दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
९ मे
जन्मदिवस : सम्राट राणा प्रताप (१५४०), मराठी व्याकरणकार, लेखक व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४), 'ओपल' कारकंपनीचा संस्थापक, अभियंता ॲडम ओपल (१८३७), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१८६०), स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले (१८६६), तुतेनखामेनची कबर शोधणारा पुरातत्वज्ञ हॉवर्ड कार्टर (१८७४), विचारवंत ओर्तेगा इ गॅसे (१८८३), कामगार चळवळ कार्यकर्ते लेखक वसंत नीळकंठ गुप्ते (१९२८), नोबेलविजेता जैवरसायनशास्त्रज्ञ मॅन्फ्रेड आयगन (१९२७), गायक, संगीतकार व पियानोवादक बिली जोएल (१९४९)
मृत्युदिवस : लेखक फ्रीडरिक शिल्लर (१८०५), कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक (१९१९), प्रकाश निर्वात पोकळीतून प्रवास करतो हे सिद्ध करणाऱ्यांपैकी अल्बर्ट मायकलसन (१९३१), 'रयत शिक्षण संस्थे'चे संस्थापक व समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील (१९५९), एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट सर करणारा शेर्पा तेनसिंग नोर्गे (१९८६), सिनेदिग्दर्शक अनंत माने (१९९५), गायक तलत मेहमूद (१९९८), गायक पं. फिरोज दस्तूर (२००८)
--
जागतिक थॅलेसिमिया दिवस
स्वातंत्र्य दिन : रोमानिया
मुक्ती दिन : जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
१८७३ : जागतिक महामंदीची व्हिएन्नात सुरुवात. ही मंदी पॅरिस, बर्लिन व न्यू यॉर्कपर्यंत झपाट्याने पसरली व तिच्या झळा जगभर लागल्या. ती १८९६पर्यंत चालली.
१८७४ : मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरु झाली.
१९४१ : एका जर्मन बोटीतले 'एनिग्मा' सांकेतिक संदेशयंत्र ब्रिटिशांच्या हाती पडले. अॅलन ट्यूरिंग आणि इतर संशोधकांनी त्याद्वारे जर्मन संदेशांचे कोडे उकलले.
१९५० : युरोपियन युनियनची सुरुवात होण्यासाठी महत्त्वपूर्ण 'शूमन डिक्लरेशन' सादर झाले.
१९५५ : शीतयुद्ध - प. जर्मनीचा नाटोमध्ये प्रवेश. त्याच वर्षी सोव्हिएत रशियानं वॉर्सॉ करारांतर्गत नाटोविरोधात आपली फळी उभारली.
१९५८ : अल्फ्रेड हिचकॉकचा 'व्हर्टिगो' चित्रपट प्रदर्शित.
१९६० : अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी. तोंडावाटे घेण्याच्या संततीनियमनाची प्रथम विक्री.
१९७० : व्हिएतनाम युद्धाविरोधात अमेरिकेच्या राजधानीत एक लाखापर्यंत लोकांनी निदर्शने केली.
१९७६ : 'बादर-माइनहॉफ गँग' ह्या विद्रोही टोळीची सदस्य युलरिक माइनहॉफ हिनं तुरुंगात आत्महत्या केली.
२००१ : जगातील सर्वात लांब घरगुती वापराच्या गॅसची लाइन जामनगरपासून लोणीपर्यंत घालण्यात आली. याची लांबी १२४० किलोमीटर आहे.
२००२ : भारतातील अभिमत विद्यापीठांची संख्या ५५पर्यंत पोहोचली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
हा हा हा. हे फारच ग्योडेलियन
हा हा हा. हे फारच ग्योडेलियन होत नाहीये का?
होतंय तर!
हे वाचताना मी रावण ष्टाईल खांदेउडवू हसणे इम्याजीन केले
==================
भूतकाळातील आस्वल्य.
नाभिकशृङ्गापत्तीसदृश काही
नाभिकशृङ्गापत्तीसदृश काही करता आलं असतं, नै?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाल्गुदादा..
अजून बरंच काही करता येईल
उ.दा. आत्ता जर हा प्रश्न बदलून "तुम्ही पुरुष आहात काय?" असा केला तर उत्तरांकडे पाहून तंबू मे घबराहट होउ शकते!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
"तुम्ही या कौलावर उत्तर देत आहात काय?"/"उत्तर दिले आहे काय?"
"तुम्ही या कौलावर उत्तर देत आहात काय?"/"उत्तर दिले आहे काय?" हे अधिक प्रमाणात स्वसंदर्भी झाले असते.
या विवक्षित कौलात "नाही" असे उत्तर देणे खोटे न बोलताही शक्य आहे. काही गोष्टी कराव्याशा न वाटताही केल्या जातात.
कौलाला उत्तर
कौलाला उत्तर दिले आहे. ते तुम्हाला तेंव्हाच मिळेल जेंव्हा तुम्ही हा प्रतिसाद वाचणार नाही.
उत्तर
उत्तर दिलं असतं पण लिखाणाचा प्रकार Binary poll आणि पर्याय दोनापेक्षा अधिक. बहुत नाइन्साफी है ये.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
नाही. प्रतिसाद देण्याची इच्छा
नाही. प्रतिसाद देण्याची इच्छा झाली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही.
पण तुम्ही दहा हजार रुपये देत आहात ते मात्र घेऊ.
-Nile
एक मन म्हणतय कौल दे तर दुसरं
एक मन म्हणतय कौल दे तर दुसरं म्हणतय देऊ नकोस. या अंतर्मनाच्या द्वंद्वाची नीर्मिती कौल्निर्मात्याने अतिशय सक्षम रीतीने साधली आहे त्याबद्दल सर्वात प्रथम कौल्पाडकाचे (होय निर्माताच) आभार.
त्याचप्रमाणे हो, नाही व यापेक्षा वेगळे असे समग्र पर्याय देऊन कौल्पाडकाने त्यांच्यातील सांगोपांग विचारप्रक्रियेची एक अनोखी चुणूकच दाखवून दिली आहे. किंबहुना कौल कसा पाडावा याचा व कौल कसा पाडू नये याचा दोन्हीचाही हा कौल एक वस्तुपाठच बनू शकतो.
या अद्वितीय, विलक्षण, यशस्वी व बुद्धीमान कौलाबद्दल कौलपाडू युवापीढीचे खंदे मार्गदर्शक ,नवनवोन्मेषशालीन कौलांचे अत्यंत कल्पक निर्माते, श्रीयुत अस्वल्जी आका कौल्पडीक, सॉरी कौल्पीडक, ऊप्स कौल्पाडक, यांचे मनःपूर्वक अभिनंदन. संपूर्ण जनसागर त्यांचे विचार ऐकण्यास उत्सुक आहेच, तेव्हा त्यांना ईईईई-श्रीफळ व ईईई-महावस्त्र देऊन मी त्यांना हा कौल कसा सुचला,या बद्दल २ शब्द बोलायची विनंती करते व माझे २ शब्द संपविते. < .....टाळ्या ..... :D>
कसचं कसचं...
अ.भा. कौलपाडक समाज (चेंबे खुर्द शाखा ) ह्यांच्यावतीने सारिकातैंना धन्यवाद!!
बाकी तपशील आमच्या "कौलपडीकापासून ते कौलपीडकापर्यंत"[१] ह्या आगामी कौलरुपी-आत्मचरित्रात आहेच.
[१] - ही विकिपिडीयाने लावलेली वाईट सवय. [आकडा] दिसला, की धावलेच लोक.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
!
घ्या!
आणि इथे बदनाम आम्ही होतो!१
---------------------------------------------------------------------------------------------------
१ ('कारण शेवटी'-आदि पुलोक्त वाक्य इथे डकविण्याचा अनावर मोह तूर्तास महत्प्रयासाने आवरता घेतलेला आहे.)
!
सांगता काय!
या मनोबाचा इथे ड्युप्लिकेट आयडी आहे?
:)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एक न्यूज चायनेल हाये. तेच्या
एक न्यूज चायनेल हाये. तेच्या बात्म्या अश्या अस्त्यात-
१. क्या होगा जमनाबाईका?
२. किसके साथ खेल रहे थे दिग्विजय सिंग?
३. थरुर कि प्यास कैसे बूझ गयी?
४. केरला में क्यो तैर रहा है पानी पर सोना?
५. क्या आतंकी आपके सेकंड फ्लोअर पर भी रह रहे हैं?
६. कैसे डूबने वाली थी २०११ के तिसरे क्वार्टर में दुनिया?
७. अमरिका मोदी से क्यों काँपता है?
८. क्या है भूटान के अण्वस्त्रों का सच?
वर अखंड जाहिराती चालू आणि खाली प्रश्नपत्रिका. मज्जा आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.