झाडाझडती

बायको अगदी गोड आहे. 'गो'च्या पुढे शंभर अवग्रह काढावे इतकी गोड.
पण अशाच वेळी का आठवते ती गल्ली?

मध्यमवर्गीय, मार्क्सचा शापित - इंपोटंट इंटलेक्चुअल.
मी त्यातलाच.
ओरखडे उमटले की रक्त भळभळतं.
'विश्लेषण' जमलं की हसू फुटतं.
मूल्यं जपा, पासबुकं जपा, नोकरी जपा, अब्रू जपा, आता भर म्हणजे हॅकिंगपासून इ-मेल अकाउंट जपा...

बायकोसुद्धा जपलेलीच. मी तिला आणि तिने मला.
तसा मग वेदनेला थारा नाही.
पहिला पाऊस वगैरे झिणझिण्या आणत नसला तरी बायको सोबत असली की बरं वाटतं.

चित्रांचे आविष्कार.
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि बायको.
सगळ्यांची गोळाबेरीज होऊन गिऱ्हाईकाची वाट बघणारी स्पर्शकन्या तिथे - गल्लीत.
'गल्ली' म्हणजे वास्तविक संस्कृतीच.
ओरखडे उमटवणारी, उरकलेल्या सुखाची, स्वस्तातल्या तृप्तीची, बाईच्या वैराण एकटेपणावर स्वार होणारी लिंगसंस्कृती.
इंद्रिये अवघडल्यावर लग्नाबिग्नाच्या फंदात न अडकवणारी संस्कृती.
आणि ही संस्कृती जपणारे गरजू पुरुष.
पुरुषाची गरज, गल्लीचा उगम.
गल्लीच्या अवकाशात पुरुषत्वाचा गजर. गरजेचा गजर.
बायको बरोबर असतानाही ऐकू येतो.
बायको गल्लीत असती तर?
अंगावर अजिबात काटाबिटा येत नाही. पण शून्य वाटतं.
संस्कृती जपणारी, असंस्कृत, पान-सिगारेटचं व्यसन असणारी ती स्पर्शकन्या
आणि जिच्यावर प्रेम इत्यादी आहे ती गुणाची बायको.
गल्लीचं विश्लेषण म्हणजे इन्द्रियांचं विश्लेषण.
लग्नाचं विश्लेषण म्हणजेही अखेरीस इन्द्रियांचंच विश्लेषण.

बुधवार पेठेपासून सदाशिव पेठेपर्यंत मी खालमानेने येतो.
मध्ये फक्त एकदा मान उचलून म्हणतो, 'बाप्पा, तू अमानुष.
संस्कृतीचे कुठले कुठले तुकडे कुठे कुठे नांदत असतात ते शोधायची अक्कल का नाही भरलीस आमच्या टाळक्यात?
म्हणजे मग आमच्या संस्कृतीच्या प्राणप्रतिष्ठेआधी आम्ही तिची झाडाझडतीही घेतली असती...'

(मिळून साऱ्याजणी, दिवाळी २०११)

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

" 'गल्ली' म्हणजे वास्तविक संस्कृतीच. " खरे आहे..
' स्पर्शकन्या ' हे नाम देखील भिडले.. !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

कवितेचा अर्थ आवडला; 'गरजेचा गजर' विशेष आवडला.

अंगावर अजिबात काटाबिटा येत नाही. पण शून्य वाटतं.

हे अंगावर आलं.

कवितेचा 'आकार' असा बघण्याची सवय नसल्यामुळे गोंधळ झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कविता आवडली. पुढील ओळी जास्त भिडल्या

बायको अगदी गोड आहे. 'गो'च्या पुढे शंभर अवग्रह काढावे इतकी गोड.

पहिला पाऊस वगैरे झिणझिण्या आणत नसला तरी बायको सोबत असली की बरं वाटतं.

बायको गल्लीत असती तर?
अंगावर अजिबात काटाबिटा येत नाही. पण शून्य वाटतं.

गल्लीचं विश्लेषण म्हणजे इन्द्रियांचं विश्लेषण.
लग्नाचं विश्लेषण म्हणजेही अखेरीस इन्द्रियांचंच विश्लेषण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गल्ली म्हणजे वास्तविक संस्कृतीच!

किती खरं आहे!

पुरुषाची गरज, गल्लीचा उगम.
गल्लीच्या अवकाशात पुरुषत्वाचा गजर. गरजेचा गजर.

म्हणूनच भारीतलं गिर्‍हाईक पटवणारी वेश्या आणि चांगल्यातल्या नवरा गटवणारी मुलगी "यशस्वी" समजल्या जातात.

मुक्तक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वस्थ झाले.
<<लग्नाचं विश्लेषण म्हणजेही अखेरीस इन्द्रियांचंच विश्लेषण. >> हे जोपर्यंत आहे तोपर्यंत <<बाईच्या वैराण एकटेपणावर स्वार होणारी लिंगसंस्कृती >> हेच राहणार.
विदारक सत्य.
<<पुरुषाची गजर, गरजेचा गजर.
बायको बरोबर असतानाही ऐकू येतो.>> हेच दरवेळी का असावं? ही मानसिकता कधी बदलणार?
<< म्हणूनच भारीतलं गिर्‍हाईक पटवणारी वेश्या आणि चांगल्यातल्या नवरा गटवणारी मुलगी "यशस्वी" समजल्या जातात.>> ही सुद्धा मानसिकता कधी बदलणार?

कविता आवडली. अगदी मला पडले तसेच नसतील, पण कविलाही काही अस्वस्थ करणारे प्रश्न पडले आहेत असे शेवट्च्या कडव्यात जाणवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0