Must Watch Movies – २ Dr. Zhivago

हे लिखाण आधी दुसर्‍या संकेतस्थळा वर टाकलेला आहे

नमस्कार,

लेखनाचा धागा पुढे चालवतो आहे. चित्रपट बनवणे हि फार मोठी कला आहे. त्या मधे बाकी सर्व कला चा अन्तर्भाव होतो. जसे की साहित्य, संगीत, अभिनय, Imagination and skills required for production design and execution. ह्या सर्व बांधुन ठेवतो तो Director.

Good Movies should be watched few times to understand the intricacies of film making. माझा असा अनुभव आहे की उत्तम चित्रपट पहिल्या वेळेस बघताना अचंबित करतो, नंतर काहि दिवस सतत डोक्यात रहातो. पुन्हा पुन्हा बघितला की त्यामधिल आधि miss झालेल्या गोष्टी जाणवतात. हा जो चित्रपट तो सुद्धा at least २-३ वेळेला तरी बघाच.

-----

Doctor Zhivago : -

हा सिनेमा १९६५ साली तयार केला आहे आणि बोरिस पास्तरनाक ( Boris Pasternak ) ह्या प्रसिद्ध लेखकाच्या ह्याच नावाच्या कादंबरी वर बेतला आहे. ह्या लेखकाला Nobel Prize जाहिर झाले होते.

ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन म्हणजे "Passionate Movie about Passionate People in Passionate Times" ( Rotten Tomato ). Love Story in epic proportion with backdrop of Country in Civil War.

Backdrop of Civil war and end of a Culture are similarities between this movie and "Gone With the Wind"

थोडक्यात कथावस्तु - चित्रपट Russian Revolution च्या थोडा आधी चालु होउन काही वर्षा चा काळ दाखवतो. कहाणी एका पॅरीस हुन डॉक्टर होउन आलेल्या तरुणा ची आहे. केन्द्र्स्थानी ड्रॉ. युरि झिवगो, त्याची प्रेयसी /बायको Tanya, नंतर ची प्रेयसी "लारा" ही पात्र आहेत. त्यांच्या आजुबाजुला तितकिच महत्वाची "पाशा" ( Pavel Pavlovich ), विक्टोर ( Victor Komarovsky ), युरी चे वडिल अशी पात्र आहेत.

पुर्ण कथा ईथे मिळेल http://en.wikipedia.org/wiki/Doctor_Zhivago_(film)

आवर्जुन काय बघावे -

- मानवी मनाचे अतिशय सुंदर चित्रण. प्रत्येक पात्र बघण्या सारखे आहे.
- Vast Canvas - एखादे ४ फुटांचे चित्र आणि एखादे भव्य, मोठी भिन्त व्यापुन राहिल असे चित्र ह्या मधला जो फरक आहे तो हा चित्रपट बघताना जाणवत रहातो.
- Omar Sharif चा उत्तम अभिनय. Underplay केलाय खूप पण डोळ्या मधे जी आर्तता त्यानी दाखवली आहे त्याला तोड नाही.
- Production Values - रशिया चे सगळे वातावरण जसे च्या तसे उभे केले आहे आणि ते सुद्धा स्पेन मधे. माझी अशी request आहे की प्रत्येक Scene बघताना विचार करा कि हा सेट कसा उभा केला असेल? किती कष्ट पडले असतील?

थोड्या ऊणिवा -

- लांबी ३ तासा हुन जास्त आहे.
- शेवट जास्त रेंगाळतो.
- संवाद जास्त effective पाहिजे होते.

---------------

आपल्या अभिप्रायाची वाट बघतोय. पण हा सिनेमा नक्की बघा आणि मग कळवा.

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ऐसीवरील पहिल्या लेखनाबद्दल स्वागत आणि अभिनंदन! Smile
हे लेखन खूप त्रोटक वाटले. अधिक मिमांसा आवडली असती.
शिवाय शक्य तितके मराठीत केलेले लेखन वाचायला अधिक आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे लिहायचे कारण चित्रपटाची story सांगणे किंवा त्याची खुप खोल समिक्षा करणे असा नाही. फक्त हे चांगले चित्रपट आहेत आणि ज्यानी बघितले नसतील तर नक्की बघावेत हे सांगण्यासाठी.
चित्रपट हे स्वता: आस्वाद घ्यायची गोष्ट आहे, फक्त pointer द्यावा हा हेतू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लासिक. 'गॉन विथ द विंड' चा समतुल्य म्हणता येईल.
बोरीस पास्तरनाकला बिचार्‍याला कम्युनिझमचा विरोध केला म्हणून नोबेल मिळाले हा नसता कलंक लागला.
नॉस्टाल्जियाला जर सूर असते तर ते डॉ. झिवागोच्या सिग्नेचर ट्यूनसारखे असते असे नमूद करतो.

किंवा - अधिक चांगल्या जुन्या,मराठी शब्दांत -
भल्याबुर्‍या आठवणींनी जेव्हा उदास व्हायला होते तेव्हा डॉ. झिवागोचे पार्श्वसंगीत माझ्या कानी रुंजी घालू लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समकालीन परिस्थिती काय होती, त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं महत्त्व काय, आज या चित्रपटाचं महत्त्व काय अशासारख्या प्रश्नांची उत्तरं चित्रपट बघण्याआधी मिळाली तरी चित्रपट बघण्यात रसभंग होणार नाही असं वाटतं.

हे लिखाण आधी दुसर्‍या संकेतस्थळा वर टाकलेला आहे

त्याची लिंक दिलीत तर तिथे प्रतिसादांमधे झालेली चर्चाही वाचता येईल.

अवांतरः विसुनानांकडून आलेलं अल्पाक्षरी रेकमेंडेशन, त्यांच्या अन्य लिखाणामुळे, महत्त्वाचं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<चित्रपट बनवणे हि फार मोठी कला आहे>> चित्रपट पाहुन त्यातिल सौन्दर्य समजवुन देणे हि तुलनेने छोटी कला आहे. प्रयत्न करा. जमेल. शुभेछ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

हा आणि गॉडफादर सारखे चित्रपट बनवताना खूपच किचकट काम असते. कादंबरी जास्ती परिणामकारक ठरते. एकेक दिसायला साधी परंतू विस्फोटक वाक्ये चित्रपटात "दाखवता" येत नाहीत. उलट बॉण्डच्या चित्रपटात दाखवणेच महत्त्वाचे असते.
समिक्षा केलीत ते आवडले.
पूर्वी आमचे वडील इंग्रजी चित्रपट समजण्याकरता हंस मासिकातली श्रीकृष्ण हवालदार यांची कथासमिक्षा वाचून जात असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कादंबरी ही सिनेमापेक्षा केव्हाही सरसच असावी. कारण कादंबरी, वाचकाला कल्पनाशक्तीचे पंख देते याउलट सिनेमा स्पून-फीडींग करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हे नेहमीचं लोकप्रिय वाक्य आहे. खंडन केल्याशिवाय राहवत नाही.
आपापल्या मर्यादा आणि बलस्थानं असतात माध्यमांची. सिनेमा कल्पनाशक्तीला आवाहन करत नाही असं नव्हे. त्याची पद्धत निराळी असते. पडद्यावर एक चित्र दिसत असताना त्याच्या माध्यमातून प्रेक्षकाच्या डोक्यात निराळे संदर्भ जागवणं, दृश्याचं एका शक्तिशाली प्रतीकात रूपांतर करणं, ते करताना पृष्ठभागावरची गोष्ट आणि खोलवरचे अर्थ या दोन्हीमध्ये सुसंगती राखणं, चौकटीतल्या घटकांच्या नुसत्या रचनेतून डोक्यातले लागेबांधे जागे करणं - हे स्पून फिडिंग आहे? सॉरी. सिनेमाची बदनामी करायची फॅशन आहे आपल्याकडे, इतकाच त्याचा अर्थ. वाईट सिनेमे खंडीभर असतात. पण म्हणून माध्यमालाच शिव्या द्यायच्या? सॉरी अगेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

अजून एक गोष्ट म्हणजे व्यावहारिकता. लेखक जेंव्हा लिहीतो तेंव्हा शब्द खर्च करतो...पण ते प्रत्यक्षात आणताना बर्याच गोष्टींंचं भान पाळून, वेळेचं बंधन पाळून, अन्य शेकडो लोकांच्या सहकार्याने चित्रपट बनवायचा असतो. बहुदा म्हणूनच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं होत असावं (इथे चित्रपट म्हणजे लिहिलेलं वास्तवात आणणं अशा अर्थाने "प्रत्यक्ष" वापर्लं आहे, आणि लेखन म्हणजे लेखकाने त्याची वर्णनप्रतिभा वापरून प्रत्येक वाचकाला त्याला भावेल अशी प्रतिमा रचायला मदत केली असते अथवा उद्युक्त केलं असतं अथवा वाचक स्वतःच उद्युक्त होतो...छे जाऊ दे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

सॉरीची गरज नाही. माझं मत बदलणार नाही. कारण पुस्तके Vs सिनेमाला शिव्या द्यायच्या अन मंद समजण्याच्या बालपणाच्या वातावरणातच मी वाढले आहे. अन तो पगडा अजूनही आहे, कदाचित राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

फक्त स्पून फीडींग करणारे चित्रपट पाहिले असतील तर असं मत होण्याची शक्यता आहे.

लुई्स बुन्युएल या दिग्दर्शकाबद्दल असं म्हणतात, चित्रपट हे माध्यम त्याच्या वेळेस नसतं तर तो काहीच करू शकला नसता. लेखन हा त्याचा प्रांतच नव्हता. "कादंबरीच चित्रपटांपेक्षा सरस" म्हटल्यावर त्याचे चित्रपट लेखनात कसे वाटतील याचा विचार केला. मला ते काही झेपलं नाही. 'आंखो देखी'मधला शेवटचा प्रसंग पुस्तकात वाचताना किती थिटा वाटेल!

न समजणाऱ्या भाषांमधल्या कादंबऱ्यांच्या भाषांतरापेक्षा चित्रपटाचं, सबटायटल्सचं भाषांतर करणं सोपं; मुळात कमी शब्द वापरून बरंच काही दाखवता येतं. कादंबऱ्यांमधला शब्दबंबाळपणाच (सगळ्या कादंबऱ्यांमध्ये असतो असा दावा नाही.) आवडत असेल तर मग चित्रपट हे माध्यमच कितपत आवडत असेल याबद्दल मला शंका आहे.

व्यक्तिगत पातळीवर - मला कादंबऱ्या वाचायचाच कंटाळा येतो. चित्रपटात जी गोष्ट दोन तासांत सांगून होते त्यासाठी कादंबरी वाचण्यासाठी चित्रपटाच्या पाच-सात पट वेळ घालवणं मला परवडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डॉ झिवागो खरोखरच सुंदर चित्रपट आहे.
चित्रीकरण, कलाकारांचा अभिनय आणि चित्रपट कथा ... सारच उच्चं दर्जाचं
चित्रपट मोठा असला , तरी अजिबात कंटाळवाणा वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पास्तरनाकची ही कादंबरी रशियन क्रांतीच्या आधीचा, मधला आणि क्रांतीनंतरचा कालखंड कविमनाच्या डॉ.युरी झिवागोच्या नजरेतून दाखवते. अर्थातच कादंबरीतले सामाजिक-राजकिय संदर्भांना गहिरा अर्थ आहे.तत्कालीन रशिया आणि बोल्शेविक चळवळीचं चित्रण ह्यात आहे. मुळ कादंबरी मी वाचली नाही पण मला चित्रपट बराच मोठा आणि कंटाळवाणा वाटला...विशेषतः ओमार शरीफ अजिबातच पटला नाही. चित्रपट मात्र प्रणयगहिरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

चित्रपट मोठा आहे ... काहीं लोकांना कंटाळवाणा वाटु शकतो .

पण ओमर शेरीफ का नाही रुचला ?
मी आधी मॅकेनाज गोल्ड पाहिला होता .. त्यातला ओमर शेरीफ अगदीच वेगळा होता . आणि झिवागो मधला खूपच वेगळा .
म्हणजे दोन धॄवावरच्या दोन व्यक्तीरेखा . पण दोन्हीत तो मिसफीट नाही वाटला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

ओमर शेरीफचा "आली इब्नल्ख़रीश" लॉरेन्स ऑफ अरेबिया मध्येही एक नंबर वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो हो. ओमर शेरीफ ला रशियन माणसाच्या भुमिकेत घेणे म्हणजे डेव्हिड लीन चे मोठे धाडसच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचा अभिनय मला काही फारसा रूचला नाही.

अवांतरः- लॉरेन्स मध्ये डेव्हिड लीनने आधि म्हणे दिलीपकुमारला विचारला होतं, पण त्याने पटकथा वाचून ओ टूल ची भुमिका मागितली आणि नंतर ओमर त्या भुमिकेसाठी निवडला गेला.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

दिलीप कुमार ला सबुद्धी दिल्या बद्दल आकाशातल्या बापाचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच क्रेडीट का दुसर्याला देता? लीनसारख्या दिग्दर्शकाने ओमार शरीफ (जो नंतर ह्याच भुमिकेसाठी निवडला गेला) समोर असतानासुद्धा दिलीपकुमारला आधी बोलावलं हे दिकुचं क्रेडीट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

पण त्याने पटकथा वाचून ओ टूल ची भुमिका मागितली

लोल! दिलीपकुमार लॉरेन्सच्या भूमिकेत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.