फॉर्म आणि क्लास

'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट' असे बहुतेक वेळा क्रिकेटच्या संदर्भात म्हटले जाते. 'आता आपण निवृत्त झालेले बरे, आपला गावस्कर होऊ देऊ नका....' असे सल्ले मिळालेला आणि मुष्किलीने संघात पुन्हा जागा मिळालेला एखादा डावखुरा फलंदाज खेळायला येतो, त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याची चूक गोलंदाज करतो आणि ऑफ साईडच्या सहा क्षेत्ररक्षकांना जागेवरुन हलण्याचीही उसंत मिळत नाही. एखाद्या बाणासारखा चेंडू सीमारेषेबाहेर जातो. "ऑन दी ऑफ साईड, फर्स्ट देअर इज गॉड, अ‍ॅन्ड देन देअर इज ही' हे त्याच्याच तोलामोलाच्या भिंतीसारख्या मजबूत खेळाडूने त्याच्याविषयी म्हटलेले वाक्य आठवते. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट...'
'यांच्या कथा म्हणजे मराठी साहित्यातला एक मानदंड आहे, पण आता असल्या दृष्टांत कथा वगैरे लिहिण्यापेक्षा त्यांनी लिहिणे थांबवावे..' असा अनाहूत सल्ला कुणी समीक्षक देतो. त्या लेखकाने नाहीतरी लेखन थांबवलेलेच असते. 'हे कोण बोलले बोला..' हे ऐकायलाही तो लेखक थांबत नाही. 'तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, मी तर चाललो' असे म्हणून तो मावळतीच्या दिशेने निघून जातो. आणि मग त्याची पत्रे, त्याचे एखादे अरभाट पुस्तक प्रसिद्ध होते आणि वाचक अवाक होऊन बघत राहतात. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट....'
जाडजूड मद्राशी बांधा, सदोष हिंदी उच्चार, कामाची आणि सहकलाकारांची सरधोपट निवड या सगळ्यासह ती लोकप्रियता मिळवते. काही ठिकाणी रसिकांची वाहवाही मिळवते. वयानुसार आणि शिरस्त्याप्रमाणे वादग्रस्त लग्न करुन पडद्याआड निघून जाते. 'या वयातही तिने स्वतःला कसे 'मेन्टेन' केले आहे' यासारख्या देवानंदी पेज थ्री बातम्यांव्यतिरिक्त तिची काही आठवण शिल्लक राहात नाही. पंधरा वर्षे उलटतात. अनपेक्षित रीत्या पडदा किलकिला करुन ती बाहेर डोकावते आणि तिच्या तेजाने आसमान उजळून निघते. तिच्या देहबोलीने काळ थबकल्यासारखा होतो. तिच्या अस्तित्वातली 'ग्रेस' पडदा भरुन उरते. निर्बुद्ध हाणामारी आणि उथळ करमणूक हेच आता आपल्याला बघत राहावे लागणार असे वाटत असतानाच एक वसूल परफॉर्मन्स बघायला मिळतो. मन तृप्तीने भरुन जाते. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट...'
चुकवू नका, रसिकहो, चुकवू नका. 'फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट......'

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

सहमत, अजिबात चुकवू नका. कापरा आवाज, पन्नाशीतला बांधा आणि बोलके डोळे.... सगळे सगळे कसे चोख वापरून घेतले आहे. तृप्त व्हायला होते, हेच खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काही प्रसंगांमधे उगाच टाकलेला ड्रामा वगळता चित्रपट आवडला. श्रीदेवी आवडलीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संजोप्या, कुठल्या चित्रपटाविषयी बोलतो आहेस ते तरी सांग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गौरी शिंदे आणि श्रीदेवीची एकत्र मुलाखत बघून खरंतर चित्रपट बघू नये असं मत होत होतं. पण त्यानंतर सेन्सॉरचं सर्टीफिकेट वाचणारं ट्रेलर पाहिलं आणि उत्सुकता निश्चितच चाळवली. आता तर निश्चितच बघेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रावांबद्दल आदर बाळगूनही हे लिहिण्याचे धाडस करतोय.
'इंग्लिश विंग्लिश' ह्या चित्रपटाबद्दल आणि त्यातल्या श्रीदेवीच्या अभिनयाबद्दल बर्‍याच जणांची वाहवा ऐकली आणि उत्सुकतेने बघितलाही चित्रपट.
एवढे वाहवा करावे असे मला तरी काही सापडले नाही. सर्व साधारण विषय, नीटनेटकी (पण सरधोपट) हाताळणी, बरा (थोडा नाटकीच) अभिनय - बाकी काहीच विशेष वाटले नाही.
आणि रावांसारख्या चोखंदळ रसिकाने ह्या चित्रपटाला 'दादा, जी. ए.' ह्यांच्या रांगेत बसवावे ह्याचे मात्र आश्चर्य वाटून गेले - पण मग तेच वाक्य स्व्तःला समजावले ''फॉर्म इज टेम्पररी, बट क्लास इज पर्मनन्ट...'' Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तर 'शाब्दिक टीज़र' चे चाङ्गले उदाहरण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येकाची 'क्लास'ची कल्पना वेगळी असते वेगवेगळ्या लोकांसाठी हेच खरं!
अन्यथा दादा आणि जी ए या क्लासमध्ये 'ती'ची गणना व्हावी हे कसं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील लिखाण वाचून आत्ताच 'इंग्लिश विंग्लिश' जालावर सापडला आणि पाहिला.

सिनेमा चांगला आहे पण इतकेच असे वाटले. superlatives ची आवश्यकता नाही असे वाटले. अशा प्रकारच्या feel good चित्रपटांमध्ये - उदा. लगान - गोष्ट काय वळणे घेत जाणारा आणि कोठे संपणार हे चाणाक्ष प्रेक्षकांना आधीच कळते. येथेहि तेच झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रपट पाहिलेला नाहि त्यामुळे पास!
मात्र ज्यांच्याशी तुलना केली आहे ते वाचुन चित्रपट बघणार हे मात्र नक्की

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

ह्या... श्रीदेवीचा पिक्चर ना? जाऊ द्या. आपण काय तिचे फ्यान नाही.

पाहिला तर श्रीदेवीसाठी नक्कीच पाहणार नाही. ('हलिप्लशाद' च्यापेक्षा अधिक वयाची भूमिका केली आहे का हे कुतुहल मात्र आहे). Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता आपण निवृत्त झालेले बरे, आपला गावस्कर होऊ देऊ नका.

गावस्कर विषयीचे वाक्य पटले नाही. उलट गावस्कर अगदी योग्य वेळीच रिटायर झाला असे आमचे मत आहे. फार तर, आपला कपिलदेव वा सचिन होऊ देऊ नका हे वाक्य पटले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

तुम्ही का रिटायर होताय? असा प्रश्न विचारला असता गावसकर यांचे उत्तर होते की "कधी रिटायर होताय?" असा प्रश्न ऐकायला लागण्यापेक्षा "का रिटायर होताय" असा प्रश्न ऐकायला लागणे अत्यंत सुखद आहे आणि तीच रिटायरमेंटची योग्य वेळ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोजक्या शब्दात पण नेमकं सांगण्याची शैली नेहमीप्रमाणेच आवडली. सिनेमा पाहिलेला नाही, त्यामुळे तिसऱ्या भागाबद्दल उत्सुकताच केवळ आहे, मतं काही नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांताला पाहिला.
चांगल जमून आलाय. क्रिस्प मांडणी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरावं.. श्रीदेवी ला कमबॅकसाठी याहून चांगला चित्रपट मिळणे कठिण होते. चित्रपट पूर्ण तिच्याभोवती फिरतो

(तुलना जरा जास्तच मोठ्या लोकांशी केलीये, पण आपले म्हणणे मांडायला-पोचवायला समर्पक!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!