सहा शब्दांच्या कथा

सहा शब्दांच्या कथा :

-------
१.

फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

२.

हजार व्हायोलिन्स एका स्वरात रडल्या तेंव्हा.

३.

भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

४.

म्हातारी नंतर म्हातार्‍याची आबाळ होणारच होती.

आता संबंध संपलेत, पण जीव तुटतोचना.

--------

लेखक : अनंत ढवळे

-----

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखज हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

अशीच एक कथा मी पूर्वी कुठेतरी वाचलेली अाहे:

For Sale: Baby shoes (never worn).
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

तुम्ही दिलेली कथा हेमिंग्वेचीच आहे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकल्प अतिशय आवडला.

>>फोटोची चौकट रिकामी पडलीए अनेक वर्षांपासून.

जीए कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर काढलेल्या कुठल्यातरी एका पुस्तकाच्या सुरवातीला नुसतीच एक रिकामी चौकट होती. ते आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'कुसुमगुंजा' हे ते पुस्तक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकल्प छानच आहे.

'नॉमन रॉकवेल' ह्या प्रसिद्ध अमेरिकी चित्रकाराने काढलेली अनेक चित्रे किंवा आपल्याकडचे 'शि. द. फडणीस' याञ्ची चित्रे अश्याच प्रकारची आहेत. चित्र पाहताच त्या चित्रात पकडलेला क्षण हा त्यापूर्वीचे बरेच काही आणि त्यानन्तरचे थोडे काही साङ्गून जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादं वाक्य त्याच्या पुढचा आणि मागचा प्रसंग सांगून जाणं यावरुन आठवलं. सहा शब्दांचीही गरज नाही. :

- लायसन बगू.

- पॉझिटिव्ह फॉर मॅलिग्नन्सी.

- ड्राय डे

- पेट्रोल संपले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यातल्या त्यात ३री आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'काका, चॉकलेट?' टर्रकन.. कापड फाटल्याचा आवाज.
नोकरी, लग्न, मुलगा... शेंदूर, अंगारा, नवस
बिजवराच्या गळ्यात हार... सहा पोरगेल्याशा बहिणी
पहाटे पाच वाजताच हायवेवरील गच्च आवाज
तिच्या फोटोतलं माझंच फिकट होत जाणारं प्रतिबिंब
इत्यादि..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

चिकणी-हॅंडसम. शुभमंगल सावधान. कटकटी-चिडका.
पसारा आवरला. आता कसं रिकामं, रिकामं.
आंघोळ ब्रेकफास्ट ट्रेन ऑफिस काम जेवण काम ट्रेन टीव्ही फेसबुक इमेल जेवण टीव्ही झोप (दीर्घकथा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जी, तुमच्या दीर्घकथेचा शेवट लैच नास्तिक वाटतो.

अनंतराव, प्रकल्प फार छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जी, तुमच्या दीर्घकथेचा शेवट लैच नास्तिक वाटतो.

__/\__ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

त्याचा आत्मघातकी हळवेपणा अजून पटत नाही.

मग तिनं ठरवलं - हिरमुसण्यापेक्षा अपेक्षाच नको.

हे दाखवायचे फोटो आता कशाला ठेवायचे?

विश्वासघाताला गैरसमज ठरवून फसणार्‍याला कोण वाचवणार?

दोघेही एकमेकांकरिता मुक्त व्हायला पंचेचाळिशी उगवली.

चष्म्याचं भिंग चिकटपट्टीनंच दुरुस्त करायचं, पुन्हा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चष्म्याचं भिंग चिकटपट्टीनंच दुरुस्त करायचं, पुन्हा..

हे समजले नाही. असो यावरुन हॅरीची जादुई दुनिया आठवली,

रिपेरो, इपिस्की, इरेक्टो, चार्मिंग लाईफ इन्डीड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असो यावरुन हॅरीची जादुई दुनिया आठवली,

रिपेरो, इपिस्की, इरेक्टो, चार्मिंग लाईफ इन्डीड!

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

रोचक प्रकार आहे.
मूळ लेख व प्रतिसाद मधल्या सर्व कथा आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा? मी? आणि सहा शब्दांत? हाहाहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सहा शब्दांची भिकार कथा' असा धागा अजून आलेला नाहीये! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म्म्म्...

'कथा? मी?? सहा शब्दांत??? भिकार!!!!' असाही एक पाठभेद विचारात घेण्यालायक आहे, असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक प्रयत्न ..
मात्र वर दिलेल्या हेमिंग्वेच्या

For Sale: Baby shoes (never worn).

दर्ज्याची मुळ धाग्यातली किंवा प्रतिसादांतील एकही वाटली नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आहो चालायचंच! हेमिंगेव्या दर्ज्याची असती एखाददुसरी तर हेमिंग्वेला फाडून नस्ता का खाल्ला Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

' ये क्या कर रहे हो ? ठ्ठो !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

फॉर्मॅट आवडला.. मर्यादा असली तरी त्याचवेळी क्रिएटिव्हिटीला एक आधार / आउटलाईनही मिळते (काहीसं छंदोबद्ध रचनेसारखं)

नववर्षाचा मूड पकडणारी ही रचना कशी वाटते..?

"घुट घुट घुट घुट घुट ब्ळ्यॉक्क्क ..."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकखरेदेसाठी रोजरोज उपाशी राहणं परवडणारं नव्हतं.
.
झिजलेल्या चपला दडवत व्याह्यांकडे टाकलेले आशाळभूत स्मित.
.
अजगराच्या मिठीत गळाठलेले मृतप्राय हरीण
.
स्फोटानंतरः- हो, माझाच तर हात तो!
.
नवर्‍यासोबत असल्यानं तिनं बाजूलाच असूनही त्याला ओळखही दाखवली नाही.
.
जाहिरसत्कार होतानाही त्याला खर्‍या कर्त्याची आठवण पुसता आली नाही.
.
गर्दित खेटल्यावर आपल्याच मुलीचा दिसलेला तो चेहरा.
.
आता तो पोलिसांपासून दूर, निवांत होता.
.
अंत्यविधी(दहनामुळं) संपल्यानं पुरावा नष्ट झाला होता.
.
कवळी बसवतानाही आठवत असलेला रम्य मधुचंद्र.
.
तंत्रज्ञानामुळं का असेना तो बाप बनलाच.
.
शेवटी एकदाचा पाळणा हलला.
.
ओकारीतून सांडलेले घोट नि हास्याचा फवारा.
.
पुन्हा खालमानेनं तो उकिरड्यातलं खरकटं अन्न शोधू लागला.
.
आज पुन्हा डझनभर दारुडे तिच्यावर चढणार होते.
.
नलिनी त्याच्या बाहूंत असतानाच मनिषाचाही आलेला कॉल.
.
रसाळ ट्याहॅच्याऐवजी निष्प्राण बाहेर आलेला मृतदेह.
.
जबरदस्तीनं सुन्नत होउनही विठूचच नाव ओठांवर.
.
तिच्या अगतिकतेवर हसत त्यानं गोलाई हाताळली.
.
लेकराचय जीवाकडे पहात तिनं मांड्या फाकवल्या.
.
ऐसा मत समझ पीके बोल रहा हूं
.
पेढा भरवताना त्यानं सारं श्रेय पालकांनाच दिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबाचा उल्लेख एक श्रेष्ठ कथकार असा करावा असा प्रस्ताव मांडतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता काही चितपरिचित, इतिहासप्रसिद्ध सूक्ष्मकथा:-
you too Brutus?
.
'Able was I ere I saw Elba'
.
काका मला वाचवा.
.
देवा त्यांना माफ कर.
.
ह्या संन्याशाच्या पोरांना वाळीतच टाका.
.
आम्ही वडीलमस्तकी असता चिंता कोण गोष्टीची?
.

आता उर्वरित सामान्य वाक्ये :-

मै तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हू
.
म्हणून सांगते शेखर मला विसरून जा. (courtsey :- "माझे पौष्टीक जीवन" -- पु ल )
.
शत्रूच्या ह्या सुवर्णमोहरा तुझ्याकडे कशा?
.
रश्मी तर म्हणाली तू तिच्याकडे काल झोपायला नव्हतीस.
.
मुलासकट त्याने तिला स्वीकारले होते.
.
इन्स्पेक्टर सायेब तो खरच त्यो याक्सिडेंट व्हता.
.
काय? नापास झाला म्हणून आत्महत्या??!!
.
मुलाचे मामा मुलाला आणा
.
शरीराने नाही पण मनाने मी त्याचीच झालिये.
.
आजन्म अविवाहित राहण्याची हा शंतनुपुत्र प्रतिज्ञा करीत आहे.
.
हे दशरथा, तुलाही तीव्र पुत्रशोक घडेल.
.
केशवा, माझ्या आप्तांस मी कसा मारु?
.
तू केलेल्या तपोभंगाबद्दल हा शाप, मेनके.
.
तुझं गुपित हे ; गुपित ठेवण्या॑त माझा काय फायदा?
.
अरेरे आजपासून तिसर्‍याही मुलीचाच बाप म्हणवून घ्यावं लागणार.

--मनोबा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रश्मी तर म्हणाली तू तिच्याकडे काल झोपायला नव्हतीस.

ROFL हाण्ण तेजायला.

अरेरे आजपासून तिसर्‍याही मुलीचाच बाप म्हणवून घ्यावं लागणार.

Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

गर्दित खेटल्यावर आपल्याच मुलीचा दिसलेला तो चेहरा.

च-र-च-री-त!!! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

प्रतिसादातल्या काही कथा चांगल्या आहेत :

चष्म्याचं भिंग चिकटपट्टीनंच दुरुस्त करायचं, पुन्हा.. ( धनंजय) -(कथेतले वयस्कर पात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे चष्मा बद्लू शकत नाही असा मी अर्थ घेतला )

चिकणी-हॅंडसम. शुभमंगल सावधान. कटकटी-चिडका. ( घासकडवी ) -(बर्‍याच घटना आल्यात)

बाकी विडंबनाच्या जीर्ण जालीय अतिसाराची ( ग्रहणी म्ह्णा हवातर) कल्पना असल्याने अनेकाना वेग आवरणार नाही याची कल्पना होतीच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी विडंबनाच्या जीर्ण जालीय अतिसाराची ( ग्रहणी म्ह्णा हवातर) कल्पना असल्याने अनेकाना वेग आवरणार नाही याची कल्पना होतीच

तुम्ही कोणाचं नाव घेतलं नाहीयेत, पण अनेकांना वेग आवरणार नाही वगैरे कल्पना होतीच म्हणता आहात. या धाग्यावर सर्वात कॅज्युअल / विनोदी वाटू शकेल अश्या प्रतिक्रिया किमान मी नक्कीच दिल्या आहेत. त्या करुण, धक्कादायक, सिरियस नसतीलही. पण यात विडंबन, चेष्टा,खिल्ली अशा आशयाचे प्रतिसाद नाहीत अशी माझी समजूत आहे, कारण धाग्याचा उद्देश आणि विषय मला आवडला होता आणि त्यामुळेच उत्स्फूर्त असे प्रतिसाद इथे लिहीले.

माझं नाव घेतलेलं नसताना मी उत्तर का देतोय असं कोणी म्हणू शकेल, पण त्या वाक्यातून जे जाणवलं त्यावर मी एक जनरल प्रतिक्रिया देतो आहे.

बाकी कोणाचे अंतर्गत उद्देश मला माहीत नाही, पण वाचक म्हणून या पूर्ण धाग्यावर विडंबनाचे जुलाब, अतिसार, ग्रहणी वगैरे म्हणावेत अशा दर्जाचे प्रतिसाद मला दिसले नाहीत. अर्थात माझ्या नजरेचाही तो दोष असेल. पण तुमच्या या प्रतिसादाचा व्यत्यास करु जाता केवळ गंभीर कथासूत्रांना अन तत्सम प्रतिसादांना काय जालीय बद्धकोष्ठ म्हणावे का?

आवेग सर्वांनाच असतो.. एक मत देण्याचा.. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि ते दोघं सुखासमाधानाने नांदू लागले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

(१) वाळूवरील पावलांचे ठसे नाहीसे होत होते.

(२) मग निर्धाराने तिने पाऊल उंबरठ्यावर ठेवले

(३) इतिश्री झालीय दु:खाची ...आणि जगण्याची सुरूवात

(पण या सहा शब्दांच्या समुहातून एकापेक्षा जास्तं कथानके मिळू शकतील असे वाटते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......

आंतरजालावर अंगात हलकटपणा नसलेल्या माणसाचा शोध...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

कथा लिहायला सांगीतलेय, विनोद नाही Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तिच्या फोटोतलं माझंच फिकट होत जाणारं प्रतिबिंब ( संजोप राव) - दुरावत चाललेल्या संबंधाची कथा
मग निर्धाराने तिने पाऊल उंबरठ्यावर ठेवले ( मनीषा) - एक स्त्री आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करते आहे, आपला प्रतिकूल वर्तमान / गतआयुष्य निर्धारपूर्वक मागे सारून.

आणि ते दोघं सुखासमाधानाने नांदू लागले. ( मुक्त सुनीत ) - हॅप्पी एंडींग !

एक नवा वाचनानुभव मिळतो आहे !

पोस्ट स्क्रीप्ट - आधी चा प्र तिसाद केवळ मला विडंबने अपेक्षित होती एवढेच सुचवण्यासाठी होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम धागा.
सन्जोपरावांच्या कथा आवडल्या कारण काहीशी अस्वस्थता वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाडक्या, लाडू, लाडुकल्या 'प्र' WinkWink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

छानच. आमचीही एकः
"दार तोडण्यापूर्वी इन्स्पेक्टरने कोयंड्यात अडकवलेला चमचा काढला".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आशीर्वादाची वाट कशाला बघायची, आता म्हातारपणी?"

किंवा किंचित विनोदी गूढकथा हवी असेल तर,

'ढवळ्या'शेजारी बांधला 'पिवळ्या', वाण नाही पण...."
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्भयापटावर बंदी घातली. आमची संस्कृती वाचली ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

माझी आवडती सहा-शब्दी कथा: (मार्गारेट अ‍ॅटवुड यांची)
Longed for him. Got him. Shit.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

She Came, She Saw, She Conquered.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आज फेसबुकवर हा ट्रेंड सुरू आहे
#mysixwordsstory
#sixwordstory

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुभ मंगल सावधान ..
शांती करुन उपयोग काय झाला?
स्वतःपासून पळता आले असते तर वाचला असता
पॅरॅलिसिस बाय अ‍ॅनॅलिसिस
१०० लाख रुपये आत्ताच्या आत्ता नाहीतर ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

आणि विज्ञानानंद जीना चढू लागले - ही कथा चांगली होती की. का काढल्यात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपलं वय काय ? आपण करतोय काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

भारीचेय हा सगळा प्रकार, मस्त, आवडला ब्वा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी