सध्या काय वाचताय? - भाग १२

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

रविवारचा 'लोकसत्ता' नेहमीच वाचनीय असतो. आजचा तर इतर वॄत्तपत्रांच्या गल्बल्यात 'हासिल-ए-महफिल' म्हणावा असा आहे.काही नोंदी:
- माजी सनदी अधिकारी माधव गोडबोले यांची सडेतोड मते: धर्मनिरपेक्षता टिकली तरच देशाला भवितव्य, राम मंदिराचा अट्टाहास सोडून द्यावा, नरसिंह रावांच्या कचखाऊ आणि न-निर्णयक्षम धोरणांमुळेच बाबरी मशीद पाडली गेली, लाच घेणार्‍याबरोबर लाच देणार्‍यावरही कारवाई हवी, नियोजन आयोग पूर्णपणे रद्द करावा, एन्रॉन हे (राज्य) सरकारचे संपूर्ण अपयश, माहितीच्या अधिकाराचा अधिकाधिक वापर व्हावा, गोपनीयतेची शपथही बदलण्याची गरज, (यातील नियोजन आयोग हा फक्त नेहरुंच्या अट्टाहासामुळे आणि एन्रॉनचा भारतातला प्रकल्प हे शरद पवारांच्या (त्यांनाच माहिती असलेल्या पण तरीही सर्वपरिचित कारणांपोटी जन्मलेल्या) अट्टाहासामुळे जन्माला आले हे वाचून (तेवढेच वाटणे शक्य असल्याने) गंमत वाटली. एखादा राज्यकर्ता आपल्या मर्जीखातर आणि स्वार्थासाठी राज्यशकटाला आणि जनतेला कसे वेठीस धरतो याचे आणखी एक उदाहरण, इतकेच), भाषावार प्रांतरचनेमुळे संकुचितपणा वाढला ( इथे परत गोडबोलेंनी नेहरुंचे उदाहरण दिले आहे. भाषावार प्रांतरचनेला नेहरुंचा विरोध होता, पण त्यामागची भूमिका लोकांना कळालीच नाही, असे गोडबोले म्हणतात. भाषावार प्रांतरचनेमुळे इतर भाषांबाबतची तुच्छता आणि तिटकारा वाढला असे समजायला अगदीच वाव आहे. मुळात इतक्या तुकड्या-तुकड्यांच्या देशात भाषेच्या नव्या भिंती घालायला हव्याच होत्या का असा प्रश्न पडतो. भाषेच्या नाही तर मग इतर कोणत्या आधारावर राज्यांची निर्मिती करायला हवी होती या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही.)
'हर चुनाव कुछ कहता है' हा गिरीश कुबेरांचा लेख त्याचे अकारण हिंदी शीर्षक सोडल्यास उत्तम आहे. मोदी लाटेनंतर लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही त्याची आपसूक पुनरावृत्ती होईल आणि काँग्रेस- राष्ट्रवादीचे पानीपत होईल असा भाबडा आशावाद बाळगणार्‍यांनी हा लेख मुद्दाम वाचावा. असे होणार नाहीच असे नाही, पण असे का होऊ शकणार नाही याचे कुबेरांनी केलेले विश्लेषण रंजक आहे.
'सार्वजनिक शरमेची गोष्ट' या 'तिरकी रेघ' मधील सदरात संजय पवार परत स्त्रियांसाठीच्या स्वच्छतागृहांच्या प्रश्नाबाबत बोलतात. पण हे असे असणारच. एक मूलभूत प्रश्न जोवर किमान काही अंशी सुटत नाही, किंवा तो सुटावा यासाठी समाजमन आणि राजकीय नेतृत्व यांच्यांत पुरेसे गांभीर्य येत नाही तोवर त्या प्रश्नांवर लोकांनी पुन्हापुन्हा बोलणे, लिहिणे गरजेचे आहे.
'सात सकं त्रेचाळीस' या किरण नगरकरांच्या कादंबरीला चाळीस वर्षे झाली. त्यानिमित्त त्यांच्या मनोगताचा काही भाग या अंकात आहे. त्यातले मे.पुं.रेगेंचे लेखाकाला 'विषयामध्ये गती नसते तेंव्हा भाषेला दुर्बोध करण्याची गरज भासते' हे मत मला रोचक वाटले. (जी.ए., ग्रेस वगैरेंच्या चाहत्यांसाठी हा एक चर्चेचा, वादाचा विषय ठरावा). पण या मताच्या बरोबर मागे छापलेला विश्वास पाटलांचा 'गौताळ्याचा अरण्यानुभव' हा लेख वाचल्यावर मे.पुंच्या या मताची मला तात्काळ प्रचिती आली आणि 'शब्दांचे, प्रतिमांचे भुईनळे उडवून कल्पनादारिद्र्याचे मढे सजवले तरी त्यात आशयाचे पंचप्राण कुठून येणार?' हे 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे' या धर्तीवरचे वाक्य मला सुचले. त्यामुळे बा वाचकांनी या लेखाचे अंकाला लागलेले हे गालबोट ढीस करावे. बाकी कृष्णात खोत यांच्या 'धूळमाती' या कादंबरीचे प्रभा गणोरकर यांनी केलेले परीक्षण आणि 'उद्याचे वाचक घडविण्यासाठी' हा डॉ. प्रतिभा कणेकर यांचा (चर्वितचर्वण झालेल्या विषयावरचा) लेख ठीकठाक आहेत. दुसर्‍या लेखातले 'किती मुले मोकळ्या वेळात आपले आई-बाबा एखादे पुस्तक एकाग्र होऊन एखादे पुस्तक वाचताना बघतात?' हे वाक्य परत एकदा टोचून गेले आणि जबरदस्त वाचन असलेल्या काही मित्रांची शून्य वाचन असणारी मुलेही आठवली.
एकूण हा अंक मला आवडला. 'फाईंडिंग फॅनी' या चित्रपटाचे 'लोकसत्ता' मधले परीक्षण हे 'सकाळ' मधल्या परीक्षणाच्या बरोबर विरुद्ध आहे हे वाचून समाधान वाटले आणि हा चित्रपट बघायचा असे मी ठरवून टाकले.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

http://www.loksatta.com/lokrang-news/saat-sakkam-trechalis-by-kiran-naga...

सात सख्खं बद्दल चा लेख वाचतोय. त्यातलं हे वाक्य लई आवडलं - Students learn despite their teachers.

धन्यवाद, संजोपराव. निपोंना लेख पाठवलेला आहे.

----

"धर्मनिरपेक्षते विना देशास भवितव्य नाही" हे वाक्य "भारत हा कृषिप्रधान देश आहे" सारखं गुळगुळीत आहे. (I know what you want to hear .... so I deliver it. टाईप). माधवराव उत्तम सेल्समन असावेत. पण चांगलंच बकवासात्मक आहे. अक्षरशः खोटं आहे ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/42397165.cms

शशिकांत सावंत यांनी लिहिलेला हा लेख वेगळा प्रतिसाद म्हणूनच द्यायचा होता मला.

यातली खालील वाक्ये लक्षणीय -

जीवनभाष्य-

माणूस कितीही मुक्त असला, तरी तो कुठेतरी आणि कुणाशीतरी स्वतःला बांधून घेतो. बंधनं आवडती असोत वा नावडती असोत वा झिडकारायचे हजारो मार्ग सापडले तरी बांधलेले.

आपण सगळेच कोणातरी व्यक्तीला निवडतो आणि तिच्याशी एकांतात आणि चार लोकात बोलत बसतो. मग ती व्यक्ती तुमचं बोलणं ऐकत असो वा नसो.

---

ढिश्क्लेमर - मी कादंबरी वाचलेली नाहीये. पण निपोंकडून लई वेळा त्याबद्दल ऐकलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'फाईंडिंग फॅनी' या चित्रपटाचे 'लोकसत्ता' मधले परीक्षण हे 'सकाळ' मधल्या परीक्षणाच्या बरोबर विरुद्ध आहे हे वाचून समाधान वाटले आणि हा चित्रपट बघायचा असे मी ठरवून टाकले.

टुकार आहे चित्रपट. पंकज कपूर मधूनच स्पार्क दाखवून जातो. पण बाकी चित्रपट बकवास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://www.businessinsider.com/ken-rogoff-warns-of-scotland-independence...

स्कॉटिश इन्डिपेंडन्स च्या सार्वमताबद्दल ...

Earlier today the Royal Bank of Scotland (RBS) said it was making contingency plans to re-domicile in England in case of a Yes vote. Lloyds, Standard Life and the Clydesdale Bank are also planning to quit Scotland and move their headquarters to London if voters back independence in next week’s referendum.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो क्रुगमन तर आलरेडी म्हंटोच आहे ना की पौंड कायम ठेवून जर स्कॉटलंड बाहेर पडलं तर इंग्लंडचं काय खरं नाही म्हणून?

झालंच तर लॉईड्स चे हेडक्वार्टर लंडनमध्येच आहे अशी माझी समजूत होती/आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डीसी कॉमिक्सने मार्च 1982 – मे 1989 दरम्यान प्रकाशित केलेलं ​अॅलन मूर व डेव्हिड लॉईड द्वारा निर्मित 'व्ही फॉंर व्हेन्डेटा'​ हे ग्राफिक नॉव्हेल नुकतंच वाचून पूर्ण केलं.
ऐंशीच्या दशकात एकत्र बसून, व्यक्तिशः राज्यशास्र वा समाजशास्त्राची कुठलीही भक्कम स्कॉलररी पार्श्वभूमी नसताना नव्वदच्या दशकाचं भयावहरित्या वास्तवनिर्देशी, अंगावर शहारे आणणारं काल्पनिक जग लेखक-चित्रकार द्वयीने उभं केलं आहे.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आण्विक महायुद्ध होऊन बहुतांश जगाचा विनाश झालेला आहे. मात्र काही अन्य देशांसह इंग्लंड तरलेलं आहे व पुन्हा एकदा प्रबळ सत्ता म्हणून उदयास आलं आहे. मात्र इंग्लंडमधे नॉर्सेफायर पक्षाच्या अॅडॅम सुसॅन या चिवित्र हुकुमशहाची सत्ता आहे (हिटलरप्रमाणेच 'तारणहार' समजून लोकांनीच त्याला निवडून दिलेलं असतं.) लोकांच्या श्वासाश्वासावर इथे पाळत ठेवली जाते, अर्थातच अधिकाऱ्यांच्यासुद्धा. राजकीय विरोधक, ख्रिश्चन सोडून अन्यधर्मीय, परदेशी व स्थलांतरित, कृष्णवर्णीय, समलिंगी लोकांना 'सोशल अनडिझायरेबल्स' ठरवून त्यांचा अनन्वित छळ करण्यासाठी, त्यांना ठेचून काढण्यासाठी, वाट्टेल ते शास्त्रीय प्रयोग करण्यासाठी त्यांना वापरता यावं म्हणून या देशात काही वर्षांपूर्वी एक 'रीसेटलमेंट कॅम्प'ही उभारण्यात आला होता. तो बंद पडला असला तरीही त्या लोकांची धरपकड व हेटाळणी थांबलेली नाही.
…पुढे काय?… आला दिवस रेटत मरण येत नाही म्हणून जगणाऱ्या, सत्तेचा पुरेपूर माज करणाऱ्या, ज्या सरकारने घृणास्पद कृत्यं केली त्यासाठी काम करताना मानसिक कुचंबणा भोगणाऱ्या या साऱ्याच लोकांना भविष्य आहे का? .. हे जाणून घेण्यासाठी उत्सुकांनी नॉव्हेल वाचणंच योग्य ठरेल.

​​इथे नायक, खलनायक, नायिका, थरारक ट्विस्ट्स् वगैरे सगळं काही आहे पण तत्कालीन ग्राफिक नॉव्हेल्समधला साचेबद्धपणा, भपकेबाजपणा, नायकाचं दैवतीकरण त्यात कुठेच दिसून येत नाही. (-पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हणल्याप्रमाणे "V for Vendetta is everything comics weren't supposed to be.") नायक असामान्य आहे पण ट्रबल्डही आहे. खलनायकासह सर्व व्यक्तिरेखांना खूप सूक्ष्म पोत, अतरंगी स्वभाववैशिष्ट्यं आहेत.

​​नॉव्हेल वाचण्यापूर्वी मी त्यावर आधारित 2006 मधे आलेला 'व्ही फॉंर व्हेन्डेटा'​ सिनेमा पाहिला होता. खरं सांगायचं तर कॉमिक्सचं सिनेरुपांतरण म्हणून व स्वतंत्र कलाकृती म्हणूनही मला सिनेमा खूप आवडला. सिनेरूपांतरण करताना कथेत केलेले बदल, मधल्या काळात जगात घडलेल्या घटनांच्या संदर्भांची घातलेली भर, सर्व पात्रांचा अभिनय हे सारं फारच अफलातून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

You have not yet discovered that you have a lot to give, and that the more you give the more riches you will find in yourself.
- Anaïs Nin

सध्या सौ. शैला दातार लिखित पं. भास्करबुवा बखले यांचे चरित्र (किंवा कादंबरीच्या अंगाने लिहिलेले चरित्र) वाचतो आहे. याआधी वाचताना मिळाला तोच आनंद याही वेळी मिळत आहे :-). भास्करबुवांनी विद्या मिळवण्यासाठी घेतलेले आणि मिळालेली विद्या इतरांना देण्यासाठी घेतलेले कष्ट फारच अपूर्व आहेत. तसेच त्यांचे बालगंधर्व आणि मास्टर कृष्णा यांची संगीतातील कारकिर्द आणि एकुणच मराठी संगीत नाटकांतले योगदान या गोष्टी मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. मुख्य आवडलेली गोष्ट म्हणजे सौ. दातार यांनी इतर समकालीन दिग्गजांवर टिप्पणी करण्याचा मोह टाळलेला आहे (अशी टिप्पणी आपल्याला इतर काही चरित्रांत दिसून येते). काही वेळा फारच कादंबरीच्या अंगाने जरी गेल्यासारखं वाटलं तरी मुळातच भास्करबुवांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांचं आयुष्य आपल्याकडे अनडॉक्युमेंटेड आहे त्यामुळे थोडंफार लालित्य येणं साहजिक आहे. हे सौ. दातार यांनी प्रस्तावनेत मान्यही केलेलं आहे. एकुणात छान आणि वाचनीय पुस्तक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल हे आख्खं पुस्तक वाचलं अन विकत घेतलं - http://www.amazon.com/Love-Poems-God-Twelve-Compass/dp/0142196126
लेखक अमेरिकन असून नंतर पश्चिम भारतात मेहेर बाबांच्या सहवासात सामाजिक कार्यरत होते.
कविता फार आवड्ल्या.
१२ मिस्टिक कवींच्या कवितांचे भाषांतर आहे - राबया, मीरा, कबीर, सेन्ट फ्रन्सिस ऑफ असिसी, रुमी अन अन्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्यंतरी बराच काळ उपलब्ध नसलेली सारंगांची 'एन्कीच्या राज्यात' हाती लागली. विविध व्यवस्थांच्या कचाट्यात सापडलेले नागरिक, प्रत्येकाची त्या त्या व्यवस्थेकडे पाहण्याची रीत, त्याचे त्यांच्या नातेसंबंधांवर, व्यवहारात पडणारे प्रतिबिंब, एकाच वेळी वेगवेगळ्या 'जगां'चे अस्तित्व, त्यांतील नीतीनियमांशी जुळवून घेताना त्यांचा भाग असलेल्या माणसांना करावी लागणारी कसरत, काही कमावताना काही गमावताना कुठे परिस्थितीशरण तर कुठे व्यवस्थेला चकवा देत केलेली वाटचाल, अशा मार्गाने वाटचाल करत कादंबरी अनेक परिप्रेक्ष्यांना समोर ठेवत जाते. कादंबरीचा घाट असल्याने कुठेही मूल्यमापनाचा, लेखकाच्या विचारांना भाष्य स्वरूपात समाविष्ट करण्याचा मोह टाळल्याने कादंबरी वाचनास सुलभ होत असली तरी त्यातील गुंता गुंतीचे कंगोरे आवश्यक तिथे अचूक ठळक करत नेऊन मार्मिक अधोरेखिते सोडत पुढे जाते, विचारप्रवण होण्यास भाग पाडते. आजवर वाचलेल्या कादंबर्‍यांपैकी एक महत्त्वाची कादंबरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

'एन्कीच्या राज्यात' आवडली असेल, तर मग भाऊ पाध्यांच्या 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर'ची (वाचली नसेल तर) माझ्याकडून शिफारस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद चिंतूशेट. ती ही रेडारवर होतीच. आता लगेचच घेतो वाचायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

एका सेकंडहँड पुस्तकांच्या दुकानात जाँ ल कारेची "स्मायलीज पीपल" मिळाली. ल कारेचं नाव "द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड" मुळे परिचयाचं होतं - ते एक वाचायच्या यादीत बरेच दिवस पडून आहे.

स्मायलीज पीपल झकास! शीतयुद्धकालीन आंतरराष्ट्रीय हेरगिरीवर आधारित कथानक आहे. पण भडक, अद्भुतरम्य, लार्जर दॅन लाईफ न करता काळ्यापांढर्‍या छटांनी रंगवलं आहे. लेखनशैली रिपोर्ताजच्या अंगाने जाणारी. खासच.

आता कारेच्या इतर कादंबर्‍या मिळवतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हृषिकेश गुप्ते यांच्या भयकथा/कादंबर्‍या कोणी वाचल्या आहेत का? परीक्षणांनुसार अवश्य वाचाव्या अशा आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फायर इन द बेली-ऑन बीईंग अ मॅन नावाचे पुस्तक वाचते आहे. खाली ठेववत नाहीये.
समाजाच्या पुरषांकडूनच्या अपेक्षा, एकंदर पुरषांच्या पुरषांकडून अपेक्षा, त्यांच्यातील एकमेकातील स्पर्धा... लहानपणी पुरषांना आईवर अवलंबून असतानाच तिच्यापासून तोडून काही विधी - सुंथा आदि केले जाणे, त्यातून त्यांचे पौरुषत्वामध्ये इनिसिएशन, स्त्रियांचे सेन्श्युअल जग त्यांच्यापासून तोडून टाकून त्यांना "मर्द" बनविणे.
असे काही मुद्दे चवथ्या पाठापर्यंत तरी वाचनात आले.

तसेच स्त्रियांवर होणार्‍या बलात्कारांचे अगदी समर्थन नाही पण तशा प्रकारच्या कोणत्या क्रौर्यास पुरषांना सामोरे जावे लागते याचे काही वर्णन आहे. जसे पूर्वीपासून अजस्त्र व बलाढ्य, हिंस्त्र प्राणी मारुन अन्न गोळा करणे, स्वतःला सतत लढाईस सक्षम ठेवणे, आधुनिक काळात, सैन्यात जाणे वगैरे सक्ती पुरषांसाठीच असते अशा प्रकारचा प्रतिवाद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!
वाचायला हवे.

पुरूषांवरही पुरूष म्हणून होणारे अन्याय कमी नाहितच!

एकुणच सामाजिक व्यवहारात/नियमांत/कायद्यात लिंगनिरपेक्षतेची निकड आहे. हे जितके लवकर होईल तितके उत्तम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यू. आर. अनंतमूर्तींवर विनय हर्डीकरांनी लिहिलेला लेख. आणि त्यांची अंक भरून प्रदीर्घ मुलाखत.

ही मुलाखत दिवाळी अंकातही प्रकाशित झाली होती. पण तो दिवाळी अंक माझ्याकडून हरवला. ते गेल्यावर त्या अंकाची आठवण होऊन चरफड झाली होती. 'साधने'चे सगळे दिवाळी अंकही त्यांनी सॉफ्टकॉपीजमधे उपलब्ध करून दिले, तर फार बरं होईल. त्यासाठी पैसे मोजायला लागले, तरी ते वसूल आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लिंक गंडली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आता दुरुस्त कशी करू?! बूच मारलेत ना? इथून (१३ सप्टेंबरचा अंक) घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुळ दुवा सुधारला आहे. आता बघा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असं मोठ्ठं नाव असलेलं छोटं पुस्तक वाचतो आहे. लेखक आहेत पं. केशवराव इंगळे. मला जी प्रत मिळाली आहे ती फार्फार जुनी आहे, १९३६ सालातली. किंमत एक का दोन रुपये अशी छापलेली आहे (खात्री करुन सांगतो). एकूण त्या काळातले सनातनी/ब्राह्मणी/संस्थानी वातावरणाचे वर्णन आणि बाळबोध गोष्ट सांगितल्यासारखी आणि अनेक वेळा आजचा काळात पॉलिटीकली इनकरेक्ट वाटेल अशी भाषा यामुळे पुस्तक वाचायला जाम मजा येतेय.

मी वर एका प्रतिसादात पं. भास्करबुवा बखले यांच्या चरित्राचा उल्लेख केला आहे. भास्करबुवांच्या वेळी ख्यालगायकी महाराष्ट्रात लोकांना ठाऊक तरी होती. बाळकृष्णबुवांच्या काळी तीही लोकांना ठाऊक नव्हती. गायक म्हणजे ध्रुपदिया नाही तर कीर्तनकार नाहीतर त्याहीपेक्षा वाईट, तमासगीर/नाटकवाला, अशी लोकांची समजूत होती. अशा काळात, नशीब आणि परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना, नानाविविध अपमान सहन करून अत्यंत जिद्दीने बाळकृष्णबुवा भारतभर फिरून ख्यालगायकी शिकले. वाटेत थोडंफार ध्रुपद गायकीचंही शिक्षण त्यांना मिळालं. कमावलेली कला आणि आवाज घेऊन परत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राला ख्यालगायकीची ओळख करून दिली. महाराष्ट्रात आणि भारतभर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचं आणि ख्यालगायकीचं नाव मोठं केलं. मुख्य म्हणजे पं. गुंडोपंत इंगळे, पं. मिराशीबुवा, पं. विष्णु दिगंबर पलुसकरांसारखे अनेक शिष्य घडवले ज्यांनी आपल्या गुरुचा लौकिक अधिकच उंचावला.

लेखक पं. केशवराव इंगळे हे गुंडोपंत इंगळ्यांचे चिरंजीव. स्वतः ग्वाल्हेर घराण्याच्या विद्वान गायकांपैकी होते. वडिलांबद्दल लिहिताना त्यांचा थोडासा बायस पुस्तकात कधी कधी डोकावतो. केशवराव स्वतः साहित्यिक वगैरे नसल्याने आठवणी सांगाव्यात तसं पुस्तक लिहिलंय हे अधिक आवडलंय. साहित्यातील मराठीचे सध्याच्यापेक्षा वेगळं स्वरूप वाचायला मिळाल्याने छान वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक आहे. कुठे मिळालं हे पुस्तक?
वाचायचं असेल तर कसं मिळवावं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला पण वाचायला आवडेल. किती मोठं आहे? जुने आहेच, फार पानं नसल्यास स्कॅन करून स्क्रिब्डी वर टाकता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही पुस्तकं (हे आणि पं. भास्करबुवा बखले यांचं चरित्र) वाचण्याची उत्सुकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र - हे नक्कीच आउट ऑफ प्रिंट आहे. पुस्तकावर प्रकाशकाचं वगैरे नाव नाही याचा अर्थ इंगळेबुवांनी स्वतः प्रकाशित करुन छापले असावे. माझ्या गुरुजींकडून वाचायला आणले आहे सध्या. वर म्हटल्याप्रमाणे, ती प्रत १९३६ सालची आहे. स्कॅन करून डकवता आल्यास पाहातो.

२) पं. भास्करबुवांचे चरित्र ('देवगंधर्व') - हे सहज मिळेल. बहुधा राजहंस प्रकाशनाचे पुस्तक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्पलचं ताजं पोस्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऋषिकेश गुप्ते यांचा 'अंधारवारी' हा गूढकथांचा संग्रह वाचला. ६-७ कथांपैकी दोन नि:संशय निराळ्या आहेत. मृत्यू या एकाच संकल्पनेभोवती न फिरता भीती-क्रौर्य-संभ्रम-कुतुहल... अशा अनेक गोष्टींबद्दल बोलणार्‍या आहेत. एकदा वाचायला पाहिजेतच अशा गोष्टी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5371701630372368339&Se...

मुक्तपीठाने कात टाकली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुक्तपीठावर आता पुढे काय काय येईल त्याची भावनावेगाने,आतुरतेने उत्सुकतेने वाट पहात आहे.

की राहुलनं आपल्यातील Duel personality इतकी बेमालूमपणे जपली होती? की राहुल हा वन ऑफ द ‘गे’ होता? का ‘होमो’ होता?

राहुल ट्रान्सवेस्टाईट होता बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तर गे आणि होमो हे दोन वेगळे प्रकार असतात हीच ण्यूज होती. (लेखिका डॉक्टर आहेत - खोटं कशाला बोलतील?)

बाकी लेख मात्र मुपी प्रंप्ररेला साजेलसा fantastic आहे. आणि "अनुरूप" वर आडून केलेलं शरसंधान वगैरेही मुपिमध्ये नवीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला तर गे आणि होमो हे दोन वेगळे प्रकार असतात हीच ण्यूज होती. (लेखिका डॉक्टर आहेत - खोटं कशाला बोलतील?)

हाहाहा, अगदी अगदी. शिवाय " वन ऑफ द ‘गे’" हा नक्की काय प्रकार असावा? केवळ आपला माडर्नपणा ('न' पूर्ण) ठसवण्याचा प्रयत्न? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाविषयी बराच उहापोह करता येईल.
राहुल असं का वागला? तो फक्त रात्रीच साडी नेसायचा की दिवसासुद्धा? रिमाने त्याला काहीच कसं विचारलं नाही? आणि आईबाबा काय करणार ह्यात आता?
बरं नक्की काय इश्यू होता ते गुलद्स्त्यातच ठेवून घैसासबाईंनी सॉलिड वातावरण निर्मिती केलीये.
बाईंनी पुढे नुसतं 'क्रमशः' लिहिलं असतं तर मी रोज उठून मुक्तपीठ फ५चून पाहिलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हात्तिच्या, हा (कथेतील) राहुल होय!!
छ्या!
मोठ्या उत्सुकतेने लेख उघडला होता Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाजीराव रोड चा सिंघम - बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 - 12:32 PM IST
छान सल्ला दिला आहे डॉ.maDam तुम्ही... पण शेवटच्या परीछेदापर्यंत कळतच नव्हत, मुक्तपीठ वाचतोय कि हैदोस...

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला तर मुक्तपीठावरच्या लेखाऐवजी तिथल्या कॉमेंट्स वाचायलाच जास्त आवडते. हहपुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Other Men's Flowers - A. P Wavell

हे कवितांचं पुस्तक आधाशासारखं वाचलं. काही अनवट काही ओळखीच्या कविता सापडल्या. पैकी एक खाली.

Three gypsies stood at the castle gate. They sang so high, they sang so low.
The lady sate in her chamber late. Her heart it melted away as snow.

They sang so sweet, they sang so shrill. That fast her tears began to flow
And she lay down her silken gown, her golden rings and all her show.

She took it off her high-heeled shoes, a-made of Spanish leather-O
She would in the street in her bare, bare feet, all out in the wind and weather-O.

Saddle to me my milk white steed and go and fetch me my pony-O
That I may ride and seek my bride who's gone with the wraggle taggle gypsies-O!

He rode high and he rode low, he rode through woods and copses too
Until he came to an open field and there he espied his a-lady-O.

“What makes you leave your house and land, your golden treasures for to go?
What makes you leave your new wedded lord, to follow the wraggle taggle gypsies-O?”

“What care I for my house and land? What care I for my treasures-O?
What care I for my new wedded lord? I'm off with the wraggle taggle gypsies-O!”

“Last night you slept on a goose-feathered bed, with the sheet turned down so bravely-O.
Tonight you sleep in a cold open field along with the wraggle taggle gypsies-O!”

“What care I for the goose-feathered bed with the sheet turned down so bravely-O?
Tonight I shall sleep in a cold open field along with the wraggle taggle gypsies-O!”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या http://www.amazon.com/The-Fearful-Void-Geoffrey-Moorhouse/dp/0571243576 वाचते आहे. रोचक वाटत आहे.
फक्त निव्वळ भीतीवर मात करण्यासाठी उंटावरुन प्रवास करुन लेखकाने सहारा वाळवंट ओलांडलं. भीतीने जीवन बद्ध होऊ नये म्हणून. हे फार रोचक वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आनंद विनायक जातेगांवकर यांची अस्वस्थ वर्तमान कादंबरी काही दिवसांपूर्वीच वाचायला घेतली. सुरुवातीला प्रश्नालंकारांच्या भडिमाराने चिडचिड झाली. पण आता लेखन पकड घेतंय. कोणी कादंबरी वाचलीय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेघनाने दिलेल्या दुव्यावरची एक पोस्ट, नविन शेरलॉक चाहत्यांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी एक रोचक आणि उत्तम वाचन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी आहे ना तो ब्लॉग? तो आवडला असेल, तर हाही चाळून पाहा. (NSFW आहे हां. शेरलॉकप्रेमही उतू जातं. पण ते दोन्ही बाजूला सारू शकलात, तर बरीच वेगळी चित्रं बघायला मिळतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Endurance: Shackleton's Incredible Voyage - आल्फ्रेड लॅन्सिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपरिमेय यांच्या सौजन्याने: सोव्हिएत लिटरेचर - एन्जॉय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अपरिमेय आणि भुस्कुटे , दोघानाही धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फाईल हपिसातून उघडत नाही. काय आहे त्यात? मीर पब्लिशरची पुस्तके की टॉलस्टॉय-दस्तयेव्हास्की?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी रशियन बालसाहित्यामुळे हरखून गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओह अच्छा. धन्यवाद.

(व्होयना-इ-मिर प्रेमी) ब्रूस बात्मानोव्स्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

may i know few names of the books?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बर्‍याच काळाने मुपिप्रेमं साठी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वुडहाऊसच्या पंख्यांसाठी:

सबॅस्टियन फॉक्सने लिहिलेल्या Jeeves and the wedding bells या non-canonical पुस्तकाचं लय कौतुक ऐकलं म्हणून वाचायला घेतलं आहे. (३६% वाचून झालं आहे.)

भाऊला जमलंय!

टिपिकल जीव्ज् कथा. खऊट आत्या/मावश्या, मित्राला प्रेमप्रकरणांत मदत करण्यासाठी बर्टीच्या निर्बुद्ध आयडिया, वेषांतरं, तोतये,...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे काही वर्षांपूर्वी अभिधानंतर मधे वाचलं होतं वाचलं होतं. ते आज कसं कुणास ठाऊक हाती लागलं. ते इथे देतो आहे.

डिस्क्लेमर : पुढच्या विनोदी पोस्टांमधे ज्या दोन दिवंगत साहित्यिकांचा उल्लेख आहे त्यांच्याबद्दल मला अतीव आदर आहे. या लिखाणात त्यांचा अपमान झाला आहे असं मला वाटत नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पपन का क्या करें ?
पपन वाघमारे एक ऍक्टीव्हिस्ट आहे. एका राजकीय पक्षाच्या आश्रयावर मुंबईतील एका गल्लीतल्या चाळीत पपन राहातो. पपनला पिक्चर बिक्चर आवडत नाही. टीव्हीतही त्याला इंटरेस्ट नाही. त्याला फक्त ग्रेस हा कवी आवडतो. ग्रेसच्या सर्व कवितांमधे बुडून जाणे हीच त्याची एकमेव हॉबी. पपनचे दोन मित्र. एक मल्लू एक बिहारी. या दोघांनाही पपन ग्रेसबद्दल बोलून सॉलीड पकवतो. दोघांना कळत काहीच नाही ; पण पपनला कोण काय बोलणार ! नाही का ?

पपनची इच्छा आहे की ग्रेस सगळ्यांनी वाचावा ; पण सगळ्यांना मराठी येत नाही , पण सगळ्यांना हिंदी समजते. पपनला हे राझ कळल्यावर पपनने ग्रेसच्या कविता हिंदीत ट्रान्सलेट करण्याची कसम खाल्ली आहे.

फुंक

घर थकेला सन्यासी
हल्लूहल्लू दीवार भी थकरेली है
माँके आँखके नक्षत्रकी
मेरेको याद आरेली है

पपनका क्या करें ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही अजून एक. इथे म्हणजे साक्षात "जीएस्वामीं"चेच वस्त्रहरण. हे वाचून पण अति वेडा झालो ...

गूढ

काळा चष्मा लावून बी. ए. कुलकर्णी
स्फूर्ती आल्यामुळे आपल्या लेखनाच्या
टेबलावर जाऊन बसले.
काळा चष्मा घातल्यामुळे
जगाच्या काळ्या वर्मावर
बोट ठेवणे सहज शक्य होते
असे बी ए जींना का वाटायचे
हे त्यांना कधीच कळले नाही.
"गूढ आहे" एव्हढेच.
"वर्मावर बोट ठेवणे" या फ्रेझची मात्र त्यांना
ज्याम मज्या यायची.

बी ए कुलकर्णी हे इंग्लिश टाईप नाव
कसे सुचले आपल्याला ,
याचे त्यांना हल्ली
वैषम्य वाटायचे बंद झाले होते.
"गूढ आहे" , एव्हढेच.
निदान आपण लिहीण्याकरता
बाईचे नाव तरी घेतले नाही,
ह्या आनंदाइतके तरोताझा.

तर असे बीएजी बसलेले असताना
त्यांचा फोन वाजला -
"हॅलो , मला वाचवा . "
बीएजी सटकन काटे-काटे रोमांचित.
"काय : कोण आहे " - बीए
"मला वाचवा. घरात मांजर शिरली आहे ;
नि मी एकटा आहे."
बीएजी सरबरीत.
एकटा आहे , मांजर आहे, हे काय गूढ.
अहो मी पोपट बोलतोय.
बीएजींचा हिरवा रावा.
गूढ आहे एव्हढेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.पपनचे काही पचले नाही. पण बी.एंची रेवडी
मस्त उडवली आहे!

निदान आपण लिहीण्याकरता
बाईचे नाव तरी घेतले नाही,
ह्या आनंदाइतके तरोताझा.

इथे बहुदा "तो" स्पर्श काही प्रमाणात लाभलेल्या आरती प्रभूंचा
तर संदर्भ नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीएंची रेवडी मस्तच उडवली आहे!!!

पण तो फाँट कुठून आणलात ओ झडकर साहेब?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'साँग ऑफ आइस अ‍ॅण्ड फायर' या मालिकेतली पुस्तकं नुकतीच वाचून संपली. ७ पुस्तकांच्या या मालिकेतली ५ पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत. गेम ऑफ थ्रोन्स ही टीवी मालिका यावरच आधारित आहे.
मालिकेचा आवाका प्रचंड मोठा आहे. शेकडो पात्र आहेत. एकाचवेळी अनेक ठिकाणी घडणारी ही गोष्ट साधारण २० पात्रांच्या दृष्टिकोणातून सांगितलेली आहे. लेखकानी जे विश्व उभं केलं आहे ते प्रचंड डिटेलमध्ये केल आहे. त्या जगामधल्या वेगवेगळ्या संस्कृती, त्या प्रत्येकाचे रितीरिवाज, धर्म, खाण्याच्या सवयी, पिण्याच्या सवयी, कपडे, हत्यारं हे सगळं लेखक डोळ्यासमोर उभं करतो.
गोष्टीमध्ये अर्थातच युद्ध आणि मारामार्‍या आहेत. पण युद्धाच्या आर्थिक, शारिरीक आणि सामाजिक बाजूही लेखकानी समर्थपणे मांडल्या आहेत. युद्धासाठी लागणारा पैसा, अन्न आणि त्याची कमतरता, त्यातून आयुष्यभर साथीला राहणारं अपंगत्व, युद्धावेळी आणि नंतर सामान्य माणसांची होणारी फरफट हे सगळं लेखक उभं करतो. पण कुठेही उपदेशपर किंवा प्रचारकी न वाटता.
गोष्टीमध्ये फक्त युद्ध नाहीत. वेगवेगळ्या पात्रांचं ही खोलवर दर्शन होतं. त्या पात्रांची घडण कशी झाली आहे, त्यांच्यात वेगवेगळ्या घटनांमुळे बदल कसे होतात हेही लेखकानी चितरलं आहे. मुलगी-वडील, नवरा-बायको, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण अनेक संबंध गोष्टीमध्ये दिसतात.
काही गोष्टी वादग्रस्त वाटू शकतील अशा आहेत. लैंगिक संबंधांचा मुबलक वावर आहे पूर्ण गोष्टीत. त्यातला बराच भाग हा खूप कृर वाटतो. इन्सेस्चुअल संबंधही आहेत. औरस-अनौरस संतती, अनौरसांना दिली जाणारी वागणूक हा ही अ‍ॅंगल आहे. जन्मजात श्रेष्ठ-कनिष्ठताही, लग्नांचा राजकारणात होणारा वापर हे सगळं आहे. पण त्याचवेळी काही स्ट्राँग स्त्री पात्रही आहेत.
एक विशेष आवडलेली बाब. गोष्टीची सुरुवात होते त्याआधी १५ वर्षं खूप मोठी उलथापालथ झालेली आहे. एका घराण्याची सत्ता जाऊन दुसर्‍या घराण्याची सत्ता आलेली आहे. ते सत्तांतर कसं घडलं, का घडलं, हे वाचकाला एखाद्या जिग्सॉ पझल प्रमाणे समजत जातं. वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्तीकोणातून, संवादातून वेगवेगळ्या पुस्तकात आपल्याला ते हळूहळू समजत जातं. ५व्या पुस्तकापर्यंत देखील त्या उलथापालथीचा काही भाग उलगडलेला नाही. आत्ता घडणार्‍या गोष्टीबरोबरच, आजची पाळेमुळे ज्यात आहेत त्या गोष्टीचं असं तुकड्यातुकड्यात उलगडणं छान वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आईशप्पथ!!!!! ते सगळं वाचून झालं????????????????

_/\_

मान गये बॉस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile
साडेतीन महिने लागले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नै पण तरी...इतकी पुस्तकं कंटिन्युअसलि वाचत राहणे लै त्रासदायक आहे. बॅकट्रॅकिंगचा प्राब्ळम होऊ शकतो. मी फौंडेशन सेरीज वाचलीये पण त्यातली इंडिव्हिज्युअल पुस्तकं आकाराने लहान आहेत सबब तितकी अडचण नै आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कधी कधी आधीच्या पानांमध्ये शोधाशोध करावी लागते. पण फार काही त्रास नाही होत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हम्म ओक्के.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आईशप्पथ!!!!! ते सगळं वाचून झालं????????????????

जमेल तुम्हालापण.
इथली पोप्रतिसादटाकाटाकी कमी केलीत तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

मी बॅटमॅन. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुन्हा एकदा वाचलं. बी. टॅव्हर्न अशा टोपणनावाने नावाने लिहिणार्या कुणा एका (हा बी टॅव्हर्न नक्की कोण होता हा अजूनही एक वाद आहे) लेखकाचं हे गाजलेलं पुस्तक.
तर मेक्सिकोमध्ये गोल्डरशच्या वेळी सोन्याच्या शोधात निघालेल्या तिघांची गोष्ट आहे. त्यांना नक्की सोन्याची खाण सापडते का? मग काय होतं? इ.इ.
भडक डोक्याचा डॉब्स, शांत आणि अनुभवी हॉवर्ड आणि काहीसा happy go lucky कर्टीस यांच्याबरोबर सिएरामधून आपली एक झकास सफर होते.
पण लेखकाची शैली जास्त मजा आणते. प्रस्थापित शासनव्यवस्थेबद्दल लेखकाला अढी आहे हे त्याच्या कोपरखळ्यांतून जाणवत रहातं. त्याने हे prospectors चं आयुष्य जगलेलं असावं असही कित्येक प्रसंगातल्या तपशीलांतून दिसतं. बरेचदा लेखक स्पॅनिशमधले शब्द सहज वापरून जातो (उ.दा Donkey ऐवजी burros) -आणि त्याने वर्णन अजूनच खरं वाटतं. लेखकाची शैली पाल्हाळीक आहे- बरेचदा इथली तिथली वर्णनं, गावकरी स्टाईलने तो सांगत रहातो Smile

आणि पुस्तक मिळत नसेल तर त्यावर निघालेला चित्रपटही (१९४८ मधला) पहाण्यालायक आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवधूत डोंगरेंची ही (पारितोषिक प्राप्त?) कादंबरी वाचून काय कळाले? तर नेमांडेंची शैली ढापण्याचा प्रयत्न, मूठभर शिव्या आणि प्रयत्नप्राप्त असंबद्धपणा यांनी फक्त एक आचरट फालतू कृती तयार होऊ शकते. त्या अर्थी या कादंबरीकेचे शीर्षक समर्पक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

इतिहासाविषयी मराठीत सर्वसाधारणतः ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित होतात त्यापेक्षा थोडं वेगळं आणि बरं असू शकेल असं (म.टा.त आलेला हा परिचय वाचून तरी) ह्या पुस्तकाविषयी वाटतंय -

'इतिहासातील नवे प्रवाह'
संपादक : प्रा. जास्वंदी वांबूरकर
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे.
किंमत : २९५ रु.
पृष्ठं : १८४

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://indianexpress.com/article/opinion/columns/fifth-column-old-idols-...

नेहरूंची लेगसी नेमकी काय आहे ?

तवलीन सिंग यांचा लेख. नेहरूंना व्हिलन ऑफ "इंडियाज इकॉनॉमिक स्टोरी" म्हणायला हरकत नसावी. फक्त खलपुरुष की खलनायक हा च प्रश्न उरतो.

It is not for nothing that Modi repeats often that he does not have a great “vision” for India and that he wants to concentrate on doing the “small things”. He said this most recently in the speech he made at the village of Jayapur when he went back to his constituency for the first time as Prime Minister. He talked of “small things” like the need to end foeticide, the need to celebrate the birth of a girl child, the need to help keep the village clean and the need for young people to help those who come to give children polio drops. - See more at: http://indianexpress.com/article/opinion/columns/fifth-column-old-idols-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं म्हणतात की जो चालू काळ असतो त्याचं मूल्यमापन करणं हे कठीण किंवा अतिशय निसरडं काम आहे. घडलेल्या घटनांचे पडसाद उमटल्यावर, त्यांचे परिणाम माहिती झाल्यावर त्याचं मूल्यमापन करणं सोप्पं असतं. अमेरिकन बोलीभाषेमधे "मंडे मॉर्निंग क्वार्टर बॅकिंग" असा एक शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ अमेरिकन फूटबॉल या खेळाशी संबंधित आहे. हे फूटबॉलचे सामने रविवारच्या दिवशी पूर्ण दिवसभर चालू असतात. "क्वार्टर बॅक" ही या खेळातली सर्वात महत्त्वाची पोझिशन. "मंडे मॉर्निंग क्वार्टर बॅकिंग"चा अर्थ असा की कोण कसा बरोबर किंवा कसा चुकला किंवा कुणी कसं खेळायला हवं होतं इत्यादिच्या, सोमवारी सकाळी सकाळी केलेल्या चर्चा. (थोडक्यात भारतातले लोक जे क्रिकेटबद्दल करतात तेच.) मुद्दा असा की मागाहून आपण जे काही गणित मांडतो ते सोपं असतं. चालू काळ कसा आहे, काय आहे , त्याचे परिणाम पुढे कसे होऊ शकतील याचं मूल्यमापन कठीण.

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अलिकडे वाचलेलं एक ब्लॉग पोस्ट. नव्या जुन्या सिनेमा-पुस्तकांबद्दलचा हा ब्लॉग माझा आवडता आहे.

१९७५ साली "शोले" आला आणि नंतर हिंदी सिनेमामधे त्याचं स्थान काय, त्याने काय इतिहास घडवला हे मी नव्याने सांगायला नको. आमच्या लाडक्या ब्लॉगरने हे कुठून खणून काढलं कल्पना नाही, पण चित्रपट आल्याआल्या "स्टार अँड स्टाईल" मधे त्याचं जे परीक्षण आलं होतं त्याचं कात्रण त्याने लेखात चिकटवलेलं आहे. ते कात्रण आणि त्यावरचं ब्लॉगकर्त्याचं थोडक्या नि नेमक्या शब्दांमधलं वर्णन, दोन्ही वाचनीय.

ब्लॉग पोस्टचा दुवा : Gabbar the fat lazy lout

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हेमामालिनीचा "वासंती" हा उल्लेख वाचून डॉले पानाव्ले...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रेशनच्या तांदळाचा भात तांदूळ न निवडता खाल्ला तर जितके खडे दाताखाली येतील त्याहून अधिक हे वाचताना येत होते राव. भयावह लिहिलंय. निव्वळ पहिल्या परिच्छेदामधलीच प्रस्तुत वाक्यं पहा. असाच आनंदीआनंद शेवटापर्यंत आहे. Biggrin

- "The picture does keep itself on high level "

- "Salim Javed's eternal triangle of murder-revenge-murder"

- "show the work of taking the law in one's own hands."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुसु,

असं म्हणतात की जो चालू काळ असतो त्याचं मूल्यमापन करणं हे कठीण किंवा अतिशय निसरडं काम आहे.

सहमत. हॉल ऑफ फेम (अमेरिकन फुट्बॉल, हॉकी किंवा बास्केटबॉल) मध्ये प्रवेश मिळण्यासाठी जसं ५ वर्ष थांबावं लागतं रिसेन्सी बायस होउ नये म्हणून तसंच.
अर्थात मायकेल जॉर्डन, वेन ग्रेट्झकी सारखे सन्माननीय अपवाद आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गो नी दांडेकर यांनी लिहिलेलं आत्मचरित्रात्मक पुस्तक "स्मरणगाथा".

कॉलेजजीवनामधे असताना जी अनेक आत्मचरित्रं वाचली होती त्यापैकी हेही एक. अलिकडे काही जुनी पुस्तकं आवरताना हे हाताशी लागलं. सुमारे सहाशे पानांचं पुस्तक अवचितपणे वाचूनही झालं.

लेखकाने आपल्या बालपणापासून ते तीशीला येऊन पोचेपर्यंतचा आलेख मांडलेला आहे. लहानपणीची अनेक वर्षं एका कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मणी घरात वाढलेल्या, थोड्याशा चुणचुणीत मुलाच्या आठवणींपासून पुस्तकाला सुरवात होते. या आठवणी दांडेकरांनी आपल्या रसाळ शैलीत मांडलेल्या आहेत. आणि मग १९२९ साली वयाच्या सुमारे दहाव्या-बाराव्या वर्षी ते स्वातंत्र्ययुद्धात भाग घेण्याकरता म्हणून जे घरातून पळाले ते परत आलेच नाहीत. स्वातंत्र्यचळवळीमधे उडी मारताना उरी बाळगलेलं स्वप्न फार पटकन विरलं. त्यानंतर निरनिराळ्या गावांमधे निरनिराळ्या लोकांचा आश्रय घेत घेत, नवनवे अनुभव घेत , नवनव्या गोष्टी शिकत , निरनिराळ्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन, त्यांच्या कामामधे सामील होऊन वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या त्याची ही "स्मरणगाथा". मग त्यात स्वातंत्र्यचळवळ येते, फिल्म स्टुडिओज् येतात, एखाद्या जमीनदाराकडे दत्तक जाणं येतं, गाडगेमहाराज येतात, आध्यात्मिक क्षेत्रातल्या विद्वान व्यक्ती आणि संस्था येतात, नम्मदा परिक्रमा येते, हैदराबाद संस्थानाविरुद्ध केलेली निदर्शनं, भोगलेले हाल येतात , सरतेशेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही येतो. या सर्वांचा प्रभाव येतो, त्यांनी दाखवलेली करुणा येते, त्यांच्याकडून झालेली जडणघडण येते. आणि यासर्वाबरोबरच भीक मागणं येतं, अन्नवस्त्रनिवार्‍याकरता केलेली पायपीट, बकालपण येतं. यातून आलेलं बैरागीपण येतं, संन्यस्तपण येतं. आयुष्याबद्दलची तटस्थता येते, कृतज्ञताही.

प्रस्तुत पुस्तकातल्या भाषेचा, काहीश्या कीर्तनी वाटेल अशा शैलीचा प्रभाव एक वाचक म्हणून पडला होता असं अजूनही आठवतं. आज सुमारे वीस पंचवीस वर्षांनंतरही या शैलीमुळे हे वाचन रंजन झाल्याचा अनुभव आला. अशा प्रकारचं वाचन "फॉर द ओल्ड टाईम्स सेक्" असंच असतं. मात्र आज वाचताना अनेक गोष्टी पहिल्यांदा जाणवल्या ज्या त्यावेळी जाणवल्या नव्हत्या.

ज्या घटनेने त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळं वळण लावलं ती घटना म्हणजे घरातून पळून जाणं. गांधीजींनी "एका वर्षात स्वराज्य" अशी घोषणा केली त्याने प्रेरित होऊन हा दहा-अकरा वर्षांचा मुलगा घरातून पळून गेला. या घोषणेमधलं वैयर्थ लक्षांत आल्यानंतरही तो घरी परत गेला नाही. कारण काय ? तर "एका वर्षात स्वराज्य" ही जी घोषणा केलेली होती तिचा आधार घेऊन आपल्या सवंगड्यांबरोबर "आता परत येईन ते स्वराज्य घेऊनच" असं म्हण्टल्यामुळे. मला ही कारणीमीमांसा फार विलक्षण वाटते. पळून जाण्याच्या प्रसंगाच्या आधी जे बालपणाचं वर्णन केलं आहे त्यात वडलांच्या धाकाचा, त्यांनी एका प्रसंगी पशुवत् केलेल्या मारहाणीचा, वडलांना वेड लागल्यानंतर त्यांच्याबरोबर गावातल्या लोकांसमोर केलेल्या भटकंतीचा भाग येतो. घरी परत का गेलो नाही याचं कारण जरी "शाळूसोबती हसतील म्हणून" असं दिलेलं असलं तरी न सांगितलेल्या कारणाची कुठेतरी संगती लागते. कदाचित इतक्या वर्षांनी त्यांनी स्वतःकडेच हे कारण बिंबवलं असेल आणि तसंच लिखाणातूनही आलेलं असेल.

दुसरा मुद्दा ईश्वरी शक्ती, धर्म, परमार्थ , आध्यात्मिकता या गोष्टींबद्दलचा. इतके वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतल्यावर, इतकी वेगवेगळी माणसं पाहिल्यावर, त्यांपैकी काहींच्या क्रौर्याचा, वंचनेचा, क्वचित् प्रसंगी पशुवत् वाटेल अशा प्रवृत्तींचा अनुभव घेतल्यावरही दांडेकरांचा मूळ पिंड पारमार्थिक राहिला. धर्मावरची श्रद्धा अढळ राहिली इतकंच नव्हे तर संघासारख्या संस्थेत काही वर्षं काढण्याइतपत - आणि काढल्यानंतर - ते बहुदा, आता ज्याला हिंदुत्ववादी म्हणतात तसे झाले असावेत. राष्ट्र, धर्म, परमार्थ, पारलौकिक अस्तित्त्व या सगळ्यांवरच्या श्रद्धा अभंग कशा काय राहिल्या असतील ? कदाचित ते असं काहीसं रसाळ भाषेतलं रंजक पुस्तक लिहू शकले कारण सिनिसिझमचं अंग त्यांना नव्हतंच काय ?

असो. पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचनीय आहे. एखाद्या माणसाच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक मतांशी विशेष कसलीही सहमती नसतानासुद्धा, त्याचे अनुभव सच्चे असतील तर त्याच्या लिखाणाशी एकरूप होता येतं याचं , माझ्यालेखी एक उत्तम उदाहरण आहे.

पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७४ची आहे. मॅजेस्टिक प्रकाशन. पुस्तकाला त्या वर्षीचं मराठी भाषेतल्या चरित्र/आत्मचरित्र या विभागाचं साहित्य अकादेमी पारितोषिक मिळालेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

विल्यम डर्लिम्पल(जयपूर लिट्ररी फेस्टिवलवाला)ची पुस्तके कोणी वाचली आहेत का ?आता त्याचा फैन झालो आहे. .सिटि {दिल्ली}अव जिन्स कुठे सापडतं का बघतोय. नाईन लाइवज मध्ये नऊ पंथातील एकेकाची आयुष्यरेखा दिली आहे त्यांच्या श्रध्देवर तुलनात्मक मुल्यमापनाचं भाष्य केलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिटी ऑफ जिन्स चांगलं आहे - पहिल्यांदा वाचलं तेव्हा दिल्लीतच राहात होते, आणि प्रत्येक विकेंडला पुस्तकातल्या एका स्थळाला भेट देण्यात खूप मजा आली. त्यापेक्षा प्रवासवर्णन-इतिहासाचे सुखद मिश्रण फ्रॉम द होली माऊंटन मधे आहे. लास्ट मुघल पुस्तकही अत्यंत वाचनीय आहे. मला डॅलरिम्पल ची स्वत:च्या पुस्तकांच्या प्रचाराची शैली आवडत नाही, मुलाखतीत वगैरे प्रचंड सरसकटीकरण करतो, पण मुळात पुस्तकं चांगली आहेत. त्याचे सर्वात पहिले पुस्तक - इन झानाडू हे भन्नाट विनोदी प्रवासवर्णन आहे. लास्ट मुघल नंतरची पुस्तकं मी वाचली नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'इन झानाडू'बद्दल सहमत आहे. लेखक कॉलेजात असताना मार्को पोलोच्या जेरुसलेम ते झानाडू (चीन) असा केलेला प्रवास, self-deprecating म्हणता यावी अशी विनोदबुद्धी आणि मार्को पोलोच्या 'ट्रॅव्हल्स्' पुस्तकातले काही अंश यामुळे पुस्तक वाचनीय झालं आहे.

अवांतर - 'गौरवर्णीय वा श्रीमंत प्रवाशांपुढे भारतातल्या सेवकवर्गाची आतिथ्यशीलता कधी कधी जशी लाचार खुशामतीकडे झुकते, तसा अनुभव पाकिस्तानात कधी आला नाही.', हे या पुस्तकातलं त्याचं निरीक्षण लक्षात राहिलं आहे. [पण त्यावर अधिक चर्चा कृपया या धाग्यावर नको.]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेल्फ डेप्रेकेशन काय ते त्याच पुस्तकात आहे -:पुढे नको नको तितके सेल्फ-प्रमोशनच झालेले आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Best books of 2014 - by Lorien Kite, THE FINANCIAL TIMES, London

यात अनेक अर्थशास्त्रासंबंधित पुस्तकांची माहीती आहे. परंतु नंतर इतिहास, राजकारण, कला, चित्रपट्/रंगभूमी, क्लासिकल, पॉप, फॅशन/स्टाईल, क्रीडा, खाद्य"संस्कृति", सायन्स फिक्शन याबद्दलची सुद्धा पुस्तके लिस्ट केलेली आहेत.

---------------------

वेगळ्या विषयाबद्दल .....

Why couples move for a man’s job, but not a woman’s

A body of established research suggests that when two-earner couples move for job reasons, it’s usually for the sake of the husband’s career. It often hurts the wife’s work ambitions and her paycheck. And it typically strains the marriage.

Some academics suggest the “trailing spouse” phenomenon is based on traditionally-accepted gender roles, in which the husband’s career takes priority. Others conclude that that it happens for practical reasons that have to do with a man’s greater earning potential. It’s his job that will lead to greater gains in household income, so it’s his job that takes precedent, or that's the way the thinking goes.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाईट मुघल्स आणि लास्ट मुघल दोन्ही पुस्तके शंभर शंभर रुपयात आतल्या चित्रांसह मिळाली. त्याकाळी ब्रिटिश काय करत होते यावर उजेड पडला पुस्तकांतली श्रेयनामावली पाहता लेखक किती कष्ट घेतो /घेतात हे कळते. आता झानाडूही शोधतो.
खुशवंतसिंगाचेही डेल्ही वाचले त्याचे सिखिझमचे दोन भाग लगेच विकत घ्यायला हवे होते नंतर पुस्तकवाला निघून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spectator books of the year lists.

यात सगळ्याप्रकारच्या पुस्तकांबद्दल आहे. २०१४ मधल्या.

---------

Guardian writers pick best books of 2014.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. "What You Want, or the Pursuit of Happiness by Constantine Phipps " चांगले वाटते आहे.
या पुस्तकावरचे काही दुवे वाचले/ऐकले-
https://www.youtube.com/watch?v=Xf5Zqsi7bxI
http://www.telegraph.co.uk/culture/books/bookreviews/10846820/What-You-W...
http://www.yorkshirepost.co.uk/yorkshire-living/arts/books/novel-in-vers...

पुस्तक रोचक वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेल्फ प्रमो॰ कोणत्या पुस्तकात आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रक्तरेखा संपविल्यावर आता शशी भागवत यांचे "रत्नप्रतिमा" हाती घेतले आहे. वाचन ओघवते चाललेले आहे. दोन्ही पुस्तके फार रोचक आहेत. विशेषतः प्रहेलिका, पूलिका वगैरे संस्कृत शब्दांमुळे एक मस्त वातावरणनिर्मीती झालेली आहे.
___
रत्नप्रतिमा काल वाचून झाले. बराच गुंतागुंतीचा प्लॉट आहे. बरीच कारस्थानी, कपटी पात्रे आहेत मात्र व्यक्तीचित्रण हे या कादंबरीचे बलस्थान म्हणता येणार नाही. रहस्य शेवटाला जवळजवळ लक्षात येऊ लागते तेव्हा रहस्य राखण्यात मला तरी वाटतं शशी भागवत यशस्वी झाले आहेत. शेवट फार गोड आहे कोणालाच मारलं नाहीये. ओढून ताणून सगळे भेटतात अन गोग्गोड मिलाप होतो टाइप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंग्रजी विकिपीडियावर लिगल सोशलायझेशन या लेखावर काम करण्यासाठी गूगलताना डॉ. मोहम्मद वसीम नावाच्या एका पाकीस्तानी (लाहोर विद्यापीठ) प्राध्यापकाची तेथील जंग दैनिका आलेली, पाकीस्तानी मुलतत्ववादाचे स्वरूप विशद करणारी रोचक मुलाखात वाचण्यात आली. पाकिस्तान आणि मुलतत्ववाद आणि संबंधीत बातम्यात तसे काही नवे नाही. पण पाकीस्तानातील लिबरल दृष्टीकोणातून झालेली चिकित्सा कमी वाचण्यात येते. मुलाखात तशी जुनी २०१२ ची असावी पण तरीही रोचक वाटली. पाकिस्तानातील घडामोडींवर लक्ष ठेऊ इच्छिणार्‍यांना वाचण्यासाठी उपयूक्त वाटेल असे वाटते.

डॉ. मोहम्मद वसीम यांची मुलाखत दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

The Economist picks best books of the year, a good list.

विज्ञान, संस्कृति, पर्यटन, राजकारण - असे विविध विषय व त्यातील उत्तमोत्तम पुस्तके - २०१४ मधील - साप्ताहिक इकॉनॉमिस्ट तर्फे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

LynnTwist यांचे The Soul of Money" एकदा वाचले होते ते परत वाचावयास सुरुवात केली आहे. पहीली २ प्रकरणे झालेली आहेत अन यात पैशाचा मानवी जीवनावरील समग्र प्रभाव वेधकपणे मांडलेला आहे.
______
प्रत्येक व्यक्तीस "पैसा" या विषयात रुची असते. अन जवळजवळ प्रत्येक व्यक्तीस ही भीती केव्हा ना केव्हा तरी ग्रासतेच की जर त्याच्याजवळचे पैसे संपले किंवा त्याला पैशाची कमतरता भासली तर? प्रत्येकाचेच पैशाशी व्यामिश्र नाते असते. काहीजण स्वतःशीच सर्रास ढोंग म्हणा बतावणी करतात की त्यांना पैशात रस नाही, पैसा ही एक तुच्छ बाब आहे. पण हे ढोंग दुबळे असते, वरवरचे असते ती स्वतःशीच केलेली प्रतारणा किंवा पैसा या विषयापासूनची ती पळवाट असते. अनेक जण तर सर्रास पैशालाच देव मानून त्याच्यामागे धावतात, वर सांगीतल्याप्रमाणे अनेकांना किंबहुना सर्वांना अतिशय असुरक्षित वाटते. काही का नाते असेना पैशाशी प्रत्येकाचे नाते व्यामिश्र असते. Smile
पैसा हे मानवनिर्मीत साधन आता जवळजवळ मानवी मूल्ये तसेच मानवी आनंदाचा ग्रास करु पहाणारा राक्षस बनला आहे. एकमेकांबरोबरच पैशाची स्पर्धा करण्यात समय व्यतित होत आहे. पैसा हे व्यक्तीचे मूल्य जोखण्याचे, लायकी मापण्याचे १००% साधन बनून गेले आहे.
Money is the most universally motivating mischievous, miraculous,maligned & misunderstood part of human life.
_________

हे पुस्तक पूर्वी वाचले होते तेव्हा वेधक वाटले होते स्पेशली पैसा अन आपण किती क्लिष्ट रीतीने, मानसिक व सबकॉन्शस पातळीवर गुंतागुंतीने गुंफलेले आहोत, जुडलेले आहोत याच्यावर लेखिकेने, फार नीट प्रकाश पाडलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A must read.Very enjoyable book. ५/५


______________________

कोणाच्या तरी सांगण्यावरुन, अजुन एक पुस्तक "फ्रेन्ड्शिप अन एक्स्पोझे" (Friendship: An Expose: Joseph Epstein) काल वाचायला घेतले. ओह माय गॉड!!! अप्रतिम पुस्तक आहे. अ-प्र-तिम!!
मैत्र या विषयावर सखोल उहापोह, अगदी उदाहरणां- तर्कासहीत आलेले आहे. निव्वळ परिचीत, मित्र, घनिष्ठ मित्र, Foxhole-friends, fair-weather friends नाना प्रकारचे मैत्रीचे प्रकार, जीवनातील त्याचे स्थान अतिशय सुंदर इंग्रजी भाषेत वर्णिले आहे.
रक्ताच्या नात्याच्या Vs मैत्रीच्या मर्यादा, बलस्थाने - एकदम झक्कास बोले तो चोक्कस पुस्तक छे|
पहीली ४ प्रकरणं तर खाली न ठेवता वाचून झाली आहेत. आत्ता हे लिहीतानाही त्या पुस्तकाचा विरह जाणवतो आहे. तुटुन पडावं असं पुस्तक आहे. Smile
___
मैत्रीची व्याख्या ही फार अस्पष्ट अन धूसर आहे हे पहील्या वाक्यालाच मान्य करुन, पुढे लेखकाने मैत्रीची व्याख्या किंवा रुपरेखा ठरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तीसर्‍या प्रकरणात लेखकाच्या अतिशय प्रिय मित्राचे व्यक्तीचित्रण व त्यांच्या नात्याचे डायनॅमिक्स मस्त रंगविले आहेत. बर्‍याच ठीकाणी त्याच्या माणूसघाण्या/ रिझर्वड स्वभावामुळे चुकलेल्या मैत्रीबद्दल लेखकाला वाटणारी गुन्हेगारी भावनाही प्रकट झालेली आहे.
_________
मला पुढील वाक्य फार फार आवडलं - Friendship suggests that two people have not exhausted the delight they take in each other. यातील "delight" हा शब्द केवळ थोरच.
____
"foxhole" अर्थात सैनिकी/मिलिटरी टर्म आहे. कोणते लोक संकटकाळी धैर्य दाखवू शकतात अन ते लेखकाच्या मैत्रीच्या शिडीवर कोठे पदस्थित आहेत, या संदर्भातील ही वाक्य मननिय वाटले-

I know ppl whom I want in foxhole but whom I do not consider close friends or even friends at all.

And I have friends, good friends, whom I would not want anywhere near my foxhole, because courage & loyalty under pressure aren't things for which I would ever count on them, though they have other excellent qualities.
_________
मध्ये एकदा "अ‍ॅरिस्टॉटल" चा संदर्भ येतो की मैत्री करण्यासाठी व्यक्तीचे स्वतःवर प्रेम (उथळ नव्हे तर सखोल ओळख अन प्रेम) असणे आवश्यक असते अन स्वतःवर प्रेम करण्याकरता त्या व्यक्तीने एक "चांगला" भूतकाळ जगलेला आवश्यक असतो की ज्या भूतकाळाकडे वळून पाहताना त्या व्यक्तीस अभिमान वाटेल, बरे वाटेल.
_____
अन एवढं चिंतन करुनही लेखकाचे हे म्हणणे आहे की, पुस्तक लिहीतेवेळी, "मैत्री" या नात्याला समाजमनात, जे अति आदर्श उच्चासन दिलेले आहे, त्या उच्चासनावरुन तिला पदच्युत करण्याचा त्याचा मानस नव्हता अन तरीही "व्यावहारीक व निष्पक्ष व ऑब्जेक्टिव्ह" दृष्टीकोनामुळे तसे झालेले आहे अर्थात या पुस्तकामुळे "मैत्री" चे ग्लॅमर काही अंशी उणावले आहे. पण पुस्तक सुरु करतेवेळी तसा मानस नव्हता.
____
एक संपूर्ण प्रकरण "स्त्रिया-स्त्रियांमधील" मैत्रीस वाहीलेले आहे. या प्रकरणात, अनेक संशोधन तसेच अनेक मातब्बर मानसशास्त्रज्ञ आदिंच्या मतांची दखल घेऊन काही विधाने केलेली आहेत. परंतु कोठेही लेखकाने, त्या विधानांचा मालकीहक्क (ओनरशिप) स्वीकारलेला नाही.
उदा - (१) स्त्रिया संभाषण हे मुख्यतः समोरच्या व्यक्तीला बरे वाटावे (stroking) या दृष्टीकोनातून करता. याउलट पुरुष हे समोरच्याला हरवून, स्वतः जेते होण्यासाठी मुख्यत्वे संभाषण करतात.
(२) स्त्रिया लवकर ओपन अप होतात, पुरुष एकमेकांत सहसा ओपन अप होतच नाहीत अन थोडेफार झालेच तर स्त्रियांशी बोलताना होतात.
(३) अनेकदा पुरषांकडून ज्या सहानुभूती, ओलावा आदि गोष्टी मिळत नाही त्या स्त्रियांना एकमेकींच्या सहवासात मिळतात व त्यातून त्यांची घनिष्ठ व "symbiotic" मैत्री उमलते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाट हा हमीद दलवाई यांचा कथासंग्रह वाचला. वास्तव समोर ठेवणार्‍या उत्तम कथा. काहींमध्ये 'हमीद' हेच लेखक पात्र आहे....त्या कथा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किती बेतल्या आहेत किंवा पूर्णच बेतलेल्या आहेत की काल्पनिक आहेत हे त्यांच्या विषयी माहिती नसल्यामुळे कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टॉम मर्फी या युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये शिकवणार्‍या भौतिकशास्त्रज्ञाचा ब्लॉग वाचण्यात आला.
आपल्या लो-एनर्जी भविष्याबद्दलचा हा लेख उद्बोधक वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेचर न्यूज मधला हा लेख वाचला
अरूण जोशींना कदाचित आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वुल्फ टोटेमबद्दल किरण लिमये यांच्या ब्लॉगवर वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काँग्रेस- राष्ट्रवादीचे पानीपत होईल असा भाबडा आशावाद बाळगणार्‍यांनी हा लेख मुद्दाम वाचावा. असे होणार नाहीच असे नाही, पण असे का होऊ शकणार नाही याचे कुबेरांनी केलेले विश्लेषण रंजक आहे.

हे विश्लेषण वाचायला मिळेल काय कुठे?

http://epaper.loksatta.com/338289/loksatta-pune/14-09-2014#page/16/2
इथे वाचता येईल. एक माणूस असा पर्याय नसताना देखील आघाडीची धूळधाण झालीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिपा वरती अतिवास ने सुरू केलेली 'भीतीच्या भिंती' ही लेखमाला वाचतोय. रोचक आहेत अनुभव. मला अफगाणिस्तानाबद्दल (किंवा इतर आखाती देशांबद्दल) वाचायला नेहमीच आवडतं. अफगाण बद्दलचे अनुभव अ-अफगाणियांकडून ह्या आधीही वाचले/ऐकले आहेत. अर्थात हे अनुभव आतापर्यंत पत्रकार, लेखक ह्यांच्याच कडून ऐकले/वाचले आहेत त्यामुळे त्याला एक 'पुस्तकी' बाज होता. पण तिथले रहिवासी नसूनही एक सामान्य/दैनंदिन जीवन जगताना काय अनुभव असतात ('असतील' असेच म्हणावे लागेल कारण अजून लेखमाला तिथल्या तिच्या दैनंदिन जीवनापर्यंत पोहचली नाहीये) हे आतिवास च्या चष्म्यातून वाचताना एक वेगळी मजा येते आहे Smile

भाग १ - http://misalpav.com/node/29674
भाग २ - http://misalpav.com/node/29728
भाग ३ - http://misalpav.com/node/29856

भाग ३ च्या शेवटी मधे क्रमशः आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार. चांगली लेखमाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिंकांबद्दल थँक्यू.
छान आहे ते. एस्पेशली १ आणि २.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिंकांबद्दल थँक्यू.
छान आहे ते. एस्पेशली १ आणि २.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*होय लेखमाला भीतीच्या -छानच आहे
*मराठीतले नवे लक्षवेधी लेखक कोण आहेत
*आबा यांच्या नोंदीत गुरुवार 18/12/2014 हा 'गुरुवार' कसा आला Thu कसा आला नाही?
*मराठी वाङमयातील अनमोल रत्ने पंधरा वर्षाँपूर्वी वाचलेले थोडे आठवतंय कोणी लिहिले आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*आबा यांच्या नोंदीत गुरुवार 18/12/2014 हा 'गुरुवार' कसा आला Thu कसा आला नाही?

आधी पाहिलेच नव्हते. आता पाहिले तर Thu कुठेच दिसत नाही आहे. बाकीच्या धाग्यांवरही गुरुवारच दिसते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. बदल केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जयवंत दळवी लिखित "सारे प्रवासी घडीचे" इबुक नुकतेच बुकगंगा.कॉम वरून विकत घेवून वाचत आहे . १०० वर्षापूर्वीच्या कोकणी ग्रामीण जीवनाच्या अतिशय हॄद्य आठवणी!

अतिशय आवडले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Mandar Katre

जयवंत दळवींची सर्वच पुस्तके चांगली आहेत. उगाचच वरून काटेरी आतून रसाळ गोमटी छाप गोग्गोड लिखाण केलेले नाही. इंग्रजीत हेच लेखक असते तर कायमचे best seller झाले असते 'लेखकाचे घर' वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0