आज्जोबाऽऽऽ, आय लौ यू

आज्जोबाऽऽऽ, आय लौ यू - एका थोर्थोरसमाजवादी साहित्यिकाच्या नातवाने त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी लिहिलेले पत्र.

ओ माय डिअर आज्जोबाऽऽऽऽऽऽऽ, आय लौ यू
मला कडेवर घ्या नं... माझे लाड करा ना... मला कि नै छान छान गोष्ट ऐकायची आहे. रोऽऽज तीच ती शामच्या आईची रटाळ सेंटी गोष्ट नको, आज मला गोग्गोड आदम इव्हच्या किंवा अरेबियन नाइट्सच्या रापचिक गोष्टी सांगा ना... प्लीऽऽज. राजा राणीच्या बोर गोष्टी मुळीच सांगू नका बुवा. जगभर साम्यवाद, समाजवाद असो कि भांडवलशाही सगळ्यांनाच त्या निष्क्रीय, कुरूप ब्रिटीश राजघराण्याच्या गोष्टी कशा काय आवडतात हो? मागे त्या खेबड्या राजपुत्र चार्ल्सने म्हातारपणी केलेल्या दुसऱ्या लग्नाचे जगभर लाईव्ह टेलेकास्ट झाले होते तेंव्हा कॅमिलावहिनीसाठी मुंबईचे डबेवाले भाऊजी लोकशाही साडीचोळीचा आहेर घेऊन गेले होते म्हणे! आता प्रिन्स विलियमच्या रॉयल बेबीसाठी बाळंतविडा घेऊन कोण जाणार आहे? तुमच्यासारखा थोर समाजवादी साहित्यिक घरात आलेला गोंडस नातू बघायचे सोडून खुळ्यागत टीव्हीवर रॉयल बाललीला बघत बसला आहे याचे नवल वाटतेय. थोडावेळ टीव्ही, लेखन, नेटवर्क आणि समाजकार्य यातून वेळ काढून बघा तर खरं मी त्या रॉयल बाळापेक्षा लोभस दिसतोय की नाही ते!

आज्जोबा, तुम्ही सारखे कैच्याकै लिहित बसता ते कुणी वाचतं का हो? नेहेमीच शब्दांशी काय खेळत बसता, जरा माझ्याशी पण खेळा ना. मी पण तुमच्यासारखा समाजवादी होऊ का? त्यासाठी काय काय तयारी करायला लागते सांगता का? माझ्यासाठी खादीचे लंगोट, झबले आणि लाळेरे घ्यायचं का? माझ्या छोट्या शबनम ब्यागेत आपण खुळखुळा आणि नव्वाकोरा "कालचा सुधारक"चा अंक ठेवूया हं. सध्या इतके पुरे झाले ना? माहितीये का, आपल्या शेजारचा ऋतिक दादा आधी चिकणा, चोपडा दिसायचा. त्याला रफटफ दिसायचं होतं तर शेवटचा उपाय म्हणून तो समाजवादी पक्षात गेला आणि खादीचा कुर्ता घालून शबनम खांद्याला लटकवली अन काय नवल लग्गेच त्याच्या चोपड्या गालावर खुंट उगवले असे बिंटी काकू म्हणत होती. मी खादीचे झबले घालून छोटी शबनम बॅग घेतली तर माझ्या लुसलुशीत गालावर सुद्धा दाढी उगवेल काय हो आज्जोबा?

असो. तुम्ही विकिपीडियावर बघितलेत का त्यात लिहिलेय, "समाजवादाला गांडूवाद असे नाव महाराष्ट्रातील विचारवंतानी दिले आहे." हे खरे आहे का? आज्जोबा, तुम्ही एकतर लिहिता नाहीतर सतत लोकांशी बोलताना दिसता. फॉर अ चेंज कधीतरी तुमचा मोबाइल बंद ठेवाल का? तुम्ही मितभाषी आहात हि अफवा कोणी पसरवली हो? श्रोता दिसला रे दिसला की तुम्ही तर हावरटासारखे बोलत सुटता. बरं झालं तुम्ही कविता नै करत, नै तर समाजवादी अंगाईगीते ऐकून माझी झोप कायमची उडाली असती, हुश्श वाचलो बुवा!

आज्ज्जोबा, तुम्ही अहोरात्र नेटवर लुटूपुटीच्या लढाया खेळत बसू नका न प्लीज. त्यात वेळ फार वाया जातो असे बिंटीकाकू म्हणत होती. ती कि नै आधीच्या ८४ लक्ष जन्मामध्ये पण म्याचुअरच होती असे चित्रगुप्त म्हणाला. वयातीत असल्याने तिला सगळे बिंटीच म्हणतात. तुमच्यासारखी पांढरी फिलॉसॉफर दाढी असलेल्या आणि ब्रह्मानंद (याचा तर काही लाडिक शॉर्टफॉर्म पण करता येत नाही गड्या) नाव असलेल्या मनुष्याला आज्जोबा पदवी कशी अगदी शोभून दिसते असं रंभा मावशी आणि उर्वशी मावशीपण म्हणत होत्या. तुम्हाला अशी घरगुती नाती चिकटलेली आवडत नाही का? तुम्हाला समाजकार्याइतकीच जगातले निवडक सिनेमे बघण्याची आवड आहे असे विश्वविख्यात सिनेसमीक्षक फिल्मातुर किंतू म्हणत होते. बिंटी म्हणे तुम्ही नुसत्या हार्डडिस्का भरून सिनेमे घेऊन लॉकर मध्ये ठेवून दिले आहेत. चला न आपण दोघे ते सिनेमे बघू या... कुणीतरी एक तारकोव्हस्की आहे त्याचे सिनेमे पहाताना मस्त झोप लागते असे जोशी आज्जोबा म्हणत होते. तुम्ही मधूनमधून मला दुदू प्यायला आणि शीशी शूशू करायला ब्रेक द्या हं! त्याबद्दल मी तुम्हाला दोन पप्पी देईन... तुमच्या दाढीमुळे मला गुदगुल्या होतील आणि मी पण हसेन बापडा खुदुखुदु. तुम्हाला बाललीला दाखवायला मी इतका व्याकुळ झालोय की काय सांगू!

आज्जोबा तुम्ही नेहेमी "पोरा आता मला वेळ नाही. पण यावर एक पळवाट सांगतो. त्या ढेमाडे आजोबांकडे जा. त्याला खूप छान छान गोष्टी सांगता येतात, नाहीतर पंचविशीत म्याचुअर झालेल्या चोंबड्या बिंटीकाकूंकडे जा. त्या तुला मस्त मस्त सिनेमे दाखवतील आणि नंतर त्यांचे विश्लेषण सादर करतील. ते ऐकता ऐकता तुला छान झोप लागेल." असं म्हणता आणि मला टाळता. त्या ढेमाडे आजोबांकडे तुमचे मित्र तांबे आजोबा आणि पेडगावकर आजोबांना पाठवाल का चेंज म्हणून? ढेमाडे आजोबांचे गुणगान आणि रटाळ चर्चा ऐकूनच मला कंटाळा आला आहे. आता बाहेरचे कोणी कोणी नको बुवा, आपण दोघेच खेळू, गप्पा गोष्टी करू, सिनेमे बघू आणि मजेत हसू या. सारखे कुंभमेळे जमवून नका बसू, लोकांना त्यांचे संसार करू द्याल की नाही? आता मी नेहेमी तुमच्याच मांडीवर झोपेन आणि शूशू करेन. तुमच्याच दाढीशी खेळेन. तुमच्या फेसबुकात लोळेन. "समाजसुधरेना" आणि "शब्दच्छल " मासिकामध्ये खूप खूप लिहीन. मला तुमचा ल्यापटॉप द्याल ना?

मला तुम्ही खूप खूप... अगदी खूपच आवडता गड्या...

चला न आपण वाचनालयात फिरायला जाऊया....

तुमचाच लाडका नातू,

हिरण्यकशपू

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

मला वाट्लं आजोबा पिच्चरचं प्रोमोशन असेल...
पण इथे आज्जी नातवाचं सोंग घेऊन...

मांडीवर झोपेन आणि शूशू करेन

दाढीशी खेळेन

हे राम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आज्जीला अंडरएस्टीमेट करताय का ? Wink ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मराठी विकी हा जातीयवादाच्या (पक्षी ब्राह्मण वि. मराठा वि. इतर मागास वि. मागास वि. भटक्या विमुक्त) बहुरंगी कुस्त्यांचा आखाडा झाल्याने तिकडे फिरकणेच बंद केले होते.

हे पान पाहून अवाक झालो : http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार!
लिंक बघताच लेखाच्या प्रेरणेचा (?) उलगडा झाला! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाची प्रेरणा नुकतेच आज्जोबा झालेले दोन मित्र आहेत .त्यांना समाजवादी अवतार चढवण्यात आला
आहे . विकी वरचा मजकूर पाहून नवल वाटले म्हणून ते यात जोडले आहे . गम्मत म्हणून पत्र वाचावं येवढीच अपेक्षा आहे .

विकिपीडियाच्या या पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१३ रोजी १३:४७ वाजता केला गेला.

म्हणजे या पात्रातील उल्लेख पाहून केला आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसंत सखू, या पानावरील मूळ मजकुराचा मागोवा इथे उपलब्ध आहेच :
http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:O

पण हे आश्चर्य तसे क्षणभरच टिकले.

अवांतरः ब्रह्मणेतर नेत्यांना मुली पुरवून ब्राह्मण त्यांना चळवळीपासून तोडतात हे एक लै क्लिशे आणि तितकेच विनोदी वाक्य आहे. मूठभर ब्राह्मणांचा आणि त्यांच्या चिमूटभर पोरींचा बहुजनांनी इतका धसका घेतल्याचे पाहून डोळे पाणावतात अधूनमधून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूठभर ब्राह्मणांचा आणि त्यांच्या चिमूटभर पोरींचा...

...आणि तशातहि भाकड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाभयंकर विनोदी विकीपान! लहानपणापासून अनेक समाजवादी पाहिले आहेत. त्यांना या विकीपानात वर्णिलेला पोशाख चढवला. आणि हसून संपलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

विकी विचारमंच करण्याचा विचार दिसतो. असो हाही सामाजिक मनोविकारांचा मागोवा घ्यायला उपयुक्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आपण जो विचारमंच चा धागा दिला आहे, त्यावरचे मोती बघून डोके गरगरले.
हे पहा काही "अनमोल मोती" :

http://anita-patil.blogspot.in/2011/09/blog-post_27.html

http://anita-patil.blogspot.in/2012/02/blog-post_26.html

http://anita-patil.blogspot.in/2012/03/blog-post_22.html

http://anita-patil.blogspot.in/2011/10/blog-post_15.html

आता यांना काय उत्तर देणार, कपाळ? हा विचार मंच आहे की मचमच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावर इथेच आधीही चर्चा झालेली आहे. वाटल्यास बघू शकता.

http://www.aisiakshare.com/node/1190

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या विकीपानाचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. विकीवरचं एखादं लिखाण स्रोत वापरत नाही, पूर्वग्रहदूषित आहे वगैरे सांगणारे संदेश अनेक इंग्रजी विकीपानांवर पाहिलेले आहेत. उपरोल्लेखित पानावर तसं करायचं असेल तर काय करावं लागेल? उदा : {{Citation needed}}, {{Verify credibility}}, {{Dubious}}, {{Disputed}}, {{POV-check}} इत्यादि टॅग्ज टाकता येतात असं मला वाटतं. उपक्रमावर पूर्वी निनाद म्हणून वावरणारे एक सदस्य अशा गोष्टींशी परिचित होते असंही स्मरतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

टॅग नक्कीच टाकता येतात. स्वतःचे विकी अकौंट असेल तर असे करता यावे. करून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टॅग टाकून शिवाय ते आपल्या वॉचलिस्टमध्येही टाकावं लागेल, कारण जे खोडसाळ सदस्य हे धंदे करत आहेत ते पुन्हापुन्हा पान संपादित करत राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता ते पान वेगळं दिसतंय. Smile कोणीतरी सुज्ञ खोपोलीकर वाचकाने खोडसाळ मजकूर बदलला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आयपी अ‍ॅड्रेस खोपोलीचा दिसतोय? बरंय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हे पान पाहून अवाक झालो

का बरे? mr.org परंपरेला साजेसेच तर पान आहे. (आता संपादित झाल्यापासून 'होते' असे म्हणावे लागेल. :-()

शिवाय, आधी खोडसाळ मजकूर छापायचा, नंतर मग त्यावर ठळक अक्षरांत 'संपादकीय ताकीद' छापायची (विविध टॅग्ज़, वॉचलिष्ट म्हणजे तरी वेगळे काय असते?), आणि मग सर्वांनी मजकूर पाहून झाला याची खात्री झाली, की निवांतपणे कधीतरी तो काढून टाकायचा, ही परंपरादेखील (परंपरा!!!) नवी नसावी.

प्रस्तुत प्रश्नांकित मजकूर छापणारा(री) सदस्य(स्या) कदाचित येनकेन नामेण विकीवरील एखादा(दी) मॉडरेटर-सदस्य(स्या) असल्याचे निष्पन्न झाल्यासदेखील आश्चर्य वाटणार नाही.

पण एक गोष्ट सहमत होण्यासारखी आहे: बहुरंगी कुस्त्यांचा आखाडा झाल्याने फिरकायला बंद करण्याच्या लायकीच्या संस्थळांत आणखी एकाची भर पडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0