बावी

--------------------कविता चालू ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बावी यक्कं बावी, बावी दुनि चव्वेचाळ;
बावी त्रिक सासट, बावी चोक अट्ट्यांशी;
बावी पंचे धागोदर्शे, बावी संग बत्तिसाचे;
बावी सत्तं चोपन्नाचे, बावी आठ्ठं श्यातरीचे;
बावी नम अट्यानवाचे, बावी धाय विसन्दो.

-------------------कविता खतम*------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------कविचे मनोगत चालू --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवि लोकालै समाजात लै मान अस्तो. मंजे जन्रली त्यैला थोडे शाणे तरी समजतातच समजतात. ज्ये लोक कवितेतून रस काडतात त्यैला बी समाज शाणा समजतो. आवं, नुस्तं जे 'कळ्ळी', 'मस्तंय' मंतात त्यैला बी लोक शाने समजतात. कविवायच्या आन् तैच्या कस्टंबरावायच्या गुराळाशेजारी बसूनबी आमाला कळंना कि रस कोन्ता आन् गुळ कोन्ता. दिवस गेलं, महिनं गेलं आन् कवि आन् त्यैचे पर्संसक आमाला लै नूनगंड द्युलाले. राग आवरना. कैतरी करायचं ठर्विलं.
मंग ठर्वून टाकलं कि सोताच एक कविता लिहायची. उगवायच्या आदि तैयार झालो. थंडगार नवरत्न तेल लावलं. यमुनेच्या डोहाकाटी आलो. तसं म्या घेत्नी, पर शेवटचा उपाय मनुनसनी टेकिलाची एक बाटली घीवून गेलो. शेवटी कैच नाय सुच्लं तरी टकिला ढोसली कि कायनू बायनू सुच्तं मूनसनी गब्बरबाबानी यनितून सांगितला होता. छानपैकी सूर्य उगवला, पक्षी आवाज कर्लाले, ढवामधी तरंगं उठलाले, बरंच काय काय व्हवलालं, पर साला कोन्ती कविता काय सुचंना. कालिज्यातल्या प्वोरी आटवल्या, आत्ताचीही एकादी अर्धवट इच्चा अस्ली तर आठवून बघावी मन्ली पर छ्या! डोस्कं लै तान्लं पर काय फायदा नै. मंग इचार केला जास्त इदन्यान, विंजिनविरिंग शिकल्यानं टकुर्‍यात कविता घुसनाय. मनून मन्लं तितूनच एक कविता काडायची!! आन् जम्लं.
तसा आमचा "बे एकं बिया" टाकण्याचा इचार व्हता पर तिला बाल्कविता मन्लं गेलं अस्तं आन् "इदेश" हामच्यावर कातावले अस्ते. मनून सनी थोडा अडल्ट फ्याक्टर आनन्यासाटी बे च्या जागी बावीचा इचार केला.
आता लोक मन्नार, ह्येच्या जागी त्यो शबूद घाटला अस्ता तर अजूक बरी वाटली अस्ती, अस्याच्या जागी तसं लिवलं असतं तर मजा आली अस्ती. नविन गडी बघूनसनी लोक आपला मोट्टेपना, शानपना दाखवाय जानार. मूनसनी आमी कविताच अशी बनिवलीय तिच्यात इंप्रूवमेंटला स्कोपच नाय.

---------------------मनोगत खत्तम----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

* कवितेचा अर्थ दिसतो तितका सरळ नाही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

कविता चालू आनी कविता खतम
या लायनी एकदम भारी ... लै आवडल्या
अर्थ कै कळ्ळा नाही ... पन चांगलाच अस्नार
लिहित रहा ... आमी वाचू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अर्थ कै कळ्ळा नाही

मनीषातै, आमच्या मेडन कवितेच्या आपण मेडन वाचिका. आपण कविता वाचली त्याचं कोण अप्रूप आहे. कविता मंजे गहन अर्थ आलाच. तो आपल्यापासून असा लपवून ठेवायचं फार वाईट वाटतंय. पण जरा अवकाश धरा, हे धनंजय, रमतारम, चिंतातुर, इ इ प्रभूतींपैकी कोणीतरी या कवितेवर लवकरच काही ना काही भाष्य करेल. ते कसे चूक आहे हे सांगितले कि लगेच आपल्याला अर्थ सांगणारच आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काये हे? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबब धाग्यात एक कविता आणि कविचे मनोगत वर्णिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐला ... मला वाटलं की "बावी" म्हंजे एखादी पारशी पोरगी (&&&) तुम्हास आवडलेली ... तिच्याबद्दल कविता असेल. पण छ्या !!!

आय विल गो ब्याक टू माय टेकिला.

----

&&& - पहा परवीन बावी. Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इ इ प्रभूतींपैकी कोणीतरी या कवितेवर लवकरच काही ना काही भाष्य करेल. ते कसे चूक आहे हे सांगितले कि लगेच आपल्याला अर्थ सांगणारच आहे. (डोळा मारत)

कवितेवर वाचकांनी केलेलं भाष्य चूक किंवा बरोबर हे कसं सांगणार हेच मला कळलेलं नाही. आणि कवितेचा अर्थ काही असतो आणि तो कवीलाच ठाऊक असतो, अशा मध्ययुगीन कल्पनांवर काय विश्वास ठेवून आहात अरुणभाऊ? अहो, तुम्हाला ती श्री. पु. भागवतांची गोष्ट माहीत नाही का? काय झालं, की एकदा एका दीडशहाण्या माणसाने आपली कविता सत्यकथेकडे पाठवली. ती संपादकांना आवडल्यामुळे त्यांनी ती छापली. मग या कवीने बोंब मारली की मी आपली काहीतरी निरर्थक शब्दरचना करून पाठवली आणि या मूर्ख संपादकांनी ती छापली. श्री पु भागवत आणि पटवर्धन यांनी मिळून त्या कवितेचं एक सुंदर रसग्रहण लिहिलं आणि खाली मल्लिनाथी लिहिली. 'कवितेचा अर्थ काढणे ही गहन गोष्ट आहे. सर्वच वाचकांना ते जमेल असे नाही. काही वेळा कवीलाही ते जमत नाही. आम्ही ही कविता छापली कारण आम्हाला तीतून वरील अर्थ जाणवला... '

तेव्हा लक्षात ठेवा अरुणभाऊ, हे समीक्षक लोक महा वस्ताद असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम झकास !!!

ग्रेस यांनी सुद्धा २००९/२०१० च्या आसपास असे प्रतिपादन केलेले होते की - माझ्या कविते बद्द्ल स्पष्टीकरण द्यायला मी गुन्हेगार नाही. Once written ... She should stand on her own. तिचा अर्थ तुम्हास समजत नाही ... त्यात मी काय करू ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा मध्ययुगीन कल्पनांवर काय विश्वास ठेवून आहात अरुणभाऊ?

राजेशभाऊ, प्रत्येकवेळी आमच्या प्राणप्रिय प्राचीन काळावर आसूड ओढल्याशिवाय तुम्हाला करमत नाही काय? मला तर वाटतं कि तुमच्या बेडरूममधे तुम्ही इसवीसनपूर्व ५००० ते इसवीसन २०१४ इतकी वर्षे दाखवणारे लांबलचक कॅलेंडर लावले असावे आणि १९४७ पूर्वीच्या कोणत्याही ८-१० वर्षांवर फुल्याफुल्या मारल्याशिवाय तुम्हाला झोप येत नसणार.

अहो, कालिदास नि शेक्सपिअर त्याच काळात झाले. त्यांच्या साहित्याचा अर्थ तुम्ही त्यांना शिकवणार का? त्यापेक्षा हिमेसभाई रेसमिया कधी जन्मले त्या वर्षावर फुल्या मारणे किती सोपे!!

'कवितेचा अर्थ काढणे ही गहन गोष्ट आहे. सर्वच वाचकांना ते जमेल असे नाही. काही वेळा कवीलाही ते जमत नाही. आम्ही ही कविता छापली कारण आम्हाला तीतून वरील अर्थ जाणवला... '

तेव्हा लक्षात ठेवा अरुणभाऊ, हे समीक्षक लोक महा वस्ताद असतात.

कदाचित असं असेलही, पण गाठ अरुणभाऊंशी असते तेव्हा परिस्थिती वेगळी असते. मी ही इथेच आहे, समीक्षक ही इथेच आहेत. पाहू या कोणाची सरशी होते ते. अब दिल्ली* दूर नहीं है।

* आम्ही अगोदरपासूनच दिल्लीत आहोत. समीक्षक लोक इतरत्र असायची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही कविता तुमच्या फक्त गावातच काय त्या मिळाणार्‍या रम्य वैग्रे बालपणाच्या आठवणीतून आलेली आहे, बरोबर ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!