तू-ता

'अरे तुरे' ला ओडियामध्ये 'तू ता' म्हणतात.

एका अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी सांगितलेला किस्सा. तीसेक वर्षांपूर्वी ते उत्तर ओरीसामध्ये तहसीलदार होते. एक दिवस त्यांच्या ऑफिसबाहेर एक संथाळ आदिवासी बसून होता. तहसीलदार आपले काम संपवून ऑफिसबाहेर आले तर हा दिसला.

यांनी विचारले काय रे बाबा काही काम आहे का? तो म्हणाला, "हो. तहसीलदार तूच का?"

हे नोकरीत नवीन आलेले. लोकांकडून मान घ्यायची सवय. यांना त्याच्या 'तू ता' ची मौज वाटली. ते म्हणाले, "हो. मीच. बोल काय काम आहे?"

"तुला वेळ आहे का? काही विचारायचं होतं."

"हो आहे. विचार."

"मला सांग, तहसीलदार होण्यासाठी तू काय शिकलास?"

"तहसीलदार होण्यासाठी काही वेगळं शिकावं लागत नाही. आहे तेच शिक्षण घ्यायचं. शाळा, कॉलेज पूर्ण करायचं. मग एक परीक्षा असते. ती पास झालं की तहसीलदार होता येतं. का रे?"

"असं बघ, मला माझ्या जमिनीचा पट्टा पाहिजे."

"मग त्यासाठी तुला तहसीलदार व्हायचंय का?"

"मला नाही. तुझा जो तलाठी आहे, त्यानं मला सहा महिने झालं झुलवत ठेवलंय. पहिल्यांदा त्यानं सहाशे रुपये घेतले. मग एक कोंबडी मागितली. आता म्हणतोय चारशे रुपये दे. मी म्हटलं राहू देत पट्टा. आत्ता जातो तहसीलदाराकडं आणि विचारतो त्याला कसा झालास तहसीलदार. मग माझ्या पोरालाच तहसीलदार करतो. आणि माझ्या जमिनीचा पट्टा मीच करून घेतो."

तहसीलदार स्तंभित झाले. त्यांनी दुसर्‍याच दिवशी त्याचे काम करवून घेतले.

[किस्सा ऐकून माझ्या मनात अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातच एक आठवण टाटांची. ताज हॉटेलची प्रेरणा त्यांना अशीच - सत्ताधार्यांच्या मग्रूरीमधून मिळाली होती. सत्तेच्या मग्रूरीची प्रतिक्रिया एक विधायक वळणाची. दुसरी तथाकथित नक्षलवादाची.]

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

:-).
अजून किस्से येउद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किस्सा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! बरेच दिवसांनी परतलात
किस्सा छान आहे

एका आदिवासी व्यक्तीला तीसेक वर्षापूर्वी बंड म्हणून सुद्धा मुलाला त्याच व्यवस्थेत शिरवावंस वाटत होतं, हे आताच्या भीषण सत्यापुढे उभा ठाकलेला विरोधाभास अधोरेखीत करायला पुरेसं आहे. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
किस्सा विचार करायला लावणारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किस्सा आवडला.

तहसीलदार स्तंभित झाले. त्यांनी दुसर्‍याच दिवशी त्याचे काम करवून घेतले.

म्हणजे तहसीलदार खरा सच्चा माणूस होता तर. व्यक्तिगत अनुभवात टी. चंद्रशेखर, IAS यांनी केवळ एका पत्रामुळे कारवाई केली, हे अनुभवले आहे. पण माझ्या व्यावसायिक अनुभवात मी एकूणएक IAS ऑफिसर्सना लाच घेताना पाहिले आहे, ज्यांना मी स्वतःच्या हाताने लाच दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द. मा. मिरासदारांची 'तगाई' ही कथा आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0