मायभूमीला मदत करण्यासाठी आपल्या देशातच राहणे गरजेचे आहे का?

आत्ताच मनोगतावर एक लेख वाचला. मटा मधील या बातमीचा संदर्भ असलेल्या या लेखात शेवटी एक वाक्य आहे की

मात्र , हे ज्ञान मिळवून तिला परत यायचे आहे ते मायभूमीत. आपल्या संशोधनाचा उपयोग इथे करण्यासाठी.

मला नेहमी हा प्रश्न पडतो की हल्लीच्या जगात संपर्काची मुबलक साधने उपलब्ध असताना आणि वैचारिक देवाण घेवाण सहजतेने शक्य असताना (आणि बहुधा अधिक प्रमाणात होत असताना - येथील बर्‍याच शिक्षणसंस्थांमधील तुम्ही कुठे राहून संशोधन करता याला कितपत महत्त्व द्यायचे? संशोधानाचा उपयोग मायभूमीत करणे म्हणजे नक्की काय?

उदा. मी परदेशात राहून जर का HIV वरील लस/ औषधाचा शोध लावला तर त्याचा उपयोग सर्व जगाला होणारच आहे. जर परदेशात लालफितीचा त्रास कमी असेल आणि सहजतेने आर्थिक मदत मिळत असेल तर मग तिथेच का राहू नये?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

हे विश्वची माझे घर ही तर आपल्या संताचीच देणगी ना? मग कुठेही राहिले तरी काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

१. आपला उद्देश मायभूमीला मदत हा आहे कि आत्मोन्नती हा आहे हे स्पष्ट असावे लागेल. माझ्या परदेशातील आत्मोन्नतीने मायभूमीला मदत होते ही चूकीची संकल्पना आहे. बहुतेक लोकांचा मायदेशाशी भावनिक बंध असतो खरा पण ते 'केवळ' आत्मोन्नतीसाठी परदेशात राहतात. त्यांच्या असे असण्याने 'जगातल्या कोणत्याही माणसाने संशोधन केले' आणि 'भारतीय माणसाने संशोधन केले' यांमधे निवासी भारतीयांलेखी काही फरक राहत नाही. वरच्या लसीच्या उदाहरणात 'आपल्याखेरीज कुणालाच ती लस गवसणारच नव्हती' असे असेल तर जगाचे, भारताचे कल्याण! पण हेच काम 'इतर कोणी करू शकत असता' अशी केस असेल तर आपला भारतीयांवर 'विशेष' उपकार नाही. म्हणून परदेशात राहून आपण शोध लावला काय कोण्या अभारतीयाने लावला काय, निवासी भारतीयाला काय 'विशेष फरक' पडतो?
२. जेव्हा जगातले सर्व हुशार आणि उत्तम मूल्ये असलेले लोक एकाच/काहीच देशात राहायचे ठरवतात तेव्हा इतर जगाच्या समस्या सुटण्याची गरज/प्राथमिकता/शक्यता कमी होते. एन आर आय लोक भारतात राहीले असते तर सडले असते हे खरं आहेच पण हे ही खरं आहे त्यांच्या उपस्थितीने गोष्टी बेहतर राहिल्या असत्या.
३. अभारतीय इलिमेंटससाठी केलेले काम भारताच्या सरळ तोट्याचे असू शकते. शाखालिन वायू फिल्डमधला भारताचा स्टेक आपण जर 'स्मार्टली' हाताळला आणि शेलला एक जबरदस्त फायद्याची डील दिली तर तो थेट आमच्या (आधीच ढेपाळलेल्या) बजेटवर आघात असतो.
४. अनिवासी भारतीयांनी अमेरिकेत भरलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर अमेरिकन सरकार पाकला मदत देण्यासाठीही वापरते. हे असा कर देणारांना अपेक्षित नसले तरी यांचे पर्यवसन भारतीय सेनेला क्षती होण्यात होते. आणि ही केस अमेरिकेकडून भारताच्या आयातीशी तोलता येत नाही.

यातलं बरंच काही देशांतर्गत आत्म-उन्नतीला देखिल लागू आहे.

सर्वसाधारणपणे, भारताबाहेर प्रगती करण्याचे 'भारतीयांना (निवासी)' अनेक नफे तोटे आहेत. एका आदर्श आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत हे तोटे शून्य होतील, आता आपण त्यापासून दूर असलो तरी त्यात उडी मारणे गरजेचे आहे.

बाकी मायभूमीला मदत जे जाणिवपूर्वक करतात आणि ज्यांना तेच करायचे असते त्याच्यासाठी सोडू या. 'भारतात' किंवा 'बाहेर' राहणे गौण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  1. येथे आत्मोन्नतीचा प्रश्न नाही आहे. ती मुलगी परत येऊन मायभूमीला मदत म्हणजे नक्की काय करणार आहे? जे काही संशोधन करणार असेल ते परदेशात राहून जर सहज करता येणार असेल तर मायभूमीत येऊन काय बदलणार आहे? बाकी पुढील सर्वच विधाने अतिशय जनरलायझेशन ने भरलेली वाटली. मला नाही वाटत जगात असे काही कोणा सूज्ञाला आधीपासूनच माहित असेल की माझ्याशिवाय कोणालाच काही गवसणार नाही. कोणी असे मानत असेल तर तो त्याचा overconfidence. त्या लसीचा शोध भारतात लागला तर भारतीयांवर उपकार होतील का? बाकी सुनिता विल्यम्स अर्धी भारतीय वंशाची असून भारतात तिचा उदो उदो होतो. अथवा citi bank चा पदाधिकारी मराठी असल्याच्या बातम्या पेपरात छापून येतात याचा अर्थ भारतीयांना फरक पडतो असा नाही घ्यायचा तर मग कसा? माझा प्रश्न फक्त भारतासाठीच मर्यादित नसून मी सर्व साधारण पणे विचारतोय. पण फक्त भारतासाठी विचार केला तरी फारसा फरक पडत नाही.
  2. मी असे कुठेच म्हटले नाही की सर्वांनी एकाच देशात रहावे. जिथे कुठे संशोधानाला वाव असेल तिथे जावे.
  3. हा मुद्दा थोडा विषयाला सोडून होतोय. पण अंबानी वा इतर भारतीय उद्योजक तिथे राहून भारताच्या उन्नतीचीच कामे करत आहेत असे म्हणणे आहे का?
  4. भारतात राहून कर भरणार्‍यांचे पैसे तरी कुठे सेनेला मदत देण्यासाठी वापरले जात आहेत. ते जर राजकारण्यांच्याच घशात जाणार असतील आणि अमेरिकेत भरलेल्या कराने भारतातील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अमेरिका भारताला मदत पाठवत असेल तर काय वाईट आहे?
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरज नाही, असे बर्‍याच जणांबद्दल म्हणता येईल.
उलट परदेशी राहून मायदेशाला मदत करणे जास्त शक्य आहे, अर्थात केली तर.
उदाहरणार्थ भारतात वीस हजार रुपये मिळवणारा अमेरिकेत तीन लाख रुपये महिना मिळवू लागून एक लाख जर भारतात पाठवू लागला, तर भारताला तेवढे पकीय चलन मिळू शकते.
भारतात कोणत्याही क्षेत्रात 'एक ढूंढो हजार मिलते है' अशी स्थिती असल्याने उलट जेवढे लोक बाहेर जातील, तितके बरे, असेही म्हणता येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायभूमीला मदत करण्यासाठी आपल्या देशातच राहणे गरजेचे आहे का?
नाही. मायभूमीला मदत करणेही गरजेचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कोण मायभूमी? ’ऐसी मति जयाची थोर!’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात 'मायभूमीला मदत करण्यासाठी' असे लिहिले आहे त्या अनुषंगाने चर्चा चालवावी.

अवांतर-
बाकी मायभूमीला मदत करणे खरोखरीच गरजेचे नाही या भूमिकेशी सहमत. एवढे लोक भारत सोडून कायमचे गेले. भारत काय ठप्प पडला आहे का? आणि आत्मोन्नतीसाठी मायभूमीचा घातही करावा. बरेच करतात. इथे बसून, तिथे बसून. काय फरक पडतो?

व्यक्तिवाद (आपल्या एकट्याचेच भले करायचे असणे या अर्थी) अजून थोडा वाढला कि जगाचा घात करावा. काही मोठे लोक आपापल्या परीने याचा प्रयत्न करतात. काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हैला.. "उपरोधिक" अशी नवीन श्रेणी आणा बुवा.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही लोकं ह्या मायभुमीतुन गेल्यानेच मदत होणार आहे असं आपलं एक मत आहे, बाकी रावांच्या मताशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्वदच्या दशकापासून खूप लोक भारत सोडून जाऊ लागल्यावर** खरोखरीच भले झाले* असे दिसते आहे. Wink

*भले झाले म्हणजे जीडीपी वाढला वैग्रे वैग्रे
**कोरिलेशन डज नॉट इम्प्लाय कॉजेशन हे वचन आम्हास ठाऊक आहे. पण एक निरीक्षण नोंदवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एन आर आय लोक भारतात राहीले असते तर सडले असते हे खरं आहेच पण हे ही खरं आहे त्यांच्या उपस्थितीने गोष्टी बेहतर राहिल्या असत्या.

ह्या वाक्याशीच असहमत.
एखाद्या 'माय' ने नीट वागवले तरच तिच्याविषयी आत्मीयता वाटू शकेल. त्यामुळे,रावांशी सहमत. मुळात माणसाने इतके अवाजवी,भावनाशील असण्याचे कारणच नाही. मूठभर मुलांनी भारतमाता म्हणायचे आणि बहुसंख्यांनी तिच्यावर बलात्कार करत रहायचे. असल्या वातावरणात रहाण्यापेक्षा, ज्याला जिथे रहायचे आहे तिथे त्याने रहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगरावजी,
१. भारताने जनतेला नीट वागवले आहे, २. नीट नाही वागवले तरी भारताशी आत्मीयता वाटावी, ३, माणसाने अवाजवी भावनाशीलतेने आपला देश निवडावा, ४ जिथे सतत लोक देशावर बलात्कार करतात तिथे राहावे, ५ ज्याला जिथे जायचे स्वातंत्र्य असले तरी तरी त्याने भारतात खितपत पडावे इ या वाक्याचा अर्थ नाही.

सगळे चळवळे लोक एका जागेतून काढले तर तिथली स्थिती अजूनच वाईट होते/होत असावी असे लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फक्त संशोधन या क्षेत्रापुरती चर्चा मर्यादित आहे का?

संशोधन सर्व क्षेत्रांत होतं हे खरंच आहे, पण फक्त संशोधन (उल्लेखलेल्या ओळीतल्या "परत येण्याच्या" उद्देशावरुन) इतकंच काम परदेशी जाणारे आणि इथे राहणारे लोक करतात का? प्रशासन, कारभार, कायदा, इम्प्लीमेंटेशन (प्रत्यक्ष बांधकाम, प्रत्यक्ष रुग्णोपचार, प्रत्यक्ष लस टोचणे) अशी संशोधनाच्या तुलनेत खालची समजली जाणारी पण आवश्यक कामंही असतातच ना? दोन्ही देशांत?

संशोधन हा एकच प्रकार असा आहे की कदाचित तत्वतः असं म्हणता येईल की तो कुठेही राहून केला तरी सर्वांना फायदा होईल. (हे दिसतं इतकं सरळ नाही, पण तरी तत्वतः म्हणता येऊ शकेल.)

पण बाकी बाबतीत काय? उद्योगधंदा, इथे रोजगारनिर्मिती, इथे मूलभूत सुविधा... त्यांचं काय?

बाहेर जाणारे सर्व लोक अमेरिका - कॅनडातच संशोधनासाठीच जातात का? अन्य देशांत केवळ अर्थार्जनासाठी जाणारे बरेचसे नसतात का?

म्हणून विचारलं की संशोधन इतक्या मर्यादित विभागावर चर्चा अपेक्षित असेल तर मग हा प्रतिसाद बाद ठरवावा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविजी,
संशोधनावर चर्चा अपेक्षित नाही. दुव्यामधील बातमीत संशोधनाचा विषय आहे म्हणून प्रारंभीची चर्चा त्या दिशेने आहे.

पण बाकी बाबतीत काय? उद्योगधंदा, इथे रोजगारनिर्मिती, इथे मूलभूत सुविधा... त्यांचं काय?
कळीचा मुद्दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी मुख्यतः संशोधनाबद्दलच बोलत होतो. बहुतेकदा त्याबद्दलच ब्रेन ड्रेन अशी ओरड होत असते. बाकी लोक प्रशासन, कारभार, कायदा, इम्प्लीमेंटेशन इ. इ. कामे करतातच पण बहुतेकदा ह्याविषयीचे शिक्षण त्या त्या देशात राहूनच घ्यावे लागते. अमेरिकेत तर प्रत्येक राज्यात तुमचे वकिलीचे दुकान चालवण्यासाठी लायसन्स लागते (कशाची वकिली करताय त्यावर अवलंबून आहे बहुधा).

संशोधन करणारे काही भारतात येऊन उद्योगधंदा वगैरे सुरू करतात असे कुठे फारसे दिसले नाही. उद्योगधंदा वगैरे सुरू करण्यातसुद्धा बर्‍याच लालफितीच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागते म्हणून असावे कदाचित. बरं त्यातून मायभूमीला फायदा म्हटलं तर कररूपातून जो पैसा जमा होईल तो. रोजगार वगैरे परत त्या त्या कर्मचार्‍याची आत्मोन्नतीच नाही का? तो कर कुठे कशासाठी वापरला जातो वगैरे तर अजूनच वेगळी गोष्ट.

अर्थार्जनासाठी जाणार्‍यांची गोष्टच वेगळी आहे. ते मायभूमीत राहून तरी कर भरण्यापेक्षा काय दुसरी मदत करणार होते?

जर मला परदेशात राहून उद्योग सुरू करणे सोपे असेल (अमेरिकेत LLC सुरू करणे अगदी सोपे आहे. माझ्या एका सहकार्‍याने वयाच्या २४ व्या वर्षी एकही पैसा न चारता २ महिन्यात सर्व सोपस्कार पूर्ण करून LLC register केली होती) आणि समजा भारताला कर न देता तिथल्या कर्मयोगी संस्थांना मदत देता येत असेल तर ती मायभूमीतील लोकांनाच मदत नाही का? बाकी बिल गेट्स याच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन ने बर्‍याच संशोधकांना कामाला लावून अविकसित/ विकसनशील देशांना उपयोगी पडतील असे बरेच नवनवीन शोध लावले आहेत. त्यात किती भारतीय/ इतर देशीय आहेत याचा विदा माझ्याकडे नाही पण तेच संशोधक जर त्यांच्या मायभूमीत राहिले असते तर हे शक्य झाले असते का? बरं मदत तर त्यांच्याच देशाला होते आहे.

मला अमेरिकेतच लोक जातात असे म्हणायचे नाही आहे. कोणत्याही विकसित देशात म्हणूया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थार्जनासाठी जाणार्‍यांची गोष्टच वेगळी आहे. ते मायभूमीत राहून तरी कर भरण्यापेक्षा काय दुसरी मदत करणार होते?

संशोधन करणे, पीएलसी काढणे, कर्मयोगी संस्थांना मदत देणे, अवकाशात जाणे, क्ष क्षेत्रातल्या य या सर्वात मोठ्या कंपनीचा सीईओ बनणे या सगळयांपेक्षा अर्थाजनासाठी जाऊन रेमिटन्स पाठवणे सर्वात श्रेष्ठ. इथे 'कायमस्वरुपी' कमाई ठेवणे (गुंतवणे) अजूनही श्रेष्ठ. (गृहीतके - मदत करायची आहे. मदत निवासी भारतीयांच्या दृष्टीने पाहायची आहे.)

आणि ब्रेन ड्रेन म्हणजे मेंदू मोरीत जाणे. उच्च बौद्धिक क्षमतेचा माणूस अधिक पैशासाठी कमी दर्जाचे काम करू लागणे. म्हणून आखातात जे कामगार जातात त्यांना ब्रेन ड्रेन शब्द लावत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला जाणून घेण्याची आहे की वरील बातमीतील मुलगी परत जाऊन मायभूमीला मदत करणार म्हणजे नक्की काय करणार? पैसे मिळवून देणार? समाजकार्य करणार? एखादी संस्था काढणार?

परत एकदा... चर्चाविषय संशोधन करणार्‍यांनी मायभूमीत जाऊन तिथे "मदत" करण्याविषयी आहे.

आणि ब्रेन ड्रेन म्हणजे मेंदू मोरीत जाणे. उच्च बौद्धिक क्षमतेचा माणूस अधिक पैशासाठी कमी दर्जाचे काम करू लागणे. म्हणून आखातात जे कामगार जातात त्यांना ब्रेन ड्रेन शब्द लावत नाहीत.

माझ्या माहितीप्रमाणे ब्रेनड्रेन हा वाक्प्रचार जेव्हा मोठ्या प्रमाणात आयआयटी मधील हुशार मुले परदेशी जाऊ लागली त्याला उद्देशून वापरू लागले. तुम्ही म्हणत असलेला अर्थ मला माहित नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवासी भारतीयांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर विदेशात तिने शोध लावला, नाही लावला इत्यादीने निवासी भारतीयांना 'निवासी भारतीय म्हणून' काहीच फरक पडत नाही.
१. पण तिने त्यातून गडगंज पैसा कमावला आणि भारतात आणला (तर आणि तरच) फरक पडतो.
२. विदेशात संशोधन करण्यापेक्षा भारतात काहीही चांगले केले तर फरक पडतो. पण इथेही तिचा बाहेरून रेमिटन्स किती असला असता आणि 'भारतातल्या कामाचा नेट एकॉनॉमिक इंपॅक्ट' काय असला असता हे कळले तरच असे ठामपणे म्हणता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निवासी भारतीयांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर विदेशात तिने शोध लावला, नाही लावला इत्यादीने निवासी भारतीयांना 'निवासी भारतीय म्हणून' काहीच फरक पडत नाही.

सर्वप्रथम फरक पडतो म्हणजे काय होते? बरं मग ते जे काही असेल तर असा फरक निवासी भारतीयांना पडत नाही मग अनिवासी भारतीयांना पडतो का? पडत असला तर मग ते वाईट म्हणायचे का? शेवटी तेही भारतीयच आहेत ना?

  1. पण तिने त्यातून गडगंज पैसा कमावला आणि भारतात आणला (तर आणि तरच) फरक पडतो. कसा? कर स्वरूपात?
  2. विदेशात संशोधन करण्यापेक्षा भारतात काहीही चांगले केले तर फरक पडतो. परत तेच. म्हणजे नक्की काय होते?

एकूण असे वाटते की संशोधकांच्या कार्याला शेवटी एकॉनॉमिक इंपॅक्ट या एकाच निकषावर तोलले जात आहे. संशोधन म्हटले की मला तरी नवीन शोध लावणे हेच सुचते. लस वगैरे शोध लावून खरेच लोकांना मदतही होते. पण मग आधी म्हटल्याप्रमाणे जर परदेशात राहून उच्च प्रतीच्या सोयी सुविधा, आर्थिक पाठबळ वगैरे सहजी मिळत असेल आणि जर संशोधनावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येत असेल आणि तीच लस जर लवकर बाजारात येत असेल तर तिचा उपयोग मायभूमीलाच काय तर सर्व जगालाच होईल की?

हेपेटायटीसवर वर संशोधन करून लस अथवा औषध संशोधानाचा उपयोग मायभूमीला करणे म्हटले तर तरीही ती स्वतः लोकांना औषधे वाटप करणार नाही त्यामुले प्रत्यक्ष मदत करण्याचे प्रसंग फारच क्वचित येत असावेत. खाली अदिती ने म्हटल्याप्रमाणे हे विक्रीयोग्य विधान असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम फरक पडणे म्हणजे कोणताही फरक पडणे. बाकी अनिवासी भारतीयांनी स्वतः सुखी राहणे आणि इतर अनिवासी भारतीयांना सुखी ठेवणे हे चांगलेच. माझे हेच मत चिनी आणि ब्राझिलच्या नागरीकांबद्दल आहे, म्हणजे चिनी लोकांनी स्वतः सुखी राहणे आणि इतर चिन्यांना सुखी ठेवणे हे जसे चांगलेच तसेच अनिवासी भारतीयांचे पण.

भारतात शोध लागणे आणि विदेशात शोध लागणे याची प्रामुख्याने आर्थिक निकषांवरच तुलना का करावी ते सांगतो. विदेशात उच्च प्रतीच्या सुविधा, इ मोफत मिळत नाहीत. त्याची किंमत त्या देशाला द्यावी लागलेली असते. म्हणून जेव्हा संशोधन होते, तेव्हा या सर्व किमतीची वसूली होते. त्यामुळे सहसा उच्च सुविधा देणार्‍या देशांतले शोध महाग असतात. वर असफल संशोधनांचा खर्च सफल संशोधनांवर टाकला जातो. म्हणजे मी जर २० निविदा भरल्या, निविदा भरायचा खर्च १ कोटी असेल तर मी जिंकलेली २१ वी निविदा २० कोटींनी
महाग असेल. विदेशात शोध लागला असल्याने तो भारतात यायला वेळ लागतो. शोधांचे पेटंट विदेशी कंपनीचे असते आणि विदेशात फाईल केलेले असते. त्यावरची जी रॉयल्टी असते तिच्यावर तो देश आणि भारत 'उत्पन्नावर' रॉयल्टी कर लावतात. इतर बाबतीत, धंद्यांमधे हा कर 'नफ्यावर' असतो. हा १०% ते २०% भारतातच असतो. तिकडचा कर सवता! आणि बार्गेनिंग पावर असल्याने विदेशी उत्पादनाच्या साखळीमधील सर्वांना उच्च दर्जाचे जीवनमान उपलब्ध होईल अशी किंमत आकारायची हा अशा उत्पादनांचा दंडक बनतो. (जिथे ही पावर नाही तिथे विदेशी कंपन्या भारतात स्वस्त उत्पादन करून जगभर माल विकतात , उदा. Hyundai) हेपॅटीटीसची भारतातली लसीची मागणी, affordability पाहिली तर शोध प्रगत युरोपीय देशात लावण्याचा भारताला फायदा नाही, म्हणजे इतर जगापेक्षा वेगळा/जास्त फायदा नाही. समजा तिने भारतात शोध लावायचा प्रयत्न केला तर भारताची चांदी आहे. (भारतातले कायदे कशाची काय किंमत असावी याचा थोडाफार शहाणपणा बाळगून आहेत असे समजू. असे बर्‍यापैकी आहे ही) स्वस्त लस आणि कितीतरी परकीय चलन. भारतात राहिल्याने शोध लागणारच नसेल तर सर्वांचेच नुकसान होईल.

भारतात राहून शोध लावणे ही कोणत्याही संशोधकास न आवडणारी गोष्ट असेल. इथे शोध न लागण्याची शक्यता वाढते. गैरसोयी सहन कराव्या लागतात. संशोधनाचे बाजारीकरण करणे अवघड असते. झाले तर त्याचा स्वीकार कमी असतो. शिवाय भारतातली धूळ, गरमी, घाण वेगळी सहन करावी लागते. व्यक्तिगत पातळीवर संपत्तीही फार कमी मिळते. अशा अनेक कारणांनी लोक इथे शोध लावणे पसंद करत नाहीत. ही त्यांची व्यक्तिगत बाब आहे.

भारताबाहेरील अभारतीयांच्या संशोधनांमुळे त्यांच्या देशांना फरक पडत असता तर आज भारत (तसेच चीन, इ )बरेच पुढे दिसले असते.

इतर फरकांबद्दल पाहू. अमेरिकेत सुनिता विलियम्स अंतराळात गेली, विक्रम पंडीत सीटीचे अध्यक्ष (?) झाले, ओबामा (ते अर्धवट अमेरिकन नाहीत असे मानू)राष्ट्राध्यक्ष झाले याने भारताला (केनयाला?) खरेच फरक पडत नाही. कारण ते त्या त्या एजंसीचे हित आणि स्वतःचे हित पाहत असतात.

भारतात देशांतर करू इच्छिणारे बरेच लोक असतात. त्यांना मिळणारी प्रेरणा आणि भारताचा विकास यात गल्लत करू नये. म्हणजे समजा अमेरिकेत अध्यक्ष होता येते म्हणून अनेक भारतीय दलितांनी देशांतर केले तर त्याचा भारतावर परिणाम शून्य. पण मी भारताचा पंतप्रधान होणार म्हणून इथेच कोणी पेटला तर भारताला खराखुरा फायदा.

सारांश - व्यक्तिगत स्तरावर नफा तोटा पाहिला तर कोणीच भारतात संशोधन करू नये. पण जर केलेच तर त्याचा भारताला जबर्‍या फायदा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संशोधनाचं पेटंट कोणत्या देशाला मिळतं त्यावर हे अवलंबून नसेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येथे दिल्याप्रमाणे तुम्हाला ज्या देशात तुमचे संशोधन सुरक्षित ठेवायचे आहे त्या त्या देशात वेगळे पेटंट फाईल करावे लागेल. पेटंट बहुधा एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीलाच मिळते. देशाला मिळते का माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पेटंट बहुधा एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीलाच मिळते

पेटंट टेक्निकली संशोधकाला म्हणजे व्यक्तीलाच मिळते. पण सहसा संशोधन हे कंपनीच्या सुविधा व पैसा वापरून होत असल्यामुळे कंपनी पेटंटची असाइनमेंट कंपनीच्या नावे करण्यास संशोधकास भाग पाडते (ज्यात गैर काही आहे असे मला आणि बहुतांश संशोधकांनाही वाटत नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरेच आहे. मातृभूमीचे आपण काहीतरी देणे लागतो हे तत्त्वतः खरे आहे, पण एकूण परिस्थिती पाहता ते ऑब्लिगेशन म्हणून का वागवावे, असा तिरशिंगरावांसारखा प्रश्नही कैकदा पडतो. तस्मात ज्याला जिथे जायचे तिथे जाऊदे आणि काय करायचे ते करूदे. जज करणारे आपण कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पॅरिस मधे अनेक भारतीय तरूण (मुख्यतः पंजाब मधील) रस्त्यांवर पाण्याच्या बाटल्या विकणे, कणसे भाजून देणे वगैरे कामे करत असताना दिसतात. त्यापैकी बरेच जणांशी बोलल्यावर कळले, की ते भारतातील एजंट द्वारे (हा १०-१५ लाख रु.घेतो)आलेले असतात. ८-१० जण लहानश्या घरात राहतात. त्यांना भारतीय जेवण अल्प किमतीत पुरवणारे त्यांच्यातीलच असतात.
आपल्या मायदेशात या तरूणांना बेकारीचा सामना करावा लागतो, तर इथे राहून ते दरमहा ६०-७० हजार रुपये भारतात पाठवत असतात. आठ-दहा वर्षांनंतर ते हळू हळू इकडले कायदेशीर रहिवासी होऊ शकतात.
१० लाख रुपये कुठून आले, असे विचारता 'वडिलांनी दिले' असे सांगतात.
'मायभूमीला मदत' वगैरे विचार ते करतात की नाही,हे ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मायभूमीला मदत' वगैरे विचार ते करतात की नाही,हे ठाऊक नाही.

ठीक आहे. असे पाहू:

इथे राहून ते दरमहा ६०-७० हजार रुपये भारतात पाठवत असतात.

हे ६०-७० हजार रुपये ते नेमके कोणाला पाठवतात? बहुधा त्यांच्या कुटुंबीयांना, झालेच तर आईवडिलांना, असे समजून चालू. त्यातून त्यांच्या कुटुंबीयांची, आईवडिलांची आर्थिक अडचण दूर होत असेल कदाचित, कदाचित (त्यांच्या कुटुंबीयांची, आईवडिलांची) आर्थिक उन्नतीही होत असेल त्यातून, कोणी सांगावे.

आता, त्यांचे कुटुंबीय, आईवडील म्हणजे नेमके कोण, पाकिस्तानी, की बांग्लादेशी? नव्हे, भारतीयच ना? म्हणजे यातून भारतीयांनाच मदत होते ना, भारतीयांचीच आर्थिक उन्नती होते ना?

'भारत' म्हणजे नेमके काय? भारताची जमीन (माती)? भारत सरकार? की भारतीय माणसे?

आपल्या मायदेशात या तरूणांना बेकारीचा सामना करावा लागतो

समजा, या लोकांनी प्यारीसला गेल्यावर भारतात एक नवा युरोसेंटही पाठवला नाही. तरीही, हे लोक भारतात बेकारीतच राहत होते ना, आणि त्या बेकारीवर मात करू शकत नव्हते ना? मग भारतात बेकार बसून कुटुंबावर, समाजावर नि सरकारवर, नि बेकारांच्या मांदियाळीत स्वतःची भर घालून एकंदरीतच देशावर भार होण्यापेक्षा, या लोकांनी स्वतःच दूर होऊन देशावरचा भार कमी केला, देशाची समस्या कमी करण्यात फूल-ना-फुलाची-पाकळीवजा का होईना, पण हातभार लावला, हे काही थोडके आहे काय? ही काही कमी मदत झाली काय?

(गांधीजींनीही कधीतरी काही वेगळ्या संदर्भात अन्य कोणालातरी "छोडो भारत!" असे म्हटले होते. अर्थात, हे तरुण त्याचा विचार करीत असावेत किंवा कसे, याची कल्पना नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ज्या संशोधकांशी संपर्क आलेला आहे त्यातल्या बहुतेकांनी प्रगत देशांमधे नोकर्‍या केलेल्या आहेत. भारताबाहेर काम करण्याचा, तिथल्या वर्क-कल्चर आणि एकंदर संस्कृतीचा फायदा झाल्याचं हे लोक वेळोवेळी नमूद करतात. हा फायदा व्यावसायिक दृष्टीकोन म्हणून असेल किंवा सहकर्मचार्‍यांना, विद्यार्थी, पोस्टडॉक्सना क्षुद्र न मानणे असा असेल. व्यक्तिगत आयुष्यातले फायदे निराळे.

यातले कोणीही मातृभूमीची सेवा म्हणून परदेशी नोकर्‍या करून परत आलेले नाहीत. बहुतेकांना काहीतरी लालूच, मोठं पद, कायमस्वरूपी नोकरी, बुद्धीला चालना मिळण्याची (आणि कामात स्वातंत्र्याची) हमी मिळाली म्हणून परत आले. काही लोक "गड्या आपला गाव बरा" प्रकारचे आहेत म्हणून परत आले आहेत. आणि सगळे लोक तरूणांना परदेशात शिकायला जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. असे काही लोक शिक्षक, बॉस, मित्र, सहकर्मचारी म्हणून भेटले याचा मला फार आनंद होतो. माझ्या अनुभवानुसार, खरोखर 'सेवा' करणारे असतात ते असं कधीही म्हणत नाहीत. इतर त्यांच्याबद्दल असणारं मत "या विषयातलं योगदान खूप आहे" अशा प्रकारचं असतं.

मातृभूमीची सेवा वगैरे शब्द छापले की पेपरची विक्री जास्त होते आणि बर्‍याच लोकांना या मनुष्याचं काम कितीही थोर (किंवा क्षुल्लक) असलं तरीही "मातृभूमीची सेवा" फार अपील होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"द लोन रेंजर"मधे एक गमतीदार प्रसंग पाहिला.
इंडियन लोकांशी असलेला युद्धबंदीचा करार मोडून आणि ठरवलेल्या सीमा ओलांडून खाणकाम करून वॅगनच्या वॅगन भरून चांदी आणलेली. परिस्थितीची पाहणी करायला आणि दोषींना शिक्षा करायला आलेल्या लष्करातल्या कॅप्टनला त्या चांदीची लालूच दाखवली जाते.
एवढी चांदी पाहून कॅप्टन हरखून जातो.
"What could you buy with all that!! "
"A country! Captain."
तेवढ्यात इंडियन लोकांचा हल्ला होतो आणि कॅप्टन मोठ्या आवेशात त्याच्या सैनिकांना लढायला प्रेरित करतो "fight for the country!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0