बेवड्या !

*******लेखन अर्धवट आहे.*******************
लै दिवसांचा तसाच राहिलेला कच्चा खर्डा प्रकाशित करत आहे.
****************************************
त्याच्याबद्दल बोलताना कु़णीही "बेवडा" आला, "बेवडा" म्हणाला असं म्हणत नसे. "बेवड्या" आला होता, "बेवड्यानं" अमुक केलं असच त्याच्याबद्दल बोललं जाइ. म्हणजे "बेवड्या" हे फक्त संबोधन नाही तर त्याचं टोपणनावही होतं.
त्याला ह्याच नावानं हाक मारायची इतकी सवय होती की सगळ्यांचं सोबतच रेल्वे रिझर्वेशन वगैरे करतानाही त्याच खरं नाव पटकन आठवत नसे. त्यालाच विचारुन ते आम्ही लिहीत असू आणि लिहून झाल्यावर सवयीने विसरतही असू.
.
.

तसं त्याला पितानाही कधीच कुणी पाहिला नव्हता.पण तो शुद्धीवर असल्यासारखं वागल्याचेही काहीच पुरावे उपलब्ध नाहित.
शांत , सौम्य आणि कंटाळ्वाणा वाटाणारा हा कशाच्या भरात तो काय निर्णय घेइल ह्याचा नेम नसे.
त्याचं कधी कुणा मित्राशी किंवा अगदि प्रेयसीशी वगैरेही कडाक्याचे भांडण झाले नाही. पण त्याला x होत्या.
हा त्यांच्याबद्दल आणि त्या ह्याच्याबद्दल पुस्तकी वाटेल अशी गोडगोड बडबड करीत. "परस्पर आदर ठेवू" , "मतभेअदही असणं योग्यच" वगैरे वाक्यं ह्यांच्या ओठांवर नाचत असत.
अरे???
हे असे इतके छ्छान छ्छान गोग्गोड होते आणि "आदर" वगैरे होता तर झक मारायला वेगळे झालेच कशाला; हे मात्र अल्पमती मित्रमंडळींना कधीच समजलं नाही.
हा घट्ट पाकातला साखराम्बा आणि त्याची लाडकी बया... ती सात्त्विक मिठाई! भांडायला कुणी तयारच नाही.पण तरी ह्यांचं काही जमू शकलं नाही.
.
.

बेवड्या धुंदीत असे. जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल वगैरे व्हावे म्हणून हा दर दोन चार दिवसांनी नव्या उदात्त ध्येयाला आयुष्य समर्पित करी. हे असं देशाप्रती समर्पण वगैरे डोक्यात असतानाच अचानक "आपल्यावरच्या प्रेमाची तशाच प्रेमाने परतफेड करणे हे अधिक अगत्याचे आहे" असे म्हणत "नैतिकतेचा विचार करुन" हा गडी अगदि ठरवून प्रेमात पडला.
.
.

यथावकाश पुन्हा काही "नैतिकतेच्या कारणानं" ती दोघं स्वतंत्रही झाली.
ह्याचं अजून एक प्रकरण झालं. त्यातही पठ्ठ्यानं आपटी खाल्ली.
ह्यानं मागाहून लग्नही केलं तिसरीशीच. ती निघाली मिश्कील.
ह्याच्या बायकोचं डोहाळजेवनाची आणि ह्याच्या x चं लग्नाची तारिख आसपासचीच निघाली.
"अवश्य जा हो तिच्या लग्नाला. आपल्या मुलीचं किंवा धाकट्या बहिणीचं कन्यादान करणारे पाहिलेत्.तू प्रेमिकेचं कन्यादान करुन ये." म्हणत ती ह्याची फिरकी घेइ.

----लेखन अपूर्ण

ता. क. :-
बेवड्या त्याच्या हरेक गोष्टीला नैतिक स्पष्टीकरण कसे काय शोधत असे हे अजूनही समजले नाही.
आणि मुळात प्रत्येक गोष्टीला नैतिक स्पष्टीकरण का शोधत असे हेही समजले नाही.
" आइस्क्रिम खावेसे वाटले; म्हणून खाल्ले" इतके साधे त्याचे वागणे का नसावे ?
दरवेळी "आपण आइस्क्रिम खाल्ल्याने आपल्याला आनंद मिळतोच, पण खर्च केल्यानं अर्थव्यवस्थाही वाहती राहते" वगैरे वगैरे परोपकारानं थबथबलेले विचार तो पावसात भिजत आइस्क्रिम खाताना ऐकवित असे--त्याच्या प्रेमिकेला!
--मनोबा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

रोचक मासला आहे व्यक्तीचित्रण लिहायला. का नाही पक्के लिहित? वेळ काढ नी विस्तार कर की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काहीच्या काही भारी नमुना आहे. का नाही पूर्ण करत? हे असं अर्धवट प्रकाशित करण्यामुळे असले तुकडे कधीही पुरे होत नाहीत. अनुभवातून सांगतेय. असले मोह टाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काहीच्या काही भारी नमुना आहे. का नाही पूर्ण करत?

हे बरे आहे!

नाही म्हणजे, तुमची होते करमणूक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१. यातल्या प्रत्येक परिच्छेदासाठी प्रसंग, काही संवाद असं करून छान जितंजागतं व्यक्तिचित्रण होईल. असं अर्धवट सोडू नकोस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरुवात छान झाली आहे, ल्हित रहा.

हे असे इतके छ्छान छ्छान गोग्गोड होते आणि "आदर" वगैरे होता तर झक मारायला वेगळे झालेच कशाला;

तुमच्या ललित लेखनामधेही तुम्हाला प्रश्न पडतात हे पाहुन बरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे कॅरॅक्टर... आवडलं लिहिलेलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0