सायकलींचे मौन

'मी' यांच्या सायकलींच्या फोटो वरून 'स्तब्ध उभ्या त्या सायकली' ही ओळ सुचली होती...आणि पुढे या प्रेरणेच्या लाटेवर स्वार होवून ही कविता करण्यात (बरं....पाडण्यात) आली आहे.
'मी' यांचा सायकलींचा फोटो इथे देत आहे. तो इथे देण्यावर आक्षेप असल्यास तो काढून टाकावा.

कवितेचं शीर्षकः " सायकलींचे मौन"

प्रदूषण झाले आहे फार
लोक म्हणती हे वारंवार

स्कूटर, गाडया धूर ओकती
जाता येता मुले खोकती

बारा माहिने चर्चा झडल्या
एकमताच्या अभावी अडल्या

प्रदूषणाचा प्रभाव टळेना
उपाय कोणता काही कळेना

त्यावेळी हे पाहिले कोणी
तेव्हा थांबली सर्वच गाणी..

स्थितप्रज्ञासम मौन अकाली
स्तब्ध उभ्या त्या सायकली !

-ऋता

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

वा! छायाचित्र स्पर्धा आणि 'तो' अदितीचा धागाही असे दोन्ही वसूल झाले Smile

बाकी आज पुण्यात बस डे नावाचा बोभाटा चालु असताना ही कविता समयोचितही म्हणता यावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(पुण्यात लहानाचा मोठा झाल्याकारणाने) आयुष्यात आजवर अनेक सायकलींशी संबंध* आला, परंतु आजतागायत एकाही सायकलीस बोलताना पाहिलेले नाही. तेव्हा, 'सायकली बोलू शकत नाहीत' असे काहीशा खात्रीनिशी सांगू शकतो.

दुबळ्याच्या अहिंसेप्रमाणेच, मुक्याच्या मौनासही या जगात काहीही महत्त्व नसते, या ठळक बाबीकडे येथे सविनय लक्ष वेधू इच्छितो.

त्याऐवजी, 'सायकली बोलू लागल्या तर' असा काही शाळाछाप निबंध पाडला असतात, तर कदाचित तो अधिक वाचनीय होऊ शकला असता, असे नम्रपणे सुचवू इच्छितो.

पर्यायाने, कविताच जर पाडायची होती, तर (इतक्या सायकली एकाच वेळी एका रांगेत पाहून) 'मुकी बिचारी, कुणी हाका' असे काही(बाही) शीर्षक आणि/किंवा कविताविषय कदाचित अधिक उचित होऊ शकला असता, असे आता (पश्चात्बुद्ध्या) वाटते.

असो. पुढील पाडापाडीस**** शुभेच्छा.
===
* कधी बुडाखाली, तर कधी बुडास येऊन धडकल्याने. कधी मालकीच्या, तर कधी भाड्याच्या**.

** आता स्मृती धूसर झाली आहे, परंतु बहुधा दहा पैसे तास. फार फार तर चार आणे (अधिकृत भाषेत: पंचवीस नवे पैसे) तास असेल. हो, त्या काळात (म्हणजे आम्ही शाळेत असताना) खूप स्वस्ताई होती. (गेले ते दिवस!***)

*** 'गेले ते दिवस' विरुद्ध 'दिवस गेले': शब्दरचना थोडीशीच बदलल्याने अर्थामध्ये किती प्रचंड उलथापालथ होते, नाही? कोण म्हणतो मराठी भाषा दुबळी आहे म्हणून?

**** पाडापाडीवरून आठवले. चित्रात इतक्या सायकली छानपैकी एका रांगेत मांडलेल्या दाखवल्या आहेत. यातील कोणत्याही टोकाच्या एकाच सायकलीस योग्य दिशेने किंचित धक्का देऊन जर का ती पाडली, तर किती छान डॉमिनो इफेक्ट होऊन बहार येईल, नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"त्याऐवजी, 'सायकली बोलू लागल्या तर' असा काही शाळाछाप निबंध पाडला असतात, तर कदाचित तो अधिक वाचनीय होऊ शकला असता, असे नम्रपणे सुचवू इच्छितो."
निबंध पाडणं कविता पाडण्याच्या तुलनेनं फारच अवघड काम आहे.
"पर्यायाने, कविताच जर पाडायची होती, तर (इतक्या सायकली एकाच वेळी एका रांगेत पाहून) 'मुकी बिचारी, कुणी हाका' असे काही(बाही) शीर्षक आणि/किंवा कविताविषय कदाचित अधिक उचित होऊ शकला असता, असे आता (पश्चात्बुद्ध्या) वाटते."
छान आहे पर्यायी कल्पना.
"असो. पुढील पाडापाडीस**** शुभेच्छा."
धन्यवाद.पुढील पाडापाडीची* तयारी करते.
(*तुमच्या मर्मिक प्रतिक्रिया वाचून त्यावर काही कविता पाडावी असं मनात घोळतय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निबंध पाडणं कविता पाडण्याच्या तुलनेनं फारच अवघड काम आहे.

पूर्ण असहमत, उदा. संत तुकाराम या विषयावर एका मुलाला ५ वाक्ये बोलावयास सांगितली असता तो बोलला ते असे:

"संत तुकाराम हे एक संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. ते एक फार मोठे संत होते. लोक त्यांना संत तुकाराम असे म्हणत. आणि अशाप्रकारे हे संत तुकाराम मला खूप आवडतात."

यातला साधेपणा कवितेत येणे शक्यच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा मस्त कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला इथे भेटा

'सायकलींचे मौन' याऐवजी 'मौन' असे शीर्षक मला आवडले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायकलींचे हँडल हे शिंगांसारखे दिसते म्हणून 'मौन मोहक शिंग' असे शीर्षक आवडले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादावरून वाटतं की तुम्ही या फोटोवरून एक कविता सहज पाडू शकाल.शीर्षक तर पाडलं आहेच.(हे शीर्षक छान आहे पण या कवितेला एवढं शोभेल असं मला वाटत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी सायकलींचा उल्लेख शीर्षकात कारण्यामागे उत्सुकता वाढवणे हा हेतू होता. नुसतं 'मौन' असं शीर्षक म्हणजे काहीतरी वेगळ्याच अपेक्षा वाचणार्याच्या मनात निर्माण झाल्या असत्या असं मला वाटतं. प्रत्येकाचं मत अर्थातच वेगळं असू शकतं.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या सायकलींच्या माना झुकल्यामुळे दुःखी वाटतात. त्यामुळे हे मौन नसून अबोला असावा.

फोटोस्पर्धेतल्या फोटोवर कविता तयार करण्याची कल्पना मस्तच. अजून असे प्रयोग व्हायला हवेत.

राजेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोस्पर्धेतल्या फोटोवर कविता तयार करण्याची कल्पना मस्तच. अजून असे प्रयोग व्हायला हवेत.

फारा वर्षांपूर्वी (म्हणजे आमच्या बालपणी) 'चांदोबा' नामक मासिकामध्ये 'फोटो जोडनावे चढाओढ' येत असे, असे अंधुकसे आठवते.

(कोणास ठाऊक, कदाचित अजूनही येत असेल. आम्ही 'चांदोबा' वाचणे फार पूर्वी सोडून दिले, त्यामुळे कल्पना नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा वाचायचाय ? ही घ्या लिंक.

http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm

जुने अंकही वाचू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा फोटो इतका प्रभावी वाटतोय की त्या सायकलींकडे बघून त्या काही भावना व्यक्त करत आहेत असं जाणवतय. तुमच्याही प्रतिसादातून तुम्हालाही तसं जाणवलं असल्याचं वाटलं. स्पर्धेत काही आशी छायाचित्र पाहायला मिळाली तर कविता नक्कीच "होतील"(केल्या जातील).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पावसात निमूट भिजणार्‍या ट्रेनहून दु:खी काही असू शकेल का - अशा आशयाची कविता आठवली ( बहुतेक नेरूदा)...असो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0