तर अखेरीस

तर अखेरीस
कोशातला कोणताही शब्द येत नाही कामी
कोणत्याही भाषेतला

कोणताही उजेड आपला नसतो
आपला नसतो कोणताही अंधार

शून्य सावलीचा काळ
न जाणे किती युगे लांबणार
आपणच आपले नसताना

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

छान.. जरा किंचित अधिक फुलवायला हवी होती असे वाटून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही ऋ.. ही रचना नेमकी तेवढीच असण्यात तिचा मुख्य इम्पॅक्ट आहे.

"फुलवण्याच्या" अपरिहार्य मर्यादेची टोकदार जाणीव देणारी कविताच फुलवून लिहायची? ना..

परिणामकारक झालीय रचना कविता ताई...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण अखेरीस उच्चार नसतो
शब्द नसतात, नसतो अर्थही

नाती, शब्द, काळ, युगं
त्या अंधारातच विरलेली असतात

आणि तो अंधार कशापासून
वेगळा सांगण्यासाठी
प्रकाशही नसतो,
त्या अखेरीच्या कुठच्यातरी झरोक्यांमधून
पाझरायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि प्रतिसाद द्यायलाही नुरतात शब्द
कारण सादही नसतो नि:शब्द अब्दामध्ये
पण दिलासा फक्त हाच की
उरलेला नसतो विषादही
सारं संपून गेल्याचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ही आवडली वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत... छान कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि या अखेरीची अखेर तरी कधी होणार?...

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्ये रिकामी जागा सोडली आहे - शब्द आणि अर्थ भरून काढण्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0