पर्सनल फायनान्स - भाग ६ - माहिती मिळवणे

गेल्या आठवड्यात लेख लिहू शकलो नाही, म्हणून क्षमस्व.

आपल्याला आर्थिक आयुष्यात स्वावलंबी व्ह्यायचे असेल, तर काही-काही गोष्टी स्वतःलाच शिकाव्या लागतात. काही गोष्टी आपण इतरांकडून ऐकून शिकतो, काही पुस्तके वाचून शिकतो तर काही इतरांच्या किंवा स्वत:च्या अनुभवातून शिकतो. बर्‍याचदा कोणावर विश्वास टाकायचा ते कळत नाही आणि दुसर्‍यावर विश्वास ठेऊन चूक झाली तर नुकसान आपलेच होते. म्हणून फायनान्सच्या बेसिक गोष्टी माहित असणे, फार महत्वाचे आहे. लक्षात ठेवा: Others may love your money, but nobody cares for your money as much you do. म्हणून स्वतःची financial literacy फार महत्वाची आहे. त्यामुळे काही साध्या गोष्टींबद्दल सोपी माहिती असणे महत्वाचे ठरते.

१. ऑपोर्च्युनिटी कॉस्ट:
साधारणतः आपल्याला गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, पण आपल्याकडे असणार्‍या लिमिटेड पैशामुळे आपण निर्णय घेतो की पैसे इथे गुंतवूया, पण तिथे नको. यामुळे आपले जे नुकसान होते, त्याला म्हणतात ऑपोर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे समजा, तुम्ही सोन्यात पैसे गुंतवले आणि १ वर्षात सोन्याचा भाव वाढला १०% आणि त्याच १ वर्षात स्टॉक मार्केट वर गेले १५%. म्हणजे तुम्ही स्टॉकऐवजी सोन्यात पैसे गुंतवल्याने १५-१०=५% झाली तुमची ऑपोर्च्युनिटी कॉस्ट.

२. इन्फ्लेशन:
दर वर्षी भाववाढ होते, ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ही वाढ वस्तू तसेच सर्व्हिसेसच्या किमतीत होते. उदा: न्हावी केस कापायला ५० रुपयांऐवजी ५५ रुपये घेतो, दूध १५% महाग होते, रेल्वेचे तिकीट अजून वाढते इत्यादी. भाववाढ झाल्याने आपल्या पैशांची क्षमता (purchasing power) कमी-कमी होत जाते. म्हणून आपल्या गुंतवणुकीवर परतावा किमान इन्फ्लेशनच्या दराइतका तरी हवा, नाहीतर आपल्याला पैसे पुरणार नाहीत आणि रहाणीमान घटवावे लागेल.

३. टॅक्स
कुठलीही गुंतवणूक फायद्यात विकली तर ती इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जाहीर करावी लागते आणि सरकार लगेच फायद्यावर टॅक्स कापून घेते. (सोने वगैरे जाहीर केले नाही इ. अपवाद असेल, मला माहीत नाही). त्यामुळे टॅक्स हा आपला फायदा कमी करतो. म्हणून after-tax किती पैसे आपल्या खिशात राहातात, ते बघणे महत्वाचे आहे. होणारा फायदा लाँग-टर्म आहे की शॉर्ट-टर्म, तुमची या वर्षाची टॅक्स पातळी, झालेला फायदा पुनर्गुंतवणूक (reinvestment) करून पुढे ढकलता येईल का? याचा विचार करणे जरुरीचे ठरते. त्यामुळे टॅक्सबद्दल जुजबी का होईना, पण माहिती असणे अत्यावश्यक आहे.

४. इंटरेस्ट रेट रिस्क
याचा परिणाम मुख्यत्वे बाँडहोल्डर्सवर जास्त होतो. इंटरेस्ट रेट वाढले की साधारणतः बाँडच्या किमती घसरतात आणि कमी झाले की किमती वाढतात. याचा परिणाम थोडा बोथट करण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या कालावधीचे बाँड ठेवणे चांगले.

५. करन्सी रिस्क
जेव्हा तुम्ही परदेशात गुंतवणूक करता, तेव्हा तुम्हाला करन्सी रिस्क असते कारण त्या दोन देशांमधील करन्सीचा विनिमय दर बदलू शकतो. उदा: समजा, मी १ डॉलरला ५५ रुपये दराने भारतात १००० डॉलर (५५,००० रुपये) वार्षिक १०% टक्के व्याजाने गुंतवले कारण अमेरिकेत व्याजदर ३% आहे. वर्षाअखेर त्याचे ५५,००० + ५,५०० = ६०,५०० रुपये होतील. पण समजा तोपर्यंत करन्सी दर १ डॉलरला ६५ रुपये झाला, तर मला ६०,५०० रुपयांचे फक्त ९३०.७७ डॉलर मिळतील. म्हणजे माझा फायदा १० टक्के होणार नाही, उलट नुकसानच होईल. Essentially, this means that if you are carrying currency risk, meaning your portfolio is not hedged against currency fluctuations, you are carrying a needless risk. स्टॉक मार्केटमध्येसुद्धा ADR मध्ये गुंतवणूक करत असाल, तर करन्सी रिस्क लक्षात ठेवा.
करन्सी ट्रेडिंग सोपे आणि फायद्याचे आहे, असे सांगणारे आणि करणारे बरेच जण असतात, तरी त्यातील रिस्क समजून घ्या. Academic studies of currency risk suggest - although without absolute certainty - that investors bearing currency risk are not compensated with higher potential returns, meaning it is essentially a needless risk to bear.

- माहिती कुठून मिळवायची
चांगली पुस्तके:

  • Fundamental Analysis for Investors by Raghu Palat
  • Random Walk Down Wall Street: The Time-Tested Strategy for Successful Investing by Burton Malkiel
  • Stocks for the Long Run by Jeremy Siegel
  • The Millionaire Mind by Thomas Stanley
  • Personal Finance for Dummies by Eric Tyson
  • If you are cluless about Accounting and Finance by Seth Godin
  • Four Pillars of Investing by William Bernstein
  • Little Book of Common Sense Investing by John Bogle
  • Fundamental Analysis for Dummies by Matt Krantz
  • Intelligent Investor by Benjamin Graham

- कोणावर विश्वास टाकायचा

  • माझ्या मते फक्त स्वतःवरच. इतर कोणावरही नाही. अगदी मी म्हणतोय म्हणून माझ्यावरही नाही.
  • A public-opinion poll is no substitute for thought.
  • कधी-कधी काय होते की आपला पोर्टफोलिओ सांभाळायला तितका वेळ नसतो किंवा आवड नसते. अशा वेळी बरेचसे सल्लागार तुम्हाला "मदत करायला आणि तुमचे भले करायला" तयार असतात. साधारणतः रिकमेंडेशनमुळे सल्लागार निवडला जातो जो मित्र/मैत्रिण किंवा नातेवाईक असतो. माझ्या मते आर्थिक गोष्टी या मैत्री आणि नातेसंबंधापासून दूर ठेवणेच चांगले. सल्लागार हा fee-only च असावा आणि शक्यतो CFP असावा, असे माझे मत आहे. मोठ्या-मोठ्या बँका सुद्धा केवळ कमिशन मिळवण्यासाठी फसवू शकतात. (3.6 कोटी गुंतवणूकीवर ८३ लाख लॉसची ही एक केस बघा.)

- सावध कसे राहायचे

  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलाही निर्णय भावनेच्या भरात किंवा तातडीने घेऊ नका. थोडा विचार करायला वेळ घ्या. If it is too good to be true, it probably is.
  • शक्यतो ज्या क्षेत्रात तुम्हाला पुरेशी माहिती आहे, तिथेच गुंतवणूक करा.
  • एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करायची असेल, तर आधी जमेल तेव्हडी माहिती करून घ्या आणि तुमचा सल्लागार कोण आहे आणि त्यात त्याचा काय फायदा आहे, ते लक्षात घ्या.
  • वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर You only have to do a very few things right in your life so long as you don't do too many things wrong.

तुम्हाला हा भाग कंटाळवाणा वाटण्याची शक्यता आहे कारण यात काय करावे/काय करू नये, असे काहीच सांगितलेले नाही आणि बहुतेकांना त्यातच जास्त इंटरेस्ट असतो. पण माझा मूळ उद्देश आहे की पर्सनल फायनान्सबद्दल प्रत्येकाने/प्रत्येकीने हा असा विचार स्वतःच करायला शिकले पाहिजे.
आपण आयुष्यात काय-काय चुका केल्या, कसे-कसे शिकलो हे जर प्रतिसादात लिहिलेत तर उत्तम. म्हणजे एकमेकांना शिकता येईल. रूझवेल्टने म्हटलेच आहे: Learn from the mistakes of others. You can’t live long enough to make them all yourself.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

मी कॉलेजमधून पास झाल्यावर नोकरीला लागलो. तेव्हा भरपूर पगार आणि कमी खर्च यामुळे पैसे शिल्लक राहात असत. त्यामुळे लगेच मी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागलो. भांडवल सुरक्षित ठेऊन फायदा करून घेणे, हा नेहमीच उद्देश होता. त्यामुळे सुरुवातीला मी बहुतेक ब्लू-चिप कंपनीचे स्टॉक्स विकत घेत असे. पण मला न आवडणारी गोष्ट म्हणजे तेव्हा २-३% ब्रोकर कमिशन होते, शिवाय ट्रान्सफर फी वगैरे खर्च असत. शिवाय स्टॉक विकताना ब्रोकर नेहमी Day-High दराने मला स्टॉ़क विकत असे, पण मी विकताना मात्र Day-Low दराने पैसे देत असे. त्याच्यामुळे केवळ ब्रेकइव्हनसाठी मला किमान १०% फायदा लागत असे.

माझा मित्र तेव्हा Stock Holding Corporation of India Ltd (SCHIL) कंपनीत नोकरीला लागला होता. त्याच्याकडून मग अजून माहिती मिळवली. तेव्हा स्टॉक कसा निवडावा याची माहिती फारशी उपलब्ध न्हवती. मला एकदा रघु पालट या लेखकाचे पुस्तक मिळाले, ज्यात माहिती होती की स्टॉकबद्दल अभ्यास कसा करावा. त्या पुस्तकाचा खूप फायदा झाला. टाइम्स ऑफ इंडियात तेव्हा १ लेखक (आता नाव विसरलो) स्टॉक अ‍ॅनॅलिसिसवर लेख लिहित असे. तो बहुतेक स्टॉकना शिव्याच घालत असे, पण क्वचित कधीतरी एखादा स्टॉक "बरा आहे" असे म्हणत असे. की मी लगेच तो स्टॉक घ्यायचो. ही पद्धत चुकीची होती, ते आता कळतंय, पण माझा खूप फायदा करून दिला त्या लेखकाने. का माहीत नाही, पण एकंदरीत स्टॉक किंवा सिनेमाला शिव्या घालणारे लेखक मला जास्त आवडत. Smile म्हणून खलिद मोहंमदची चित्रपट परिक्षणे मी आवडीने वाचायचो आणि जर कधी सिनेमा बरा आहे, असं तो म्हणाला, तर नक्की बघायचो. योगायोगाने, ही सगळी वर्ष स्टॉक मार्केट तेजीत होते, त्यामुळे आपले पैसे बुडू शकतात ते कळलेच नाही. नंतर मी माझे सगळे स्टॉक विकून जागा घेतली आणि नंतर लगेच मार्केट गडगडले, तेव्हा समजले की इथे नशिबाची साथ खूप महत्वाची आहे.

अमेरिकेत आलो तेव्हा इथली पद्धत शिकायला थोडा वेळ लागला, पण इथे इंटरनेटमुळे मुबलक माहिती उपलब्ध आहे. पण त्यातले खरे काय आणि खोटे काय ते शिकायला वेळ लागला. माझा १ मित्र आधीपासून इथे होता, त्याने मला DRIP बद्दल माहिती सांगितली आणि मी लगेच ती गुंतवणूक सुरू केली. मग योगायोगाने, मॉर्निंगस्टार वेबसाइटवर असलेल्या Bogleheads या फोरमचा मला शोध लागला. त्यात कुणीतरी सांगितलेल्या माहितीप्रमाणे नंतर मी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये जोनाथन क्लेमेंटचे Getting Going हे लेख वाचू लागलो, ज्याचा खूप फायदा झाला.

मग मी गुंतवणूक करण्यासाठी माझी स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवली. कंपनी कितीही सेक्सी वाटली, तरी प्रॉफिटेबल नसेल तर मी त्यात पैसे गुंतवत नाही. मी मार्केटमध्ये इमोशन्स काढून टाकले आहेत, त्यामुळे नेहमी विशिष्ट रक्कमच गुंतवतो. त्यामुळे स्टॉक वर गेला तर अरेरे, अजून का नाही गुंतवले याचे दु:ख होत नाही आणि स्टॉक पडला तर पैसे बुडले याचे दु:खही होत नाही. २००० च्या आसपास डॉट कॉम बबलमुळे लोकांचे खूप नुकसान झाले, पण माझ्या टेंपरमेंटमुळे माझे विशेष नुकसान झाले नाही आणि प्रत्येक निर्णय मी स्वतः विचार करून घेतल्यामुळे केवळ मीच जबाबदार ठरलो. पुढे मग मी माझीच स्ट्रॅटेजी सुधारत गेलो आणि आताही मी तीच वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला हा भाग कंटाळवाणा वाटण्याची शक्यता आहे

अजिबात नाही. उलट आवडला. काही नवीन गोष्टी कळाल्या.

तुम्ही लिहीलेल्या पुस्तकांच्या नावे आधी पण ऐकली आहेत, पण या अशा विषयात जास्तीत जास्त १५-२० मिनिटात संपणार्‍या लेखापेक्षा जास्त गहन वाचायचा पेशन्स नसल्याने "एकदा नक्की वाचू" या सदराखाली फक्त जमवून ठेवली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

उत्तम लेखन!
लेखमाला छान चालु आहे. दरवेळी प्रतिसाद देण्यासारखं काहि असेलच असे नाही मात्र आवडीने वाचतो आहोत. लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा भागदेखील उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला चांगल्या दिशेने जात आहे. मी घेतांना काही वेगळ्या लेखकांची पुस्तके घेतलेली.
the thoughtful investor - basant maheshwari
value investing and behavioral finance by parag parikh
the neatest little guide to stock market investing-Jason Kelly
one up on wall street, Beating the Street - Peter Lynch
आणि यादीत दिलेली रँडम वॉक आणि इंटॅलिजंट इन्वेस्टर.

वर दिलेल्यातली बाकीची आता मिळवतो. फिलिप फिशर आणि विल्यम ओ निल यांच्या पुस्तकांबद्दल बरच ऐकलं आहे ती पण आत्ता विशलिस्टमध्ये आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हॅल्यु इन्व्हेस्टिंग बद्दल हे पुस्तक मस्त आहे असे ऐकुन आहे - http://www.amazon.com/Value-Investing-Graham-Buffett-Beyond/dp/047146339...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द इंटेलिजंट इन्वेस्टर
रिच डॅड, पुअर डॅड
युअर मनी ऑर युअर लाईफ

ही तीन पुस्तके मी संग्रही ठेवली आहेत. मॉर्गिंगस्टार आणि व्हॅल्यू रिसर्च ही संकेतस्थळे भारतातील पर्सनल फायनान्ससंबंधी (इन्शुरन्स-म्युच्युअल फंड-रिटायरमेंट) बरीच चांगली माहिती देतात. बिझनेस लाईन वर्तमानपत्रातील रविवारची पुरवणी चांगली असते. इतपत माहिती पुरेशी वाटते. सुंदर शंकरन या लेखकाचे भारतील म्युच्युअल फंडांसंबंधी हे एक चांगले पुस्तक मी वाचले होते. निव्वळ म्युच्युअल फंडांच्या (भारतासंदर्भातील) माहितीसाठी अत्यंत रेकमेंडेड पुस्तक.

बाकी मनीकंट्रोल, इकॉनॉमिक टाईम्स वगैरे प्रकार निव्वळ कचरा आहेत असे स्पष्ट मत आहे. तिकडे जाऊ नका.

'लोकसत्ता'मध्ये काही वर्षांपूर्वी अर्थवृत्तांत (की अर्थसत्ता?) पुरवणीत महाराष्ट्र बँकेचे माजी अध्यक्ष वसंत पटवर्धन यांचे चांगले लेख येत असत. त्यांचे स्टॉक रेकमेंडेशन काहीवेळा गंडलेले असायचे पण बरीच चांगली माहिती सोप्या भाषेत देत असत. पुण्यात काही ठिकाणी त्यांनी मोफत कार्यशाळा घेतल्या होत्या. मी दोन कार्यशाळा अटेंड केल्या होत्या. त्याचा बराच फायदा झाला. (एक कार्यशाळा स्टॉक मार्केट पाचसहा टक्क्यांनी गडगडल्याच्या - व नोमुरा वगैरे संस्थांनी भारताचे बेअर मार्केट सुरु झाल्याची जोरदार आवई उठवल्याच्या - दिवशीच झाली होती असे आठवते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रिच डॅड, पुअर डॅड"चे नाव इथे वाचून आश्चर्य वाटले. जॉन रीड याने या पुस्तकाचा चांगला अ‍ॅनॅलिसिस केला आहे, तो पण वाचावा.

CBC, Canada यांनी केलेले इन्वेस्टिगेशनः

मॉर्निंगस्टार चांगली आहे, पण मला त्यात conflict of interest दिसतो. मला स्वतःला व्हॅल्यूलाईनचे रिपोर्ट आवडतात, कारण ते लोक रिपोर्टशिवाय इतर काही विकत नाहीत. व्हॅल्यूलाईनचे रिपोर्ट हे पब्लिक लायब्ररीमध्ये विनामूल्य उपलब्ध असतात.
शेवटी काय, कुठल्यातरी पुस्तकात किंवा आंतरजालावर पण लिहिलेले डोळे झाकून वाचू नये. माहिती देण्यार्‍याचा conflict of interest आहे का ते बघावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बापरे... ही माहिती नव्हती. Sad कियोसाकीचे सगळे सल्ले मी अमलात आणलेले नाहीत. नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा उत्पन्नाचे इतर स्रोत शोधा हा सल्ला चांगला वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच्यापेक्षा वॉरन बफेचा सल्ला जास्त चांगला आहे. तो म्हणतो की उत्पन्नाच्या एकाच स्रोतावर अवलंबून राहाणयापेक्षा उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करा.

Warren Buffet’s 5 Life Tips

On Earning: “Never depend on a single income. Make Investments to create a second source.”

On Spending: “If you buy things you do not need, soon you will have to sell things you need.”

On Savings: “Do not save what is left after spending, spend what is left after saving.”

On Taking Risks: “Never test the depths of the river with both of your feet.”

On Expectations: “Honesty is a very expensive gift. Do not expect it from cheap people.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२ अन ५ प्रचंड आवडती वाक्ये आहेत. ५ व तर टू गुड!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

On Expectations: “Honesty is a very expensive gift. Do not expect it from cheap people.”

हे वाक्य ग्रेटच आहे.

भाषांतर - What are you paying me for being honest ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाड थू त्या पेमेंटच्या.
मी रस्त्यानं जाताना समोर एखाद्याला पत्ता विचारला; तर त्यानं ठाउक असल्यास योग्य तो पत्ता सांगावा ही रास्त अपेक्षा आहे.
निदान चुकीचा सांगून दिशाभूल करु नये.
प्रत्येक व्यवहार पैशाच्या देवाणघेवाणीतून होत नाही.
तुम्ही व्यवहार करत आहात म्हणजेच तुम्ही प्रामाणिक राहण्यास तयार आहात हे अध्याहृत आहे.
( कंपनीची मोठी गुपिते जाणून असणार्‍या उच्चपदस्थ मंडळींनी गुपिते फोडू नयेत ही रास्त अपेक्षा आहे.
ती फोडल्यास त्यांना कारवास होउ शकतो. तो न होणे हेच एक पारितोषिक आहे.
प्रामाणिकपणाची किंमत लावता येत असेल तर तो प्रामाणिकपणाच नव्हे.
कारण उघड आहे. माझ्या प्रामाणिकपणाची किंमत मी समजा शंभर रुपये सांगणार असेन तर ह्याचाच अर्थ असा होतो की एकशे एक रुपये कुणी दिल्यास मी अप्रामाणिकपणा करायला तयार आहे. प्रामाणिकपणा ही काय कमोडिटी आहे का ?
)
ट्याक्स कमी जास्त करुन हरेक समस्या सुटते असेही नाही.
त्यानंही "मी मला वाटेल तेव्हा चूक पत्ता सांगणार. योग्य पत्ता सांगून माझा फायदा काय ?" अशी भूमिका घेतली तर ?
thanks God, लोक असे करत नाहित. अजून दरवेळचे ते नफा-तोट्याचे गणित त्यांच्या डोक्यात गेले नाहित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असहमत आहे.

योग्य पत्ता सांगितला जातो कारण चुकीचा पत्ता सांगून त्यातून काही यूटिलिटी मिळणार नसते. दुसरं असं की पत्ता सांगण्यात वेळेचा जास्त अपव्यय होत नसेल तरच योग्य पत्ता सांगितला जातो.

उदा. १: नवख्या उतारूला घुमवणारे रिक्षावाले. इथे चुकीचा पत्ता सांगून यूटिलिटी मिळणार असते.
उदा. २: "तपशीलवार" पत्ता विचारणार्‍या लोकांना बर्‍याचदा फाट्यावर मारलं जातं. उदा. ९१४ सदाशिव, गाडगीळ स्ट्रीट, पुणे ३० या भांडवलावर पत्ता शोधणार्‍याला लई घाम गाळावा लागेल.

कंपनीची गुपितं फोडू नये यासाठी इन्सेन्टिव म्हणून उच्चपदस्थ लोकांना बक्कळ पगार असतो. नोकरी सोडल्यानंतर मोह होऊ नये म्हणून नॉन काँपीट अ‍ॅग्रीमेंटस, गार्डनिंग लीव्ह यासारखे मार्ग असतात.

प्रामाणिकपणा ही निश्चितच कमोडिटी आहे. फक्त ही कमोडिटी विकत घ्यायचं साधन (कन्सीडरेशन) पैसेच असतं असं नाही.

-----------------
सामान्यतः. मुद्दाम चुकीचा पत्ता "कसा गंडवला" या खाजेपोटी देणारेही महाभाग असतात.
त्या एवढ्याशा बोळाला स्ट्रीट हे नाव देणार्‍याच्या बुद्धीचं नेहेमीच कौतुक वाटत आलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरं बुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तिकडे जी + २ बिल्डिंगला टॉवर किंवा हाईट्स म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रामाणिकपणा ही निश्चितच कमोडिटी आहे.

१. तो कोणत्या एककात मोजतात?
२. तुमचा प्रामाणिकपणा किती आहे?
३. त्याचा दर काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजून काही:

४. प्रामाणिकपणा कुठे विकत मिळेल?
५. इतरांचा / जगातला मीडियन प्रामाणिकपणा वाढला तर व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचं तौलनिक मूल्य कमी होईल का?
६. जेव्हा आपण एखादी वेगळी कमोडिटी विकत घेतो तेव्हा आपण मोजलेल्या किमतीपैकी किती भाग कमोडिटीसाठी असतो आणि किती भाग विक्रेत्याच्या प्रामाणिकपणासाठी मोजला जातो?
७. ज्या वस्तू/सेवांसाठी पैसे मोजावे लागत नाहीत (उदा. ऐसीअक्षरे) तिथे प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं चूक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आदूबाळजी, माझा सिमित मुद्दा असा होता कि जगात जे जे काही अस्तित्वात आहे (सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम देऊन ज्याचे वर्णन करता येते) ते कमोडीटी आहे वा नाही हे कसे ओळखायचे. म्हणजे कमोडीटी का म्हणायचे आणि का नाही?
-------------
बाजार आणि अर्थकारण या संकल्पना मानवतेच्या सुखासाठी आहे, मानवता नि तिची मूल्ये बाजारासाठी नाहीत असे मला वाटते. प्रामाणिकपणाची किंमत ही मौलिक, भावनिक, इ इ असते. ती बाजारू नसते.
----------
आपण 'निश्चितच' असा शब्द वापरला तेव्हा मी सबब प्रश्न विचारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमचा मुद्दा समजला, आणि मर्यादित अर्थाने मान्यही आहे.

Transaction किंवा quid-pro-quo ही व्यापक संकल्पना आहे. "एखादी कृती करण्याच्या बदल्यात मला काय मिळालं" (what's in it for me?) असं त्याचं सामान्यतः वर्णन करता येईल. बाजार आणि अर्थकारण या संकल्पनेचाच एक सबसेट आहे. सोपं पडावं म्हणून त्यात "पैसे" हा कॉमन डिनॉमिनेटर आणला आहे.

"प्रामाणिकपणाची किंमत ही मौलिक, भावनिक, इ इ असते." इथे तुम्हाला हेच म्हणायचं असावं.

"किंमत असते" हे या ठिकाणी महत्त्वाचं. ती किंमत मोजायचं medium of exchange काय आहे याला महत्त्व नाही.

प्रामाणिकपणा करायलाही incentivise करायला लागतं यातच सगळं आलं.

---------------------------------
क्वचित - न करण्याच्या
यावरून "विकत घेतला श्याम" गाणं आठवलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोणतीही श्रेणी समाधान होणार नाही इतका चांगला प्रतिसाद.
--------
बफेसाहेबांचं वाक्य फार काही महान नाही.
जनरली हिशेब असा असतो :
सामान्य माणूस * सामान्य वाक्य = सामान्य वाक्य
सामान्य माणूस * महान वाक्य = सामान्य वाक्य
महान माणूस * सामान्य वाक्य = महान वाक्य
महान माणूस * महान वाक्य = अर्थातच महान वाक्य
---------------
खूप कॉमन सेन्स वाक्ये मोठी लोक करतात तेव्हा तेव्हा ती त्यांची कॉपीराईट बनू नयेत. शिवाय ती एका स्पेसिस्फिक संदर्भाच्या बाहेर वापरू नयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्वसाधारण मध्यमवर्गीय भारतीय व्यक्ती पहिले अर्धेमुधे आनि बाकी चारही सल्ले आधिच पाळाते आहे असे वाटते

मला कित्येक सेल्फ हेल्प पुस्तकांत दिलेल्या गोष्टी आपण (मीच असे नाही इन जनरल भारतीय पब्लिक) आधीच करताना दिसतात नी अशी पुस्तके प्रचंड बोअर होऊ लागतात
रीच ड्याड... पहिल्यादाच वाचताना फार्फार आवडले वगैरे नव्हते. वाचले नी ठिके म्हणून बाजुला ठेवले.

बहुता माझा आत्मविश्वास (का अहंगंड?) इतका आहे की या सेल्फ हेल्प सल्ल्यांची मला गरज वाटत नाही किंवा 'तु १३ देख' म्हणावेसे वाट्टे किंवा मग कंटाळा येतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
सेव्हिंग्ज अकाउंट पगाराच्या २०% खर्चातच सुरुवातीस भागत असल्याने "ही मंडळी नेमके नवीन काय सांगताहेत" असे वाटले.
अगदि २००८ नंतर काहीकाळ global slowdown म्हणा recession म्हणा अवतरले; तेव्हाही "परवडत नसेल तर चैन करु नका. अंथरुण पाहून पाय पसरा. ब्रॅण्डेड कपडेच वापरले पाहिजेत असे काही नाही. " असे सांगणारे मोप सल्ले , फॉरवर्ड्स, पुस्तकं मिळाली. दरवेळी "ह्यात नवीन काय" हे समजत नसे.
अर्थात हा एक भाग झाला. बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करण्यात मात्र मी दणकून मार खात राहिलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

On Spending: “If you buy things you do not need, soon you will have to sell things you need.”

- हे पाळणारे लोक उलट मला हल्ली फार कमी दिसतात. आणि "खरंच याची गरज आहे का?" असे प्रश्न आपण विचारले की आपल्याला चिंगूस ही पदवी बहाल करण्यात येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

>>"खरंच याची गरज आहे का?" असे प्रश्न आपण विचारले ....

या प्रश्नाचं उत्तर आपल्या ओव्हरऑल उत्पन्नाच्या किती प्रमाणात या वस्तूचा खर्च आहे यावर अवलंबून असतं. आणि उत्पन्नाचा प्रत्येक स्रोत आपण कशा दृष्टीने पाहतो यावर अवलंबून असतं.

एक उदाहरण देतो. मी बेस लोकेशनला राहतो तेव्हा मला एक विशिष्ट पगार मिळतो. त्याखेरीज मी प्रोजेक्ट साठी बाहेरगावी महिनोनमहिने राहतो तेव्हा मला क्ष भत्ता रोज मिळतो. त्यापैकी खर्च य वजा झाल्यास मला (क्ष - य) रक्कम रोज अधिकची मिळत असते. समजा ही (क्ष - य) रक्कम ३०० रु आहे. ही रक्कम माझे रेग्युलर (बेस) इनकम नाही. अशा वेळी आठवड्यात ५००-७०० रु वायफळ खर्च करायला मला काही वाटत नाही. पण मी ती (क्ष - य) रक्कम माझे उत्पन्न म्हणून समजत असेन (पगार निगोशिएट करताना मी ती रक्कम मिळणार असे गृहीत धरून कमी बेस पगार स्वीकारला असेल) तर त्या क्ष-य रकमेतून खर्च करताना मी दहादा विचार करेन. इतकेच काय य खर्च सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गरज आणि पगाराच्या प्रमाणात वस्तूचा खर्च या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून नसाव्यात. नोकरीत पगारवाढ झाल्यावर आपोआप गरजा निर्माण होतात की काय? Wink

(अंबानींच्या गरजा जास्त आणि अझीम प्रेमजींच्या गरजा कमी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काहिसं कॅच २२ आहे. तुमच्या गरजा काय यात मौजमजा ही गरजही म्हणता येईल. मौजमजा नाहीतर इन-जनरल कशासाठी जगायचं हा प्रश्न आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्हाला आनि थत्तेचाचांना एकत्रच प्रतिसाद देते.

म्हणजे समजा

एखाद्यचा पगार ५०,००० आहे. घर चालवायला (टाळता न येण्यासारखे खर्च - किराणा,दूध्, भाजी, बिले, काम्वाली बाई) २५,००० रूपये आहेत म्हणजे २५,००० सरप्लस उरले.

अशा वेळी जेव्हा लोक ४०,००० चा मोबाईल, ३-४००० चे ब्रॅन्डेड शूज, तसेच कपडे, लाखभर रूपयाची मोटर्सायकल इत्यादी खर्च करतात (विशेषतः रिटायरमेंट प्लॅनिंग, इन्श्युरन्स, मेडिक्लेम कशाचा पत्ता नसताना) तेव्हा मला असले प्रश्न पडतात.

मोबाईलचे उदा घेऊ

४०,००० का? १५,००० मध्ये तुमच्या सगळ्या गरजा भागवणारा फोन मिळत असताना तुम्हाला न लागणा-या इतर दहा गोष्टी पण असलेल्या फोनवर इतके पैसे खर्च का? बर आणि ४० हजाराचा फोन घेऊन तो ५ वर्षे वापरतील असे पण नाही. तर साधारण एक-दिड वर्ष झाले की कंटाळा आला या सदराखाली परत दुसरा घेतला जातो.

लक्षात घ्या मी इथे १५,००० वाला घेतला तर काही हरकत नाही म्हणतेय (- अ‍ॅज इट हॅज सम व्हॅल्यू अ‍ॅडिशन),अगदी बेसिकच फोन नाही!

हेच बाही सगळ्या वरती स्संगितलेल्या गोष्टींना पण लागू होते.

पण लोकांना वाटतं,
> आत्ता नाही तर तर कधी?
> सगळेच हल्ली असेच वापरतात.
> ५०,००० कमवून स्वतःवर इतके पण नाही का खर्च करायचे? मग कमवायचे कशाला?

ह्याच लोकांच्या घरात हॉस्पिटलायझेशन इत्यादी अनपेक्षित खर्च आले की कशी फाफलते, लोकांकडून उधारी, पर्सनल लोन इत्यादी घेतले जाते तेही पाहिलेय.

कितीही ठरवले तरी मला नाही जमत असे एज केसेस चा अजिबात विचार न करता खर्च करायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

+१ हेच बोल्तो.
भरपूर खर्च करण्यास लागणारी हिंमत मजकडे नाही. "कंजूस" हे विशेषण मिरवतच जगणं मी पसंत करतो. कारण लोकांना कंजुषी वाटते ती मला काटकसर वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत आहे.

(विशेषतः रिटायरमेंट प्लॅनिंग, इन्श्युरन्स, मेडिक्लेम कशाचा पत्ता नसताना)

हा मुद्दा मान्य आहे. पण मागे घासकडवी म्हणाले होते त्याप्रमाणे, की २४-२५व्या वर्षी ट्रिपा, हाटेलं, सिनेमे, फोन यावर मुद्दाम कमी खर्च करून तेव्हापासून बचत करणं मला पटत नाही. पण तुमच्या जबाबदार्‍या पार पाडून मग चैन करावी यावर सहमत. रिटायरमेंट प्लॅनिंग ही जबाबदारी आहे असं मला नाही वाटत. ( २५-२६व्या वर्षी तरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रिटायरमेंट प्लॅनिंग ही जबाबदारी आहे असं मला नाही वाटत. ( २५-२६व्या वर्षी तरी)

मग कधीपासून रिटायरमेंट प्लॅनिंग सुरु करायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिशीनंतर तर नक्की सुरूवात कराच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पहिल्या पगारापासूनच रिटायरमेंट प्लॅनिंग सुरु करावे असे मला वाटते. (खरं तर पहिला पगार सुद्धा बराच उशीरा आहे. खर्च कमी ठेवणे, सामूहिक खर्चाचा फायदा उचलणे - उदा. बससेवा वगैरे) कॉर्पोरेट आयुष्यावरील अवलंबित्व कमी करुन नोकरीच्या तापातून लवकर सुटका होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल. तुमची अपेक्षित लाईफस्टाईल, वडिलोपार्जित पैसे, आरोग्य या गोष्टींवर ते अवलंबून असेल. वय २८, ३०,३५ काहीही.. मुद्दा हा आहे की तीशीच्या आत मन मारून रिटायरमेंट प्लॅनिंग, कर्ज काढून सेकंड होम (ज्याच्यातून भाड्याचं उत्पन्न अपेक्षित आहे) असल्या गोष्टी करणं मला पटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असेल हे मान्य आहे. पण मन मारून म्हणजे कसे? मन नक्की समाधानी होईल असा काही फॉर्म्युला आहे की काय? तुम्ही ज्यात समाधान मानाल त्या गोष्टीने तुम्हाला समाधान मिळेल. (असो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन नक्की समाधानी होईल असा काही फॉर्म्युला आहे की काय?

अर्थात
म्हणजे सामायिक फॉर्म्युला नाही पण वैयक्तिक असतो असा माझा समज आहे
किमान मला नक्की कशात समाधान वाटते ते मला ठाऊक आहे. ती यादी सान्त नसली तरी निश्चित आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत. हेच बोल्तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणि या वैयक्तिक फॉर्म्युल्यात पैशाला कितपत महत्त्व आहे ते तपासून पाहिले तर पैशाची (नसलेली) गरज समजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन नक्की समाधानी होईल असा काही फॉर्म्युला आहे की काय?

अर्थात! सामायिक फॉर्म्युला नाही पण वैयक्तिक असतो असा माझा समज आहे

नाही, चुकीचा समज!

काय नकोय हे चटकन समजते. म्हणजे त्या ऑप्शन वर तुम्ही काट मारून पुढे जाता. पण मग नक्की काय हवे आहे ते मात्र समजायला बराच काळ जावा लागतो.

कधी कधी सापडतच नाही. मला सापडलेला नाही. बरेच ऑप्शन काट मारून पुढे आलेय हे नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आपल्याला काय करायला आवडतं, कशातून आनंद मिळतो हे प्रत्येकाला माहित असतं. माझ्या ओळखीचा एक जण आहे. बॅडमिंटन खेळायची आवड. बर्‍यापैकी चांगला खेळायचा. त्यानी नोकरी लागल्यावर १५०००रु. ची बॅडमिंटन रॅकेट घेतली होती. त्या उदाहरणात त्यानी 'नको, त्यापेक्षा १५०००ची एफ्डी करू' असा विचार करणं म्हणजे मन मारणं असं मला वाटतं. हेच इतर कला, वाद्य, फिरणं याबद्दल म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१

काही वेळा लहानपणापासूनच्या इच्छा असतात. त्या नोकरी लागल्यावर पुर्‍या केल्या जातात. मी नोकरी लागल्यावर माझी वॉकमन घेण्याची इच्छा पुरी केली होती. म्हटले तर त्याची काही गरज नव्हती. वॉकमनची किंमत माझ्या एका महिन्याच्या पगारापेक्षा बरीच जास्त होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटते या कंपन्यांचे मार्केटिंग टेक्निक फारच सोफिस्टिकेटेड आहे. वॉकमनची गरज नसतानाही ती घेण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण करण्याची शक्ती त्यांच्या मार्केटिंगमध्ये आहे. बॅडमिंटन खेळण्याची आवड असणे ठीक. मात्र १५०००चे रॅकेट घेतल्याशिवाय आपण आपल्या आवडीला न्याय देत नाही अशी भावना मनात निर्माण करु शकणे हे मार्केटिंगवाल्यांचे खूप मोठे यश आहे असे मला वाटते.

विशेषतः अॅपल, सॅमसंग, गूगल सारख्या कंपन्यांच्या नव्या प्रॉडक्ट्सचे ज्या पद्धतीने मार्केटिंग केले जात आहे ते केवळ थक्क करणारे आहे.

(मी या सर्व मोहापासून अलिप्त आहे असा माझा अजिबात दावा नाही. मी स्वतःला बऱ्यापैकी शॉपिंग कॉन्शस समजतो मात्र हळूहळू इतर मध्यमवर्गीयांकडे असणारी सगळी टीपिकल गॅझेटे एम्पी-३, 'स्मार्ट'फोन, ट्याबलेट वगैरे माझ्याकडेही आली आहेतच. आय अॅम अॅज गिल्टी अॅज एवरीवन एल्स..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=25959
हे वाचनात आलं आज. रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बॅडमिंटन खेळण्याची आवड असणे ठीक. मात्र १५०००चे रॅकेट घेतल्याशिवाय आपण आपल्या आवडीला न्याय देत नाही

दर्जाला किंमत आहे, किंमत योग्य आहे किंवा नाही ह्याबद्दल शंका घेता येणे शक्य आहे. पण अंबेमोहर तांदुळाची चव कोलमला येणार नाही, त्या चवीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील, ते जास्त पैसे बिग बजार मधे गेल्यास किलोमागे ७१/- इतके मोजावे लागतील पण होलसेल किराणाच्या दुकानात किलोमागे ६३/-च मोजावे लागतील, चवीसाठी योग्य किमंत मोजायची तयारी हवी. त्याचबरोबर सठी-सहामाशी बॅडमिंटन खेळणार्‍याला १५०/-चे रॅकेट पण पुरावे ह्या म्हणण्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर्जाला किंमत आहे हे मान्य आहेच. पण त्या दर्जाची वस्तू घेण्याची गरज आहे की नाही हे व्यक्तीसापेक्ष आहे एवढेच म्हणायचे आहे. बहुतांश वेळा अशी गरज नसते. मार्केटिंगचा वापर करुन अशी गरज असल्याचा भास निर्माण केला जातो.

उदा. स्वस्त कोलम तांदूळ एखाद्याची कार्बोहायड्रेट्सची गरज भागवू शकतो. आंबेमोहोराचीच गरज आहे असे नाही. अर्थात परवडत असेल तर बासमतीही रोज खाण्यास हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरज आहे की नाही हे व्यक्तीसापेक्ष आहे एवढेच म्हणायचे आहे. बहुतांश वेळा अशी गरज नसते.

इथे विरोधाभास जाणवतो.

पण व्यक्तीसापेक्ष आहे ह्याबद्दल सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- हे पाळणारे लोक उलट मला हल्ली फार कमी दिसतात. आणि "खरंच याची गरज आहे का?" असे प्रश्न आपण विचारले की आपल्याला चिंगूस ही पदवी बहाल करण्यात येते.

+१. रिच डॅड वाचण्यापूर्वी स्टॉक मार्केट इन्वेस्टिंगबाबत इतका कन्विन्सिंग सल्ला कुणी दिल्याचे आठवत नाही. कियोसाकी अगदी फ्रॉड असला तरी तेवढे श्रेय मी त्याला देईनच. 'युवर मनी ऑर युवर लाईफ' हे तर अगदीच जेम पुस्तक आहे. निसर्गाची होणारी हानी, सस्टेनेबल लाईफस्टाईलबाबतची मते मला फारच आवडली. मी तर इतका 'चिंगूस' आहे की मला कॉलेजातही मित्र 'चिंतामनी' म्हणायचे. (मात्र या पुस्तकात काही आकडेमोडी सांगितल्या आहेत त्या केल्यानंतर, मी सगळे सल्ले पाळत होतो हा भ्रमही दूर झाला).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरीडातर्फे कोर्सेरा वेबसाईटवर आजपासून नवीन कोर्स सुरू होत आहे. पर्सनल अ‍ॅण्ड फॅमिली फायनान्शियल प्लॅनिंग. हा कोर्स जगातील कुणालाही फुकट करता येईल. आवड आणि इच्छा असेल तर जरूर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!!! धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप माहितीपूर्ण लिंक. सर्वच विषयातले कोर्सेस रोचक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या दोन प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत. कृ. जाणकारांनी मदत करावी.

Question 5
Instead of investing a lump sum of $25,000, Brittany Royer decides to save the money in a vault for 2 years. Assuming the inflation being 2.5% per year, how much will her purchasing power decline in 2 years time?
$1000.5
$1556.2
$1265.6
$1334.7

Question 6
A combination of stocks and bond portfolio offers Mike Spangler a rate of return of 8.5%. Considering the inflation rate of 3%, what is the actual (nominal) rate of return?
3.33%
9.33%
5.33%
7.33%

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

६ चं ५.३३?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओके. मी 1.085 ऐवजी 1.85 असा दर घेतला होता असं दिसतंय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Instead of investing a lump sum of $25,000, Brittany Royer decides to save the money in a vault for 2 years. Assuming the inflation being 2.5% per year, how much will her purchasing power decline in 2 years time?
$1000.5
$1556.2
$1265.6
$1334.7

पहिल्या वर्षी 25000 वर 2.5 टक्के दरानं 625
आणि दुसऱ्या वर्षी 24375 वर 2.5 टक्के दरानं 609.38

असं एकूण 1234.38 उत्तर निघालं. पण ते वरील पर्यायात दिसत नाही. काय चुकतंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

$२५,००० x १.०२५ x १.०२५ = २६,२६५.६२५
आजच्या २५,००० ऐवजी दोन वर्षांनी लागणार २६,२६५.६२५
पैशाच्या खरेदी करण्याच्या शक्तीत झालेली घट = २६,२६५.६२५ - २५,००० = १२६५.६२५

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्याय चुकीचे आहेत.
१२६५.६२५ ही घट "आजच्या २६२६५.६२५ रुंच्या" क्रयशक्तीमधे झाली आहे.
खरे उत्तर २५००० - २५०००/(१+०.०२५)^२ = १२०४.६४ रु आहे.
---------------
अगदी सोपं कळावं असं करून पाहायचं झालं तर १०० रु , १०% आणि १ वर्ष असं सोपं उदाहरण करू.
आजच्या १०० रुचे १ वर्षाने मोल किती घटले ? = (आजचे मोल) १००- (वर्षानंतरचे मोल)१००/(१+१०%)^१ = १००- १००/१.१ = ९.०९१ रु.
हे खरे उत्तर.

१००*(१+१०%)^१- १०० = १० हे उत्तर चूक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

A combination of stocks and bond portfolio offers Mike Spangler a rate of return of 8.5%. Considering the inflation rate of 3%, what is the actual (nominal) rate of return?

Nominal rate of return does not mean actual rate of return. Here, the answer sought is actual or real rate of return.
Suppose I invest 100 Rs today. The nominal return will be 8.5% or 108.5 Rs.
But after one year 103 Rs are worth 100 Rs today. So what is worth of 108.5 Rs? =100*108.5/103 = 105.3398
The real worth of 100 Rs today has become 105.3398 due to this investment thus 5.3398% return.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूळ प्रश्नातील वाक्यरचना मलाही खूपच गोंधळवणारी वाटली होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकीच्या जागी प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

On Earning: “Never depend on a single income. Make Investments to create a second source.”
======== Specialization, focus may pay better. Don't do this blindly.

On Spending: “If you buy things you do not need, soon you will have to sell things you need.”
======== The value of gratification has no financial comparison. Also you may get benefitted in an unexpected manner from anything (associated) with you. For example I just don't deserve and afford the South City Club membership. I pay 80% of my annual savings as unrefundable fees. I enjoy in the club. I may get huge business opportunity from there which may just catapult me to a far richer person. You may buy a Rs. 40,000 /-- phone if you love to use its features and you grudge a cheaper phone not having them.

On Savings: “Do not save what is left after spending, spend what is left after saving.”
=========Then when do I spend all what I have saved? Do I do that when I am 82 years, to foot hospital bills to live on the bed till 90?
Between any period:
Past value of wealth + change/appreciation in wealth+ Earnings + returns on past savings = expenditure + savings + New wealth.
If I keep earning, I don't spend, I keep on saving, what do I do to the balooned wealth? Donate in charity? I think it better that if I know the earning curve and the spending 'desire' curve over my life, I should save and spend such that at no point of time there is negative working capital.

On Taking Risks: “Never test the depths of the river with both of your feet.”
=========
This is ok so long as it does not mean that don't take more/higher risk.

On Expectations: “Honesty is a very expensive gift. Do not expect it from cheap people.”
========
This is the most accurate statement in economic context. Financial institutions just aren't just. All the savings are subject to contracts that are totally one way.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फायनान्शियल अ‍ॅडव्हायजर विश्वासू आहे का ते बघा. गरज पडलीच तर Fee-only अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. माझ्या मते स्वतः शिकून स्वतः निर्णय घेणे हे अधिक चांगले. (म्हणूनच मला बर्नी मेडॉफच्या घोटाळ्यात सापडलेल्या "व्हिक्टीम"बद्दल अजिबात दया वाटत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0