एक अप्रकाशित पत्र

वृत्तपत्रांमधून जे काही छापून येतं, त्यावरील सोयीच्या असतील तितक्याच प्रतिक्रिया छापल्या जातात, हा एक अनुभव.
प्रतिक्रिया छापताना 'संपादकीय धोरण' नावाची गोष्ट आढळत नाही, हा दुसरा अनुभव. त्यामुळे अनेकदा चुकीची माहिती प्रसारित होते.
तर इंटरनेटमुळे अशा गोष्टी लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहून टाकताहेत आणि त्यामुळे पुष्कळ गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकताहेत, हे आनंदाचेच.
उल्का महाजन या कार्यकर्त्या मैत्रिणीने लोकसत्तातील एका अग्रलेखाबाबत मतभेद नोंदवणारे एक दीर्घ पत्र लिहिले आहे. त्याचा दुवा इथे देते आहे. इथे त्याची चर्चा झाली, तर मतेमतांतरे समजू शकतील, असे वाटले, म्हणून आवर्जून देत आहे.
http://www.slideshare.net/SureshSawant1/handwritten-article-by-ulka

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

लिंक पाहिली पण पत्र काही दिसत नाहीये. स्कॅन्ड पत्र इथे टाकल्यास दिसू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पत्र उघडायला बरीच वाट पाहवी लागली. असो.
पत्र मुद्देसूत आहे आणि अनेक मुद्दे ग्राह्य आहेत. इथे दुवा दिल्याबद्दल आभार. याबद्दल अधिक मते/चर्चा वाचायला उत्सूक आहे.

या विषयाशी संलग्न बालकुपोषणाशी संबंधीत काही विदा या धाग्यात दिला आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ज्यांच्याकडून हे पान चटकन दिसत नाहीये त्यांच्यासाठी:

पान क्र १: http://image.slidesharecdn.com/handwrittenarticlebyulka-130726134601-php...
पान क्र २: http://image.slidesharecdn.com/handwrittenarticlebyulka-130726134601-php...
पान क्र ३: http://image.slidesharecdn.com/handwrittenarticlebyulka-130726134601-php...
पान क्र ४: http://image.slidesharecdn.com/handwrittenarticlebyulka-130726134601-php...

--- (मध्यंतर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद! आता दिसले नीट.

पत्रातल्या मजकुराशी सहमत आहे इतकेच सांगतो. कारण बाकी फारसे वाचन आजिबात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक पत्र. दुवा दिल्याबद्दल आभार.
एक शंका: ते अप्रकाशित का बरे आहे?

इथे त्याची चर्चा झाली, तर मतेमतांतरे समजू शकतील, असे वाटले

चर्चेचा प्रस्ताव मांडताना प्रस्तावकांचे मतही त्यात असावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकसत्तामधला लेख वाचला. सरकारी योजना ही राजकारणी हेतूने निवडणुकांच्या आधी सादर केली जाते आहे यात किंचित तथ्य आहे. पण लेखाचं केवळ हेच गृहितक असल्याने तोल संपूर्णपणे ढळलेला आहे. योजना काय आहे, ही कुठच्या पार्श्वभूमीवर तयार झाली, आधी किती खर्च होत होता, आता वाढीव खर्च किती, व वाढीव खर्चाचा वाढीव फायदा किती याबद्दल काहीही चर्चा न करता निव्वळ 'राजकारण' म्हणून टीकेची झोड उठवण्याचा प्रकार वाटला. याउलट उल्का महाजनांचा लेख आकडेवारीसकट या योजनेचे फायदे काय हे मांडतो. असे माहितीने भरलेले लेख छापले जाण्याऐवजी पूर्वग्रहदूषित मतांचीच मांडणी करणारे, योजनांऐवजी माणसांची टीका करणारे लेख प्रसिद्ध होतात हे दुर्दैव.

मूळ चर्चाप्रस्तावात मांडलेला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. सरकारी योजना, त्यांना कमीअधिक प्रमाणात मिळणारं यश, आणि या सगळ्याकडे केवळ नेते आणि पक्ष यांचं राजकारण म्हणून बघण्याची माध्यमांची भूमिका हा मोठा आवाका आहे. मात्र वर लिहिलेल्या काही ओळींत त्याला पुरेसा न्याय मिळत नाही. किमानपक्षी लोकसत्तातला लेख कशाविषयी आहे, आणि उल्का महाजनांनी त्याचं खंडन कशाप्रकारे केलं आहे याबद्दल काही ओळी आलेल्या आवडल्या असत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0