मनातील छोटे मोठे प्रश्न - भाग २४
आधीच्या धाग्यात जवळजवळ १०० प्रतिसाद झाल्याने स्वतःहूनच नवीन धागा उघडतो आहे. (पुढाकार घ्यायची लहानपणापासूनच आम्हाला सवय आहे, काय करणार!)
माझ्या या प्रतिसादावर मिहीर यांचा खालील प्रतिसाद आला त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतो आहे.
सतत लोकांना मूर्ख, हास्यास्पद वगैरे म्हणून काही लोक नक्की काय दाखवायचा किंवा कसे दिसायचा प्रयत्न करतात, ह्याबद्दल विचार करतो आहे.
तुम्ही जेव्हा उघडपणे मत मांडता तेव्हा तुम्ही स्वतःहून जगाला तुम्हाला पारखण्याचे ('जज') आमंत्रण देत असता. जरी समोरच्याने तुम्ही काय मत मांडले आहे यावरून त्याचे तुमच्याबद्दलचे मत व्यक्त केले नाही तरी त्याने तुम्हाला 'जज' केलेले असतेच. असे असता त्याने ते मत व्यक्त केल्यास लगेच नाराजी का व्यक्त केली जाते हे मला पडलेलं एक कोडं आहे.
वास्तविक जवळजवळ आपण सर्वचजण उघडपणे 'जोकर', मूर्ख, हास्यास्पद वगैरे मतं इतरांविषयी व्यक्त करत असतो. उदाहरणार्थ, क्रिकेटचे सामने पाहताना खेळांडूंच्याबद्दल आपण सर्रास मतं व्यक्त करतो ("काय मूर्खयं, हातात बॉल असताना रन काढतोय लेकाचा"), मालिका-सिनेमे पाहताना वगैरे. एखाद्या सेलिब्रिटीने व्यक्त केलेल्या मतांबद्दल आपण त्यांना उघडपणे नावं ठेवतो, (उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर जेव्हा सत्यसाईबांबाकडे आशिर्वादाला जातो, किंवा इस्त्रोचा चेअरमन तिरूपतीला नवस फेडतो वगैरे.) अशी असंख्य रोजची उदाहरणं घेता येतील. पण असाच प्रसंग जर आपल्या वैयक्तिकबाबतीत घडला तर समोरच्याने व्यक्त केलेल्या अशा मताला लगेच आक्षेप घेतला जातो. शिष्टाचारात हे बसत नाही असे लगेच सुनावले जाते. (नुसत्या वाईट श्रेण्या जरी मिळाल्या तरी लोक रडारड करताना ऐसीवरती सर्वांनी पाहिलं असेलंच.)
.
.
काही उदाहरणं, अशी मतं मराठी संस्थळावर सहज सापडतील, पण त्याला विशेष विरोध होताना कधी दिसत नाही.
किंवा हे सामान्य लोक, ज्यांच्या मूर्खपणाला आपण दिलखुलास हसतो;
.
.
असे असता जर समोरच्याने तुमचे मत हास्यास्पद आहे असे तुम्हाला 'इन पर्सन' म्हणलं आणि ते त्याला तसं का आहे असंही सांगितलं तर ते लगेच इतकं अपमानास्पद का वाटत असावं? वास्तविक वर दिलेल्या उदाहरणांपेक्षा हे कित्येक पटीने शिष्टाचारसंमत आहे. नुस्तंच नावं ठेवण्यापेक्षा किंवा हसण्यापेक्षा त्या व्यक्तीने तुमच्याशी संवाद चालू ठेवलेला आहे याकडे सोयीस्कर दुर्लक्षही केलं जातं. मी इथे ज्या प्रकारे प्रतिसाद देतो त्याच प्रकारे समोरासमोरच्या चर्चेत प्रतिसाद देतो (ऐसीवरील जे लोक मला भेटले आहेत त्यांनी मी म्हणतो ते खोटं असल्यास जरूर सांगावं, वैयक्तिक टिका मी तरी दिलखुलासपणे घेतो), पण त्यावेळी बहुतेक जण माझ्याशी संवांद चालू ठेवतात. एकतर त्यांची मतं कशी हास्यास्पद नाहीत यावर चर्चा पुढे सरकते किंवा हास्यास्पद मत आहे असे मान्य केले जाते वगैरे. संस्थळांवर मात्र लगेच कानावर हात का ठेवले जातात कोणास ठावूक. केलेल्या प्रतिवादला उत्तर तर सहसा मिळतंच नाही, उलट चर्चा माझा अपमान कसा झाला याकडेच वळवली जाते.
माझ्या आजवरच्या अनुभवावरून, भारतात या गोष्टीचा बाऊ जास्त केला जातो. अमेरिकेत माझ्या मित्रमंडळींशी चर्चा करताना मी जर 'दॅट्स अ स्टुपिड अर्ग्युमेंट' म्हणलं तर भारतीय लोक जेव्हढा आक्षेप घेतात तेव्हढा अमेरीकन/पाश्चात्य मित्रमंडळी घेत नाहीत.
जाता जाता, विनोदाच्या प्रकारांपैकी माझा एक आवडता प्रकार म्हणजे 'इन्सल्ट कॉमेडी', मराठी संस्थळांवरील लोकांनी जरूर पहा, कातडी जरा जाड होण्यास मदत होईल.
भारतीय व्स पाश्चात्य
माझ्या आजवरच्या अनुभवावरून, भारतात या गोष्टीचा बाऊ जास्त केला जातो. अमेरिकेत माझ्या मित्रमंडळींशी चर्चा करताना मी जर 'दॅट्स अ स्टुपिड अर्ग्युमेंट' म्हणलं तर भारतीय लोक जेव्हढा आक्षेप घेतात तेव्हढा अमेरीकन/पाश्चात्य मित्रमंडळी घेत नाहीत.
अधिक विचार करता हे पटलं- भारतीय पब्लिक दुसर्याला असं म्हणत नाहीत, गुळमुळीत "बरं/ओके/नाही तसं छान आहे" वगैरे म्हणून वेळ मारून नेतो.
उदा. एखाद्या कार्यक्रमाला जायचं नसेल तर "मी येऊ शकत नाही" ऐवजी "बघू जमतंय का" असं सांगून कटवतो.
कपडे बाहेर वाळत घालणं
माझी आधीची अपार्टमेंट कम्युनिटी 'गो ग्रीन' वगैरे जाहिरातबाजी करणारी होती. दर मंगळवारी आणि शुक्रवारी सर्वत्र कचऱ्याच्या अवजड गाडीचे धूड तीन चार राऊंडा मारून 'रिसायकल' करायचा कचरा वेगळा गोळा करत असे वगैरे. (त्याची वेगळी 'रिसायकल फी' वगैरे घेत असत!!). मात्र सूर्याची मोफत उष्णता वापरून कपडे वाळवणे त्यांच्या 'ग्रीन' पॉलिसीत बसत नव्हते. ड्रायरमध्येच कपडे वाळवले पाहिजेत!!. पर्यावरण रक्षणाची ही खास अमेरिकन पद्धत वाटली.
त्यांना एकदोनदा समजावून सांगायचा प्रयत्न केला होता की नॉट ऑब्विअसली व्हिजिबल अशा पद्धतीने कपडे वाळवू. मात्र अॅपीअरन्सबाबत फारच कॉन्शस होते.
नंतर दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये मुद्दाम मागच्या बाजूला घर घेतले. अपार्टमेंटवाले फारच फ्लेक्झिबल वाटले. आमची गॅलरी बॅकसाईडला असल्याने गॅलरीत कपडे वाळवायला त्यांनी अगदी उत्साहाने होकार दिला.
+१
ड्रायरमध्ये कपडे वाळवणे (जेव्हा सूर्य इ. ऑप्षन असेल तेव्हा) हे गो ग्रीन च्या कल्पनेशी विसंगत वाटते. अपीअरन्स अपीअरन्स काय चाटायचाय?
शिवाय श्रोणिशुद्धीकरणास कागद वापरणे हेही तसेच. एक हँड फवारा ठेवून मग नंतर कागद असे ठेवल्यास काही अडचण येणार नाही, शिवाय कमी कागद लागेल. हे त्यांना का झेपत नाही ते कळत नाही. असा प्रकार तिथले इंड्यन करतात असे ऐकून आहे. हे पसरलं तर चांगलंच आहे.
डायरेक हस्तक्षेपाचा इतका बाऊ
डायरेक हस्तक्षेपाचा इतका बाऊ करायचं कारण नसावं.
---------------
ज्या डायजेस्टीव कॅनॅलच्या एका मुखाचं लोक चुंबन घेतात त्याचं दुसरं टोक काय असतं? शरीरात निर्माण होणारे एकूण त्याज्य पदार्थ कुठेकुठे किती किती वेळ असतात हे पाहिले तो सेन्स ऑफ फिल्द नसायला हवा. उदा. घामाचे नि मूत्राचे कंपोझिशन फार सारखे असते. आता कुठे कुठे किती किती कागद लावणार?
कँटरबरी टेल्स या जेफ्री
कँटरबरी टेल्स या जेफ्री चाऊसरच्या क्लासिक पुस्तकात असा उल्लेख (आणि विस्तृत वर्णन) आहे!
In the darkness, she presents her "hole" (bottom) at the window and he "kissed her naked arse full savorly". He realises the prank and goes away enraged. He borrows a red hot coulter (a blade-like plough part) from the early-rising blacksmith. Returning, he asks for another kiss, intending to burn Alisoun. This time Nicholas, who had risen from bed to go to the privy, sticks his own backside out the window and breaks wind in Absolon's face. The furious suitor thrusts the coulter "amidde the ers" (between the cheeks) burning Nicholas' "toute" (anus) and the skin "a hands-breadth round about".
स्वतःचं घर असेल तर
स्वतःचं घर असेल तर वाळवता यायला हवेत असे वाटते. शहराबाहेरच्या वाड्यावस्त्यांवर चित्रपटात दाखवतात तसे दोन खांब रोवून त्याच्या दोरीवर कपडे वाळायला घातले आहेत असे दिसते.
मात्र काही महापालिका त्यांच्या हद्दीमध्ये असे काहीतरी मूर्ख (की या पेपरकंपन्यांसारख्यांच्या कॉर्पोरेट लॉबीइंगमुळे) नियम करतात असेही ऐकून आहे. माझा एक कलीग बहुतेक भारतीय राहतात त्या अपस्केल उपनगरात राहतो. तिथे असे वाळत घालायला परवानगी नाही. मी जिथे राहत होतो तिथे महापालिकेचा नियम नाही मात्र अपार्टमेंटवाल्यांना त्यांची घरे चांगली दिसावीत असे वाटत असल्याने त्यांनी नियम केले होते. आता नवीन ठिकाणी महापालिका किंवा अपार्टमेंट असा कुणाचाच नियम नाही.
...
स्वतःचं घर असेल तर वाळवता यायला हवेत असे वाटते.
मात्र काही महापालिका त्यांच्या हद्दीमध्ये असे काहीतरी मूर्ख (की या पेपरकंपन्यांसारख्यांच्या कॉर्पोरेट लॉबीइंगमुळे) नियम करतात असेही ऐकून आहे.
महापालिकाच नाही. 'होमओनर्स असोसिएशन' (मराठीत: 'सोसायटी') नावाचा प्रकारही असतोच.
पण ब्याकयार्डात आहे, दर्शनी भागात नाही, तोपर्यंत शक्यतो चालावे.
कपड्यांसाठी ड्रायर वापरणे फार
कपड्यांसाठी ड्रायर वापरणे फार आकर्षक प्रकरण आहे पण भलतेच महाग आहे.
आमच्या कंपनीच्या अमेरिकन सिएफोने एकदा गो-ग्रीनच्या नावाखाली स्वतःच्या घरचा आदर्श भारतीय लोकांसमोर असा मांडला - "आम्ही(म्हणजे तो आणि त्याचे कुटुंबिय) या वर्षी आमच्या घरातल्या ७५ लाईट प्वाइंट्सपैकी फक्त ५०च!!!!(नक्की आकडा आठवत नाही) वापरणार आहोत, उन्हाळ्यात कपडे दोरीवर वाळवणार, शक्य तेंव्हा सार्वजनिक वाहतुक वापरणार वगैरे...".
अर्धवट माहिती
अर्धवट माहितीवरून आपली मतं दिली की आपण किती हास्यास्पद दिसतो याची लोकांना कल्पना येत कशी नाही याची मला नेहमी गंमत वाटते.
अमेरीकेत विजेचे दर तसे फार कमी आहेत. शिवाय कपडे धुण्याकरता वापरले जाणारे वॉशर्स आणि ड्रायर्स हे रोज दोन कपड्यांकरता लावणारे म्हणजे थोरच समजायला हवेत. पाच सहा लोकांचं कुटुंब आणि त्यात लहानं मुलं (सारखी कपडे घाण करणारी) असली तरी रोज कपडे धुतले जात नाहीत.
अमेरीकेत कपडे वाळत घालत नाहीत असं नाही, फक्त ते गॅलरीच्या कठड्यावर, दरवाजावर, खुर्च्यांवर वगैरे वाळत घालण्याचं प्रमाण कमी आहे. कित्येक अमेरीकन लोक (विशेषतः लहान मुलं असलेले लोक) या प्रकारची रॅक्स घरात किंवा बॅकयार्डमध्ये वापरताना मी पाहिलेलं आहे. http://www.walmart.com/c/kp/clothes-drying-racks आणि कित्येक भारतीय लोकांना ओल्या झालेल्या फोमच्या गाद्या घराबाहेर वाळवतानाही बघितलेलं आहे.
आता वेळ, श्रम आणि वीज या सर्वांचा विचार केला तर दोर्यांवर कपडे वाळत घालण्यापेक्षा ड्रायर वापरणे हे जास्त 'इफिशीयंट' ठरू शकते. (इतर फॅक्टर्स वर अवलंबून)
आता, आंघोळीचे टॉवेल्स कसे वाळवायचे? मी राहतो तिथल्या कोरड्या हवामानामुळे टॉवेल्स घरातल्या घरात सहज वाळतात. पण जिथे थंड आणि दमट असेल तिथे काही सोपे उपाय करून टॉवेल वाळवता येतात. अमेरीकेत एसी किंवा हिटर (किंवा नुसताच फॅन, स्वॅम्प कूलर नव्हे) बहुतेक घरात नेहमी चालूच असतो (अती थंडी किंवा उष्ण वातावरणामुळे + सवय), एखाद्या व्हेंट समोर/जवळ हे टॉवेल्स वाळत घातले की लवकर वाळतात/वास येत नाही. शिवाय, अमेरीकेतील घरं ही बर्याच प्रमाणात सीलबंद असतात (नाहीतरी हिवाळ्यात्/उन्हाळ्यात हिटर/ए.सी. नीट काम करणार नाही), अशा वेळी घरातील एक-दोन खिडक्या उघडून हवा खेळती करता येते, अशा खिडकी समोर वाळत घातल्यास टॉवेल्स सहज वाळतात. (मी स्वतः, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ठराविक बाजूच्या खिडक्यां उघडून एसी/हिटरचे पैसे वाचवतो.)
स्वयंपाक घरातील स्वच्छतेची फडकी: अमेरीकेत कपडे धुवायला बाया नसल्याने आणि बहुतेक घरांमध्ये भारतात असतात अशा मोर्या नसल्याने ही फडकी, रोजच्या रोज अंडरवेअर वगैरे धुणे शक्य होत नाही. त्यामुळे लोक वॉशिंग मशिनमध्येच सगळं धुतात (बॅट्याचं आवडतं धुणं सोडून!), अगदी बुटं, घरातले डोअर मॅट्स वगैरे सुद्धा. ही दोन चार फडकी धुणं तसं प्रॅक्टीकल नाही, म्हणून डिस्पोजेबल पेपर टॉवेल्स वापरणं जास्त सोयीस्कर पडतं (शिवाय, तीच तीच कापडं वापरणं मला स्वतःला स्वच्छतेच्या दृष्टीनं सोयीस्कर वाटत नाही. भारतात लोकांना सवय आहे म्हणून चालतं, इथे स्वच्छतेचे 'नॉर्म' वेगळे आहेत. माझ्यासारखा एखादा 'पर्टिक्यूलर' माणूस तर घरातील आणि बाहेरचे कपडेसुद्धा वेगवेगळे धूतो!)
बाकी प्रतिसाद
बाकी प्रतिसाद माहितीपूर्ण.
अर्धवट माहितीवरून आपली मतं दिली की आपण किती हास्यास्पद दिसतो याची लोकांना कल्पना येत कशी नाही याची मला नेहमी गंमत वाटते.
सतत लोकांना मूर्ख, हास्यास्पद वगैरे म्हणून काही लोक नक्की काय दाखवायचा किंवा कसे दिसायचा प्रयत्न करतात, ह्याबद्दल विचार करतो आहे.
वाटलंच होतं
विज दर कमी असताना आणि ड्रायर वापरणे इफिशियंट असताना अमेरिकन लोकं असं का वागत असावेत? का हा निव्वळ घाणेरडेपणा असावा?
अमेरीकेत स्त्री पुरूष समानतेचे स्तोम फार वाढल्याने इथे बहुतेकदा पुरषांना 'लाँड्री' करावी लागते, त्यामुळे असेल. :-)
मी स्वतः दोन-दोन आठवड्यांनी करतो, म्हणजे हा नक्कीच फक्त अमेरीकन स्वभावगुणधर्म नसावा! ;-)
ड्रायर्स हे केवळ विजेवरच चालत
ड्रायर्स हे केवळ विजेवरच चालत नाहीत, गॅसवर चालणारे पण असतात. (ते विकत घेताना महाग पडतात, पण वापरासाठी स्वस्त पडू शकतात.)
अमेरिकेत बाहेर कपडे वाळत घालत नाहीत कारण बहुतेकवेळा ते होमओनर असोसिएशनच्या नियमात बसत नाही.
बहुतेकदा आठवड्यातून एकदाच कपडे धुतले जातात, यात स्वच्छतेचा प्रश्न येत नाही, तर सोयीचा येतो. कारण रोज नवीन वापरूनही आठवडाभर पुरतील इतके कपडे असतात, इथे भारताइतका घाम सहसा येत नाही, कपडेही भारतातल्याइतके खराब होत नाहीत आणि आठवड्यानंतर धुण्यासाठी पुरेसे लोड तयार होते.
अर्थात
भारतात वॉशर्समध्ये असतो त्याला सेंट्रीफ्युज म्हणता येईल, त्यात फक्त सेंट्रीफ्युगल फोर्सने पाणी काढून घेतले जाते. हा प्रकार अमेरीकेत वॉशिंग मशिनमध्येही होतोच. त्यापुढे हे कपडे ड्रायरमध्ये घालून वाळवले जातात. ड्रायर मध्ये कपडे 'टंबल' होताना गरम हवेचा झोत सोडला जातो, त्यामुळे कपडे ड्राय होतात. गॅसवर चालणारे ड्रायर्स ही गरम हवा गॅस जाळून करतात तर इलेक्ट्रीक ड्रायर्स इलेक्ट्रीक कॉईल वापरून. पण दोन्हीतील मोटर इंडक्शन मोटरच असते. गॅस जाळून गरम हवा करणे जास्त इफिशीयंट असल्याने थोडे स्वस्त पडते. भारतातही आता "ड्रायर्स" मिळतात असे ऐकले आहे.
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
>>भारतात वॉशर्समध्ये असतो त्याला सेंट्रीफ्युज म्हणता येईल
भारतात वॉशिंग मशीन म्हणतात (आणि त्यातल्या ड्रायर्सना स्पिन ड्रायर्स म्हणतात). आम्ही खालील चित्रात दाखवलेल्या वस्तूंना वॉशर्स (मराठीत - वायसर) म्हणतो. (हलके घ्या)
तरीही (बंदिस्त क्याबिनेटमध्ये) गरम हवेच्या झोताने कपडे पूर्ण सुकत असतील असे वाटत नाही. हां; ते टांगले जाऊन त्याच्या सर्व बाजूंनी गरम हवा सोडली जात नसेल तर.
या एकदा
तरीही (बंदिस्त क्याबिनेटमध्ये) गरम हवेच्या झोताने कपडे पूर्ण सुकत असतील असे वाटत नाही. हां; ते टांगले जाऊन त्याच्या सर्व बाजूंनी गरम हवा सोडली जात नसेल तर.
या एकदा (स्वतःच्या तिकाटाने, रांग लागायाच्या आधीच सांगतो!), दाखवतो. माणसं सुद्धा वाळतील, तुम्ही आलात की करू प्रयोग, कपड्यांचा हो! ;-)
?
तो जोक होता? हसतो मग आता. (अरे त्यांना किमान एकतरी विनोदी श्रेणी तरी द्या रे, काय वाटेल त्यांना!)
लोकांना बाय हूक ऑर क्रूक हास्यास्पद ठरवण्याची ही ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसॉर्डर बाकी रोचक वाटली. रोजचा कोटा भरण्याच्या कामी जर मदत होत असेल तर चालूदे. हॅपी टु बी ऑफ हेल्प
अरे रे, जाऊ दे हं. त्यांना बाप्पा शिक्षा करेल.
हम्म
माझ्यापुरतेः
१. आमच्या घरात एसी किंवा हीटर नेहमी चालू नसतो. तो कपडे वाळत घालण्यासाठी चालू ठेवावा असे मला वाटत नाही.
२. दिवसभर खिडकी उघडी ठेवली की सेक्युरिटी अलार्म चालत नाही.
३. वेळ, श्रम आणि वीज कोणत्याच निकषावर ड्रायर हा दोऱ्यांवर वाळत घालण्यापेक्षा इफिशियंट आहे असे दिसले नाही.
४. वीज स्वस्त आहे म्हणून ती वापरलीच पाहिजे असे मला वाटत नाही.
?
तुम्ही लिहिलेले उपाय.
अमेरीकेत एसी किंवा हिटर (किंवा नुसताच फॅन, स्वॅम्प कूलर नव्हे) बहुतेक घरात नेहमी चालूच असतो (अती थंडी किंवा उष्ण वातावरणामुळे + सवय), एखाद्या व्हेंट समोर/जवळ हे टॉवेल्स वाळत घातले की लवकर वाळतात/वास येत नाही. शिवाय, अमेरीकेतील घरं ही बर्याच प्रमाणात सीलबंद असतात (नाहीतरी हिवाळ्यात्/उन्हाळ्यात हिटर/ए.सी. नीट काम करणार नाही), अशा वेळी घरातील एक-दोन खिडक्या उघडून हवा खेळती करता येते, अशा खिडकी समोर वाळत घातल्यास टॉवेल्स सहज वाळतात. (मी स्वतः, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ठराविक बाजूच्या खिडक्यां उघडून एसी/हिटरचे पैसे वाचवतो.)
एसी चालू न करता फक्त व्हेंटसमोर टॉवेल्स वाळवण्याचा प्रयोग करुन पाहतो. खिडकी न उघडता खिडकीसमोर टॉवेल ठेवून हवा खेळती करण्याचा प्रयत्न करुन वाळवण्याचा प्रयत्न करुन पाहतो. आणि या वैज्ञानिक प्रयोगांचे निष्कर्ष येथे जाहीर करतो.
निव्वळ कार्डिओ
निव्वळ कार्डिओ व्यायामासाठी कपालभाती व तत्सम क्रिया करुन टॉवेलवर फुंकर मारून वाळवणे सोयीचे वाटते. डक्ट+खिडकीजवळ केल्यास न-हवा + फुंकर असा डब्बल फायदा. प्राचीन काळी ऋषीमुनी करत तसे हवेत अवकाशात टॉवेल व तुम्ही तरंगत डक्टजवळ गेल्यास अधिकच प्रभावी उपाययोजना होऊ शकते.
हो
डक्ट हा साधारण फुलस्केप वहीएवढ्या आकाराचा आहे. टॉवेल सहा फूट बाय तीन फूट. आता डक्टला बांधायचा म्हणजे म्युझियम, मॉल किंवा सरकारी इमारती वगैरे ठिकाणी ते खाली लोंबणारे झेंडे दिसतात तसा बांधावा लागेल.
त्या परिस्थितीत डक्टमधून (एसी/हीटर बंद असल्याने) येणारी न-हवा टॉवेलचा डक्टजवळ असलेला भागच वाळवू शकेल अशी शंका वाटते. कदाचित यू आकाराच्या झोळीप्रमाणे बांधला तर न-हवेने फक्त दोन टोके वाळून मुख्यत्वे वापरला जाणारा टॉवेलचा मध्यपूर्वेचा भाग तसाच ओलसर ठसठसत राहील असे वाटते.
अवांतरः डक्ट खिडकीजवळ सीलिंगला आहे. खिडकी बंद ठेवून तिथून येणाऱ्या न-हवेचा वापर होऊ शकतो पण ब्लाईंड्स उघडे ठेवल्याने 'दर्शनी भागात वाळत घातले' असा तांत्रिक आक्षेप उपस्थित केला जाऊ शकतो काय?
(कायदेतज्ञांनी मदत करावी).
--/\-- डक्ट हा साधारण
--/\--
डक्ट हा साधारण फुलस्केप वहीएवढ्या आकाराचा आहे. टॉवेल सहा फूट बाय तीन फूट. आता डक्टला बांधायचा म्हणजे म्युझियम, मॉल किंवा सरकारी इमारीती वगैरे ठिकाणी ते खाली लोंबणारे झेंडे दिसतात तसा बांधावा लागेल.
समस्या खरोखर गहन आहे, पण तुमची आयड्या मस्त आहे, अमेरीकेत तसेही झेंड्यांचे टॉवेल मिळतात, टावेल परी टावेल, झेंडा परी झेंडा, तसेही अमेरिकेत झेंडे दाराबाहेर लावण्याची(निदान पुर्व किनार्यावर) एक विचित्र सवय लोकांना असल्याचे दिसते.
ह्या प्रतिसादात अवांतर लिहल्याबद्दल परत एकदा --/\--
आश्चर्य नाही
एसी चालू न करता फक्त व्हेंटसमोर टॉवेल्स वाळवण्याचा प्रयोग करुन पाहतो. खिडकी न उघडता खिडकीसमोर टॉवेल ठेवून हवा खेळती करण्याचा प्रयत्न करुन वाळवण्याचा प्रयत्न करुन पाहतो. आणि या वैज्ञानिक प्रयोगांचे निष्कर्ष येथे जाहीर करतो.
तुमचे तार्किक कौशल्य पाहता तुम्ही असे काही केलेत तर आश्चर्य वाटणार नाही. शुभेच्छा.
मत
वेगवेगळ्या वर्तुळात अपशब्दांना सामावुन घेण्याची प्रवृत्ती वेग-वेगळी आढळते, समवयस्क वर्तुळात शिव्यांचा बोचरेपणा कमी असतो, पण अधिक औपचारीक वातावरणात शिव्या अशिष्ट समजल्या जाव्यात, अमेरीकतही सौम्य शब्दात विरोधी अर्थ असणारी वक्तव्ये केली जातात त्यामधे बोचरेपणा कमी करताना मत पोहचवण्याची मानसिकता असते, हे उपरोधावेगळे आहे, उपरोधामधे शिव्यांपेक्षा अधिक बोचरेपणा असु शकतो.
'हास्यास्पद' शब्दयोजनेत उपरोधाचा बोचरेपणा कोणाला वाटू शकतो, 'गंमत वाटली', 'रोचक वाटले' वगैरे कमी बोचरे वाटु शकते.
तुम्ही अपमान सहन करता किंवा बोचरेपणा योग्य त्या संदर्भातच लक्षात घेता म्हणुन ते इतरही तसेच वागण्यासाठी सांस्कृतिक जडणघडण एकच असावी लागेल, तुम्हाला अमेरिकन समवयस्क मोकळेपणाची सवय असल्याने तसे वाटणे स्वाभाविक आहे.
वेगवेगळ्या वर्तुळात
वेगवेगळ्या वर्तुळात अपशब्दांना सामावुन घेण्याची प्रवृत्ती वेग-वेगळी आढळते
अगदी अगदी!! १००% खरं आहे.
"फायर इन बेली" पुस्तक वाचताना एक मजेशीर किस्सा वाचला. ही दोघं गोरी अन तरुण मुलं रुळाचं कामगार-काम करायला गेली.तिथे सगळे काळे अन रापलेले कामगार. त्या घटनेचं वर्णन लेखक करतो - We were looking like virgins in harlem :)
पण सांगायचा मुद्दा तो नाही. मग आठवडाभर ते राकट काम करुन आठवड्याचे पैसे सर्वांना मिळाले तर एक काळा म्हणतो - So are you goin to spend all money on pussy n booze like us?
तर दुसरा काळा म्हणतो - "Hey they are pretty, they don't have to pay for pussy."
तर पहीला काळा उसळून प्रत्युत्तर देतो - "Shit man! You just ask your wife about me."
अन सगळे अगदी ज्याच्यावर हा जोक शेकलाय तो ही, खो खो हसतात.
माझ्या आजवरच्या अनुभवावरून,
माझ्या आजवरच्या अनुभवावरून, भारतात या गोष्टीचा बाऊ जास्त केला जातो. अमेरिकेत माझ्या मित्रमंडळींशी चर्चा करताना मी जर 'दॅट्स अ स्टुपिड अर्ग्युमेंट' म्हणलं तर भारतीय लोक जेव्हढा आक्षेप घेतात तेव्हढा अमेरीकन/पाश्चात्य मित्रमंडळी घेत नाहीत.
हे पुन्हा काहीही.
भारतीय लोक "चुत्यासारखा बोलू नकोस" , "गांडू आहेस तू", "गाढवपणा करू नकोस", "तुला अक्कल नाही.", अशी अनेक वाक्ये वापरतात. शिवाय दे मीन देम. पाश्चिमात्य लोक कोणत्याही फोरममधे भारतीयांपेक्षा करेस्पाँडीग फोरममधे जास्त फॉर्मल असताना दिसले आहेत.
-----------------
भारतात ऑफिसात उच्च पद नीच पद असा कंसेप्ट जास्त आहे. म्हणून तिथे वातावरणच पश्चिमेसारखे "फ्रेंडली" नसते. पण वातावरण जेव्हा फ्रेंडली, मोकळे असते तेव्हा भारतीय लोक काय काय बोल्लून मोकळे होतील त्याचा नेम नाही.
यात भारतीय/ अभारतीय असा भेद
यात भारतीय/ अभारतीय असा भेद करण्यापेक्षा भारतात सर्विसेस( सॉफ्ट्वेअर/ कॉल सेंटर) विरुद्ध मॅनुफॅक्चरिंग असा भेद करता येईल. मॅनुफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये शिविगाळ खूप चालते असं निरिक्षण आहे. फक्त वर्कर्सच नाही तर व्हाईट कॉलरवालेसुद्धा मनमुराद शिव्या देतात. सॉफ्ट्वेअरमध्ये खूप कमी. नाहीच जवळजवळ.
हं
भारतीय लोक "चुत्यासारखा बोलू नकोस" , "गांडू आहेस तू", "गाढवपणा करू नकोस", "तुला अक्कल नाही.", अशी अनेक वाक्ये वापरतात. शिवाय दे मीन देम. पाश्चिमात्य लोक कोणत्याही फोरममधे भारतीयांपेक्षा करेस्पाँडीग फोरममधे जास्त फॉर्मल असताना दिसले आहेत.
-----------------
भारतात ऑफिसात उच्च पद नीच पद असा कंसेप्ट जास्त आहे. म्हणून तिथे वातावरणच पश्चिमेसारखे "फ्रेंडली" नसते. पण वातावरण जेव्हा फ्रेंडली, मोकळे असते तेव्हा भारतीय लोक काय काय बोल्लून मोकळे होतील त्याचा नेम नाही.
तुम्ही सोयीस्कर रित्या तुमच्या भाषिक दौर्ब्यलाचा फायदा घेतलेला दिसतो आहे.
माझा मुद्दा गंभीरपणे वाद/चर्चा चालू असतानाचा आहे. तुम्ही लिहलेले वाकप्रचार अशा चर्चेत वापरले जात नाही. माझ्यापेक्षा उच्चपदस्थ लोकांशी अशा चर्चा करत नाही. तुम्हाला मुद्दाच नीट समजलेला दिसत नाही, पुन्हा एकदा नीट वाचून पहा.
काय कि ब्वॉ. पुन्हा वाचलं.
काय कि ब्वॉ. पुन्हा वाचलं. फोरम कोणता आहे, कशाप्रकारचा आहे हे काही कळलं नाही. गंभीर चर्चा मंजे काय? प्रत्येकच चर्चा गंभीर असते. कि तुम्ही म्हणाल ती चर्चा गंभीर. देशाप्रमाणे प्रत्येक फोरमचे प्रोटोकॉल बदलतात. पण शिव्या देणे वा शिव्या ऐकून घेणे ही प्रवृत्ती इंफॉर्मल कल्चर मधे जास्त असते.
---------
काहीही हास्यास्पद आणि स्टुपिड आर्ग्यूमेंट करू नकात.
विकसित देशात गेलेल्या लोकांना
विकसित देशात गेलेल्या लोकांना तिथली आर्थिक प्रगती पाहून आपल्या अविकसित देशाच्या सगळ्याच बाबतीत एक न्यूनगंड उत्पन्न होत असावा. तिथलं सगळंच कसं योग्य आणि आपल्याकडचं सगळंच कसं वाइट असा विचार ते बर्यापैकी करू लागतात असे वाटतात.
---------------------
मंजे अमेरिकेत २७.५ बलात्कारांना भारतात १.८ बलात्कार असा खरा रेशो असली तरी त्यांना भारतातच जास्त बलात्कार होतात असे वाटते. मग ते भारतातलं अंडररिपोर्टींगचं प्रमाण कितीही पटीने (टक्क्यांनी तर जाऊच द्या)वाढवायला तयार असतात.
---------------
पाकिस्तानी पोलिसाने आपल्या वरीष्ठाला खांद्यावर घेऊन नदी पार केली (आणि त्याचा पाय भिजू दिला नाही ) तर जगभरात ती बातमी पाकिस्तानी पोलिस किती वाइट्ट म्हणून फिरवली जाते. भारतातला पोलिस आपल्या वरीष्ठाचे लेस बांधतो तेव्हा तेच. पहा, भारताचे, पाकिस्तानचे पोलिस कसे कमी इगोचे आहेत नि त्यांना वरीष्ठांबद्दल किती आदर आहे, किती चांगले नाते आहे, असा त्याचा चांगला अर्थ काढता येत नाही. तो ही निघू शकतो ना.
---------------
भारतीय 'मूर्ख' शब्द आणि अमेरिकन स्टुपिड शब्द जरा वेगळे आहेत. भारतात कोणाला मूर्ख म्हटले तर ते त्याच्या पूर्ण जीवनाचं, व्यक्तित्वाचं, निर्णयांचं असेसमेंट होतं. स्टुपिडला लोकल मिनिंग असावी. त्यासाठी इकडे 'चूक' शब्द आहे. तो सर्रास वापरतात. समर्थ सासरी जास्त खाणाराला मूर्ख म्हणतात तेव्हा वाटते कि तो माणूस सर्वाथाने सगळीकडे गाढवासारखे वागत असावा.
-----------
अम्रिकन लोकांचा इगो कमी आहे म्हणून ते असे शब्द ऐकून घेतात असे वाटत असेल तर अमेरिकन पोलिसाला आपल्या वरीष्ठाला 'प्रेमाने' (मंजे when the situation does not demand) खांद्यावर घेऊन जा म्हणावं.
तुम्ही सोयीस्कर रित्या
तुम्ही सोयीस्कर रित्या तुमच्या भाषिक दौर्ब्यलाचा फायदा घेतलेला दिसतो आहे.
भारतीयांमधे स्टुपिड म्हणायची, ऐकायची हिंमत/मोकळेपणा असो नसो, पण समोरच्याकडे प्रामाणिकपणा असूच शकत नाही हे गृहितक मात्र फार तगडे असते. समोरच्या प्राप्त परिस्थितीत आपल्या पोझिशनचा जास्तीत जास्त गैरफायदा घेत असतो आणि आपण त्याबद्दल टाहो फोडायचा असतो, इ इ.
नाईल यांच्या प्रश्नाला
नाईल यांच्या प्रश्नाला अनुसरून- जेव्हा लोक मुद्याचं बोलण्यापेक्षा वारंवार हे अर्ग्युमेंट चूक/वायझेड आहे यावरच फोकस देतात तेव्हा लोक जास्त इरिटेट होतात. कारण विधायक चर्चेपेक्षा ट्रोलिंगमध्येच जास्त रस आहे असे तेव्हा वाटते. स्वतःचे बोळे वाहते करण्याचा केविलवाणा प्रकार यापलीकडे त्याला महत्त्व देववतही नाही.
मेन मुद्दा- अमुक एक गोष्ट मूर्खपणाची आहे असे बोललेले चालते, मात्र त्यावर अनफेवरेबल रिअॅक्शन दिली तर का विचित्र वाटते हे माझ्या आकलनापलीकडे आहे. हा दुटप्पीपणा नव्हे काय?
हाहा!
नाईल यांच्या प्रश्नाला अनुसरून- जेव्हा लोक मुद्याचं बोलण्यापेक्षा वारंवार हे अर्ग्युमेंट चूक/वायझेड आहे यावरच फोकस देतात तेव्हा लोक जास्त इरिटेट होतात. कारण विधायक चर्चेपेक्षा ट्रोलिंगमध्येच जास्त रस आहे असे तेव्हा वाटते. स्वतःचे बोळे वाहते करण्याचा केविलवाणा प्रकार यापलीकडे त्याला महत्त्व देववतही नाही.
काहीच्या काही तर्क लावणे ही तुमची खासियत दिसते, गेल्या दोन तीन दिवसांत चाललेल्या चर्चांत ती ठळकपणे दिसतेच आहे. अर्ग्युमेंट कसे चूक आहे हे ही लिहल्यानंतर चूक दाखवली म्हणून इरिटेट होऊन रडणार्यांची चिंता आम्ही का करावी? चूका दाखवणे ट्रोलिंग असेल तर असो बापडे, शाकाहाराच्या चर्चेत जे एकमेकांना उघडपणे शिव्यादेने चालले आहे त्यापेक्षा तरी बरे.
काहीच्या काही तर्क लावणे ही
काहीच्या काही तर्क लावणे ही तुमची खासियत दिसते, गेल्या दोन तीन दिवसांत चाललेल्या चर्चांत ती ठळकपणे दिसतेच आहे. अर्ग्युमेंट कसे चूक आहे हे ही लिहल्यानंतर चूक दाखवली म्हणून इरिटेट होऊन रडणार्यांची चिंता आम्ही का करावी? चूका दाखवणे ट्रोलिंग असेल तर असो बापडे, शाकाहाराच्या चर्चेत जे एकमेकांना उघडपणे शिव्यादेने चालले आहे त्यापेक्षा तरी बरे.
एक तर फालतूचे अॅटिट्यूड आहेच- पण तिकडे दुर्लक्ष करतो.
पण क्रिस्टिना होफ सॉमर्सचा विषय चालला असताना मुद्याकडे लक्षही न देता निव्वळ हे च्यानल बकवास आहे सबब इथल्या मजकुराकडे लक्ष देऊ नका छाप बिनबुडाच्या अंदाधुंद कमेंटी टाकणारांनी असे सेल्फ राइचस नक्राश्रू ढाळणे बाकी रोचक आहे.
गॅलरीमध्ये कपडे वाळवणे इ.
अमेरिका-कॅनडा अशा काही देशांमध्ये काही ठिकाणी गॅलरीचा उपयोग कपडे वाळविण्यासाठी - आणि नेहमी न लागणार्या वस्तु ठेवायला त्यांचा वापर करणे - अशा बाबींसाठी वापरायला बंदी आहे आणि 'हिरव्या' विचारधारेला ते विरोधी आहे असे सार्वत्रिक मत दिसते. त्याची दुसरी बाजू येथे मांडतो.
असे निर्बंध सहसाकरून ज्यांना 'काँडोमिनिअम' (थोडक्यामध्ये 'काँडो, भारतातील सहकारी गृहसंस्थेचे थोडे वेगळे रूप) म्हणतात अशा इमारतींमध्ये असतात.त्याचे कारण असे आहे की अशा वापरामुळे इमारतीचा बाह्य देखावा विद्रूप होतो आणि तेवढया प्रमाणात त्यातील वैयक्तिक मालकीच्या निवासांची बाजारातील किंमत कमी होते. एखादा काँडो 'डाउनमार्केट' दिसणारा आहे, त्यामध्ये ढेकूण-उंदीर-झुरळे आहेत, दरिद्री दिसणारे/वागणारे लोक तेथे राहतात अशा प्रकारचे चित्र एकदा सांगोवांगीमधून बाहेर पसरले की त्यातील वैयक्तिक मालकीच्या निवासांची बाजारातील किंमत घसरते. असे निवास हे त्यांच्या मालकांची सर्वात मोठी गुंतवणूक असल्याने ही किंमतीची घसरण त्यांना पचणे शक्य नसते. कसलेहि 'हिरवे' विचार ह्या बाबतीत त्यांना पटणारे नसतात. तेव्हा जोपर्यंत मालमत्तेच्या किंमतीची घसरण सोसून 'हिरव्या' विचारांना पाठिंबा देणे आपण त्यांच्या गळ्याखाली उतरवू शकत नाही तोपर्यंत गॅलरीत कपडे वाळविण्याची संमति मिळविणे हे अरण्यरुदनच राहणार.
असे निर्बंध काँडोमिनिअमच्या बायलॉजमध्येच लिहिलेले असतात. भारतातील सहकारी गृहसंस्थांमध्ये मनमानी करणारे, नियम पायाखाली तुडवून इतरांना डोकेदुखी देणारे सदस्य सर्रास भेटतात. अमेरिका-कॅनडा अशा देशांमध्ये अशी मनमानी फार काळ चालू शकत नाही कारण बायलॉज पाळायला लावणारी व्यवस्था कितीतरी अधिक मजबूत आहे.
गॅलरीत कपडे वाळवून ऊर्जा वाचवणे हे चांगले का वाईट हा येथे मुद्दाच नाही. ते केवळ तत्त्व म्हणून चांगलेच आहे. त्या तत्त्वाची वैयक्तिक मालकीच्या काँडोची किंमत घसरू नये ह्या रास्त इच्छेशी सांगड कशी घालता येईल हा मुद्दा आहे.
धन्यवाद!
या निमित्ताने, संपादकांनी इकडून तिकडून प्रतिसाद आणून चिकटवल्याने किंवा आधीच पापिलवार असलेल्या शिर्षकाच्या ट्यार्पीने का होईना, आमच्या धाग्याची प्रथमच शंभरी झाली. त्याला हातभार (कोण रे तो शेपटी म्हणणारा!) लावणार्यांचे धन्यवाद.
आमच्या संस्थळांवरच्या प्रदिर्घ वाटचालीचा 'उच्चांक' असे म्हणायवायस हरकत नाही. त्यानिमित्ताने "आता निवृत्त व्हायचे पहा" प्रकारच्या सल्ल्यांचेही आम्ही स्वागतच करू.
नाईल यांना एक प्रश्न आहे. मी
नाईल यांना एक प्रश्न आहे. मी आणि बॅटमॅनने दुसर्या धाग्यावर एकमेकांना शिव्या घातल्या. ती (आमचेमते, ऋषिकेशच्या नाही) एक गंभीर चर्चा होती. या धाग्यात जो प्रश्न उचलला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही अशा शिव्या घातल्या म्हणून आमचे कौतुक व्हायला पाहिजे. पण त्याचा निगेटिव उल्लेख आपण केला आहे. "गंभीर चर्चांत कडक टिकांचे, सौम्य शिवीगाळीचे महत्त्व, कौतुक" इ इ हा विषय नाही का?
---------------
४-५ दा वाचूनही नक्की भारताबद्दल काय ऑब्जेक्शन आहे हे समजत नाहीय.
मला "टोस्ट्मास्टर" मध्ये याच
मला "टोस्ट्मास्टर" मध्ये याच गोष्टीचा ओ आलेला की टीका काही विशेष नाही उगाच ह.पा. टाळ्या. अन टीकाही इतकी सौम्य की बास. अरे खणखणीत करा ना लेको. काय अंगाला भोकं पडणारेत का? झालीच तर सुधारणा होईल.
उबग आला ६ महीन्यात अन त्या "Phoney" गटातून स्वछेने निवृत्त झाले मी.