तंबाखू

ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही

तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?

भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली

दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा

आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा

रस्ता वेगवेगळा असला तरी
वाट आमची एक आहे
त्यांचा अंड्याचा.....तर
आमचा साधा केक आहे

तरी आंम्हाला सगळे म्हणतात
अहो घाण असतं ते...सोडा..
च्यायला...यांना काय माहित
हे गाढव आहे..की..घोडा?

व्यसन ही एक व्रुत्ती आहे
तीला बांध घालता येत नाही
ते म्हाताय्रा सारखं आहे हो,
काठीशिवाय चालता येत नाही

हा वेढा सुटत नाही..पण,
लवकरच मी फोडणार आहे
खरचं सांगतो...उद्या पासून...
मी तंबाखू सोडणार आहे.

पराग दिवेकर...

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ... कशाला....कशाला?
अहो उगाच का म्हटले आहे की, ज्याच्या खिशात गायछाप चुनापुडी तोच खरा मर्द गडी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

एक लंबर कविता परागभटजी.
अवांतर: तुम्ही पूजेला जाताना तोबरा भरलेला असतो का हो? आणि नसेल तर अचानक हुक्की आल्यावर काय करता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

घंटासुर, अहो ते कवि आहेत, म्हणजे ते जे जे लिहीतात ते ते त्यांनी अनुभवलेच पाहिजे असे नाही काही! म्हटलेलेच आहे 'जे न देखे रवी ते देखे कवि; मग का त्यांनी उगाच तंबाखू खावी?'
समजा, उद्या त्यांनी भुतावर लिहीली कविता, तर ते काय भुत होते असे म्हणणार काय? जावूद्या डबल घ्या आता, अन चुना जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अहो पाभेमहाराज, ते कवि असले तरीही ते पट्टीचे तंबाखूबाज हे त्यांनी मुक्तपणे कबूल केले आहे. हा पहा दुवा.
तेव्हा त्यांची कविता ही स्वानुभवावरच आधारीत आहे. Smile शिवाय भुताचं म्हणाल तर भुताच्या आधीच्या एक स्टेजवर मुळातच ते आहेत अतृप्त आत्म्याच्या रूपानं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

आरं ति च्यामारी. पहिल्यांदा नाय हो लक्षात आलं माझ्या. बाकी कुठेतरी 'मी तंबाखू खाणारच' अशी सहीदेखील कालपरवा बघीतली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

तुम्ही पूजेला जाताना तोबरा भरलेला असतो का हो? Biggrin अहो पूजा करण,हा एक करंटच असतो... Wink तो-बरा हाय की राव ? तिथं दुसरा कशाला?...अहो धार्मिक माणसाचं पहिलं आणी अंतिम व्यसन असतं देव...मधे मधे ही बाकीची येते ना,ती निव्वळ भाऊगर्दी... पण ती ही लागतेच कारण तुंम्ही म्हणता तसा मी अत्रुप्त आत्मा आहेच त्या मुळए एकच झाड 'पकडुन' आंम्हाला जमणार होय?...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

घाबरु नकोस मर्दा, तुझ्याकडे आहे गायछाप जर्दा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्च्या यस्टी ष्ट्यांडावर फार दिवस एक जाहिरात होती.
"नव्या नवरीला सांगायला लाजू नको मर्दा,
तुझ्याइतकाच प्यार मला, गायछाप जर्दा!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

@-ते कवि असले तरीही ते पट्टीचे तंबाखूबाज हे त्यांनी मुक्तपणे कबूल केले आहे...>>> हे तुंम्हीही मुक्त पणे मानलत या बद्दल धण्यवाद Wink @-हा पहा दुवा...>>>तुंम्ही आंम्हास देता दुवा... त्याबद्दल काय म्हनू वाहव्वा,वाहव्वा,वाहव्वा Blum 3

@-बाकी कुठेतरी 'मी तंबाखू खाणारच' अशी सहीदेखील कालपरवा बघीतली आहे...>>> पा.भे ती माझी इथलीच सही आहे...बाकी बाजु लाऊन धरल्या बद्दल धन्यवाद हो...मनापासुन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

>>> बाकी बाजु लाऊन धरल्या बद्दल धन्यवाद
परागभौ, तरीही सांगतो, तंबाखू सोडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

गंमतशीर प्रतिक्रिया आल्या असे वाटले व त्याबद्दल क्षमा करावीत. अनेक ओळी आवडल्या राव!

डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही

आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा

त्यांचा अंड्याचा.....तर
आमचा साधा केक आहे

व्यसन ही एक व्रुत्ती आहे
तीला बांध घालता येत नाही
ते म्हाताय्रा सारखं आहे हो,
काठीशिवाय चालता येत नाही

हा वेढा सुटत नाही..पण,
लवकरच मी फोडणार आहे
खरचं सांगतो...उद्या पासून...
मी तंबाखू सोडणार आहे.

वा वा!

मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फट्ट्याक डाव्या गालावर झालं होतं नं पर्वा?
..डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही?

त्याच गालाला मोट्ठं ऑप्रेशन करावं लाग्लं होतं. तंबाखू/गुटख्यामुळे.
बघा ब्वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

त्याच गालाला मोट्ठं ऑप्रेशन करावं लाग्लं होतं. तंबाखू/गुटख्यामुळे.
बघा ब्वा!
>>> Sad बहुतेक आज दुपारी २/३ वाजेपर्यंत आमचा तंबाखू मान-सीक बंदी कार्यक्रम अमलात येणार... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

नसेल सुटत तर कमांडो ऑपरेशन करावं लागेल बरं का!
साहेबांना कमांडो चा धसका घेतला असणारे. कारण सोबत फक्त एक खाकी पोलिस होता. कमांडो नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-