छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ६ : पाऊस

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: पाऊस
आशा आहे की हा असा विषय आहे जो कुणालाही सहज हाताळता येईल आणि अगदी साध्यात साध्या कॅमेर्‍याने सुद्धा चित्रबद्ध करता येईल. मला असे वाटते की यात प्रचंड वाव आहे, आपल्याला अनेक कल्पक चित्रे पाहावयास मिळतील.
तेव्हा आपल्या कल्पनाशाक्तीला भरारी द्या आणि येउद्यात फोटो.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ०९ सप्टेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व १० सप्टेंबरच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

चला तर मग! "पाऊस" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - रात्र आणि सर्वसाक्षी यांनी टिपलेले विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बर्‍याच दिवसांनी आमच्याकडे गेल्या विकेण्डला पाऊस पडला.

Exposure : 1/125 sec, Aperture: 5.6, Focal Length: 55mm, Camera: Canon EOS REBEL T3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हवेतला कुंदपणा छान आलेला आहे. पावसाच्या थेंबांच्या रेषा झालेल्याही आवडल्या. तशाच हातावर आपटून उडणाऱ्या थेंबांच्याही झालेल्या आहेत, तेही मस्त.

डावीकडचा बराच भाग जास्तीचा वाटतो. मी हा फोटो डावीकडचा १५% आणि उजवीकडचा ३०% आणि खालचा सुमारे १५% कातरून बघितला. जास्त परिणामकारक वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कातरण्यावरून मलाही बराच प्रश्न पडला होता. मग अगदी घट्ट कातरलं, ते आवडलं नाही. (फोटो)

तू म्हणतो आहेस तसंही कातरलं, आता तेच बरं वाटतंय.

खरंतर 'मॉडेल'ला पावसात असं भिजवत ठेवल्यामुळे हातावर पाणी जमा होऊन थेंब पडल्यावर पाणी उडलंय ते ही फोटोत आलं. या फोटोची मला मिळालेली मूळ कल्पना इथे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुमला शहरात (झारखंड) त्या दिवशी अचानकच पाऊस भेटला. रस्त्यावरचे सगळे लोक आडोशाला जाऊन उभे राहिले. पण काही लोक तयारीनिशी आले होते - छत्री घेऊन. तर काहींची पावसात भिजायला हरकत नव्हती.

Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure: 0.008 sec (1/129);
Aperture: f/2.8; Focal Length: 6.2 mm; ISO Speed: 80

त्याच दिवशी संध्याकाळी रांचीला परतताना काचेतून पावसाच्या थेंबांव्यतिरिक्त फारसं काही दिसत नव्हतं. अशा प्रसंगी वाहनचालकांची काय कसरत होत असेल ते ध्यानात आलं.

Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure: 0.008 sec (1/128); Aperture: f/5.2; Focal Length: 18.6 mm; ISO Speed: 193

काही दिवसांनी इंफाळच्या रस्त्यावर पावसाचं दिसलेलं हे आणखी एक रूप. माणसं कुठं गेली होती सगळी? - माहिती नाही!

Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA; Exposure: 0.016 sec (1/64);
Aperture: f/2.8; Focal Length: 6.2 mm; ISO Speed: 252

अवांतरः हे ISO Speed काय प्रकरण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात सांगायचे तर 'प्रकाश ग्रहण गतीक्षमाता'. कुठलेही चित्र चांगले टिपायचे तर प्रकाशयोजना परिणामकारक होणे आवश्यक आहे. ग्रहणछिद्र (अ‍ॅपरचर) आणि ग्रहणकाल अर्थात झडपगती(शटर स्पीड) यांच्या परस्परपूरक जुळणीमुळे हे शक्य होते. या द्विमितीपलिकडचे तिसरे परिमाण म्हणजे आय एस ओ स्पीड म्हणजेच ग्रहणगती. अमूक एक मापाचे ग्रहणछिद्र आणि अमूक एक (प्रकाश)ग्रहणकाल या समिकरणात तिसरा घटक (प्रकाश)ग्रहणगतीचा. त्याच समिकरणात जशी ग्रहणगती बदलेल तसा एक घटक बदलता येतो. आय एस ओ क्रमांक जितका अधिक तितकी ग्रहणगती अधिक. म्हणजेच जेव्हा एखादे चित्र टिपताना आवश्यक परिणामासाठी तुम्हाला ग्रहणछिद्र संकुचित करायचे आहे (एफ क्रमांक चाढवायचा आहे) तर ग्रहणकाल वाढवावा लागतो (ग्रहणकाल वाढवायचा म्हणजे झडपगती कमी करायची(शटरस्पीड)). समजा त्या परिथितीत जर हव्या त्या ग्रहणछिद्रासाठी कॅमेर्‍याने झडपगती १ सेकंद दाखवली तर ती सोयीची नसते; कारण दिर्घकाल झडप उघडी राहणे म्हणजे चित्र टिपताना रचनेत, वस्तुंच्या स्थितित बदल संभाव्य, शिवाय काहीतरी मधे येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा हातात धरायचा असेल तर हलु शकतो. मग यावर तोडगा म्हणजे ग्रहणगती वाढवायची. म्हणजेच आय एस ओ आकडा वाढवायचा. समजा त्या परिस्थितीत आपला कॅमेरा एफ २२ , झड्पगती १/२ सेकंद अशी दाखवित असेल आणि आय एस ओ १०० असेल तर आय एस ओ ४०० वर नेल्यास कॅमेरा एफ २२ ग्रहणछिद्रासाठी १/२ सेकंदा ऐवजी १/८ सेकंद प्रकाशग्रहणकालाची मागणी करेल आणि आपल्याला चित्र टिपणे अधिक सोयिस्कर होईल.

समजा आपण अभयरण्यार हरीणांचा कळप टिपताय, वर मळभ आहे, प्रकाश कमी आहे आणि जर ग्रहणकाल अधिक ठेवला तर हरणे विचलीत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी ग्रहणकाल घटविण्यासाठी म्हणजेच झडपगती वाढविण्यासाठी ग्रहणगती (आय एस ओ) वाढविणे हा पर्याय उपलब्ध्य आहे. मात्र ग्रहणगती जितकी कमी तितका प्रतिमेचा दर्जा अधिक हे लक्षात ठेवावे.. आय एस ओ १०० वर घेतलेली प्रतिमा जर ८ इंच उभी १० इंच आडवी (३०० बिंदु प्रती चौरस इंच छपाई) उत्तम येत असेल तर आय एस ओ ४०० वर तिच प्रतिमा त्याच आकारात त्याच छपाईला कमी प्रतिची दिसेल, कदाचित अनिष्ट चित्रकण (नॉईज) दिसु शकतात. थोडक्यात जर आय एस ओ गती वाडविणे हे क्रमप्राप्तच असेल आणि प्रतिमा लहान आकारातच आणि केवळ संगणक पटलावर पाहण्याइतकी संप्रुक्त चालणार असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

कॅमेरा जितका चांगला, त्याचा संवेदक (सेन्सर) जितका उच्च दर्जाचा तितकी त्या कॅमेर्‍याची ग्रहणगती हाताळणी अधिक चांगली. मात्र साधारणतः जिथे आवश्यक तिथे आय एस ओ ४०० व सामान्यतः २०० पर्यंत ग्रहणगती वापरायला हरकत नाही. आधुनिक व महागड्या कॅमेर्‍यांमध्ये ग्रहणगती हातालणी उत्कृष्ट दर्जाची असते व अधिक आय एस ओ वरही दर्जेदार पर्तिमा टिपणे शक्य होते.

हे माझे जुजबी ज्ञान झाले, तज्ञांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! केवळ तांत्रिक माहिती न देता (हरणांच्या कळापाचे) उदाहरण दिले आहे त्यामुळे समजायला अधिक मदत होते.
आभार!
थोडी भर अशी घालतो की माझे खाली दिलेले चित्र बघा *("तडतड पाऊस")
त्यात मी आयएस ओ केवळ १०० ठेवल होता. कारण त्यावेळी पाऊस अक्षरश बदाबद कोसळत होता. जास्त आयएसोला केवळ धुरकट चित्र दिसले असते, तर अजून कमी आयएसओल बराच नॉईज आला होता.
हेच चित्र अधिक चांगले काढण्यासाठी खरंतर अ‍ॅपार्चर-फोकल लेन्थ चा वापर आदर्श ठरला असता. मात्र माझा पॉईंट अ‍ॅन्ड शुट पद्धतीचा कॅमेरा असल्याने मी केवळ ISOच नियंत्रित करू शकतो त्यामुळे इतक्या कमी ISO ची पळवाट शोधली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आभार. उपयोगी माहिती आहे. आता कॅमेरा वापरताना काही नवे प्रयोग करुन बघायची संधी आहे Smile माझ्या कॅमे-यात हे कसे सेट करायचे, ते करता येते का, कमी जास्त केल्याने काय परिणाम होतो - अशा प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतील मला आधी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर दिलेल्या फोटोंमधे ISO तुम्ही बदललेलं नसेल तर ते सध्या 'ऑटो' मोडवर असावं. प्रत्येक फोटोसाठी ISO वेगवेगळं दिसत आहे. दिवसाउजेडी फोटो काढताना फार फरक पडत नाही, पण संधिकालातले फोटो काढताना ऑटो-आयएसओ अतिहुशारी दाखवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हं! ISO काय आहे हे मला माहिती नाही म्हणजे ते सध्या 'ऑटो' मोडवर असणार! शोधते जरा वेळ काढून!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/400 sec
Aperture 4.5
Focal Length 14mm
Flash Used false

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही दिवसापूर्वी केलेल्या "बेडसे लेणी" प्रवासादरम्यान माझा एका मित्राचे चित्र टिपले होते मी.

Camera: SONY

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महिन्यापूर्वी भंडारदरा ला गेलो होतो तेव्हा (गाडीतून) काढलेला फोटो :

भंडारदर्‍याच्या विज-प्रकल्पाजवळ काढलेला हा एक 'गुढ' फोटो (पाऊस आणि धुके एकाच वेळि जमून आलेले) :


Camera: Panasonic lumix
Model DMC-TZ 5
(णot sure of the other details but used a "Cloud and Hi-Speed" settings while clicking the photos)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा फोटो भागमंडला परिसरात काढलेला आहे. डावीकडे दिसणारी इमारत के.एस.टी.डी.सी च्या गेस्ट हाऊसची आहे.

exposure 1/400 sec
aperture 10
focal length 18 mm
ISO 100

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ISO: 400, Ap: 5.6, Shutter: 1/250

ISO: 400, Ap: 11, Shutter: 1/60

ISO: 1000, Ap: 7.1, Shutter: 1/320

कॅमेरा: Cannon EOS REBEL T2i लेन्सः १८-२००

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या दोन चित्रातील फरक अ‍ॅपर्चर आणि शटर स्पीड या कन्सेप्ट शिकायला उपयुक्त ठरावेत.
मला तिसरा फोटो आवडला.. झाडाचे पान फक्त मध्ये आले आहे असे वाटले. ते क्रॉप करून अधिक चांगला वाटल असे वाटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल मुंबईत फार पाऊस झाल्याच्या बात्म्या आहेत.
तेव्हा पावसाच्या या रुपावरही मुंबईकरांकडून या धाग्यात काही वेगळ्या वेचक/वेधक छायाचित्रांची अपेक्षा आहे Smile

आज बीबीसीच्या हिंदी आवृत्तीत कालच्या तांडवाला क्यामेरात कैद केलेले इथे पाहता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तमोत्तम चित्रे येताहेत.. शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत.. पावसाळा जोरावर आहे.. याहून अधिक सहभागाची अपेक्षा अवाजवी ठरू नये Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

ही चित्रे स्पर्धेसाठी नाहीत बरे.

'अंगे भिजली जल धारांनी' - पावसात न्हाऊन आंगावर थेंबाचे मोती ल्यालेलं लिलीच फूल.

paus 3 lr

आभाळमाया - ढग कधी कधी खाली उतरतात आणि आभाळाला गवसणी घालु पाहणार्‍या उत्तुंग इमारतींवर आक्रमण करतात. जणु ढगांचं खोडरबर आकाशाच्या कागदावरुन त्या इमारती पुसुन टाकु पाहतं.

paus lr

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिले चित्र विशेष आवडले.. त्यातही पिवळेपणाची शेड योग्य त्या प्रकाशात थेंबाच्या टेक्श्चरमुळे अतिशय वेधक झाली आणि पकडली गेली आहे..
मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

IMG_0125 (640x421)

camera: Canon 550D
lens: pentax 28mm f2.8 (in manual aperture mode)
aperture: f8
iso: 1250
shutter: 1/60s

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Camera SONY
Model DSC-W70
ISO 320
Exposure 1/50 sec
Aperture 5.0
Focal Length 16mm
Flash Used true

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

इकडे स्पर्धा जाहिर झाली आणि मुंबईत व देशात अनेक ठिकाणी पावसाने धमाल उडवुन दिली. असो आता स्पर्धेकडे वळतो.

स्पर्धेत सहभाग पुन्हा एकदा खटकला, खरेतर अगदी साधा विषय व त्यातही सध्या पाऊस पडत आहे म्हणताना अधिक प्रवेशिका असत्या तर अधिक मजा आली असती. असो. चित्रे पाहताना आणि निवडताना माझा दृष्टिकोन असा होता - विषयाला व्यक्त करणारे चित्र, त्यातल्या भावना, त्यातुन झालेली वातावरणनिर्मिती हे मुख्य. तांत्रिक अंग दुय्यम. उत्तम चित्र कोणते? तर पाहिल्यावर पटकन आवडते ते! जर पकडलेला क्षण वा दृश्य वेधक असेल तर तांत्रिक भाग दुय्यम, विशेषतः जेव्हा हौशी कलाकारांसाठी स्पर्धा असते तेव्हा. आलेली सर्वच चित्रे चांगली आहेत आणि ती नक्कीच विषयाला अनुसरुन आहेत. अनेकांनी काच हे माध्यम वापरुन चित्र निर्मिती केली आहे आणि प्रयत्न उत्तम आहेत अर्थात सुधारणेला वाव आहे.

ऋषिकेशने टिपलेला रस्त्यावरचा पाऊस पडुन गेल्या नंतरचा फवारा तसेच आतिवासचे काचेतुन दिसणारे दृश्य विशेष आवडले.
तृतिय क्रमांक : श्री.धनु यांचे काचेतुन टिपलेले दृश्य. 'पावसाळा' म्हणताना डोळयापुढे येणारे प्रसन्न हिरवे चित्र आणि त्याला काचेच्या माध्यमाची जोड मस्त आहे. वर आकाशानेही परिणामात भर घातलेली दिसत आहे.
द्वितिय क्रमांकः श्री. वाचक यांनी टिपलेले लाकडी पृष्ठभागाचे चित्र.मांडणी तसेच आशय दोन्ही झकास.प्रतिबिंब खूप बोलके आहे. नुकतीच एखादी जोरदार झड कोसळुन गेलेली असल्याची कहाणी जमली आहे.
प्रथम क्रमांकः श्री. राजे यांचे चित्र. अचानक पाउस कोसळतो आणि आपण स्वतःला आवरुच शकत नाही. कसले बंधन उरत नाही. कपडे ओले झाल्याची तक्रार उरत नाही की कुणी काय म्हणेल याची फिकीर राहत नाही. आणि मग आपण स्वतःला त्या पावसात झोकुन देतो.
धो धो कोसळणारा पाऊस आणि त्यात रममाण झालेला त्यांचा मित्र पावसाची महती सांगुन जातात.पावसात भिजताना त्याने जणु पावसाला आलिंगन देण्यासाठी आपले हात पसरले आहेत आणि त्याच्या भेटीने तृप्त होत त्याने डोळे मिटुन घेतले आहेत. इच्छा असली तरी ते सपकारे बसत असताना डोळे उघडे ठेवणे तसेही त्याला शक्य नाही म्हणा पावसाची मजा पावसाळी सहलीतला खरा आनंद इथे मला दिसला.

सर्व स्पर्धकांचे आणि अर्थातच विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व विजेत्याला पुढील आव्हानाचे आवाहन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0