काय वाट्टेल ते....! :)

आमची वटवटगिरी :-
ग्लोबल स्लोडाउन...? सायप्रस बुडतय? अमेरिका हलतिये? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे असल्या प्रकरणावर एकदम जालिम उपाय आहे. रामबाण. काय करायचं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा. आता तुम्ही म्हनाल याने काय होईल! तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडलात की तुमचं मन स्थिरावेल. मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल. ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल. या विचारांतून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अर्थव्यवस्थेवर वर विचार करायची काहीच गरज नाही.
.
त्याचं असं आहे की नको तेवढं आणि बर्‍याचदा नको तिथं डोकं चालवून थोडंसं डोकं पिकलंय...(डोकं थोडंसं पिकलंय!). तेव्हा मनात असा विचार आला की विचार न करता काहीतरी लिहावं. आता तुम्ही विचाराल की 'का लिहावं असं विचार न करता?'. अहो मग फरक काय राहिला माझ्यात आणि इतर लेखकांत? हा एक अभिनव उपक्रम (उपद्व्याप) आहे. टिळ्कांनी इंग्रज सरकारबद्दल विचारलेला प्रश्न सध्या तुमच्या मनातही माझ्याबद्दल डोकावत असेल. ('हा प्रश्न कोणता?' असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी: 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'). आहे. माझे डोके ठिकाणावर आहे. काळंजी नसावी. फक्तं ते ठिकाण कुठं सापडंत नाहीये. असो.
.
नाही नाही. हा लेख असा अर्धवट वाचून सोडून देण्याचा विचार तुमच्या मनाला स्पर्शूही देऊ नका. फारंच वैतागला असाल तर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. (श्वास बरंका.....लेख वाचणं नाही).
मुद्द्याचं बोलायचं झालं तर बोलण्याचा मुद्दा काय असावा! कशाला हवाय तो मुद्देसूदपणा! कशाला हवाय एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध! कशाला हवेत ते अक्षरा-अक्षरामधील, शब्दा-शब्दामधील, आवाजा-आवाजांमधील ते परस्पर ग्राह्य संबंध! थोडा वेळ सगळं बाजूला ठेवा. पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे. कशाचं? पोकळीचं. (पोफळीचं नाही हो...). पोकळीचं. निर्वात पोकळीचं. कसं काढाल? सोप्पंय! काही काढायची गरजंच नाहीये. याचा काय अर्थ? अं हं....विचार करायचा नाही....अजिबात विचार करू नका. वाचंत रहा. (थोडंसंच राहिलंय!).
.
जगात कोणी ना कोणी काही ना काही करंत असतो. जगात कोणी ना कोणी काही च्या काही करंत असतो. मीही ठरंवलंय की जीवनाचं ध्येय ठरंवायचं. 'काहीही' करून 'काहीही ' होत नसतं तर 'काहीतरी' होण्यासाठी 'काहीतरी' करावं लागतं- हे मला आता कळून चुकलंय...(अं हं..चुकून कळ्लंय!). काय म्हणजे काय असतं, कोण म्हणजे कोण असतं याची प्रत्येकाला पारख हवी. 'जे आहे ते का आहे' आणि 'जे नाही ते का नाही' हे कळ्ल्याशिवाय 'जे आहे ते नसते तर...' आणि 'जे नाही ते असते तर...' याचा अंदाज कसा येणार! जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. 'आपल्याला इतके प्रश्न क पडतात?' विचारलात कधी हा प्रश्न स्वत:ला? समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे.

'काय लिहीलंय हे?', 'का लिहीलंय हे?' वाटलं ना असं? वाटू द्या. काय वाट्टेल ते वाटू द्या. काय वाटावं हे आपल्या हातात नसतं. पण काय 'वाटून' घ्यावं हे मात्र आपल्या हातात असतं. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं वाटत असतं. कुणाला बरं वाटत असतं तर कुणाला वाईट वाटत असतं. कुणाला हसावं- नाचावं-बागडावं वाटत असतं तर कुणाला रडावं वाटत असतं; तर कुणाला पहावं...करावं...करून पहावं..पाहून करावं...वाजवावं...खाजवावं..............
प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...!

हुश्श! एवढं लिहीलं...मन हलकं झालं...तुम्हाला वाटंत असेल की या लेखकाला 'मन' नाही तर 'पोट' हलकं करण्याची गरज आहे. वाटूद्या...मी त्याबद्द्ल काही वाटून घेणार नाही. तुम्ही इथपर्यंत वाचंत आलात त्याबद्द्ल तुमचं मनापासून कौतुक. कांडी संपत आलीये...नाहीतर अजून लिहीलं असतं.

....आलो....आलो...कोणीतरी बोलावतंय....जायला हवं....बरंय तर मग्.....तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या..!

कळावे.....लोभ असावा....(खरं तर माणसाला लोभ नसावा....!).

प्रेम असावे........

--मनोबा

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल.

सदसद्.

'संसदविवेकबुद्धी' हे 'वदतो व्याघातः'चे उत्तम उदाहरण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> सदसद्.

हा शब्द "सदसत्" असा होईल. त ला पुढचा वर्ण लागला की त्याचा द होतो.
चूभूद्याघ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्याचं असं आहे की नको तेवढं आणि बर्‍याचदा नको तिथं डोकं चालवून थोडंसं डोकं पिकलंय...

डोकं चालवण्याने डोकं पिकलंय हे डोक्याच्या अस्तित्वाचे आणि कार्यक्षमतेचे एक व्यवच्छेदक का काय म्हणतात तसे लक्षण म्हणावे. त्यामुळे आभारप्रदर्शनाचा एक मुद्दा अजून वाढला.

नको तिथे आणि नको तेवढं डोकं न चालवल्याचा अनुभव प्रस्तुत लेखकाच्या सर्वच धाग्यांत दिसतोय. तस्मात ही द्विरुक्ती आहे.

बाकी विवेकबुद्धीच्या प्रिफिक्सफिक्सिंगमध्ये मणोबा अडकलेले पाहून गदगद् का कायतरी झाल्या गेले आहे आणि दादा कोंडक्यांना खुद्द मोरोपंतांनी सांगितलेली आर्या त्यांनी वाचावी अशी येथे एक शिफारस येथे केली आहे ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin काफ्का झाला का रे तुझा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाडावरच्या हाऊ आय फ्रॉम होम जहाज १९९२ नट्स झोपूया आता छे छे काय बर त्या सिरीयलचं नाहीच ना आठवत नाव इंग्रजी पोकळीत एक लढाईत गांधीजी स्वार होत मेट वर्क युअर मदर घुबड राहते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

....आलो....आलो...कोणीतरी बोलावतंय....जायला हवं....बरंय तर मग्.....तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या..!

हे 'कोणीतरी' कोण आहे हे मोबाईल नंबरसकट छापा अशी विनंती करतो, तो/ती फार महत्वाचा आहे.

बाकी लेख रोचक आहे.

जगात कोणी ना कोणी काही ना काही करंत असतो. जगात कोणी ना कोणी काही च्या काही करंत असतो. मीही ठरंवलंय की जीवनाचं ध्येय ठरंवायचं. 'काहीही' करून 'काहीही ' होत नसतं तर 'काहीतरी' होण्यासाठी 'काहीतरी' करावं लागतं- हे मला आता कळून चुकलंय...(अं हं..चुकून कळ्लंय!). काय म्हणजे काय असतं, कोण म्हणजे कोण असतं याची प्रत्येकाला पारख हवी. 'जे आहे ते का आहे' आणि 'जे नाही ते का नाही' हे कळ्ल्याशिवाय 'जे आहे ते नसते तर...' आणि 'जे नाही ते असते तर...' याचा अंदाज कसा येणार! जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. 'आपल्याला इतके प्रश्न क पडतात?' विचारलात कधी हा प्रश्न स्वत:ला? समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे.

हे थोडे विस्तृतपणे लिहा किंवा ह्यावर एक लेखमालिकाच लिहा अशी विनंती करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ऋशिकेश :- प्रतिसादातून दोक्,ए भंजाळले. पुढील अंक आपनच लिहावा ही विनंती.
@अस्मिता :- "काफ्फा" म्हंजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छे हो!! मी फक्त याचं पालन केलंय Wink

कशाला हवाय एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध! कशाला हवेत ते अक्षरा-अक्षरामधील, शब्दा-शब्दामधील, आवाजा-आवाजांमधील ते परस्पर ग्राह्य संबंध! थोडा वेळ सगळं बाजूला ठेवा. पाटी स्वच्छ पुसून कोरी करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऐसी उघडले तर पहिले चार लेख मन ह्यांचेच दिसले. त्यांना पण डायरीया झाला का काय अशा शंकेने घाबरलो होतो. पण एकूणच लिखाण हे विविध विषयांवरती आणि अभ्यासू आहे असे जाणवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

तूच रे बाबा तूच परा...
तूच माझी किंमत जाणणारा आणि अल्लाद मार्गदर्शन करणारा...
पुढील काही लेखांसाठी सुचलेले(की कुंथलेले?) विविध, व्यासंगी आणि माहितीपर वगैरे मथळे :-
१.डायरिया : एक सुगंधी अनुभव
२.जालिय डायरिया विरुद्ध जालिय बद्धकोष्ठ : कारणे, उपाय आणि वापर
३.मानवी डायरिया आणि वराह मेजवानी: निसर्गातील पुनर्नवीकरणक्षमतेचे जिवंत उदाहरण
४.डायरिया आणि आर्थिक स्थितीचा केलेला तौलनिक अभ्यास
५.डायरिया : शब्दव्युत्पत्ती आणि ऐतिहासिक उल्लेख (waterlooमधी १८१२च्या आसपस नेपोयनला डायरिया असल्याच्या शक्यतेचा उल्लेख)
६.डायरिया प्रसार : वर्गसंघर्षाचे कारस्थान
७.डायरिया प्रसार : आंतरराष्ट्रिय कंपन्यांचे कारस्थान
८.डायरिया प्रसार : संघाने केलेले कारस्थान
९.डायरिया : एक इष्टापत्ती
१०.डायरिया : खरेच अस्तित्वात आहे की केवळ cynisism?
११. अभिजात साहित्यातील डायरियाच्या उल्लेखाचे गांभीर्य
१२. डायर्‍या : एक प्रकारचा मानसिक डायरिया
कींवा
मनोकायिक डायरिया
१३. पेगदूत काव्व्यातील रमणीय डायरियामधील टमरेलाचे मनोहारी वर्णन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरेतर श्री. मन, हे सगळेच मथळे एकाच लेखात 'डायरीया - एक चकवा' घेऊ शकतील असे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मुद्दा क्र. ५ मध्ये चूक आहे. वॉटर्लू १८१४ मध्ये झालं होतं. १८१२ मध्ये झाली ती रशियावरची स्वारी. त्या थंडीत नेपोलियनला डायरियाऐवजी बद्धकोष्ठ झाली असण्याची शक्यता कितीतरी जास्त आहे.

मुद्दा क्र. १० मध्ये cynisism मध्ये c चा s करून ध चा मा आलरेडी केल्या गेलेला आहे.

तस्मात ही त्रयोदशगुणी लिष्ट हे डायरियाचे अजून एक उदाहरण म्हणता यावे. "सावरिया" सारखे "डायरिया" वर एखादे गाणेही पाडता येईल.

प्रस्तुत संदर्भात या क्रियापदामुळे रचना एकदम ओघवती होत आहे.

यथार्थ वर्णनाबद्दल जर कुणी बीभत्सरसाचा आरोप करणार असेल तर मुळात आरोपासाठीच्या शब्दातच ती उपमा दडलेली आहे हे लक्षात घ्यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

you are sorrect.
I am corry.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आयमाय स्वारी. वाटर्लू १८१५ मध्ये झालं होतं. त्यामुळे अजून एक वर्ष मिळालं असावं डायरियाच्या व्हायरसला ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं