श्री. मकरंद साठे यांच्या Identity च्या संदर्भातील मांडणी बाबत पडलेले काही प्रश्न.

सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करतो.
1-
खालील निबंधातील निवडलेला भाग ( मात्र जसा आहे तसा साठेंच्याच शब्दात) हा श्री. मकरंद साठे यांच्या सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण या अत्यंत प्रगल्भ अशा निबंधा चा एक लहानसा भाग मात्र आहे.पुर्ण पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते विकत घेउन एकवेळ जरुर वाचावे अशी आग्रहाची विनंती.
2-
श्री मकरंद साठे यांची मांडणी तशी जुनी च आहे पण समकालीन वास्तवात ती कीती रेलेव्हंट आहे हे आपल्या परस्पर विरोधी मत असलेल्या गटांच्या चर्चामधुनही लक्षात येते, त्यांनी याच मांडणीला “चौक” या अत्यंत प्रगल्भ अशा नाटकाने ही अभिव्यक्त केलेले आहे ते ही आपण जरुर बघावे. त्यांचा शांता गोखले यांनी घेतलेला सकाळ दिवाळी अंकातील इंटरव्ह्यु ही फ़ार सुंदर आहे वर्ष आठवत नाही बहुधा २०१० चा अंक आहे.
3-
यातील केवळ मला अगत्य असणारया विषयाला मी निवडुन काढलेले आहे जो साधारणपणे पहील्या ३० पानांत येतो. याचे कारण म्हणजे मला असे वाटते की हा भाग म्हणजे एका समस्येची मुलभुत मांडणी आहे व यापुढील भाग हा साठे यांनी केलेले त्यांच्या मतानुसारचे या समस्येचे विश्लेषण आहे. तर मला इथे साठेंच्या समस्येच्या मांडणीवर चर्चा व्हावी असे वाटते. आणि तीचे विश्लेषण हे प्रत्येकाचे वेगवेगळे असु शकते. ते जाणुन घेण्याची इछ्छा मला आहे.( पुढील भागात रस असणारयास पुर्ण पुस्तक वाचनास मार्केटमध्ये सदैव उपलब्ध आहेच )
4-
खालील भाग हा मी ओळखी च्या समस्येसंदर्भातील जी साठे यांची मांडणी आहे ती मांडणी जो भाग अधिक नेमकेपणाने दाखवुन देते तो भाग च घेतलेला आहे. अर्थात त्यांचे शब्द जसे चे तसे घेउन. आणि श्री.साठे च इतकी नेमकेपणाने मांडणी, इतक्या अचुकतेने व प्रगल्भतेने करतात की त्यात मी माझा एकही स्वत:चा शब्द घुसडुन त्या पांढरया सदरयावर डाग पाडु इछ्छीत नाही.
तर आता साठे यांच्या निबंधातील काही निवडक भाग खाली देत आहे आणि तो संपल्यानंतर त्या संदर्भातील मला महत्वाचे वाटणारे मुद्दे व प्रश्न देत आहेत. यावर मंथन व्हावे इतकीच माझी अपेक्षा आहे.

साठेच्या निबंधातील निवडक भाग सुरु..........................

ओळख (identity) हा विषय मुळातच गहन क्लिष्ट व्यामिश्र (complex) इत्यादी त्यातुनच आजच्या घटकेला त्याला इतक्या मिती जोडल्या गेल्या आहेत की त्याचा वेध घेणे दुरापास्त होउ लागले आहे. या विषयाची मुळातच असणारी गहनता व आजमितीला त्यात निर्माण झालेली व्यामिश्रता व विखंडीतता हे दोन्ही प्रकार मला कसे जाणवतात ते आधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो ( येथे मी सामाजिक ओळख या अर्थी बोलत आहे) इंग्रजी Identity या शब्दासाठी आज मराठीत अस्मिता हा शब्द वापरला जातो. परंतु अस्मिता या शब्दाला जोडुन उगाचच एक अभिनिवेशी भाव असतो असे मला वाटते त्यापेक्षा ओळख हा रोजच्या संभाषणात वापरला जाणारा शब्द जसे की मी अमुक म्हणुन ओळखला जातो किंवा ओळखपत्र (identity card) इत्यादी मला जास्त सोयीचा वाटतो परंतु या ओळखीचा इंग्रजी recognition या शब्दाशी संबंध जोडला जाउ नये म्हणुन हा खुलासा.

सेन यांच्या मते आपल्या ओळखीत सामाजिक परीस्थीतीचा जाणिवांचा वाटा असला तरी त्या (ओळखी) केवळ समाजातुन, सामाजिक मान्यता लाभलेल्या परंपरांतुन ठरत नाहीत .आपण आपली विवेकबुद्धी (reason)वापरुन त्या बदलु शकतो. आपल्याला या निवडीचे ( ओळखीच्या निकषांच्या निवडीचे ) स्वातंत्र्य असते,( freedom of choice) आपण एकाच समाजाचे –इतर जगापासुन पृथक अशा समाजाचे- संपुर्ण घटक म्हणुन जगत राहण्याचे कारण नाही; त्या समाजातुन सहज उदभवणारया ओळखींपासुन वेगळ्या ओळखी आपण विचारांती धारण करु शकतो; निरनिराळे समाज आणि संस्कृती अशा एकमेकांपासुन विलग अवस्थेत., एकमेकांत कधीही मिसळु न शकणारया अशा बेटांसारख्या असण्याचे आज कारण नाही; त्यामुळे एखादी व्यक्ती ही अशा बेटांवर अडकुन राहण्याचे कारण नाही; विवेकाने या मर्यादा उल्लंघुन आपण जाउ शकतो इत्यादी मांडणी सेन यांनी मोठ्या तरलतेने व सम्यकतेने केली आहे, ही गृहीत धरुन मी पुढे जातो. ओळखींच्या निवडीचे स्वातंत्र्य आपणास असते हा त्यांचा मुद्दा मान्य करुन माझ्या विषयाची माझ्या विषयाची सुरुवात म्हणुन मी तो थोडक्यात मांडला आज या ओळखीचे या निवडीच्या स्वातंत्र्याचे काय होते हा माझा विषय आहे. हे निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येक व्य्क्तीस असते निदान काही प्रमाणात असते असे आपण मान्य केले व त्याकडे जास्त जवळुन पाहीले तर असे लक्षात येते की गेल्या काही दशकांत या निवडीच्या प्रक्रियेतच अनेक कारणांनी काही मुलभुत बदल झालेले आहेत .या निवडीच्या परीणामातही त्यामुळे बदल झालेले आहेत.

आज दोन भिन्न संस्क्रृतींमधील सर्व पातळ्यांवरची देवाणघेवाण, दुसरया संस्कृतीतील व्यक्तीबरोबरचा (अगदी सामान्य माणसांचाही ) संपर्क इत्यादी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अलग विचारचौकटीतुन निर्माण झालेल्या श्रध्दा वा क्षीण झालेल्या श्रध्दा ,विज्ञान, तत्वज्ञान, व्यापार,कलाव्यवहार ,तत्वप्रणाली ,तत्वप्रणालींवरचा उडालेला विश्वास किंवा मी एक तत्वप्रणाली मान्य करुन जगत असता त्या तत्वप्रणालीवरचा ज्यांचा विश्वास उडालेला आहे अशांशी येणारा संपर्क, इत्यादी अनेक गोष्टींबाबत ही देवाणघेवाण असते.संपर्कात येणारया संस्कृती या ऐतिहासिक दृष्ट्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असतात(एका अर्थी विकासक्रमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असतात) त्यामुळे वेगवेगळ्या अवकाशात त्या त्याप्रमाणे जगत असतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या काळातंही त्या जगत असतात, नवे तंत्रज्ञान, नवी संपर्कमाध्यम व्यापाराचे (आणि त्यातुन राजकीय वर्चस्वासाठी) उघडणारे दरवाजे, त्यातुन उदभवणारे जागतिकीकरण( globalization) या सर्वाचा रेटा या देवाणघेवाणी मागे आहे. या देवाणघेवाणीमुळे या संपर्कामुळे आपण ज्या विषयी विचार करीत आहोत ती निवड ज्या शक्यतांमधुन करावयाची त्यांची संख्या अफ़ाट वाढत आहे, आणि त्यांचे स्वरुप व्यामिश्र (complex) होत आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या शक्यता एकमेकांशी असंगत अशा चौकटींतुन संचामधुन उदभवलेल्या आहेत.

भारतासारख्या विकसनशील देशांत ,सांस्कृतीक विकासाच्या अनेक टप्प्यांमधुन गेल्यानंतर समोर ठाकाव्यात, अशा या अनेक शक्यता त्या टप्यांमधुन न जाताच सामोरया येत आहेत. इथल्या व्यक्तींच्या मनोभुमिका आणि अर्थव्यवस्था, निर्मीतीची हत्यारे (tools of productions), ज्ञानमार्गाचा विकास इत्यादी या निवडीसाठी योग्य प्रकारे तयार होण्याच्या आधीच त्या सामोरया येत आहेत. समाज एकसंध ठेवणारया श्रध्दा अगदी जागतिकीकरणाच्या रेट्याच्या काहीशा बाहेर राहीलेल्या अशा आदिवासी समाजात सुद्धा आज (वा निदान नजीकच्या भविष्यात) अनाघ्र अशा अवस्थेत सापडणे अशक्य आहे. या श्रध्दा निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत असतातच , निवड करण्याचे स्वातंत्र्य आपण त्या त्या वेळी घेत असतोच.परंतु प्रचंड वेगाने होणारा संस्कृतीसंकर ही गोष्ट च वेगळी आहे माझे विवेचन या संस्कृतीसंकराला अनुलक्षुन आहे. हा संस्कृतीसंकर निवडीच्या शक्यता अफ़ाट वाढवितो . एका अर्थी मला समृध्द करतो; एतिहासिक दृष्ट्या पुढच्या टप्प्यावर नेतो. परंतु दुसरया अर्थी मला पेचात टाकतो.

एका व्यक्तीच्या अनेक व्यामिश्र ओळखी निर्माण करतो. ती व्यक्ती एकाच वेळी भारतीय ,(पण) लंडननिवासी, स्त्रीवादी, वित्तीय धोपटमार्गी( fiscal conservative), मॆक्डोनाल्ड बर्गर आवडणारी, लोककलांचा अभ्यास करणारी, सॅक्सोफ़ोन वाजविण्यात निष्णात असणारी इत्यादी अनेक ओळखी प्राप्त करुन घेउ शकते. एकापेक्षा जास्त ओळखी पुर्वीही होत्याच परंतु त्यांची संख्या सामान्यत: इतकी नव्हती (इतकीच्या जवळपासही नव्हती) आणि दुसरे म्हणजे त्या ओळखीतही एकात्मता असे. याचा अर्थ असा की पुर्वीही निवडीच्या शक्यता (अगदी एकमेकींशी विसंगत अशा शक्यताही) अस्तित्वात होत्या. पण या सगळ्या शक्यता एकाच चौकटीतुन (frame) उदभवलेल्या असत. एकाच एकात्म विचारसंचाचा भाग असत. आज या ओळखी अनेकदा एकमेकींशी विसंगतच नव्हे तर असंगत ही असतात. दोन ओळखींमध्ये किंवा त्याच्यामागील जाणिवांमध्ये काही संबंधच नसतो. म्हणजे त्याचा उदभव वेगवेगळ्या असंगत चौकटींमधुन, प्रणाली – पद्धतीमधुन (system) झालेला असतो.

म्हणजे दोन ओळखी एका जाणिवेतुन , एका प्रणालीतुन चौकटी श्रद्धेतुन उमललेल्या नसतात. त्यांना ज्यातुन प्रामाण्य (योग्यतेचे प्रामाण्य- validity ) मिळते त्या गोष्टीही त्यामुळे वेगळ्या असतात. या अनेक व्यामिश्र ओळखी एकाचवेळी अस्तित्वात असतात. त्या कायम बदलणारया व वेगवेगळ्या बिंदुमुळे परीणामीत होणारया अनेक घटकांवर आपले अस्तित्व, निदान तीव्रतेचा कमीजास्तपणा अवलंबुन ठेवत असतात. त्या एकमेकींशी संबध नसणारया श्रद्द्दामधुन ,संस्कृतीमधुन, अनुभवांमधुन,भाषांमधुन, ज्ञानसंच यामधुन , अवकाश आणि काळांमधुन फ़ुललेल्या असतात.त्यांच्या प्रामाण्यातील एकात्मतेचा शोध त्यामुळे विफ़ल ठरतो.प्रामाण्याबाबत आणिबाणीची स्थिती ( crisis of validity )असे त्याचे वर्णन करता येईल. अशा परीस्थीतीत काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय नैतिक काय अनैतिक याबाबत गोंधळाची परीस्थीती निर्माण होउ शकते.

व्यक्तीची सामाजिक ओळख याविषयी आपण बोलत आहोत तेव्हा या संदर्भात आपण जेव्हा निवडीचे स्वातंत्र्य असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ नैतिक निवडीचे स्वातंत्र्य असा मुख्यत्वेकरुन होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवणे आवश्य्क आहे. आता अशी निवड जरी तर्कावर , विवेकावर , वैज्ञानिक तर्कशास्त्रावर ( scientific reason) अवलंबुन असली तरी फ़क्त त्यावर अवलंबुन राहुन आपण फ़क्त काही अंतर च आपण जाउ शकतो. वैज्ञानिक तर्कावर( scientific reason) अवलंबुन राहुन नैतिक निवडीच्या प्रामाण्याचे(validity) अंतिम टोक गाठता येत नाही. त्यासाठी काही मुल्य गृहीतके( apriori) आपण मान्य केलेली असतात. त्यांच्यावरच कुठल्याही तर्कशास्त्राचा, तत्वप्रणालीचा ,धर्माचा, सर्वस्पर्शी निवेदनाचा (grand naarative) डोलारा उभारलेला असतो. ही गृहीतके कधी श्रद्धांच्या ( मग ती यातुधिष्ठीत असो वा अन्य) रुपात असतात. कधी भावनांच्या , कधी रुढींमधुन, तर कधी निधर्मी तसेच उपयुक्तततेच्या , सामाजिक कराराच्या इत्यादी रुपांत असतात. हा एका अर्थी त्या मार्गावरचा प्रामाण्य सिद्ध करण्याचा अंतिम भोज्या असतो. पुर्वी ओळखीचे स्वरुप एकसंध असतांना , निदान एकच अंतिम भोज्या असे, एकच श्रद्धा व गृहीतक असे. आता असे अनेक अंतिम भोज्ये येणार हे वरील विवेचन मान्य केल्यास उघड आहे. आज व्यक्तीच्या एका ओळखींचे प्रामाण्य ती व्यक्ती उपयुक्तततेवर अवलंबुन ठेवते. दुसरीचे प्रामाण्य आधीच खिळखीळ्या झालेल्या पण अजुन टीकुन असणारया धर्मश्रद्धेवर ठेवते , तर तिसरया ओळखीचे प्रामाण्य भावनेवर ( त्यातही एका विशीष्ट समाजाची मान्यता मिळालेल्या भावनापोतावर ) अवलंबुन ठेवते असे अनेकवार आढळुन येते. सामान्य व्यक्तींच्या ओळखीमध्ये, प्राण्यांमध्ये एकात्मता नसली , त्यांनी लावलेले निकष एकाच चौकटीतुन उदभवलेले नसले , तर असंगताची व्याकुळ करणारी भावना, सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात निर्माण होते मग ती कळत असो वा नकळत.

या निवडप्रक्रीयेकडे अजुन खोलात जाउन पाहीले तर असे लक्षात येते की ती केवळ अनेकविध चौकटीतुन उमललेल्या पर्यायामधुन –व्यामिश्र पर्यांयातुनच करायची आहे असे नव्हे ,तर ती करणे तुमच्यावर काहीसे बंधनकारकच आहे. स्वातंत्र्य अनेकदा सक्तीसारखे (हक्क – कर्तंव्याच्या जोडीप्रमाणे ) वाटु लागते. व स्वातंत्याची ही किंमत मोजावीच लागते हे जरी मान्य केले , तरी ज्यांच्या प्रामाण्याविषयी एकवाक्यता नाही, ज्या शक्यतांमध्ये एकसंधता नाही , त्यात निवड करण्याची सक्ती वा स्वातंत्र्य पुर्वीच्या स्वातंत्र्यापेक्षा वेगळेच पोत घेउन येते.
त्यातुन ती निवड ज्यावर अवलंबुन करायची ते ज्ञान ,माहीती , शिक्षण, सत्य व त्याचे तात्वीक ज्ञान,हे अनेकदा बहुसंख्यकांच्या आकलनाबाहेर , आवाक्याबाहेर असतांना करावयाची आहे, काही वेळा त्या समाजाची अवस्था काही संकल्पनांना सामोरे जाण्याइतकी उत्त्क्रांत झालेली नसताना त्या संकल्पना त्या समाजावर बाहेरुन आदळल्यामुळे संकल्पना आवाक्यात नसतात. उदाहरणार्थ राष्ट्रीयत्व वा राजकीय राष्ट्रीयत्व(political nationality) या संकल्पनेचे भारतातील आगमन.अशा अनेक संकल्पना वा ओळखी आहेत.दुसरया बाजुला ही निवड प्रत्येक ओळखीबाबत स्वतंत्रपणे करावयाची आहे. म्हणजे एक प्रणाली वा सर्वस्पर्शी निवेदन( grand narrative) आपण निवडले की बाकीच्या ओळखी त्यातुन सुसंगतपणे निघतात ( निदान सैद्दांतिकदृष्ट्या) अशी ही प्रक्रीया नाही. हे सर्व लक्षात घेतले तर या ओळखींमधील व्यामिश्रता, गुंतागंत (complexity)कशी वाढते ते लक्षात येईल.

एकाच व्यक्तीच्या अनेक ओळखी असतात हे आपण पाहीले ( जशा की भारतीय , लंडनवासी, वित्तीय धोपटमार्गी,(fiscal conservative) स्त्रीवादी इत्यादी ) त्या कधी कधी द्वंद्वात्मक असतात. म्हणजे त्यांच्यात झगडा असु शकतो. उदा. लंडनवासी वा सोइसाठी रेठरेवासी (बुद्रुक) ही ओळख आणि त्याच व्यक्तीची वित्तीय धोपटमार्गी ही ओळख . वित्तीय धोपटमार्गी म्हणुन त्या व्यक्तीला सरकारने वित्तीय (fiscal)शिस्त पाळणे , खर्च कमी करणे हे मान्य असेल परंतु त्याच वेळेस एक रेठरेवासी (बुद्रुक) म्हणुन सरकारने रेठरे या गावी जा-ये करणारया बसची संख्या परवडत नसतानाही वाढवावी वा रेठरे गावात नवे कारखाने काढण्यासाठी अनुदाने( subsidy) द्यावीत असे ही वाटेल. या ओळखीप्रमाणेच ओळखी या एकमेकींशी असंगत असतात, त्यांची सुरुवात कशी वेगवेगळ्या गृहीतकांपासुन होते हेही आपण पाहीले.

या अशा व्यामिश्र ओळखी , त्या ज्यावर अवलंबुन असतात अशी व्यामिश्र गृहीतके त्यामुळे एक व्यक्ती म्हणुन भावनिक आणि एक समाज म्हणुन सांस्कृतिक परीणाम काय होतात ? ही परीस्थीती पुर्वीच्या कुठल्याही परीस्थीती पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे त्याचे परीणाम ही तसेच असणार. ही परीस्थीती प्रत्येकाच्या मनात असुरक्षीतता उत्पन्न करते. व्यक्तीच्या विचारधारेचा, समाजाचा, गटांचा, संस्कृतींचा, श्रद्दां वा तर्कशास्त्रांचा ,प्रामाण्याचा एकसंधपणा नष्ट झाला, तर असुरक्षीततेची भावना , एकटेपणाची भावना निर्माण होते हा एकसंधपणा एखाद्या अभेद्य भिंतीसारखा आपल्या भावनिक विश्वाचे ,कीमान काही दिशांनी संरक्षण करत असतो. निदान तसे आपल्याला वाटते.निश्चीतपणाची भावना थोडी सुरक्षीतता देते. माणसाचा मेंदु त्यासाठी संगतीची मागणी करीत असतो. त्यातुन गेल्या अनेक वर्षांत जगातल्या बहुतेक संस्कृतींची. ह्या असुरक्षीततेच्या भावनेची , सवयच तुटली होती.सामाजिक आठवणीतुन ही ती पुसली गेली होती.समाजातले साधे साधे व्यवहार खात्रीलायकरीत्या होत होते. ७ जुनला शाळा सुरु होणे ; सरकारने आर्थीक नियोजन करणे , साहीत्याची ब्राम्हणी वा दलित अशी वर्गवारी करणे; कायमच्या नोकरया मिळणे व त्या खरोखरीने कायमच्या टीकणे, हे सर्व जणु नैसर्गिक असते, इतका आपला यावर विश्वास बसला होता.संस्कृतीच्या घड्या बसल्या होत्या पावलोपावली निवड करण्याची गरज नव्हती, ज्या ठिकाणी ती होती, तिथे योग्य म्हणुन सिद्ध झालेल्या पथदर्शक खुणा( guidelines) होत्या.

प्रत्येक पावलावर निवड करणे हे मनुष्याला ओझे वाटते. त्यातुन ही निवड असंगत गोष्टींमधुन करायची वा दोन विसंगत गोष्टी एकत्र मान्य करुन करायची , थोड हे थोड ते अशी ही करायची , ती ज्यावर अवलंबुन अशा ज्ञानापासुन वंचित असतांना करायची, त्यापासुन सहेतुकपणे वंचित ठेवले गेलो असता करायची , अनेकदा तर ते ज्ञान ही संदिग्ध ( आजच्या काही वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे) असता करायची, ते ज्ञानच गहनतेचे( theory of complexity) किंवा गोंधळाचे(chaos) सिद्दांत मांडत असता करायची. या प्रकारातुन व्याकुळता तरी येते, किंवा ही सर्व व्यामिश्रता अमान्य करत सर्वसमावेशक निरपेक्ष एकात्मतेच्या मृगजळाला चिकटुन राहण्याचा प्रयत्न करीत राहायचे , यासारख्या गोष्टी उदभवतात.

यातुन एकतर भावनिक अवस्था नाजुक, पटकन भडका उडेल अशी तरी होते, किवा दुसरया बाजुला माणुस पुर्णपणे कोडगा,स्वार्थी ,संवेदनाशुन्य संधीसाधु पद्धतीन जगणारा, समाजात बेटासारखा जगणारा असा तरी होतो. यातील पहील्या भुमिकेतुन मुलतत्ववादी , अतिरेकी देशीवादी (nativist)जाती/गट/धर्मवादी इत्यादी भुमिका उभरतात.
तर दुसरयामुळे सार्वत्रिकीकरण, लघुत्तम साधारण विभाजकावर विसंबणे, सांस्कृतिक जागतिकीकरण, साचेबंदपणा(standardization globalization of culture) , सपाटीकरण, समोर अन्याय ,बलात्कार ,खुन होत असता थंड राहणे इत्यादी मनोभुमिका त यार होतात. या दोन्ही विरोधी वाटणारया मनोवस्था या प्रकारे एकाच कारणातुन उदभवतात.या दोन्ही मनोवस्थांना निवडीचे स्वातंत्र्य (किंबुहना कुठलेच स्वातंत्य्र नको असते) हे दोन्ही मार्ग बहुतेक उदाहरणांत व्यक्तीवादी असल्याचे आढळतील , परंतु त्यांना स्वातंत्र्य नको असते.व्यक्तीवाद आणि स्वातंत्र्य या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. याचे भान आपल्याला पुर्वापार होतेच वरील विवेचनाने याही रीतीने त्याला पुष्टी मिळ्ते.

साठेंच्या निबंधातील निवडक भाग समाप्त......................

वरील ओळखी च्या विवेचना संदर्भात निर्माण होणारे काही प्रश्न. जाणकारांनी प्रकाश टाकावा ही नम्र विनंती !

१-या ओळखी च्या मांडणी बाबत तुमचे बेसिक-जनरल ओपिनियन काय आहे ?
२-एका व्यक्तीच्या अनेक ओळखी असु शकतात या मताशी तुम्ही सहमत आहात काय ? तुम्हाला कधी याचा अनुभव प्रत्यक्ष जीवनात आलेला आहे का ? तुम्ही या कडे कशा रीतीने बघतात ?
३-संस्कृतीसंकर निवडीच्या अफ़ाट शक्यता वाढवितो व तुम्हास पुढे नेणे व पेचात टाकणे एकाच वेळेस करतो या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ?
४-श्रद्धेंना ज्यातुन प्रामाण्य मिळते त्यांतील एकात्मतेचा शोध हा साठे म्हणतात तसा नेहमीच विफ़ल असतो हे विधान तुम्हास पटते का ? त्यात एकात्मता साध्य आहे असे तुम्हास वाटत असल्यास ती कशी होउ शकते याचे एखादे उदाहरण देउ शकता का ?
५-वरील विवेचनातुन ध्वनित होणारी विज्ञानाची नैतिकते संदर्भातील प्रश्न सोडविण्याची मर्यादा आपणास मान्य आहे का ? असल्यास मग जो प्रयत्न विज्ञान या संदर्भात करते उदाहरणार्थ उत्क्रांतीच्या आधारे आधुनिक मानसशास्त्र जे मानवी वर्तनाचा-नैतिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करते मग त्याला काय अर्थ नाही ?
६-निवडीच्या ओझ्याने येणारी व्याकुळता आणि त्यामुळे एकीकडे होणारी भावनिक भडका कधीही उडेल अशी स्थिती व दुसरीकडे येणारी बधिरता याविषयी आपले काय मत आहे?
७-असे वरील प्रकारे बळी न पडता कोणीच माणुस निवड करुच शकत नाही हे आपणास पटते का ? जो प्रयत्न साठे स्वत: वरील निबंधात करत आहेत.
८-आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काही मुल्य-गृहीतके ( a priori) आपण निवडलेले असतात. आणि हा अंतिम भोज्या असतो हे विधान आपणस पटते का या कडे आपण कसे बघतात. (साठेंचे दाखविलेले sources मान्य करुन)
९- आणि या वरील प्रश्नां व्यतिरीक्त वरील मांडणीत तुम्हाला यात महत्वाचे काय वाटते ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

म्हणजे दोन ओळखी एका जाणिवेतुन , एका प्रणालीतुन चौकटी श्रद्धेतुन उमललेल्या नसतात. त्यांना ज्यातुन प्रामाण्य (योग्यतेचे प्रामाण्य- validity ) मिळते त्या गोष्टीही त्यामुळे वेगळ्या असतात. ........................................................................................... अशा परीस्थीतीत काय चांगले काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय नैतिक काय अनैतिक याबाबत गोंधळाची परीस्थीती निर्माण होउ शकते.

या संपूर्ण परिच्छेदाशी सहमत तर आहेच पण अगदी हाच अनुभवदेखील आहे. अनुभव वैयक्तिक असल्याने देता येणार नाही पण अशा कॉन्फ्लिक्ट (असंगती मध्ये)काय झाले त्याचे स्टराइल (सपक) वर्णन करता येईल. एक ओळख दुसर्‍या माझ्याच श्रद्धेबरोबर असंगत असल्या कारणाने, तीसर्‍या ओव्हराअर्चिंग श्रद्धेची मदत घेऊन "इन्टेग्रिटी" (एकात्मता) साधावी लागली आहे. अतिशय त्रास, उद्रेक, व्याकुळतेचा चा सामना केलेला आहे.
____________

एक वाचनात आलेला छान प्रसंग खाली देत आहे. या व्यक्तीचे वडील अत्यंत आजारी होते अन "पुटींग डाऊन) हा मार्ग या व्यक्तीने निवडला. पण वडील अत्यवस्थ आहेत अन त्यांना मर्सी किलींग देणे या परीस्थितीत अतिशय मानसिक घालमेल होत होती. मग या व्यक्तीने तीसर्‍या गृहीतकाचा(श्रद्धेचा) आश्रय घेण्याचा प्रयत्न केला की "हो! सर्व कुटुंबालाच ऑलिम्पिक गेम्स ना जायचे आहे व त्याकरता वडीलांना पुट डाऊन करणे हा सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे. तेव्हा फक्त माझा निर्णय नाही" मग आली या विचारातून एकात्मता, शांती? होय. पण शेवटी एका विविक्षित क्षणी हा डोलारा कोसळला व त्या व्यक्तीला "गिल्ट फीलींग" आलेच. -

My father died in July of 1984, at the age of eighty three, in a hospital room in Encinitas, CA. As he lay in his hospital bed,terminaly camatose, I had a singular moment with him, two days before he died, that shook me. My father & my mother had come up from Florida for the summer to stay with me.We all, my brother & sister, too, had tickets to the Olympic games in LA. My father had suffered a massive btrain hemmorhage & was rendered brain-dead. After he lay his way for three days, the family agreed among themselves, and with the doctor's concurrance, that keeping my father on life support was just using artificial means in a hopeless situation. The ordeal of suspended grieving was wearing down the whole family, especially my not-too-healthy mother. We decided to "Pull the plug" on my Dad's life. It was done. The solution that was dripping into my father's vein was changed from food to salina. It was with terrible mixed emotions that we then waited for his stubbornly strong heart to stop. A day or two later, and still no change in his condition (What a heart he had!), I came into his hospital room to be with him. I sat there looking at my father as the monitor registered his heartbeat, as the lung machine pumped up & down - just to be there. I spoke to my father as he lay there, and said the only thing I could think of - "Come on Pop, come out of this coma. You know we all came here to go to Olympics. The whole family is waiting." I don't know what I was thinking, other than trying to relieve my feelings of guilt & helplessness. But because of what happened next, my words and the moment were seared into my memory forever. I swear: the heart monitor, which for days had kept up a never-changing pattern and rhythm, showed a quickening. He had heard me! Feelings of panic & shame and the fear of the unknown knotted my gut. The pain that lingers still from that moment doen't come from any sense of guilt that he ever had any chance of coming alive, but from not having thought of my dad at that moment, but only of myself. I was speaking the conventional encouragements one does with a convalescent, to make myself feel noble & relieved for the effort. I had no idea he was evesdropping. Why didn't I say: "It's ok Pop, you can let go. You can relax. Your work is done. The whole family is in good shape." Within a couple of days, his heart finally stopped. As I said, the memory of it all, and the accompanying pain, lingers. Some years later I read Stephen Dunn's poem.

- अबक (नाव मुद्दम बदलले आहे), 72, Retired, Carlsbad California

______

With no experience in such matters - Stephen Dunn

To hold a damaged sparrow
Under water untill you feel it die
is to know a small something
about the mind: how for example,
It blames the cat for the original crime,
How it wants praise for it's better side.
And yet it's as human
as pulling the plug on your Dad
Whose world has turned
To feces and for, human as ....
Well lets admit, it's a mild thing
as human thing go
But I felt the one good wing
flutter in my palm------
the smallest protest, if that's what it was,
I ever felt or heard.
Reminded me how my eyelid has twitched,
the need to account for it.
Hard to believe no one notices.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय बोलु काय कळत नाही तुम्ही ज्या कोणी अनामिक व्यक्तीचा एक जिवंत वेदनेचा अनुभव शेअर केला आणि वरील थेअरी ला इतका डीप ह्युमन टच दिला. हा त्यांचा अनुभव सुन्न करणारा वाटला. खर म्हणजे तुमच्या धाग्याला प्रतिसाद जो देत होतो तेव्हा डोक्यात हीच मांडणी होती. मग प्रतिसादात मांडायला घेतली तर जमेना म्हणुन म्हटल नव्या धाग्यात विस्ताराने ओळखी चा प्रश्न जो मकरंद साठें यांनी विलक्षण प्रगल्भतेने मांडलेला आहे त्याच्या खोलात जाता येइल का असा विचार होता म्हणुन हा धागा बनवुन बघितला. याला कारणीभुत तुमचा धागा होता. तुम्ही आत्मीयतेने आपल्या जवळील अनुभव शेअर केला त्यासाठी धन्यवाद. तुमची व्यक्तीगत वेदना समजु तर शकत नाही पण त्याविषयी मनात सह-अनुभुती ची भावना एक माणुस म्हणुन जरुर आहे.
आणि तुम्ही दिलेल्या कवितेतील द नीड टु अकाउंट फ़ॉर इट ची भावना तर मला वाटत आपण प्रत्येकच जण कधी ना कधी अनुभवतोच इतकी युनिव्हर्सल ती मला वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks a lot. The article is very good & as soon as read & then again & again, it opened myself up some great ideas.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण मकरंद साठे?

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खालील लिंक्स आपण बघितल्यास आपल्याला मकरंद साठें विषयी अधिक माहीती मिळेल असे वाटते.
http://www.thehindu.com/features/magazine/i-am-slightly-more-comfortable...
http://www.india-seminar.com/2008/588/588_makarand_sathe.htm
http://www.aisiakshare.com/node/318
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4742815688731044025

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला माझा स्वत:चा अनुभव सांगतो माझ्या स्वत:च्या अनेक ओळखी आहेत मात्र त्यात माझ्या स्व वर सर्वात वरचढ ठरते अशी ओळख म्हणजे मी मराठी आहे ही ओळख. आता मराठी साठी काही मी योगदान वगैरे केल आहे म्हणाल तर शुन्य आणि मला मराठी भाषा मुळात व्यवस्थित येते की नाही तोही एक प्रश्न आहे. आणि मी मनसे वगैरे चा कार्यकर्ता ही नाही तरीही.....मी मराठी आहे ही ओळख फ़ार आतपर्यंत रुजलेली आहे. तर एकदा एका अमराठी लेखकाच्या मराठी लोकांवीषयीच्या कॉमेंटस वाचण्यात आल्या तर तेव्हा असा काही मनाचा भडका उडाला की काय सांगु मी मग एक अत्यंत वाइल्ड अशा रीतीने त्यावर मी व्यक्त झालो. तसच एकदा गाझियाबाद ( उत्तर प्रदेश ) मध्ये एकदा काही कामानिमीत्त गेलो होतो एका हॉटेल मध्ये उतरलो होतो तेथे मला भेटायला माझे दोन मित्र ( दोन्ही मराठी च) आले आम्ही बोलत उभे असतांना शेजारील एका लोकल लोकांमध्ये काही एक अतिशय गलिच्छ कॉमेंट मराठी लोकांसंदर्भात मारली तेव्हा ही आमच्या तिघांचा असाच भडका उडाला. (गंमत म्हणजे ऑदरवाइज जे माझे वागणे असते ते एकदम वेगळे असते) असो तर मला म्हणायचे होते की वर साठे जे म्हणतात ना तसे खरच होत असते.त्यामुळे मला या थेअरी त दम वाटतो.मात्र जे सेन चा रेफ़रन्स देउन साठे म्हणतात की बाय रीजन आपण आपली ओळख बदलु शकतो त्याविषयी मी सांशक आहे, वरील दोन्ही प्रसंगा अगोदर ही हा उहापोह मला माहीत होता परंतु नेणीवे चा प्रभाव हा फ़ार खोलवर असतो. रीजनींग बाह्य मनाने जरी स्वीकारली तरी नेणीवेचे फ़ोर्सेस विलक्षण परीणामकारक असतात.तुम्ही साठेंचा मुळ निबंध एकदा जरुर वाचुन बघा व जमल्यास चौक हे नाटक जरुर बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुमार जी आपण जे काही शेअर केलात त्यावरून अजून एक चांगला मुद्दा ध्यानात येतोय अन तो म्हणजे "दुसर्याची स्वप्रतिमा एकदा लक्षात आली की त्या व्यक्तीला मॅनेज करणे सोपे जाऊ शकते.
मला एक आठवते एक माझी मैत्रीण होती ती जेव्हा जेव्हा मला म्हणत असे की "सारीका तू काय गोरी आहेस तुला सर्व काही खूप छान दिसते" तेव्हा तेव्हा माझा अहंकार सुखावे अन मी त्यावर विश्वास ठेवे. अर्थात स्तुतीला भुरळून गेले नव्हते मला माझ्या कमतरातांची जाणीव होती अन तरीही ऐकायला खूप छान वाटे. ती मैत्रीण मला आवडत असे.
या स्वत:च्या ओळखीचा स्वप्रतिमेशी घनिष्ठ संबंध असावा / असतो.

म्हणजे बघा जर त्याच व्यक्तीने म्हटले असते की "मराठी लोक फार सच्चे अन दिलदार असतात असा माझा अनुभव आहे" तर "नाही वेचिली कवडी दमडी .... नाही वेचला दाम" गाण्यासारखं त्यानी तुमचं काळीज पार विकत घेतलं असतं. Smile

समोरच्या व्यक्तीची स्वप्रतिमा लिव्हरेज करुन कै च्या कै रिझल्ट्स मिळू शकतील असे आत्ता तरी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्या कीऽत्ती कीऽत्ती गोर्‍या हो तुम्ही!

स्नोम्यानपेक्षा सहापट! हो!!!

माझे दात टूथपेस्टने घासल्यावरसुद्धा इतके शुभ्र होऊ शकले असते, तर आणखी काय पाहिजे होते?

(उपप्रश्न: याला अ‍ॅण्टायडोट काय? पक्षी: बाहेर पडलेला जिनी पुन्हा बाटलीबंद कसा करायचा?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विनोदी" श्रेणी दिलेली आहे. ऐष करा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिसली नाही कुठे ती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव तुम्ही पण खरच "सिक्वेन्शिअली" विचार कर्णारे. आमचे छक्के पन्जे तुम्हाला कसे कळायचे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ता दिसली. भरून पावलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण खरंच, तुमच्या या गोरेपणाचं रहस्य काय?

मी जर समजा कोलगेटऐवजी माकडछाप काळी टूथपावडर वापरली, तर माझे दात इतके शुभ्र दिसतील का हो? की आपला विको वज्रदन्तीच वापरू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रहस्य सांगू ते ही फुकटात? मोठे व्हा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एक आठवते एक माझी मैत्रीण होती ती जेव्हा जेव्हा मला म्हणत असे की "सारीका तू काय गोरी आहेस तुला सर्व काही खूप छान दिसते" तेव्हा तेव्हा माझा अहंकार सुखावे अन मी त्यावर विश्वास ठेवे.

कोण हो कोण ही तुमची मैत्रीण ? ती नक्कीच संतपदाला पोहोचलेली असणार.. माया-मोहाच्या पल्याड गेली असणार.
कारण एक सर्वसामान्य मुलगी/बाई दुसर्‍या मुलीला/बाईला असं काही म्हणू शकेल यावर विश्वास ठेवता येत नाहीये.. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

Hahaha. She must be speaking that to keep me away smug & satisfied. Because as a good friend she should have insisted on me working out everyday. Instead she kept me blind & happy. Well .... that is one cunning feminine move. No really!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१-या ओळखी च्या मांडणी बाबत तुमचे बेसिक-जनरल ओपिनियन काय आहे ?
अतिशय योग्य पद्धतीने विशय माण्डला आहे .

२-एका व्यक्तीच्या अनेक ओळखी असु शकतात या मताशी तुम्ही सहमत आहात काय ? तुम्हाला कधी याचा अनुभव प्रत्यक्ष जीवनात आलेला आहे का ? तुम्ही या कडे कशा रीतीने बघतात ?
होय . तसे अनेक अनुभव आलेले आहेत .

३-संस्कृतीसंकर निवडीच्या अफ़ाट शक्यता वाढवितो व तुम्हास पुढे नेणे व पेचात टाकणे एकाच वेळेस करतो या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ?
होय.

४-श्रद्धेंना ज्यातुन प्रामाण्य मिळते त्यांतील एकात्मतेचा शोध हा साठे म्हणतात तसा नेहमीच विफ़ल असतो हे विधान तुम्हास पटते का ? त्यात एकात्मता साध्य आहे असे तुम्हास वाटत असल्यास ती कशी होउ शकते याचे एखादे उदाहरण देउ शकता का ?
थोडेफार सहमत .

५-वरील विवेचनातुन ध्वनित होणारी विज्ञानाची नैतिकते संदर्भातील प्रश्न सोडविण्याची मर्यादा आपणास मान्य आहे का ? असल्यास मग जो प्रयत्न विज्ञान या संदर्भात करते उदाहरणार्थ उत्क्रांतीच्या आधारे आधुनिक मानसशास्त्र जे मानवी वर्तनाचा-नैतिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करते मग त्याला काय अर्थ नाही ?

होय .विज्ञानाच्या क्षमता आणि कक्षा यासन्दर्भात अतिशय कमी आहेत.

६-निवडीच्या ओझ्याने येणारी व्याकुळता आणि त्यामुळे एकीकडे होणारी भावनिक भडका कधीही उडेल अशी स्थिती व दुसरीकडे येणारी बधिरता याविषयी आपले काय मत आहे?
सहमत.

७-असे वरील प्रकारे बळी न पडता कोणीच माणुस निवड करुच शकत नाही हे आपणास पटते का ? जो प्रयत्न साठे स्वत: वरील निबंधात करत आहेत.
नाइलाजास्तव निवड करणे किम्वा निवड न करण्याची निवड करणे हा पर्याय.

८-आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काही मुल्य-गृहीतके ( a priori) आपण निवडलेले असतात. आणि हा अंतिम भोज्या असतो हे विधान आपणस पटते का या कडे आपण कसे बघतात. (साठेंचे दाखविलेले sources मान्य करुन)

अन्शतः सहमत .

९- आणि या वरील प्रश्नां व्यतिरीक्त वरील मांडणीत तुम्हाला यात महत्वाचे काय वाटते ?

यथावकाश विस्त्रुत लिहीन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

१-या ओळखी च्या मांडणी बाबत तुमचे बेसिक-जनरल ओपिनियन काय आहे ?

ही मांडणी मला योग्य वाटते.

२-एका व्यक्तीच्या अनेक ओळखी असु शकतात या मताशी तुम्ही सहमत आहात काय ? तुम्हाला कधी याचा अनुभव प्रत्यक्ष जीवनात आलेला आहे का ? तुम्ही या कडे कशा रीतीने बघतात ?

ह्याचा प्रत्यय हरघडी येत असतो. उदाहरणार्थ, ताज्या देवयानी खोब्रागडे प्रकरणामध्ये ज्यांनी मोलकरणीला कमी पगार दिला त्या बाई अमेरिकेत नोकरी करतात एवढ्याच ओळखीवर त्यांचं वर्तन वरकरणी अन्यायाचं वाटतं. त्या स्वतः दलित आहेत, त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचा आदर्श सोसायटीत फ्लॅट आहे, त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रं सादर केली होती अशी सगळी माहिती म्हणजे त्यांच्या गुंतागुंतीच्या ओळखीचा एक भाग आहे. काहींना ह्या गोष्टी 'व्हिसा फ्रॉड' खटल्यासाठी महत्त्वाच्या वाटतात, तर काहींना त्या असंबद्ध वाटतात हेदेखील रोचक आहे.

३-संस्कृतीसंकर निवडीच्या अफ़ाट शक्यता वाढवितो व तुम्हास पुढे नेणे व पेचात टाकणे एकाच वेळेस करतो या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ?

हो. पुन्हा एकदा खोब्रागडे प्रकरण पाहा - एक भारतीय व्यक्ती भारतात मोलकरणीशी अशी वागली असती, तर कुणाला पत्ताही लागला नसता. पण एका परकीय संस्कृतीत तिनं तशाच वर्तणुकीची निवड केली आणि महाभारत घडलं.

४-श्रद्धेंना ज्यातुन प्रामाण्य मिळते त्यांतील एकात्मतेचा शोध हा साठे म्हणतात तसा नेहमीच विफ़ल असतो हे विधान तुम्हास पटते का ? त्यात एकात्मता साध्य आहे असे तुम्हास वाटत असल्यास ती कशी होउ शकते याचे एखादे उदाहरण देउ शकता का ?

श्रद्धा म्हणताच विफलतेचा धोका संभवतो, कारण ज्यावर श्रद्धा आहे त्याच्या विपरीत प्रचिती येऊ शकते.

५-वरील विवेचनातुन ध्वनित होणारी विज्ञानाची नैतिकते संदर्भातील प्रश्न सोडविण्याची मर्यादा आपणास मान्य आहे का ? असल्यास मग जो प्रयत्न विज्ञान या संदर्भात करते उदाहरणार्थ उत्क्रांतीच्या आधारे आधुनिक मानसशास्त्र जे मानवी वर्तनाचा-नैतिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करते मग त्याला काय अर्थ नाही ?

हा प्रश्न अधिक गहन आहे. विशेषतः मानवी हक्कांच्या संदर्भात आज जो उदारमतवादी विचार रुढ आहे तो माणसाबद्दलच्या आपल्या बदलत गेलेल्या वैज्ञानिक आकलनाशी निश्चितच संबंधित आहे. उदाहरणार्थ, जगण्याचा समान हक्क, स्त्री-पुरुष समानता, किंवा समलैंगिकतेला विकृती न मानणं वगैरे. विज्ञानाच्या प्रगतीनं ह्याला नक्कीच हातभार लावलेला आहे.

६-निवडीच्या ओझ्याने येणारी व्याकुळता आणि त्यामुळे एकीकडे होणारी भावनिक भडका कधीही उडेल अशी स्थिती व दुसरीकडे येणारी बधिरता याविषयी आपले काय मत आहे?

ह्याचीही प्रचिती अनेकदा येते. पुन्हा एकदा खोब्रागडे प्रकरणाकडे पाहा - खोब्रागडे दलित आहेत म्हणून त्यांची बाजू घ्यावी, किंवा भारतीय आहेत म्हणून त्यांची बाजू घ्यावी, की अमेरिकन कायद्याप्रमाणे त्यांना योग्य ती शिक्षा होऊ द्यावी अशी निवड प्रत्येकाला करावी लागते आहे. ही निवड सोपी नाही.

७-असे वरील प्रकारे बळी न पडता कोणीच माणुस निवड करुच शकत नाही हे आपणास पटते का ? जो प्रयत्न साठे स्वत: वरील निबंधात करत आहेत.

ते कठीण आहे हे मान्य आहे. तसं करता येणारच नाही असं नाही. काही परिस्थितीत काही लोक प्रगल्भपणा दाखवून निवड करू शकतात असं वाटतं.

८-आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काही मुल्य-गृहीतके ( a priori) आपण निवडलेले असतात. आणि हा अंतिम भोज्या असतो हे विधान आपणस पटते का या कडे आपण कसे बघतात. (साठेंचे दाखविलेले sources मान्य करुन)

मूल्यांची निवड कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला करणं भाग पडतं, आणि प्रत्यक्ष वर्तनात मूल्यसुसंगती राखता येतेच असं नाही हे मान्य.

९- आणि या वरील प्रश्नां व्यतिरीक्त वरील मांडणीत तुम्हाला यात महत्वाचे काय वाटते ?

सांगता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सर्वप्रथम मार्मिक प्रतिसादासाठी धन्यवाद !
एक एक मुद्दा घेतला तर स्पष्टता येईल यासाठी क्रं.२ वर फ़ोकस करतो. हा भाग तुम्ही देवयानींवर फ़ोकस केला आहे पण तो वरील थेअरी च्या स्पेसीफ़ीक संदर्भात देवयानींवीषयी जो भुमिका घेतो जो मत देतो त्याच्यावर ठेवला तर अधिक योग्य होइल. कारण असा माणुस जर त्याच्या अनेक आणि व्यामिश्र ओळखी असतील. वेगवेगळ्या असंगत फ़ेम्स मधुन आलेल्या तर त्याला देवयानींविषयी भुमिका घेतांना व्याकुळता फ़ेस करावी लागेल. उदाहरणार्थ

अ ही व्यक्ती जर भारतीय-हिंदुवादी-भांडवलवादी-अमेरीकी कंपनी कर्मचारी असेल
ब ही व्यक्ती जर भारतीय-बुद्धीस्ट-कम्युनिस्ट-युनियन लिडर असेल

तर वरील दोन्ही अ व ब या व्यक्तींच्या ओळखी या असंगत नसल्याने त्या दोघांना देवयानींच्या केसवरील भुमिका घेतांना काहीही अडचण येणार नाही. कारण सर्व ओळखी या व्यामिश्र नाहीत. असंगत नाहीत.

मात्र आता क ही व्यक्ती आहे ही जर एन-आर-आय(अमेरीकेत)-बुद्धीस्ट- कम्युनिस्ट-अमेरीकी कंपनी कर्मचारी असेल
तर मात्र या क व्यक्तीच्या ओळखी या असंगत असल्याने (एकाच फ़ेम मधील नसल्याने) या व्यक्तीला देवयानींविषयी भुमिका घेतांना कठीण जाइल.वरील साठेंच्या रेठरेवासी(बुद्रुक) प्रमाणे या व्यक्तीला निवडीचे ओझे वाटेल.

मग आयदर तो हे स्वातंत्र्य घ्यायचे टाळेल आणि भावनेने भडकुन भुमिका घेइल किंवा त्या प्रश्नाविषयी संवेदनशुन्य होउन उदासिन राहील
ऒर अतिशय प्रगल्भतेने विवेकाने भुमिका घेइल ( जे अधिका अधिक अवघड होत चाललय असे वरील निबंध अचुकतेने दाखवुन देतो)

क या व्यक्तीला ही निवड करणे कसे सक्तीचे आहे या संदर्भात साठे वरील निबंधात क कडे बोट दाखवुन म्हणतात की.

“ या निवडप्रक्रीयेकडे अजुन खोलात जाउन पाहीले तर असे लक्षात येते की ती केवळ अनेकविध चौकटीतुन उमललेल्या पर्यायामधुन –व्यामिश्र पर्यांयातुनच करायची आहे असे नव्हे ,तर ती करणे तुमच्यावर काहीसे बंधनकारकच आहे. स्वातंत्र्य अनेकदा सक्तीसारखे (हक्क – कर्तंव्याच्या जोडीप्रमाणे ) वाटु लागते. व स्वातंत्याची ही किंमत मोजावीच लागते हे जरी मान्य केले , तरी ज्यांच्या प्रामाण्याविषयी एकवाक्यता नाही, ज्या शक्यतांमध्ये एकसंधता नाही , त्यात निवड करण्याची सक्ती वा स्वातंत्र्य पुर्वीच्या स्वातंत्र्यापेक्षा वेगळेच पोत घेउन येते.”

परत एकदा क या व्यक्तीकडे बोट दाखवुन ती निवड कोणत्या परीस्थीतीत करायची आहे याविषयी साठे म्हणतात

“त्यातुन ती निवड ज्यावर अवलंबुन करायची ते ज्ञान ,माहीती , शिक्षण, सत्य व त्याचे तात्वीक ज्ञान,हे अनेकदा बहुसंख्यकांच्या आकलनाबाहेर , आवाक्याबाहेर असतांना करावयाची आहे”

आपले काय मत आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१-या ओळखी च्या मांडणी बाबत तुमचे बेसिक-जनरल ओपिनियन काय आहे ?

ही मांडणी अत्यंत विस्कळीत वाटली. लेखाचा संदर्भ, उद्देश, ओळखीची व्याख्या, तिचे स्वरुप, गुणधर्म, तिच्या नक्की कोणत्या कोणत्या अस्पेक्टस बाबत काय काय जाणायचे आहे, साठेंनी काय मते व्यक्त केली याचा एक फ्लो बनेल. तो इथे आलेला नाही असे वाटले.
दुसरे भाषेबद्द्ल. या लेखात भाषा (विशेषतः सर्वनामे) जवळजवळ अगम्य वापरली आहे. अगदी परिक्षेत किचकट प्रबंध वाचून उत्तरे द्या प्रकार असतो किंवा पाठ्यक्रमात एखादा धडा नसायला पाहिजे होता अशी भाषा आहे.

२-एका व्यक्तीच्या अनेक ओळखी असु शकतात या मताशी तुम्ही सहमत आहात काय ? तुम्हाला कधी याचा अनुभव प्रत्यक्ष जीवनात आलेला आहे का ? तुम्ही या कडे कशा रीतीने बघतात ?

माणसाची एकच ओळख, स्वमताने, त्याचे नाव असते. पण त्याची उकल केली कि त्याचे अनंत पैलू पुढे येतात. पण त्या सार्‍या ओळखी तो एकाच नावात कोंबतो. आपल्या स्वतःच्या सगळ्या वागण्याचा, विचारांचा सुसुत्र अर्थ काढतो. पण कालमानानुसार त्याच नावाचा वेगवेगळा अर्थ होत आहे हे कोणालाही मान्य असते.
जगद्दॄष्टीने मात्र प्रत्येक माणूस इतर प्रत्येकाच्या मताने वेगळा (वेगळ्या ओळखीचा) असतो. मला माझ्या नातेवाईकांत 'खूप कष्टाळू' म्हणून ओळखतात. माझ्या ऑफिसमधले लोक 'सामान्य' म्हणून ओळखतात. मी ज्यांच्या टच मधे आहे त्यांना पाहून मी स्वतःला बिलो सामान्य समजतो.

३-संस्कृतीसंकर निवडीच्या अफ़ाट शक्यता वाढवितो व तुम्हास पुढे नेणे व पेचात टाकणे एकाच वेळेस करतो या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ?

नाही. निवडीच्या शक्यता संस्कृती संकराने येत नाहीत. उलट त्या कमी होतात. स्थित्यंतरांनी मात्र एकाच व्यक्तिच्या आयुष्यात निवडीच्या शक्यता वाढतात. स्थित्यंतराशिवाय प्रगती होत असेल तर उत्तमच. संस्कॄतीसंकर आपल्याला पुढे नेतो असेही काही नाही. आपण जिथे आलो आहोत ती जागा पुढची आहे असे मानण्याची आपली प्रवृत्ती असते.

४-श्रद्धेंना ज्यातुन प्रामाण्य मिळते त्यांतील एकात्मतेचा शोध हा साठे म्हणतात तसा नेहमीच विफ़ल असतो हे विधान तुम्हास पटते का ? त्यात एकात्मता साध्य आहे असे तुम्हास वाटत असल्यास ती कशी होउ शकते याचे एखादे उदाहरण देउ शकता का ?

नाही. एकात्मता ही इंट्रिंसिक आहे. प्रत्येक एकत्र येणारे सजीव हे संघर्षासाठी एकत्र येत नाही. मनुष्य तर सामाजिक प्राणी. आपल्या सार्‍या श्रद्धा आपली सारी मूल्ये एक आहेत हे दाखवण्यासाठी असतात.

५-वरील विवेचनातुन ध्वनित होणारी विज्ञानाची नैतिकते संदर्भातील प्रश्न सोडविण्याची मर्यादा आपणास मान्य आहे का ? असल्यास मग जो प्रयत्न विज्ञान या संदर्भात करते उदाहरणार्थ उत्क्रांतीच्या आधारे आधुनिक मानसशास्त्र जे मानवी वर्तनाचा-नैतिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करते मग त्याला काय अर्थ नाही ?

हो. विज्ञानाला अजून नैतिकतेचे न माहित नाही. (नैतिकतेचे जाऊ द्या, त्याचा जो भौतिक स्कोप आहे, तोच आताशा नीट मांडणे चालू झाले आहे, पूर्ण करणे नाही. छोट्या छोट्या चमत्कारांनी नतमस्तक होणारांस विज्ञानाचा फूल स्कोप काय आहे याचीच आयडीया नाही.)अर्थातच त्याची मर्यादा मान्य आहे.

६-निवडीच्या ओझ्याने येणारी व्याकुळता आणि त्यामुळे एकीकडे होणारी भावनिक भडका कधीही उडेल अशी स्थिती व दुसरीकडे येणारी बधिरता याविषयी आपले काय मत आहे?

निवड शब्दाशी व्याकुळता, भडका आणि बधिरता हे शब्द जोडताना मधे बरीच वाक्ये गाळली आहेत. निवड हे बौद्धिक काम आहे. लोकांना एकतर निवड करावीच लागत नाही. केली तर परिणामांसोबत जगण्यास ते तयार असतात.

७-असे वरील प्रकारे बळी न पडता कोणीच माणुस निवड करुच शकत नाही हे आपणास पटते का ? जो प्रयत्न साठे स्वत: वरील निबंधात करत आहेत.

मनुष्याचे वर्तन मूलतः भावनिक असते.

८-आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काही मुल्य-गृहीतके ( a priori) आपण निवडलेले असतात. आणि हा अंतिम भोज्या असतो हे विधान आपणस पटते का या कडे आपण कसे बघतात. (साठेंचे दाखविलेले sources मान्य करुन)
हा हे विशेषण मूल्यांस असेल तर १००% पटते.

९- आणि या वरील प्रश्नां व्यतिरीक्त वरील मांडणीत तुम्हाला यात महत्वाचे काय वाटते ?

एकच उदाहरण देऊन एका व्यक्तिचे (ओळखीचे) काल्पनिक उत्तरे लिहा. म्हणजे आम्हाला काय उत्तर लिहायचे आहे याची कल्पना येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.