जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर

जीर्णनगरी मुशाफिरी : पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर

कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असे कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे मंदिर तसे फारसे प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अश्या या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे ज्यामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे.

इतिहास :
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.

साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडले नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.

जायचे कसे :
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघर ला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही वर्थ आहे असे ते पांडवकालीन मंदिर पाहिल्यावर वाटते.
गावाचे नाव 'पुर ' असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे.
जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.

बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

सद्यस्थिती :
मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.

हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा गावात निर्णय झालाय. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीवकाम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.

आमची मुशाफिरी :
कुकडेश्वर मंदिरात पोहोचायला जवळपास ७ वाजले होते. जवळपास अंधार पडत आला होता त्यामुळे तिथे पोहोचूनही काही बघायला मिळेल की नाही असे वाटले.
सूर्य नारायण जाता जाता काही राहिले तर नाही ना? म्हणून टॉर्च मारून बघत असावा असे वाटले.
.
आणि जाताना आकाशाला गिफ्ट म्हणून मावळतीचे रंग देऊन जात असावा.
.
पश्चिमाभिमुख शिवमंदिर :
.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार :
उंबरठा आणि प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वेगळ्याच धाटणीचे वाटले. असे नक्षीकाम पूर्वी कधी पहिले नव्हते.
.

प्रवेशद्वारावरील शिल्पे :
.
मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर असून त्यात काय आहे ते कळू शकले नाही. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.(अंधार असल्याने आणि ट्राय पॉड नसल्याने याचे फोटो काही धड आले नाहीत. )

मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. थोडीही जागा रिकामी अशी सोडलेली नव्हती. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. असेच सेम शिल्प खांबाच्या इतर दोन्ही बाजूस आहे. त्याखाली ढोल वाजवतानाचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य काहीतरी असावे. यालाच वेलबुट्टी म्हणत असावेत कदाचित.
.
त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर नृत्य शिल्प कोरलेले आहे आणि त्याखाली शंकरपाळी सदृश काहीतरी. हे काय कोरले आहे याची कुठेतरी माहिती असावयास पाहिजे होती. गावात काही जुनी लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी याचा इतिहास माहीत आहे.
.
.
.
हि शिल्पे पार्वतीची असावीत असे वाटते.
.
उशिरा तेथे पोहोचल्याचा एक मात्र फायदा झाला की कॅमेराचे काही गोष्टी ज्या आजपर्यंत प्रयत्न केला नव्हत्या त्या कळल्या. अंधारात लॉग एक्स्पोजर / शटर स्पीड कमी करून काही फोटो काढले.
.

एव्हाना आठ वाजत आले होते. जुन्नर पासून साडेसातला सुटणारी आणि अंजानावळ येथे मुक्कामी जाणारी शेवटची गाडी आम्हाला घाटघरला, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी सोडणार होती. ती पकडण्यासाठी परत ३ किमी चालत जाऊन फाट्यावर उभे राहायचे होते.

आमच्या सुदैवाने आम्ही उभे होतो तेथे एक दुधाची गाडी आली. गाडीतली माणसे आजूबाजूच्या गावातील गावकऱ्याकडून त्यांच्या गाई-म्हशींचे दूध घेतात, त्याचा हिशेब ठेवतात. मग ते दूध एकत्र करून घरी येऊन मोठ्या फ्रीज मध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डेअरी ला विकतात आणि हिशेबानुसार लोकांना पैसे देतात. हेच दूध डेअरी मधून प्रक्रिया होऊन ( घट्ट दुधात पाणी घालूनही ) पुणे आणि आजूबाजूच्या गावास जाते. ओह्ह मला वाटायचे की, चितळ्यांच्या गायीच्या दुधाच्या पिशवीत चितळ्यांनीच पाळलेल्या गायीचे दूध असेल. असो. गाय कोणाचीही असो, शहरात गायीच्या दुधाच्या पिशवीत गायीचेच दूध येतेय हे हि नसे थोडके !

तर त्या दुधाच्या गाडीने आम्ही ५ मिनिटात फाट्यावर आलो. आता एकदम गडद अंधार पडला होता. आजूबाजूला वस्ती नसल्याने आणि पर्यायाने एकही दिवा नसल्याने सारे नभांगण तारकांनी भरून व्यापले होते. या आधी मान वर करून आकाशात तारे कधी पाहिले हे आठवण्यात काही क्षण गेले. मग आठवले की २ वर्षापूर्वी हरिश्चंद्राला गेलो होतो तेव्हा असेच तारे पाहत बसलो होतो.
मधल्या काळात ताऱ्यांनी खुणावलेच नाही का ? का ते बघण्याएवढी मान कधी वरच आली नाही ?
हॉल च्या छताला लावलेले रेडियम चे तारे जास्त जवळचे वाटले? का हातात अख्खी 'गॅलेक्सी' आल्यामुळे ताऱ्यांचे वेडच नाहीसे झालेय? असो.

पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी हे विचार एकदम तोडले. एकमेव असलेला विजेरी दिवा पेटवला आणि त्या प्रकाशात डबा उघडून जेवण चालू केले. आजूबाजूला गर्द अंधार, निरव शांतता, दूरवर मिणमिण करणारे दिवे, जोडीला हा कंदील आणि डब्यात गोड शिरा. अहाहा ! त्या दिवशी 'कॅण्डल लाईट डिनर' चा खरा अर्थ कळला.

जेवण होऊन थोडावेळ एका गावकऱ्याशी गप्पा टाकल्या. थोडा वेळात दोन पिवळे दिवे भयंकर आवाज करत, अंधारातून माग काढत आमच्या दिशेने आले आणि थांबले. मग कळले की ती ST होती. गाडीत बसलो आणी गाडी घाटघर दिशेने पळू लागली. त्यानंतर घाटघरपर्यंत जो काही रस्ता आहे, त्याला 'कच्चा रस्ता' म्हणणे म्हणजे कुत्र्याला गेंडा म्हणणे आहे. फक्त आणि फक्त 'हमर' घेऊन जाण्यासाठीच तो रस्ता असून हा ड्रायवर उगाच त्यावर ST चालवतो आहे का काय अशी शंका येते. येथे ST मधून उतरताना ड्रायवर, कंडक्टर आणि ST महामंडळ तिघांनाही सलाम ठोकावासा वाटतो. आम्ही ठोकलाही!

घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.

राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात.

अजून काही :
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे.
२. कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे. गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो (नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.
५. ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोह ला प्रदक्षिणा मारता येते.
जुन्नर ->चावंड -> कुकडेश्वर -> जीवधन -> नानाचा अंगठा -> नाणेघाट -> निमगिरी -> हडसर -> माणिकडोह वाघ्र प्रकल्प-> शिवनेरी ->जुन्नर

पुढचे लेख :
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

जीर्णनगरी मुशाफिरी : प्रसन्नगडाचे प्रसन्न दर्शन.

बाकी २०१३ मध्ये वर्षभर काय काय कमाई झाली ती येथे वाचू शकता.
२०१३! फुल टू कमाई !

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

पुणे - मुंबै पट्टयत, मलवलीच्या आसपासची ही , कह्रंतर नाणेघाटाच्या असपासची ठिकाणं ही खरच भारी वाटतात.
शिवकालातील पायखुणा तिथे आहेतच; पण परिसरही निसर्गरम्य, शिवपूर्वकालीन - प्राचीन काळाचेही तुकडे त्या भागात सापडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सुमारे १२ वर्षांपूर्वी मी कुकडेश्वर मंदिराला धावती भेट दिली होती. त्या भेटीपैकी काही चित्रे येथे दर्शवीत आहे.

तुमच्या चित्रांपैकी क्र.३,४ आणि ११ वरून मंदिराची बरीच डागडुजी अलीकडे झाल्यासारखे दिसते. मी गेलो होतो तेव्हा मंदिर उभे होते पण त्याच्या पुष्कळ शिळा विस्कळित झाल्यासारख्या दिसत होत्या.

तुमच्या क्र.१० मधील द्वारपालच माझ्या क्र.१ मध्ये दाराच्या चौकटीच्या डाव्या बाजूच्या पायाशी आहेत असे वाटते. माझ्या चित्रात शंकराचा नंदीहि आहे.

माझे क्र.३चे चित्र लक्षणीय आहे. मुख्य देवळाच्या आवारातील हे एक लहान देऊळ असून संपूर्ण उघडयावर पडल्यासारखे आहे. कोणा देवीचे ते देऊळ दिसते. त्याचे द्वारपाल हे हाडांच्या सापळ्यासारखे दिसतात. ह्याचा अर्थ काय असावा? हे काही शाक्त अथवा मंत्रतंत्राचा प्रकार आहे काय?

मी देवळात गेलो त्याच दिवशी गावकरी बैलपोळ्याचा सण साजरा करीत होते. त्याचेहि एक चित्र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्र. ३ च्या चित्राबद्दलः नक्की ठाऊक नाही पण चामुंडा नामक देवीचे रूप बर्‍याचदा असे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरविंद सर, फोटो बद्दल धन्यवाद. १२ वर्षापूर्वीचे मंदिर पहावयास मिळाले.
पहिल्या फोटोत मंदिर आतापेक्षाही मोठे आणि सुस्थितीत वाटत आहे. प्रवेशद्वार आणि नंदी यावरही छत दिसते आहे जे आता नाहीये. नंदी पण जरा मागे गेलाय म्हणजे कोणीतरी हलवला असावा. (तेव्हा जसे मंदिरासमोर नंदी दिसतोय तसे आता नाहीये.)
तेव्हा कळस होता का मंदिरावर? आता तो मंदिराच्या मागील बाजूस पडलेला आहे. सध्या त्याच कोरीव शिळा वापरून डागडुजी काम चालू आहे.
क्र. ३ च्या चित्राबद्दलः एका ठिकाणी, ती अस्थिपंजर झालेल्या वृध्द स्त्रियांची शिल्पे आहेत असे वाचनात आले. तर एका संस्थळावरील प्रतिसादाप्रमाणे "स्त्रिया नसून वेताळ आहेत. कोकणातल्या प्राचीन मंदिरांत असे वेताळ अथवा भूतगण आढळतात." असे कळले. याबद्दल अजून माहिती शोधत आहे.
आणि चित्र ३ मधील जे उघडे देऊळ आहे त्याला आता साधे छत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

ती अस्थिपंजर झालेल्या वृध्द स्त्रियांची शिल्पे आहेत असे वाचनात आले. तर एका संस्थळावरील प्रतिसादाप्रमाणे "स्त्रिया नसून वेताळ आहेत

ती नुसतीच म्हातार्‍या बायकांची शिल्पे नसणार असेच वाटते. पण वेताळ देवाची जी दोन चित्रे पाहण्यात आली त्यात तो अस्थिपंजर नसून चांगला टुणटुणीत दाखवला होता. खंडोबा इ देवांप्रमाणे. मोठाल्या मिशा आणि उग्र पण भयप्रद नसलेला चेहरा. वेताळच असेल तर दो दोन कशाला असतील असे वाटते. ह्या द्वारपालासारख्या अस्थिपंजर शिल्पांना दुसरा काही संदर्भ असू शकेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती नाही.
हम्पी/बदामी वगैरे ठिकाणी सुद्धा असेच अस्थिपंजर झालेल्या पुतळ्यांना गाईड ने वेताळ म्हटले होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडले! लहानपणी जुन्नर मंचर परिसरात खूप फिरल्याने आवडत्या भागाबद्दल माहिती दिलीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान सविस्तर माहिती, चित्रे, प्रवासातील अनुभव सगळे एकत्र.
कोल्हटकरांचे प्रतिसादही माहितीपूर्ण

सदर लेखाचे विकीपान करण्यास लेखकाची परवानगी आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विकीपान करण्यास म्हणजे मराठी विकीपिडिया वर लेख लिहिण्यास का? अगदी परवानगी आहे.
मी बरेचदा मराठी विकीपिडिया वर माहिती लिहित/दुरुस्त करत असतो. पण ते संदर्भासहित द्यावे लागत असल्याने वेळखाऊ काम आहे. येथे कोणी करत असेल, आणि हि माहिती उपयोगी पडणार असेल तर मला नक्कीच आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

आभार. इथे ऐसीअक्षरेवर, विकीपाने(तुम्हाला लागलेला अर्थ बरोबर आहे) तयार करायला प्रोत्साहन द्यायचे ठरवले आहे.
या माहितीवर आधारीत पान तयार करेन. तुम्हाला योग्य वाटेल ते बदल तुम्ही करू शकालच.
खाली बाह्य दुव्यांमध्ये ऐसीच्या या लेखाचा दुवा दिला जाईल जेणे करून अप्रत्यक्षरित्या तुम्हाला मूळ लेखनाचे क्रेडिटही मिळेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चांगला उपक्रम आहे. मला नक्कीच चालेल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

सदर माहितीपूर्ण लेखावर आधारीत कुकडेश्वर मंदिर हे विकीपान बनविले आहे.

या पानावर तुम्ही काढलेले फोटो टाकता येतील मात्र सदर फोटो प्रताधिकार मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी फॉर्मॅलिटी म्हणून प्रतिसादार / मला क्न्फर्मेशन देणारा व्यनी केलात तर फोटो चढवायची सुरूवात करेन.

श्री. कोल्हटकरः आपण दिलेले फोटो प्रताधिकारमुक्त आहेत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार छान फोटो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छानछान अती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

सदर लेखातील माहिती वापरून विकीपान तयार झाले आहे.

या माहितीत मिसळपाव.कॉम वर झालेल्या चर्चेतील/प्रतिसादातील अधिकची माहिती योग्य ती परवानगी मिळताच वाढवली जाईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटो क्र. ४ झकास. सूज्ञ माणूस, मस्त फोटो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिकेश,आपण बनवलेले विकीपान झकास झाले आहे. फोटो मुळे अजून छान वाटतेय. दुर्लक्षित अश्या या पुरातन मंदिराची माहिती आता सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल.
फक्त एक छोटी गोष्ट. जायचे कसे मध्ये 'पूर' या गावाच्या नावाला जी लिंक जोडली गेली आहे. ती 'नदीचा पूर' या पानावर रीडायरेक्ट होते आहे. तो दुवा काढून टाकता येऊ शकेल का?
बाकी सर्वांचे आभार. : )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in