ती नसताना मी जगतच कसा होतो?

ती आल्यावर असं वाटू लागलंय
की ती नसताना मी जगतच कसा होतो?

तिचं नसणं ती नव्हतीच तेव्हा जाणवायचं नाही फारसं,
खरंतर माहितीच नव्हतं
की आपल्यालाकडे काय नाहिये?
आपल्याला काय हवंय?

पण मग ती आली,
कधी? कशी?
कशामुळे?
काहिच कळलं नाही.
एखाद्या भिनत जाण्यार्‍या विषाप्रमाणे
किंवा चढत जाणार्‍या नशेप्रमाणे
अलगद
नकळत
पण निश्चितपणे!

पण आता ती आल्यावर
जितकं भरल्यासारखं वाटतंय
तितकंच
रिकामं, काहितरी राहिल्यासारखं,
तिला अजून आपलंस करायला हवं, जिंकायला हवं.

तसा तिला फार त्रास देतो मी
सतत कामाला लावतो,
वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते मागतो,
अन् तीही काहिहि न मागता, न बोलता
मदतीला धावते.
कधी कधी तर
तिच्या मदतीचा त्रास होतोय असे म्हटले तरीही!

एकदा ती आलीये तर पुन्हा जाणार नाही असं वाटतंय
उगाचंच?
पण न जाणो
कधी गेलीच तर!

छ्या!

ही अक्कल आल्यावर असं वाटू लागलंय
की ती नसताना मी जगतच कसा होतो?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पहिल्यांदा कुठल्या नातेसंबंधाबद्दल आहे असं वाटलं, नंतर वाटलं आई-मुलगा याबद्दल आहे, पण नंतर अक्कल आली Wink

बाकी कविता मस्त झाली आहे. हृषिकेश अन कविता हे समीकरण पहिल्यांदाच पाहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'प्रत्येक यशस्वी अकलेमागे एक अक्कलदाढ असते' असे अमुक एक कुणी म्हटले आहे.
ती तुमच्या आयुष्यात आधी येऊनही इतक्या वर्षांनी अकलेवर कविता केलीत पण तिला उपेक्षित ठेवलेत.
कुठे... कुठे फेडाल ही पापे ऋ ? आता त्वरित्तात्काळ्ताबडतोब तिच्यावर कविता करून पांग फेडा बरे... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्षीण दावा. Wink रचनेतच दावा क्षीण ठरवणाऱ्या बाबी समाविष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक्.
पटले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ती आल्यावर असं वाटू लागलंय

'ती आली आहे' या दाव्यास आधार काय?

की ती नसताना मी जगतच कसा होतो?

कधी जमल्यास एखाद्या मुंडके तुटलेल्या झुरळाचे निरीक्षण करून पहावे, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो. 'रोचक' म्हणता येऊ शकेल, अशा अनुभवाची प्रचीती यावी, असे सुचविण्याचे धाडस करतो.

अवांतर: मुंडके तुटलेल्या मुरारबाजीचीही 'न्युइसन्स व्हॅल्यू' काही कमी नव्हती, असे कायसेसे ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ती आली आहे' या दाव्यास आधार काय?

मला अक्कलदाढ आली आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!