मे महिन्याच्या - उन्हाळ्याच्या सुट्टीतील दिनक्रम:-

तशी मी आठवणींत रममाण होणारी नाही, मला ते फारसे आवडतही नाही. तरीपण ‘लिहावेसे वाटले’ म्हणून लिहिले गेलेले हे टिपण--

एकत्र जमलेली भावंडे.....
सकाळी लवक्कर उठून, एकमेकांना उठवून, भराभर तोंडं-बिंडं धुवून, एकत्र खाली उतरणे, फ्रॉक-हाफ पॅंटच्या खिशात चिल्लर. कशासाठी? तासाला रु.२/- प्रमाणे सायकल भाड्याने घेऊन मरीन लाईन्सला नेण्यासाठी!
ठाकुरद्वारच्या ब्रिजवरून चढ-उतर करून एकदा का मत्स्यालयापाशी पोचलं, की जो-तो सुसाट, आपल्याच तालात!
सगळे घामेजलेले- कधी खरचटलेले अवतार.. परतीच्या वाटेवर!
त्यानंतर नाश्ता! आपापसात ठरवून ठेवलेल्या कपबशांमधून दूध-चहा-कॉफी.. आणि कागदाच्या पुंगळ्यांमधून खाल्लेले काहीही! (पोहे-साबुदाण्याची खिचडी-शिरा-फोडणीची पोळी वा भात, इ.)
आमच्याकडे दुसर्‍या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून ते खालच्या मजल्यावरून वर आणावं लागे. आईने पहाटेच खालच्या गच्चीत आमचं पिंप भरून ठेवलेलं असे.
प्रत्येकाने आपल्या आंघोळीपुरेशा दोन बादल्या खालून घेऊन यायच्या. वयानुसार लहान-मोठ्या बादल्या वापरायच्या!
स्वच्छ झाल्यानंतर बैठे उद्योग. एका सुट्टीत आप्पांनी सगळ्यांना इंग्रजी सुलेखनाचे कित्ते व वह्या आणल्या होत्या. त्याबरोबर पेन्सिली-खोडरबर-शार्पनर्स(आम्ही त्याला टोक काढण्याचे टोपण म्हणायचो)-पट्ट्या हवेच.
कधी लाट असायची नाव-गाव-फळ-फूल खेळण्याची! संपलेल्या वर्षाच्या वह्यांतील उरलेले कोरे कागद आणि खाली धरायला पुठ्ठे-पॅड्स (जी फक्त परीक्षेच्या काळातच वापरायची असत, त्यांना अशावेळी जास्त मागणी). एकेकाने एकेक अक्षर देवून त्या अक्षरापासून सुरू होणारे नाव-गाव-फळ-फूल-प्राणी-पक्षी-रंग-वस्तू लिहायचे, ठरलेल्या वेळात! प्रत्येकाला १० गुण, सामायिक झाले तर पाच गुण. गुणांसाठी चढाओढ, सर्वांत शेवटी बेरजा घ्यायच्या, कुणाला जास्त मिळाले, कुणाला कमी मिळाले, पहिला-दुसरा-शेवटचा नंबर...
पेन्सिल-रबर, इ. काही आणायची वेळ आली की सगळ्यांनी एकत्र खाली जायचं. आप्पांना लाडीगोडी लावून प्रत्येकी पाच पैसे जास्त घेवून, हरीकडे पाच पैशांचं सोरट ओढायचं. कधी दहा पैसे जास्त घेवून पानपट्टी-लिमलेट-पेपरमिंटच्या गोळ्या घ्यायच्या. १० पैशांचं बबलगम-मिलन सुपारी-चिकणी सुपारी हवी असेल तर जास्त लाडीगोडी...
जेवणाची सुट्टी (!) संपली की पत्ते-कॅरम-सागरगोटे-कवड्या-नवा व्यापार! जितकी भावंडं त्यानुसार खेळ ७-८, ५-३-२, लॅडीज (४ किंवा ६ जण), मेंढीकोट, झब्बू (इलेक्ट्रिक, गड्डा, सिंगल) पेनल्टी, नॉटॅठोम(!), बदामसात, रमी.. कधी-कधी आई-आप्पाही सामील होत.
चार वाजले की गच्चीतील खेळ! लपाछपी, डबा ऐस-पैस, बॅट-बॉल (क्रिकेट नाही बरं!), लंगडी, पकडा-पकडी, टोळी-टोळी, विषामृत, रंग-रंग, कांदाफोडी, आंधळी कोशिंबीर , , , इ.
कधीतरी जपानी बागेत (हत्तीची घसरगुंडी हे मोठ्ठं आकर्षण) - चौपाटीवर जाण्याची टूम निघायची. मोठी मुलं बरोबर असतील तर मलबार हिल! भेळ-पाणीपुरी-कुल्फी-आईस्क्रीम... तेव्हा सॅण्ड्विच फारसे मिळत नसत.
रात्रीची जेवणं आटपली की पुन्हा बैठे खेळ... गाण्यांच्या-नावांच्या भेंड्या, स्मरणशक्ती (बर्‍याच वस्तू जमवून त्या काही वेळ झाकून मग आठवून जास्तीत जास्त लिहायच्या), इ. कधी गोष्टी सांगायच्या, सिनेमांच्या स्टोरी(!) सांगायच्या, पुस्तके वाचायची.
अंथरूणावर पडून, अंधारात भितीदायक गोष्टी ऐकवायच्या... स्वयंपाकघर असलेल्या डबलरूममध्ये भाऊ झोपणार, आम्ही बहिणी ‘तिकड’च्या डबलरूममध्ये. भावांची मज्जा असायची. मध्यरात्री कुणाला जाग आली की तो इतरांना उठवून वाळवलेले पापड, कच्चे-भाजलेले शेंगदाणे, दाण्याचं कूट, पोहे, चिंच, इ. जे मिळेल ते खाणार आणि दुसर्‍या दिवशी आम्हां बहिणींना टुकटुक करणार!
भावंडं परतताना निरोप घेण्याची वेळ आली तरी रडू आलेलं आठवत नाही, कारण शाळेचं नवीन वर्ष, नवी वह्या-पुस्तकं, नवा वर्ग, नव्या मैत्रीणी, इ. आगामी आकर्षण असेच. आणि मनभरून सहवास झाल्याने रुखरुखही शिल्लक नसे!

एका घरात प्रत्येकी दोन वा तीन मुलं असल्याने भावंडांचं सुख, चढाओढ-भांडणं-मारामारी-स्पर्धा-चिडचिड-रडारड, एकमेकांना सांभाळून घेणं... सगळं-सगळं अनुभवलं.
आम्हां भावंडांच्या घरात मात्र प्रत्येकी एकच -- नाईलाऽऽज.... (दोन-- हा अपवाद)!
आमच्या मुलांच्या सुट्टीच्या आठवणी काय-काय असतील बरं?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

छान लिहिलय. शेवटची दोन वाक्य मात्र... :-D.
सोरट मंजे काय?
शार्पनरला वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे शब्द असावेत असं वाटतय खूर्रकटर आणि गिरमीट ऐकलेत. अजून काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोरट हा जुगाराचा एक प्रकार (किंवा जुगाराचे दुसरे नाव) आहे. मात्र 'सोरट ओढणे' यातून काही अर्थबोध होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशहाणा,
सोरट म्हणजे एका दोरीला कागदाच्या पुडीत बांधलेल्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. उदा. भोवरा,भिंगरी, पिटपिटी ( जिभेच्या आकाराची - पत्र्याची, तिला आतून एक पट्टी जी अंगठ्याने बाहेरील भागावर दाबली की तिच्यातून पिटपिट असा आवाज ऐकू येई) कागदी जादू (दोन काचांवर चिकटवलेले दोन कागद, ज्यावर चित्रे असत - जहाज, विमान, सायकल, प्राणी वा पक्षी असे काही जी उलट सुलट उघडून ओळखायचे की कोणते चित्र काचेच्या आत दिसू शकेल. खरं तर त्यात जादू काहीच नसायची. घड्या घालण्याच्या प्रकारांतून बनवलेला तो एक खेळ होता. त्याला तेव्हा जादू का म्हणत असू ते आठवत नाही.). प्लास्टिकचा एक स्पायडरमॅन असायचा, लाल वा निळ्या रंगाचा. हातावर ठेवला की तळव्यातील उष्णतेने तो वळायचा, त्याचीही तेव्हा गंमत वाटायची.
तर पाच पैसे देऊन कोणतीही एक पुडी ओढायची. आतमध्ये जे असेल ते आपले मानून घ्यायचे... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लपवून ठेवलेल्या चित्रांवर पैसे लावून आत कोणते चित्र आहे हे ओळखायचा हा जुगार प्रसिद्ध आहे. Wink पणती, कंदील, पतंग, सायकल वगैरे चित्रे असतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिटपिटी ( जिभेच्या आकाराची - पत्र्याची, तिला आतून एक पट्टी जी अंगठ्याने बाहेरील भागावर दाबली की तिच्यातून पिटपिट असा आवाज ऐकू येई)

आमच्याकडे तिला बेडकी म्हणत. कानाशी एकदाच तिची पट्टी दाबली की आवाजानं कान भरून जायचा, इतका खणखणीत आवाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना,
पिटपिटी अजूनही मिळते का कुठे? कदाचित जत्रांमधून विकतही असतील कुणास ठाऊक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय की. पाहिली नाही बॉ. जुन्या बासनांतून एखादी असेलही. शोधायला पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान लिहिलयं. भरपूर भावंड वा मित्रमैत्रिणी किंवा हातात पैसे मिळणं हे आमच्या अनुभवातून वजा जाता सुट्टीचा दिनक्रम हा असाच. दर बुधवारी जवाहर बालभवनच्या वाचनालयातली गोष्टीची पुस्तकं घ्यायला जायचो तेव्हाच्या फिरण्याची आठवण आली. पण लहानपण हे भावंडातलं असो वा नसो रम्यच असावं. खास करून सुट्टीच्या आठवणी. आम्ही दोघीच बहिणी एकमेकातच खेळायचो, फिरायचो. मात्र सुटटीत आत्या फिरायला,गोष्टी सांगायला आमच्याबरोबर असायची. तिच्या भुताच्या गोष्टी अफलातून असायच्या. नाहीतर दिवसभरातला घटनाक्रम गोष्टीत गुंफुन ती असं काही हसत, हसवत बसायची की क्या बात.
'नाव गाव ' हा शाळेतल्या बोअर तासांना खेळायचा खेळ होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलंय.
हल्लीच्या मुलांचे मी हल्लीच निरिक्षण करू लागलोय. छान मजेत असतात ती मुलं. प्रत्येक पिढीचे आनंद वेगळे इतकेच.
तेही अजून ३०-४० वर्षांनी असेच नॉस्टॅल्जिक होऊन लेख लिहितील Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हल्लीच्या मुलांचे मी हल्लीच निरिक्षण करू लागलोय. छान मजेत असतात ती मुलं. प्रत्येक पिढीचे आनंद वेगळे इतकेच.
तेही अजून ३०-४० वर्षांनी असेच नॉस्टॅल्जिक होऊन लेख लिहितील (डोळा मारत);)

अगदी मनातलं बोललास! मीही पहातो ना, सोसायटीमधल्या मुलांचे खेळाचे प्रकार जरा वेगळे असले आणि ते खेळण्याच्या पद्धती जरा वेगळ्या असल्या तरी त्यांच्या चेहर्‍यावर आनंद मात्र तोच, तसाच असतो. शेवटी बालपणीचा "काळ" सुखाचा मग तो "काळ" ३० वर्षांपुर्वीचा काय आणि नंतरचा काय... बालपण ते बालपणच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलय चित्रा, मोजक्या शब्दात पण प्रभावीपणे लिहीलं आहे. सोरट म्हंटलं की मावशीचा ओरडा (मला फक्त ओरडाच, तिच्या मुलांना तिने चांगलं बदडलं होतं) आणि तिने देवापूढे बसून माफी मागायला लावणे हेच नेहमी आठवतं. तेव्हा पासून सोरट म्हणजे अगदी वाईट्ट गोष्ट आहे असच मनात बसलय त्यामुळे तुम्ही सोरटचा असा खुलेआम केलेला उल्लेख पाहून तुमच्या (मुक्त) बालपणाचा हेवा वाटला Smile

बाकी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे धमाल तर होतीच पण शेवटच्या पेपरचा आनंद म्हणजे.. बाप रे, खरंच तो आनंद गगनात मावायचा नाही. तसा आणि तेवढ्या आनंदचा क्षण शाळा सुटल्या नंतर कधीच पुन्हा अनुभवला नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हीही बिल्डींगच्या मधल्या चौकीत बसून कॅरम्/व्यवहार्/पत्ते खेळत असू. मग ऊन उतरलं की डबा ऐसपैस /लपाछुपी /काचा पाणी/विषामृत्/टिपीटिपीटिपटॉप्/कटींग थे केक्/जोडसाखळी वगैरे खेळत असू.
लिंगोरच्यात (लगोरी) माझा नेम छान होता पण आऊटही मी लगेच व्हायचे Sad
मग उन्हाळा संपता संपता मे च्या शेवटी वळवाचा पाऊस येई. काय मज्जा वाटे.
बिट्ट्यांची झाडे होती कॅन्टॉन्मेन्ट भागात. अन बरेचदा दुपारी सायकलवरुन कँपातल्या लायब्ररीत जात असे. कसला घाम अन ऊन अन मजा. पिशवीत जयंत दळवी/विआ बुवा/जी ए अशी मस्त मेजवानी असे.
विशेषतः दिवाळीच्या सुट्टीत लायब्ररीतून शतायुषी/मेनका/माहेर्/स्त्री/किर्लोस्कर्/किशोर .... चे दिवाळी अंक वा!!! वो दिन भी क्या दिन थे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिशवीत जयंत दळवी/विआ बुवा/जी ए अशी मस्त मेजवानी असे.

बुवा आणि जीए मेजवानीच्या एकाच ताटात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर समर्पक प्रतिक्रिया संजोपरावच लिहू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं