आयुष्यात अंधार कि अंधारमय आयुष्य....

बरेच दिवसांनी खूप काही वेगळ बघीतलं प्रत्यक्ष तरी अविश्वासनीय. कसे चालत असतील हात त्या व्याद्यांवर कशी जुळत असेल लय कसा होत असेल तळमेळ. खरच अविस्मरणीय दिवस एक सुरेल संध्याकाळ खूप काही शिकवून जाणारी.
अंधार उजेडाचा खेळ प्रत्येकाच्याच वाट्याला येतो.. पण, जर आयुष्यात कायम अंधार असेल तर प्रकाशाची कास धरूच नये का? मग अंधार दाटल्या आयुष्यात मार्ग सोडून पाळणाऱ्या भ्याड पळपुट्याना एकंच सांगावसं वाटतं आयुष्यात अंधार असला तरी अंधारमय आयुष्यात कितीही अंधार झाला, तरी प्रकाशाची चाहूल कुठे तरी असतेच अनोळखी असली तरी ती प्रकाशाची किरण प्रयत्नाने गाठता येतेच. अंधारमय आयुष्या प्रकाशमय करता येतंच. बस त्यासाठी हवी अदम्य ध्येयासक्तता अन अदभूत इच्छाशक्ती जी मी बघत होतो त्या १४ लोकान मध्ये. डोळ्यात अंधार असला तरी त्यांचा मार्ग लख्खं प्रकाशाने न्हाऊन निघालाय. १० वादक आणि ४ गायक अश्या चमूची सुमधुर संगीताची मैफील. त्यांच्या कडे बघीतलं त्यांच्या मुखातून निघणारे सुमधुर स्वर आणि वादकांची अप्रतिम साथ मनाला भिडून गेली, हृदयाला हलवून गेली. तेव्हा वाटलं आपल्या आयुष्यात येणाऱ्या कणभर संकटाला मणभर मानून आपण त्याचा किती बाऊ करतो ना.
खूप काही असूनही आपण दरिद्रीच असतो खरंच किती गम्मत आहे ना. जे नाही आहे त्याचा दुख: कुरवाळत बसण्य पेक्षा जे आहे त्यात आनंद का मानू नये. मला डोळ्यांनी दिसत म्हणून मला त्या वस्तूची इच्छा असते मग त्यांच काय ज्यांच्या नजरेत नाही ती ज्योत. खरच आयुष्य काय असत ना ते त्यांच्या कडून शिकायला मिळत. क्षणिक माणूस ठरवतो मनाशी कि आता मी असं करेन पण, काहीच दिवसात जैसे थे. आयुष्यात सतत बोचत राहणारी गोष्ट असते इच्छा, त्यांना नसेल का हो राहत इच्छा. असते त्यांनाही असते पण आपण कधीच न शिकू शकणारी गोष्ट ते शिकतात आणि त्यावर मनाचा ताबा मिळवतात आणि इछेचा खेळ जागीच संपतो. मग हे सगळं बघताना मी काही काळ स्वतःचा आणि माझ्या सारख्या अनेक लोकांचा विचार करत उगाच हसत असतो.

कदाचित अश्या अदभूत इच्छाशक्ती असणऱ्या लोकांना आयुष्याला हेच सांगावस वाटत असेल :-

प्रक्तनास चीथावताना वाटत
खरच तुम्ही दिली असतील
लाख वादळ
वाटलं असेल
जीव झोकून देऊ
पण,
या आत्म्यास अजुनह
आस आहे
क्षितिजाची
भागभागत्या आगीला
फुंकर घालून विझवायची,
तुम्ही करत राहा
लाख प्रयत्न
पण,
अंधारल्या नजरेत अजूनही आहे
प्रकाशाची चमक
अन
प्राक्तनाचे खेळ
उलथून लावण्याची ताकद.........

- गौरव खोंड
साधनकर वाडी, वणी
जि. – यवतमाळ (४४५३०५)
दु. – ९०२८४३१०६२ / ८८०५९८९८९५

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

जालावर यवतमाळसारख्या (आम्हांला) दूरच्या प्रदेशातले लिखाण पाहून कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले.विदर्भातले अनेक लोक जालावर लिहितात पण ते बहुधा पुण्यात स्थिरावलेले असतात. आपल्या ललित लिखाणाला शुभेच्छाच,पण यवतमाळच्या साहित्यविश्वासंबंधी माहितीपर लेखनही आवडेल. तेथील साहित्यविश्वासंबंधी साध्यासुध्या गोष्टीही माहीत नाहीत. जसे की तिथे चांगली पुस्तके उपलब्ध असतात का,वाचनसंस्कृती कितपत आहे,जालौपलब्धता कितपत आहे,मराठीसाहित्याविषयी आस्था आणि वाचनाची आवड असणारे समानशील मित्र भेटतात का,आपापसात साहित्याविषयी चर्चा झडते का, चंद्रपूरच्या साहित्यसंमेलनाचा तात्कालिक आणि कायमस्वरूपी फायदा झालेला दिसतोय का वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नीटसा संदर्भ समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरील लेख हा एका अंध व्यक्तींच्या गायन कार्यक्रमाला बघितल्या नंतर माझ्या मनात आलेले विचारांवर लिहिलेला आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहो! ही पार्श्वभूमी वाचल्यावर कविता अधिक आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमच्या दैवात उजेड आणि कर्मात अंधार असल्याने आम्ही मार्जिनल युटिलिटी कर्व्हच्या पार उजव्या टोकाला जाऊन पोचलेलो आहोत. आम्हाला ज्याच्याविरुद्ध लढता येईल असं समाजमान्य दु:ख नाही याचंच आम्हाला दु:ख आहे.
त्यामुळे आमचा पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या लेखनाचे सुगम मराठी भाषांतर कुठे मिळेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

तेंचा फोण णंबर दिलाय की हो तेंनी, तितेच मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचायला हवाय, ऐकायला नकोय.

आता ते सांगतील ते लिहून घ्यायचे म्हणजे एक टंचनीका ठेवणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

टंचनिका न मिळायला काय झालं? तेसुद्धा तो सौंदर्यफुफाटा का काय म्हंतात तो असताना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपण यांच्याबद्दल कधी ऐकले नाहीत काय? यांची ही अजरामर कृती वाचली नाहीत काय कधी?

याचीच मराठी आवृत्ती समजायची नि काय, झाले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या हून अजून सुगम मराठी मध्ये हा लेख पुन्हा लिहावा असे म्हणायचे आहे का..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रा. प्रवीण दवणे यांची आठवण झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0