एलिझाबेथ बिशपची एक 'सेस्टीना'

न्याहारीत मिळालेला चमत्कार

सहा वाजता आम्ही कॉफीची वाट पाहात होतो
कॉफी आणि पाव
जे एका विशिष्ट बाल्कनीतून वाटले जाणार होते
एखाद्या जुन्या राजाच्या दानधर्माप्रमाणे किंवा एखादया चमत्काराप्रमाणे.
बाहेर अजून अंधारच होता आणि सुर्याचा एक पाय
नदीच्याएका दीर्घ लाटेवर स्थिराऊन राहिला होता

दिवसाची पहिली नौका कधीच नदी पार करून गेली होती
खूप गारठा होता आणि सूर्य आम्हाला ऊब देईल असे वाटत नव्हते,
आम्ही आशा करत होतो की कॉफी खूप गरम असेल
आणि प्रत्येकाला एक लोणी लावलेला पाव
मिळेल एखाद्या चमत्कारातून;
सात वाजता बाल्कनीतून एक माणूस बाहेर आला

तो बाल्कनीत मिनिटभर एकटाच उभा राहिला
आमच्या डोक्यांच्या पलीकडील नदीकडे पाहात,
एका गड्याने त्याला थाळीमध्ये चमत्कार सोपवला
ज्याच्यात कॉफीचा एकच कप होता
आणि पावाचं एक वेटोळं ज्याचा त्याने एक तुकडा तोडला
त्याचं डोकं खरंतर वर ढगांमध्ये असल्यासाराखं दिसत होतं- सुर्यासोबत

तो माणूस वेडा झाला होता का आणि नक्की काय करत होता या सुर्याखालच्या दुनियेत,
त्याच्या उंच बाल्कनीत उभा राहून ?
प्रत्येक माणसाला एका कपात थेंबभरच कॉफी मिळाली
आणि एकेक जाडाभरडा पावाचा तुकडा
जो काहींनी हेटाळून नदीत फेकून दिला
तरीदेखील आमच्यापैकी काही लोक चमत्कारासाठी रेंगाळत उभे राहिले

मी सांगू शकेन की मी त्यानंतर काय पाहिलं, हा काही चमत्कार नव्हता
मी पावाच्या आडून मिणमिणत्या डोळ्यानी पाहिलं
की एक सुंदर बंगला सुर्याखाली उभा होता
आणि त्या बंगल्याच्या दारातून गरमगरम कॉफीचा सुवास येत होता
समोर नदीवर राहणार्‍या पक्षांनी जोडलेली
एक सुशोभित पांढरी चुनखडी बाल्कनी होती

आणि सज्जे आणि संगमरवरी खोल्या, माझा पाव
आणि माझा बंगला- युगांच्या प्रवाहात माझ्यासाठी बनवले गेलेले, एका चमत्कारातून
पक्षांनी आणि किड्यांनी, आणि नदीने
दगड कोरून. मी दररोज उन्हात
न्याहारीसाठी माझ्या बाल्कनीत पाय वर ठेऊन
भरपूर कॉफी पित आहे

आम्ही पाव चाटला आणि कॉफी गिळून घेतली
नदीपलीकडच्या एका खिडकीने सूर्य पकडला होता
बहुतेक चमत्कार दुसर्‍याच एक बाल्कनीत घडत गेला होता..

एलिझाबेथ बिशप
(१९११-१९७९)

नोंदी

१. हा मुक्त अनुवाद आहे - सेस्टिनाचा फॉर्म जपण्यासाठी काही ठिकाणी तडजोड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. महायुध्दे- अमेरिकतली आर्थिक मंदी -गरिबी- सामाजिक/आर्थिक दरी या परिवेशात ही कविता वाचावी असे सुचवावे वाटते
३. बाल्कनी हा शब्द प्रचलित असल्याने तसाच ठेवला आहे. गॅलरीसाठी समानार्थी म्हणून सज्जा हा शब्द वापरलेला आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान.. मुळ कवितेचा दुवा मिळू शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> छान.. मुळ कवितेचा दुवा मिळू शकेल काय? <<
हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

At six
o'clock
we
were
waiting
for
coffee,
waiting
for
coffee and the charitable
crumb
that was going to be
served from a certain
balcony
like kings of old, or like a
miracle
It was still dark. One foot
of the sun
steadied itself on a long
ripple in the river
The first ferry of the day
had just crossed the river
It was so cold we hoped
that the coffee
would be very hot, seeing
that the sun
was not going to warm
us; and that the crumb
would be a loaf each,
buttered, by a miracle
At seven a man stepped
out on the balcony
He stood for a minute
alone on the balcony
looking over our heads
toward the river
A servant handed him the
makings of a miracle
consisting of one lone
cup of coffee
and one roll, which he
proceeded to crumb
his head, so to speak, in
the clouds—along with
the sun
Was the man crazy?
What under the sun
was he trying to do, up
there on his balcony!
Each man received one
rather hard crumb
which some flicked
scornfully into the river
and, in a cup, one drop of
the coffee
Some of us stood around,
waiting for the miracle
I can tell what I saw next;
it was not a miracle
A beautiful villa stood in
the sun
and from its doors came
the smell of hot coffee
In front, a baroque white
plaster balcony
added by birds, who nest
along the river
I saw it with one eye
close to the crumb—
and galleries and marble
chambers. My crumb
my mansion, made for
me by a miracle,
through ages, by insects,
birds, and the river
working the stone. Every
day, in the sun,
at breakfast time I sit on
my balcony
with my feet up, and
drink gallons of coffee
We licked up the crumb
and swallowed the coffee
A window across the river
caught the sun
as if the miracle were
working, on the wrong
balcony

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0