काव्यकोतवाल समीक्ष शहांच्या अनंत माफ्या मागून

स्वयंपाकघर-माजघराच्या सीमारेषेवर ये
तिथल्या गुप्त एरियामध्ये अक्रोड-बदामाची अपरंपार बीजे आहेत
ती पळव

फेड
पाकशास्त्राची घरंदाज अंगवस्त्रे बिनधास्त
येथल्या एखाद्या निष्प्राण शेगडीखाली बसून
व्यूहरचना कर
स्वाहाकाराच्या जमेल तेवढ्या प्रकरणांची

घोळव
प्रत्येक नव्या चवीबरोबर
निरनिराळे क:पदार्थ
ओढून काढ
बोकडाच्या बरगड्यांमधील सैद्धान्तिक सुरे
वाहू दे रस
फुटलेल्या नळीतून

वाहू दे अमर्याद
मांड पाट घाल घाट
बुभुक्षित हो भुकेच्या नगरीतून हवे असल्यास
सोयीस्कर तांबडा-पांढरा रस्सा मागत
फन्ना उडवत
ये
स्वयंपाकघर-माजघराच्या सीमारेषेवर
तिथे मी तुझी वाट पाहतो आहे
सामिष भोजनाच्या अनेक पूर्णाहुतिपैकी एक
तांबूल
कलकत्ता, मीठा या सादा?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिला धागा अजून चार घरं खाली गेला नाही तोवर दुसरा?
अर्धविरामतरी घ्या की राव!
हलके घ्या हो. त्यासाठी आधीच क्षमा मागून ठेवतो. तुम्ही आता ग्याङ्गवाले. Wink
बाकी अंगवस्त्र ही फेडायची गोष्ट असते काय? आम्हाला अनुभव नाही म्हणून विचारतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो.

सुरुवातीच्या उत्तेजनामुळे संयमानेही विराम घेतलाय असे दिसतेय एकूण Wink

अन अङ्गवस्त्र प्रकर्ण आम्हालाही कळले नाही. कृपया उद्बोधन करणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विडम्बनाचा सम्बन्ध स्पष्ट होण्यासाठी मूळ काव्य प्रगट करणे प्राप्त आहे:

व्यक्त अव्यक्ताच्या सीमारेषेवर ये
तिथल्या ग्रेएरियामध्ये असंभवाची अपरंपार बीजे आहेत
ती फळव

फेड
मानवशास्त्राची घरंदाज अंगवस्त्रे बिनधास्त
येथल्या एखाद्या निष्फळ झाडाखाली बसून
विरचना कर
अज्ञानमीमांसेच्या जमेल तेवढ्या प्रकरणांची

कोल इतिहासाला
प्रत्येक नव्या विटीबरोबर
ओढून काढ
समाजशास्त्रीय बरगड्यांमधील सैद्धान्तिक सुरे
वाहू दे रक्त

वाहू दे अमर्याद आकलनाला
तोड पाट मोड घाट
निर्वासित हो ज्ञानाच्या राजधानीतून हवे असल्यास
सोयीस्कर पांढरे निशाण फडकवत

ये
व्यक्त अव्यक्ताच्या सीमारेषेवर
तिथे मी तुझी वाट पाहतो आहे
सापेक्ष सत्याच्या अनेक अवतारांपैकी एक
धादान्त

हे प्रख्यात समीक्षक श्री. हरिश्चन्द्र थोरात यान्चे काव्य. उपरिनिर्दिष्ट विडम्बन याचेच आहे. गरजु नोन्द घेतीलच. धन्यवाद.

प्रस्तुत घटनेवर अर्धविरामाचे आणखी एक टिपण्णीवजा काव्य:
त्यांनी अतीव क्लिष्ट लिहिलं
शप्पथ! त्यांना स्वत:लाही नाही कळलं
कष्टानं छापतोय छापो बापडा
म्हणून न वाचता लाइक केलं
आकडा वाचून ते चेकाळले
भयंकर काव्य पाडू लागले
पूर्ण वाचणारे गारद झाले
पोष्टी चुकवत हिंडू लागले
न वाचणार्यांचे भान हरपले
सगळेच काव्ये पाडू लागले
हरएक ग्रुपाचं मातेरं झालं
काव्यतांडव उतू गेलं
शेवटी आड्मिन जागे झाले
महाकाव्ये गायब करत सुटले
याने मात्र बृहस्पती बिथरले
अवजड शब्द जुलाबू लागले
आड्मिनचं तर डोकंच उठलं
अखेर बृहस्पतिंनाच फुटबॉल केलं
म्हणून म्हणतो लाइक करा
पूर्ण वाचायची हिम्मत नाही
तर न वाचता चावी मारा
जो तो इदवान त्याच्या इद्वत्तेने मरेल
स्वत:चा नारळ स्वत: वाढवेल
कड्यापर्येंत अल्लाद सोडून द्यावं
उडी तर तो स्वत:च मारेल
शेवटी बिनपैशाचंच लाइक ते
आपल्या बापाचं त्यात काय गेलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

सुंदर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. मूळ रचना दिल्यामुळे आणखीनच मजा आली. अशीच विडंबनं येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त पुढच्या वेळी खाणे-पिणे सोडून वेगळा विषय घेऊन विडंबन करावे अशी विनंती धागाकर्त्याला करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरद पवार? J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!