परतताना...

काही क्षण असे असतात की ते जरी तत्क्षणी संपून जातात तरीही आपल्याला मात्र त्यातच बुडून रहावसं वाटतं. सवयीने इतर गोष्टी आपसूक होत राहिल्या तरीही त्या क्षणांनी मनावर झालेलं गारूड काही काळापुरतं लांबावं असं वाटत असतं.

गुलजारांच्या कवितांचे विजय पाडळकरांनी अनुवाद केलेल्या ‘तेच स्वप्न पुन्हा-पुन्हा’ ह्या पुस्तक-प्रदर्शनाचा कार्यक्रम संपल्यानंतरची गोष्ट..
स्वत: गुलजारांची उपस्थिती, गुलजार-पाडळकरांची आत्मीय मनोगतं, सौमित्र अर्थात किशोर कदमांनी केलेलं भावपूर्ण काव्यवाचन...
कवितामय, हलकं-फुलकं होऊन तरंगणार्‍या मनात काही काळ रहावं -- अतितीव्रतेने वाटत होतं...
पण----

प्रकाशकांनी लावलेल्या स्टॉलवर ‘सवलती’च्या दरात ठेवलेल्या पुस्तक-विक्रीच्या स्टॉलकडे पाय वळले.
हॉलच्या खालीच असलेलं किराणा मालाचं दुकान दिसल्यावर घरी नेण्याच्या काही गोष्टी आठवून त्या घेण्यासाठी तिकडे पाय वळले.
सर्व खरेदी होऊन निघताना एक पुस्तकप्रेमी बाई भेटल्या. एकाच ठिकाणी जायचे असल्याने रिक्षातून सहप्रवास सुरू झाला. त्यांच्या अखंड बोलत रहाण्याने, खरेदी करून हिशेबी झालेलं, तरीही तरंगत असलेलं मन तत्काळ जमिनीवर असं काही सपाटून आपटलं...

तेव्हापासून कानाला खडा....
मनाला रेंगाळावणारा कार्यक्रम संपला, ती सुश्राव्य संगीत वा गद्य मैफील काहीही असो, की एकतर एकट्याने अन शक्यच नसेल तर अबोल राहून परतायचं... इतक्या दणकन जमिनीवर आपटून नाही घ्यायचं...

त्यादिवशी तेच केलं......
अमृता शेरगिलच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी भेटलेल्या सौ. व श्री. Satish Tambe ह्यांच्याशी जुजबी बोलणं झालं इतकंच!
खरं तर पहिल्यांदाच समक्ष भेटलेले ज्येष्ठ फेसबुक-मित्र म्हणून त्यांच्याशी गप्पा मारण्याचा मोह झाला होता. पण, ‘अबोल राहून परतायचं’ हा निश्चय पक्का झाल्याने असेल बहुधा, अमृता शेरगिलच्या पेंटीग्जने भारावलेलं मन घेऊन कुटुंबियांसोबत गपगुमान परतीच्या वाटेला लागले.

माझी मलाच भिती वाटली, न जाणो मीच सौ. व श्री. तांब्यांच्या नजरेतून बडबडी बाई ठरले तर?
LikeLike · · Promote · Share

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

भावनांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावनांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहप्रवास

कोणत्याही सहप्रवासाची हीच कथा
तारा जुळल्या तर उत्तम नाहीतर व्यथा!!

चित्रा शिवाय तुझा कार्यक्रमामुळे निर्माण झालेला एलेव्हेटेड मूड पहाता, तोच परीणाम दुपटीने होणे स्वाभाविक वाटते.
____________

अवांतर - साने गुरुजी घे अथवा बालकवि अन अनेक हळवी लोकं, बरेचदा त्यांच्या आत्महत्येमागील कारण हेच वाटते की अतिशय तरल अन एलेव्हेटेड रिच (समृद्ध) भावावस्थेतून नंतर जगाशी अ‍ॅडजस्ट होणे (जुळवून घेणे) त्यांना जड गेले असावे. अर्थात हा फक्त कयास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदीच नेमकं लिहिलं आहे..

मनाला रेंगाळावणारा कार्यक्रम संपला, ती सुश्राव्य संगीत वा गद्य मैफील काहीही असो, की एकतर एकट्याने अन शक्यच नसेल तर अबोल राहून परतायचं...

मलाही नेहमी असंच वाटतं.

इतरांनी छान सादर केलेल्या कार्यक्रमानंतर असंच होतं.

नेहमी कलात्मक कार्यक्रम हवा असेही नाही, मित्रांशी भरपूर निरुद्देश गप्पा झाल्यानंतरही मन भरत नाही.. तरीही अपरिहार्यतेने भेट आटपल्यावरही एकीकडे नव्या भेटीचे आराखडे मनात लगेच रूंझी घालू लागतात नी तत्क्षणी मात्र पुन्हा हे वरचंच फिलींग येऊ लागतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
Smile
Smile
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मित्रांशी भरपूर निरुद्देश गप्पा झाल्यानंतरही मन भरत नाही.. तरीही अपरिहार्यतेने भेट आटपल्यावरही एकीकडे नव्या भेटीचे आराखडे मनात लगेच रूंझी घालू लागतात नी ...

सो मच ट्रू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.