मेदिनी

सर्व वाचकांना चवदा मार्चच्या, अर्थात 'पाय' दिनाच्या शुभेच्छा. एक कविता:

मेदिनी

व्रण हा रक्तवर्णी ज्या दक्षिणस्तनी
कृष्णमिलिंदकेंद्रबिंदू तिथे
विलसलसतो धवलासनी

पुष्कळे पुष्टरमणी चिंबनितंबवलये
अचपळमनमोहन गहनगंधप्रिये
अंगांगदंगसंभोगिनी मेदिनी

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

पाय दिनाच्या शुभेच्छा!

अदितीला खास शुभेच्छा!

अवांतर: सर्व कवी लोकांनी कवितेसोबत त्यामागची कल्पना टाकली तर बरं होइल.. थोडक्यात रसग्रहण.. किँवा जे काही म्हणतात ते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाय दिनाच्या सर्व पायप्रेमींना आणि विशेषतः विक्षिप्तबैंना शुभेच्छा!

कविता अगदी टिपिकल संस्कृत पद्धतीची - संपृक्त प्रतिमासृष्टी असलेली- मस्त उतरली आहे. पहिल्यांदा वृत्त शोधायचा प्रयत्न केला, पण नंतर म्हटले शब्द एंजॉय करू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेदिनी =३
व्रण = . (बिंदू = पाईंट)
हा = १
रक्तवर्णी= ४
ज्या = १
दक्षिणस्तनी =५
.
.
.

इत्यादी. म्हणजे 'पाय' ची किंमत लक्षात ठेवण्याचे सूत्र. 'पाय' दिवशी कविला पयोधर आठवलेले दिसतात. बराच रसिक आहे. Smile

ही रेग्यांची (रेगे म्हणजे पुशि... मेपु नव्हे)'पुष्कळा'. यावरून श्रीदेवी (बहरीच्या काळातली, आत्ताची नव्हे) आठवावी.
पण हा (दाताने चावल्याचा?) व्रण बिंदुवत कसा ते काही समजले नाही. की तिथे डास चावला होता? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानांना एक साष्टांग नमस्कार या प्रतिसादाबद्दल. मान गये उस्ताद. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विसुनानांना एक साष्टांग नमस्कार या प्रतिसादाबद्दल. मान गये उस्ताद. _/\_

तंतोतंत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आणि प्रतिसाद दोन्ही लै भारी!
वैदिक गणिताच्या पुस्तकात असाच एक पायची किंमत सांगणारा लांबलचक श्लोक वाचला होता. आता आठवत नाही Sad

ही रेग्यांची (रेगे म्हणजे पुशि... मेपु नव्हे)'पुष्कळा'. यावरून श्रीदेवी (बहरीच्या काळातली, आत्ताची नव्हे) आठवावी.

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण म्हणताय तो श्लोक हा तर नव्हे?

गोपीभाग्यमधुव्रात-श्रुंगिशोदधिसंधिग |
खलजीवितखाताव गलहालारसंधर ||

[ मी संस्कृतचा अभ्यासक नाही त्यामुळे वरील टंकनात जर कुठे काही चूक झाली असल्यास विद्वानांनी ध्यानात आणून द्यावी ही नम्र विनंती. (टंकन केल्यानंतर जालावर थोडासा शोध घेतला असतां ह्याच श्लोकाच्या २-३ आवृत्ती (व्हर्जन्स??) दिसल्या.) ]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दंडवत स्वीकारा, नाना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

....व्रण बिंदुवत कसा ते काही समजले नाही. की तिथे डास चावला होता?...
..........असेल असेल... ते 'धवलासन' बहुधा 'कैलास-जीवन' लावल्यानेच तयार झाले असावे ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दंडवत
नको...
पाय लागूं |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाय दिनानिमित्त दोन वर्षांपूर्वी मी लिहिलेली ही कविता आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता वाचली अन आवडली. व्यासोच्छिष्ट हा शब्द विशेष आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नितंब हा शब्द मला नेहेमी अश्लील वाटतो, या वेळेस वाटला नाही.

पाय दिनाच्या शुभेच्छा, कविता आणि रसग्रहण करणार्‍यांना थोड्या अधिकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<<नितंब हा शब्द मला नेहेमी अश्लील वाटतो, या वेळेस वाटला नाही.>>>
का बरे? मला तर एरवी सभ्य वाटतील असे 'वलये' 'गहनगंधप्रिये' वगैरे शब्दही अश्लील वाटले.. Blum 3
बाकी अश्या रचनांचा अधिकाधिक प्रसार ़केला तर विद्यार्थ्यांना गणित आणि संस्कॄत दोन्ही विषयांत(नो पन) गोडी निर्माण व्हायला मदत होईल असे वाटते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी अश्या रचनांचा अधिकाधिक प्रसार ़केला तर विद्यार्थ्यांना गणित आणि संस्कॄत दोन्ही विषयांत(नो पन) गोडी निर्माण व्हायला मदत होईल असे वाटते!

विषयांतर होईल कदाचित, परंतु तरीही, अशा मार्गांतून, पक्षी भलत्या विषयाची भलत्या विषयाशी सांगड घालण्यातून, याच्या नेमके उलट होण्याची, पक्षी विषयावरील वासना उडून जाऊन विषयाविषयी अनास्था निर्माण होण्याचीच शक्यता अधिक वाटते, असे मत नमूद करावेसे वाटते.
======
तळटीपा:
, कोणत्याही.
असल्यास. मुळात विषयासक्ती नसल्यास असे होण्याचा संभव उद्भवू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच ना. अश्लील वाटण्यासारखे त्यात काही वाटत नाही. पण सभ्य असूनही वापर टाळला जाणार्‍या शब्दांपैकी तो एक शब्द आहे हे नक्कीच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धड ना पॉर्न, धड ना "पॉर्नेतर" अशा चाळवू पहाणार्‍या वाङ्मयात हा शब्द वापरल्याचं पाहिल्यामुळे हा शब्द अश्लील वाटतो. एखाद्याला/एखादीला त्यात बुडाचं सौंदर्यही दिसू शकेल. कदाचित अलिकडेच 'कपलिंग' मालिका आणि त्यात स्त्री-पुरुषांची पार्श्वभागाकडे बघण्याची निरनिराळी दृष्टी समजल्यानंतर शरीराचा हा भाग फार रोचक वाटेनासा झाला आहे.

'कपलिंग'मधली सॅली सतत आपलं बूड फार वाढतं आहे अशी तक्रार करत असते. आपलं बूड आपल्या'मागे' सतत चरत असतं अशीही तिची एक थिअरी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय की ब्वॉ. अश्लीलता हीपण प्रत्येकाच्या बायसवर अवलंबून असते. सॅलीची थिअरी कैपण आहे हां बाकी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्रण = "." हे समजायला विसुनानांचा प्रतिसाद उपयोगी पडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलीच!
रवंथ चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मला हवं तसं लिहिलं, आता वाचणाऱ्याने त्याला हवं तसं वाचावं. पण तरीही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. कित्येक देशांत (फ्रान्स, इटली इत्यादि) दशांशचिन्हासाठी बिंदू न वापरता स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, पाच युरो चाळीस सेंट ही किंमत € 5,40 अशी लिहितात. ज्यांनी मिलान किंवा पॅरिसच्या विमानतळावर (विंडो)शॉपिंग केलेलं आहे, त्यांना हे परिचयाचं असावं. व्रणाविषयीच्या शक्यता विनाकारण मर्यादित होऊ नयेत हा हेतू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

शिरसाष्टांग नमस्कार घ्यावा, गुर्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile

भारीच! अर्धविराम वापरणारे आहेत का कोणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः पॉइंटचा डॉट म्हणून नाही, पण प्रश्नचिन्ह म्हणून ग्रीक लिपीत अर्धविराम वापरला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोचक. अर्थ साधारण कळला, पण सगळे संदर्भ अजून लागले नाहीत म्हणून आवडला असे म्हणण्याचे धारिष्ट्य करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझेही हेच मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

+१ असेच म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!