आई

ती करपत राहाते

उन्हा तान्हात, थंडी-वाऱ्यात

कधी जात्याखालच पीठ होत

कधी भट्टीतील वीट होत

बारादिस बारोमास.

पदर खोचून कंबरेला

काढते गाळ विहिरीतला

ग्यासबती डोक्यावर घेऊन

जळते इनामदाराच्या वरातीला

भांगलते शेत सावकाराचे

काढते शेताबरोबर

पोराच्याही आयुष्यतले तण

शेणातील कीडा काय शेणातच राहात नाही म्हणत

करते वजाबाकी काट्याची

शाबूत ठेवतमाणुसकी

बेरीज करून माणसाची.

काळ बदलला

बदलली आईची गोष्टसुद्धा

आई

पोराच्या वाढीसाठी ग्राईप वाटर

संतुलित आरोग्याच्या सॊदर्यासाठी

सव्हलोन -संतूरचा ब्रान्ड होते

उज्ज्वल भवितव्यासाठी

टुशनचा खाजगी क्लास होते

पोरं शिकतात

शिकून शहाणी होतात

गुगलवर सर्च करत

आई समजून घेतात

आई भारावते

हरखून जाते

आमच्या वाटयाला नाही

निदान पोराच्या वाट्याला तरी आलं म्हणत

भरल्या संसारातून आई जगाचा निरोप घेते

पोरं कोसळतात

वादळात उन्मळून पडलेल्या झाडांसारखी

तू भरल्या संसारातून निघून गेल्यास

आज बारा दिवस होत आहेत

ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो

चिन्या,जम्बो,पिल्या ....

शिवाय

माफक व योएग्य दरात पिझ्हा मिळेल

बदलत्या काळात बदलत जाते आईचे वर्तमान

आई पिझ्हाची ओर्डेर होते

मेल्यानंतरही पोराच्या धद्यासाठी

आई चार बाय पाचचा कॉलम होते

जयप्रभू कांबळे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

विषय नेहमीचाच असला तरी शब्द छान आहेत!
कविता वाचून स्त्रीदिनानिमित्त काही विचार मनात आले.
आईला मुलगी असती तर ती मुलीच्या शिक्षणासाठी खपली असती का लग्न करून द्यायला टपली असती?
फक्त मुलग्यांसाठी खपणार्‍या आया आणि उगंच माणसं जपणार्‍या बाया औट ऑफ फ्याशन झाल्या आता.

कंडोमाची अॅड
रानोमाळ

आणि

बोकाळल्या झुंडी

यातला विरोधाभास भेदक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत!

कवितेतील काही प्रयोग भेदक आहेत. मात्र जरा लहान असती तर अधिक परिणाम करून गेली असती असे वाटते.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जयप्रभू कविता आवडली.
आशयपूर्ण व त्याहीपेक्षा विरोधाभासातून अंतर्मुख करायला लावण्याची क्षमता असलेली ही कविता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादक: रचनांना स्वतंत्र आस्वाद घेता यावा यासाठी येथील रचना इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. शब्दरचना प्रभावी आहे. पण शेवटी कवितेवरची पकड सुटल्यासारखी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रातिनिधिक म्हणतानाही वेगवेगळ्या काळाचं किंवा समाजाचं चित्रण, पण परिस्थिती तीच हे चित्रण आवडलं.

(भांगलणे हे क्रियापद माहित नव्हतं. धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.