सुपर स्ट्रेसबस्टर

माझा भाचा, गेले वर्षभर कुठलातरी संगणक कार्यक्रम लिहित होता. काय ते पत्ता लागू देत नव्हता. परवा माझ्या वाढदिवसाला तो आला आणि एक छोटा पेन ड्राइव्ह भेट देऊ लागला. मी विचारले, " हे काय आहे ?", त्यावर तो हंसून म्हणाला," मामा, तुला ही सरप्राइज गिफ्ट आहे. हल्लीच्या आसपासच्या अनेक घटनांमुळे तू वैतागलेला असतोस ना ? म्हणून तुझ्यासाठी हा स्ट्रेस्-बस्टर गेम आहे. तू वापरुन बघ, तुला आवडला तर तुझ्या वयाच्या लोकांसाठी मी तो लाँच करीन."
दुसर्‍या दिवशी मी तो संगणकावर उतरवला. बरोबर एक त्रिमिती दिसावे, म्हणून डोळ्यावर चढवण्याचा एक स्पेशल गॉगलही होता. त्याच्या वायर्स संगणकाला जोडल्या. व्वा! काय छान प्रकार होता. एका काल्पनिक पण खर्‍या वाटणार्‍या जगांत प्रवेश करता येत होता. अगदी स्वच्छंद, मनासारखे वागता येत होते. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसंगात शिरता येत होते. हळुहळु सगळी माहिती करुन घेतल्यावर एक रोमांचक सफर करुन आलो. ऐकाच तर.
सकाळची वेळ सेट केली. आणि फिरायला निघालो. पुढच्या वळणावर एक चहाची टपरी होती. पहिला चहा तो रस्त्यावर ओतत होता. त्याच्या डोक्यावर हातोड्याने एक प्रहार केला. त्याने घाईघाईने एक फडके आणून रस्ता साफ केला. समोरुन एक दुधाची गाडी अतिवेगाने येत होती. त्याच्यासमोर मधेच उभा राहिलो. करकचून ब्रेक दाबत गाडी थांबली. बाहेर तोंड काढून तो शिव्या देणार, एवढ्यात त्याच्या स्पीडॉमीटरवर एक हातोडा हाणला. गपचूप गेला साला. पुढच्या वळणावर एक माणुस रस्त्यावर थुंकला. त्याचे तोंड धरले, जबरदस्तीने उघडायला लावले, आणि तोंडात पिस्तुल खुपसले. भीतिने थरथर कापू लागला तो! मग दम देऊन सोडून दिला. तसाच पुढे गेलो. रस्त्याच्या कडेला काही भैये प्रातर्विधीला बसले होते. त्यांना पुढनं 'खो' देऊन त्यांच्याच घाणीत पाडले. आता बरेच गेम खेळता येणार होते.
गोविंदाचा गेम सिलेक्ट केला. ठाण्याच्या चौकात प्रचंड गर्दी होती. गोविंदा चढत होते आणि सारखे पडत होते. जखमी गोविंदांची रवानगी हॉस्पिटलमधे होत होती. काही नेते स्टेजवर उभे होते. डीजेचा आवाज तर गगनभेदी होता. एक 'आवाज' नांवाचा नेता फारच गुर्मीत दिसत होता. मी खिशातून वायरलेस हेडफोन काढले आणि त्याच्या कानावर पटकन बसवले. कानठळ्या बसून त्याचा चेहेरा वेडावाकडा झाला. डीजे ताबडतोब बंद झाला. लगेच बंदुक सरसावून मी ती, अतिउंचावरची हंडी फोडून टाकली, त्यामुळे तो जीवघेणा खेळ लगेच थांबला.
रेल्वेचा गेम चालू केला. काही टपोरी, येणार्‍या गाडीच्या दुसर्‍या तिसर्‍या डब्यातून, एकदम चालत्या गाडीतून, महिलांच्या घोळक्यांत हात पसरुन, उतरत होते. मी महिलांच्याही पुढे , हातात दोन तीन धारदार सुरे घेऊन उभा राहिलो. गुंडाचा कोथळाच निघाला. बूटपॉलिशवाले, कारण नसताना त्यांच्या खोक्यावर खाडखाड वाजवत होते. त्यांना काठीने फटकावले. पुन्हा गाडीकडे मोर्चा वळवला. गाडीच्या टपावर बसलेल्यांना लांब काठीने खाली पाडले. मग गाडीत शिरलो. पत्ते खेळणार्‍यांचे पत्ते हिसकावून गाडीबाहेर फेकून दिले. भजन करणार्‍या मंडळींचे ढोलके सुर्‍याने पंक्चर करुन टाकले. पुढचे स्टेशन येत होते. दाराकडे वळलो. दारात उभे राहून, इतरांना न उतरु देणार्‍या टग्यांना खाली ढकलून दिले.
ट्रॅफिकचा गेम चालू केला. एका चौकात उभा राहिलो. सिग्नल तोडणार्‍या एकूणएक गाड्यांच्या पुढच्या कांचा फोडून टाकल्या. दार उघडून बाहेर पानाची पिंक टाकणार्‍या ड्रायव्हरांना खेचून बाहेर काढले आणि त्यांच्याच शर्टाने त्यांना सगळे पुसायला लावले. बाजूला स्वस्थपणे हे सगळे बघणार्‍या हवालदाराच्या कानाखाली वाजवल्या. त्याच गेममधे मध्यरात्रीची वेळ सेट केली. एका मोठ्या रस्त्यावर बाजूच्या खांबाला दोर बांधून समोरच्या फूटपाथवर दोराचे दुसरे टोक धरुन बसून राहिलो. एकदम रोरावत दहा बारा रेसिंग करणारे मोटरसायकल स्वार आले. ऐनवेळी दोर खेचून सर्वांना खाली पाडले.
हे खेळणे हातात मिळाल्यापासून माझे ब्लड प्रेशर कमी झाले. चिडचिडा स्वभाव कमी झाला. सुपरमॅन झाल्यासारखे वाटू लागले. भाच्याला निरोप पाठवला. गेम फारच आवडला आहे, लवकरात लवकर, त्यांत बलात्कार्‍यांना शिक्षा देणारे आणि भ्रष्ट राजकारण्यांना वठणीवर आणणारे अपडेटस पण तयार करुन पाठवून दे.

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

तुम्ही या खेळात खूपच फाइन डीटेल्स भरलेल्या आहेत, पण हा खेळ बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. त्याला बॉलिवुड म्हणतात. सध्याच्या काळातले त्याचे अवतार म्हणजे दबंग, रावडी राठोड, सिंघम वगैरे वगैरे...

बाकी तुमचाच प्रोग्राम वापरून तुमच्याच खेळात शिरून असे सर्वांना हातोडे मारणाऱ्यांनाच हातोडे मारणारे कोणी तुम्हाला न भेटोत ही सदीच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला आहे स्टेसबस्टर. ही यादी वाढवता येईल, पण तसे केल्याने येणारा स्ट्रेस कमी करण्यासाठीचा प्रोग्रॅम जवळ नसल्याने तसे करत नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ह्या गेमचं नाव काय हो? कोकणस्थं की डोंबिवली फास्ट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

भारीय की स्ट्रेसबस्टर Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! अशा पद्धतीची फॅन्टसी अनेक जण करत असतात. आपल्याच मनाशी. सिग्नल तोडून जाणार्‍या अनेक लोकांना मी अशा पद्धतीने मशीन गनने टिपत असतो. बाकीचे एकदम सुधरुन जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हा हा हा! गमतीशीर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!