उत्क्रांती

कत्तलीच्या वाटे झुंजती कोंबडे
पडलेले सडे जागोजागी

बोलरोंची रांग स्कॉर्पिओंची रांग
क्वार्टरींची रांग टेबलावरी

ब्रेस्लेटे रेबॅन आयफोन रेबॉक
विवेकाला बाक सुखे देऊ

श्रावणात गर्जे डॉल्बी दणादण
सत्यनारायण कॉर्पोरेट

पोपट बोलती पोपट ऐकती
कुंठलेली मती या ठिकाणी

चारचाकीमध्ये साईरामधून
राँगवेमधून दामटता

नवस बोलले नवस फेडले
पापांचे डबोले झाले रिते

काय भले बुरे मला काय त्याचे
धरु काये वाचे मग्रुरीही

रस्त्यावर थुंकी विष्ठा आणि बोळे
यातुनि उमाळे दिव्य सनातन

ओरबाडू आज ओरबाडू उद्या
शिकवू ही विद्या मुलाबाळां

मेल्या म्हातारीच्या दिवसांची नशा
जितेपणी आशा अर्ध्या भाकरीची

शुभ शकुनांचे पुनीत दिशांचे
कौल-करण्यांचे पीक आले

शेंबडे नागडे रस्त्यांत भणंग
चोरे मन अंग पांढरपेशे

कधी कोणी कोठे नाकारील सारे
वाहतील वारे विध्वंसाचे

महाप्रलयाच्या उठतील लाटा
चिंबतील वाटा दाही दिशा

जखमी धरेची छाती उकलेल
नभी उसळेल अग्निरक्त

पडतील खच भग्न शरीरांचे
मानवी किड्यांचे निर्दालन

मग कुठेतरी कडाडेल वीज
पुन्हा एक बीज अंकुरेल
हिरवे पोपटी पुन्हा एक पान
ठेवुनिया भान उमलेल
थिजलेले सर्व विराट विशाल
किंचित हलेल पुढेमागे
गावंढळ जग किड्या कीटकांचे
अळ्या गांडुळांचे अवतरेल
क्षितिजापर्यंत नसेल तरंग
अथवा तवंग प्रगतीचा

जाणता निसर्ग ओळखेल हाक
थांबवेल चाक उत्क्रांतीचे

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

कवितेतील भावनेशी १००+ सहमत.
वाट पहातोय, असा सुदिन येण्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटल शीर्षक जाणीवपुर्वक उत्कांती असे आहे.
एकदा प्रलय झाला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कविता आवडली. 'तो' सुदिन पहायला आपण नसणार याची हळहळ वाटली.

'साईरामधून' हे 'साईराम धून' असे लिहिले तर स्पष्ट होईल...पटकन पहिल्यांदा 'साईरा मधून' अशी फोड केली गेली आणि क्षणभर कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

मी ही तसेच वाचलं. तेव्हा कळलं नाही पेक्षा वेगळंच वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"गोष्ट छोटी डोंगराएवढी" या चित्रपटातले
"यावेळी नक्की भूकंप व्हनार" असे म्हनणारे निळू फुलेंचे पात्र आठवले..

(अर्थातच त्यावरचे त्यांच्या सूनेचे उत्तरही आठवले : कसला भूकंप व्हतोय आन्ना, तुमचं हातपाय कापायला लागल्यात, तुम्हाला वाटतय घरचं हालतय...)

असो कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्षलवाद ही एकच आशा आहे अभ्युत्थानाची...

>>
कधी कोणी कोठे नाकारील सारे
वाहतील वारे विध्वंसाचे
<<

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नक्षलवाद ही एकच आशा आहे अभ्युत्थानाची...

हे बरे आहे!

हे म्हणजे, एकाला आवडत नाही, म्हणून त्याने दुसर्‍यांनी मरण्याची, आणि वर त्याकरिता तिसर्‍यांनी सुपारी घेऊन बदनाम होण्याची अपेक्षा करावी. म्हणजे पहिली पार्टी घरबसल्या ही असली कवने करायला मोकळी!

(आणि काय हो महाशय, समजा आला तुमचा नक्षलवाद, नि पोहोचले हे तुमचे नक्षलवादी तुमच्या इलाख्यापर्यंत, तर पहिली गोळी तुम्हाला घालणार नाहीत, याची खात्री करून घेतली आहेत काय?)
==========================================================================================
'आयजीच्या जिवावर बायजी उदार' यालाच म्हणत असावेत, किंवा कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचित लांबली असली तरी कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग कुठेतरी कडाडेल वीज
पुन्हा एक बीज अंकुरेल
हिरवे पोपटी पुन्हा एक पान
ठेवुनिया भान उमलेल

........... आमेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

आरपार घुसली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wish you were here...

>>मग कुठेतरी कडाडेल वीज
पुन्हा एक बीज अंकुरेल
हिरवे पोपटी पुन्हा एक पान
ठेवुनिया भान उमलेल
थिजलेले सर्व विराट विशाल<<
हा आशावाद नसेल तर जगणे अवघड जाते. कधी स्मरण रंजन तर कधी स्वप्न रंजन हे मेंदुची गरजच आहे. हम होंगे कामयाब एक दिन या आशावादावर तर चळवळी चालतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कवितेमागे दर्द का हद से गुजर जाना है दवॉ हो जाना तल्या सारखा चिवट आशावाद आहे की ,
Do not worry , Oh Beautiful Plannet ! Human race is not immortal ! तल्या सारखे आश्वासन कविला अभिप्रेत आहे ?
की अजुन वेगळ काही ?
काहीही असो कविता जबरदस्त आहे मनाला भिडली !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर्द का हद से गुजर जाना है दवॉ हो जाना आणि Oh Beautiful Plannet ! Human race is not immortal ! हे दोन्ही उल्लेख वाचून बरे वाटले. धन्यवाद. बाकी कविता ही ज्याने त्याने आपापल्या तर्‍हेने (थोड्याशा अश्लील - बोरकरांच्या?- शब्दांत सांगायचे तर - कपडे काढून) भोगावी. रचनाकर्त्याचाच अनुभव वाचकांना यावा अशी अपेक्षा नसावी. (अति) थोरले बच्चनसाहेब म्हणतात तसे: मनचाहा हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा