेखनप्रपंच.

पुस्तकाची अनुक्रमणिका
१. संगणकावर मराठी भाषा कशी वापरावी?
२. टंकलेखन तक्ता
३. गमभन
४. गमभन टूलकिट
५. 'गमभन'चे फायरफॉक्स एक्सटेंशन
६. बरहा
७. गूगल transliterate
८. गूगल transliterate online
९. quillpad
१०. समारोप

अनुक्रमणिकेवरून पुस्तकात काय असेल अशी साधारण कल्पना येते. सर्वात आधी युनिकोड ची तोंडओळख आणि त्यामुळे मराठी लेखन कसे सोपं झालेय याची थोडक्यात माहिती दिली आहे. त्यानंतर पायरीपायरीने सुस्पष्ट स्क्रीनशॉट्स तसेच कमीत कमी आणि समर्पक वाक्यांत गमभन ऑफलाईन कसे इन्स्टॉल करावे, तसेच ते ऑनलाईन कसे वापरावे हे सोदाहरण दाखवलेय. तीच गोष्ट फायरफॉक्स एक्स्टेंशन आणि बरहा, गूगल transliterate आणि क्विलपॅडची. उदाहरणादाखल काही वाक्येही इंग्रजी टाईपात आणि ती मराठीत कशी दिसतील हेही दाखवून दिले आहे. इन्स्क्रिप्ट बहुधा मुद्दामच वगळलं असावं कारण त्याचा कळफलक खास लक्षात ठेवावा लागतो. हा सगळा माहितीचा खजिना अवघ्या सत्तावन्न पानांच्या पुस्तकात अगदी व्यवस्थित बसवला आहे.

थोडक्यात सांगायचं तर अतिमाहितीचा मारा नाही, आणि आवश्यक असं काही वगळलं नाही** असा या पुस्तकाचा सारांश म्हणता येईल.

*- प्रकशन सोहळ्यात कुणाच्या नावापुढे सन्माननीय हा शब्द लावला नाही तर बहुधा त्या निवेदिकेला मंचावरून हाकलून देण्यात येईल अशी धमकी मिळाली होती. त्यामुळे हा शब्द अजून छळतोय
**- बरहामध्ये काही शब्द टंकताना साधारण युनिकोड्/गमभनपेक्षा वेगळे लिहावे लागतात. उदा: क्ष, र्‍य, ज्ञ, अ‍ॅ,ऑ इ.इ. याच ही माहिती देण्यास सन्माननीय लेखक विसरलेले दिसतात. (हा उगाच आमचा छिद्रान्वेषीपणा)

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

पूसतकचि कींम्त क्य हाय? अन तु कुत मिलल? पकास्न कोन्त हाय? पोस्ताचा विपिपिन् मिलल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

>>> खोडसाळ trolling -१ व्यक्तिगत टीका, खोड्या काढणारा प्रतिसाद
>>>>विनोदी funny +१ नावावरून बोध व्हावा

वरील प्रतिसाद खोडसाळ कसा? तो विनोदी नाही का होवू शकत? लेखनाचा धागा मराठी लेखनाशी संबंधीत आहे अन एखाद्या मराठी न लिहीता येणार्‍या व्यक्ती कसा लिहील याचे उदाहरण म्हणून वरील प्रतिसाद घेता येवू शकतो. अन तुम्ही रँकींग देतात मग तो प्रतिसाद झाकून ठेवण्याची गरज काय? त्यापेक्षा सरळ उडवून टाका ना मग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मला वाटलं होतं, "टचस्क्रीन घ्या, आणि वाळूत लिहील्यासारखं मराठीत लिहा." असं काहीतरी असेल.
असो. पराशेटचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुस्तक परिचय लिहीण्याबद्दल मकीचे आभार. मके, थोडं अधिक लिहीत जा गं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.