एका महाचित्रपटाची गोष्ट

काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.

एक मिठाईवाला असतो. फारच दीर्घायुषी. त्याचा नातू एकदम हिरो असतो. त्याला मिठाई विकताना कोणी मुलींनी 'भैया' म्हटलं तर आवडत नसतं. मिठाईवाला सचिनचा पंखा! तर होतं काय की मधली पिढी पडद्यावरुन एकदम डिलिट होते आणि आजोबा,आजी आणि नातूच रहातो. आजोबांचा शंबराव्वा वाढदिवस. त्याच दिवशी सचिनची मॅच. आजोबा टीव्हीवर डोळे लावून बसलेले आणि नातू टोळभैरव मित्रांबरोबर गोव्याला कसे जायचे याच्या चिंतेत. सचिन नव्व्याण्णव वर! आजोबा गॅसवर! मित्र ,गोवा ट्रीपच्या परमिशनच्या चिंतेत. सचिन च्या चिंतेत आजोबा परमिशन देऊन टाकतात. आन... काय राव, सचिन तेंव्हाच आउट! आजी वराडते. नातू समजावतो, सचिनची सेंचुरी सिरियसली घ्यायची नाही म्हणून. हिकडे खुर्चीत बघतोय तर आजोबा पण आउट! ट्युब पेटते. सर्व विधी पार. अस्थिकलश दोन. एक गंगेत बुडवायचा आन दुसरा रामेश्वरला! आज्जी जाणार गंगेच्या मोहिमेवर, नातवाने जायचे रामेश्वरला! गोवा ट्रीप व्हायची कशी ? मित्र डायरेक्ट इंडियाचा नकाशा काढतात आन त्यांना कळतंय की गोव्याचा समुद्र रामेश्वरच्या समुद्राला मिळतोय. म्हणजे अस्थि गोव्याला टाकायच्या, समुद्र त्या रामेश्वरला पोचवेल! नातू लटके आढेवेढे घेतो. मग प्लान ठरतो. कुठल्यातरी साउथच्या गाडीत बसायचं आन आज्जीची पाठ वळताच कल्याणलाच उतरुन गोव्याला पळ काढायचा. पण आजीचे जी.के.जास्त चांगले. चेन्नईची गाडी रामेश्वरला जात नाही हे तिला ठाऊक! नातू म्यँ म्यँ करुन वेळ मारुन नेतो. दर सेकंदाला नाक फुगवले नाही आणि मर्कटचेष्टा केल्या नाहीत तर तो हिरो कसला? पण आज्जी त्याचं बारसं जेवलेलीच असते ना! ती एकदम इमोशनल ब्लॅकमेलिंग करते. हिरो(नातू) गाडीत. दोन दोन महिने कायम वेटिंग लिस्ट दाखवणार्‍या चेन्नई एक्सप्रेसमधे, निम्म्याहून जास्त बर्थ रिकामेच दिसतात. कल्याणला नातू बाहेर. अस्थिकलश आंतच. नातू पुन्हा आंत, गाडी सुटते. नातू उतरायच्या बेतात. हिरवीण गाडी पकडायला धावते. ती स्लो मोशनमधे, नातू पाघळतो. (नाहीतरी गोव्याला हुंगेगिरी करायलाच जायचे असते ना?) नातू हात देतो. ती आंत. नातू उतरायला बघतो. एका पाठोपाठ चार पांच लुंगीवाले गाडी/हिरवीण पकडायला धांवत असतात. हिरो बथ्थड, सगळ्यांनाच हात देतो. गाडी स्पीडमधे. उतरायचा चान्स जातो. हिरवीण आणि लुंग्या यांच्यामधे कडकडकड! हिरो मधे पडायला बघतो. एक महाकाय लुंगी त्याला लिटरली चेपतो. हिरोचे कॉमेडी अ‍ॅक्टिंग. हिरवीण आणि लुंगी फौज हिरोच्याच कंपार्टमेंटमधे. हिरवीणीला हिंदी येतं. लुंग्यांना नाही. हिरोला कळतं, ती साउथच्या गॉडफादरची पोरगी! सगळ्या लुंग्या म्हणजे त्याचे गुंडी. हिरवीणीचे मनाविरुद्ध लग्न ठरवले असते! म्हणून ती पळत असते.ती हिरोला बाहेर पाठवते. हिरो 'नेचर्स कॉल' ला कॉल लावत बाहेर. पाठोपाठ हिरवीण. तिला मोबाईल हवा असतो. सुटकेसाठी काँटॅक्ट करायला. हिरो ला आठवण येते की हा कॉमेडी पिक्चर आहे. तो मोबाईलची कमर्शियल टाकतो. किंमत फक्त ३४२४८ रु. हिरवीण मो. घेते. पण गुंडी लोक हजर. मोबाईल ट्रेनबाहेर. हिरो भडकिंग, पण विळे, कोयते गळ्याशी पाहिल्यावर हिरो टरकिंग! पुन्हा जागेवर. टी.सी. येतो. हिंदी सिनेमातला म्हणजे आगाऊ आणि विनोदी असणारच. लुंगी लोक त्याला भीक घालत नाहीत. डायरेक्ट बाहेर फेकतात. हिरो विटनेस, म्हणून त्याला चेन्नै पर्यंत किडनॅप्. (आयला, मजाच आहे मॅडकॅपला किडनॅप) . वाटेत एक स्टेशन येते. हिरो रेल्वे पोलिसात धाव घेतो. इन्स्पेक्टर दाद घेतच नाही. कारण डॉनचा एरिया सुरु. हिरवीणीचे गांव येते. पूल, धबधबा. गाडी तिथेच थांबते. रिसिव्हिंगला लुंगीधारी बाप. पुन्हा आपसांत कडकडकड! ठरल्याप्रमाणे हिरवीणीच्या बोलण्याला हिरो मुंडी हलविंग. तमिल इल्ले. राष्ट्रपतींपेक्षा मोठा लवाजमा घेऊन सगळे डॉनच्या घरी. हिरवीणीने ज्या थापा मारलेल्या असतात त्यामुळे हिरोचे टेंपररी पण भव्य स्वागत. दुसर्‍या दिवशी ठरवलेला राक्षस्(नवरा) हजर. भाषेचा वांधा. हिरो प्रत्येक तमिल कडकडला मुंडी हालविंग. अजाणता दोघांमधली बिग फाईट ठरते. जो जिंकणार तोच हिरवीणीचा हात धरणार. हिरोला हे सत्य एक सरदार पोलिस इन्स्पेक्टर सांगतो.पण तो ही विना असरदार! हिरवीण बिनधास्त, तिचा पळून जायचा प्लान रेडीच असतो. हिरो एका एक्स्ट्रॉबरोबर नाचतो आणि दारु पितो. मग ओव्हरअ‍ॅक्टिंग क्रमप्राप्तच. बाईकचा स्टंट दाखवताना पळ काढतो. हिरवीणीबरोबर डॉनच्या कारमधून पळतो. पाठलाग. हिरोच्या हातात फक्त कोयता! तेच चित्रपटातले प्रमुख हत्यार, हे नंतर कळते.

आता यापुढची गोष्ट डिटेलमधे सांगणं म्हणजे नुसती शब्दांची पुनरावृत्ती.तर थोडक्यांत सांगायची म्हणजे हिरो-हिरवीणचे अनेकवार पलायन आणि पुन्हा पकडले जाणे, लुंगी डान्स, हिरोने हिरवीणीला आयटेम म्हणणे, त्यांतही वेळात वेळ काढून रामेश्वरला त्या अस्थिविसर्जन करणे . शेवटी पळायचा चान्स असूनही पुन्हा डॉनच्या घरी जाऊन मेगाफाइट करणे व त्यांत कोयता हातात असतानाही व्हिलनला न मारुन त्याच्या तोंडून, तुझा दिल मोठा आहे हे वदवणे. हिरवीणीच्या बापाला महालेक्चर देणे,इत्यादि इत्यादि.

हिरोच्या आणि दिग्दर्शकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. माझी मात्र एक इच्छा अपूर्ण राहिली. मुंबईला परत येताना अजून रेल्वेट्रॅक मधेच पडलेला तो महागाचा (रु.३४२४८) मोबाईल, हिरो चालत्या गाडीतून झुकून लीलया परत मिळवतो असे एक दृश्य टाकले असते तर हिरोच्या कर्तृत्वाला चार चाँद लागले असते. शिवाय कोणाचे का असेना, नुकसान होऊ नये असे वाटणार्‍या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला बरे वाटले असते.

अवांतरः १. जुन्या जमान्यात, एक बाप हिरो होऊन गेला. स्वतःच्या चेहेर्‍यावरुन एक मिनिटापेक्षा जास्त वेळ, कॅमेरा दुसरीकडे जाऊ न देण्याचे त्याचे कसब वादातीत होते. त्याच्या डुप्लिकेटला पण तीच किमया साधलेली पाहून आश्चर्य वाटले.

२. भारतासारख्या गरीब देशात मायबाप प्रेक्षकांकडे या चित्रपटाला द्यायला २०० कोटी आहेत हे वाचून महदआश्चर्य वाटले.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

एवढ्या ओळी खर्च करण्याइतकी लायकी आहे ह्या सिनेमाची?

:O

- (शारुकच्या मर्कटलीला न आवडणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शारुकच्या चाळ्यांना मर्कटलीला हे लेबल लावणे म्हणजे माकडांचा अपमान असल्याने असहमती. बाकी सहमती आहेच.

(वाल्गुदलीलाप्रेमी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खि खि.
मी बेकायदेशीरपणे पाहिला चित्रपट. २ ३ दा हसू आल. 'ये मेरी औरत है' वगैरे... मग फुकटातच पाहिल्याने फेबुवर स्टेटस टाकलं 'चान चान आहे' म्हणुन आणि चक्क चक्क आमच्या इतर पोस्टच्या मानाने बरेच लाइक्स मिळाले. बाकी मोबाइलची किँमत कमी झाली वाटत. मी बघीतला तेव्हा जास्त होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जुन्या जमान्यात, एक बाप हिरो होऊन गेला. स्वतःच्या चेहेर्‍यावरुन एक मिनिटापेक्षा जास्त वेळ, कॅमेरा दुसरीकडे जाऊ न देण्याचे त्याचे कसब वादातीत होते. त्याच्या डुप्लिकेटला पण तीच किमया साधलेली पाहून आश्चर्य वाटले."

आश्चर्य कसलं? एकदा 'सुपरस्टार' झाल्यावर असंच करण्याची हिंदी चित्रपटाच्या हिरोंची (चुकून नटांची असं टंकणार होतो, पण वेळीच भानावर आलो) प्रदीर्घ व देदीप्यमान परंपरा आहे. ह्यास अपवाद हे नियम सिद्ध करण्यापुरतेच. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले