हुच्चभ्रु इतरांना व्यसनी बनवतात का ?

नुकतेच एका संस्थळावरती असे वाचनात आले, की हुच्चभ्रु लोक्स सामान्य लेखकांना / सामान्य लोकांना आपल्या घरी जेवायला बोलावतात आणि दारू ढोसण्याचा आग्रह करतात. अशाने आंतरजालावरील एक सामान्य लेखकांची अथवा सामान्य लोकांची पिढीच ते वाम मार्गाला लावत आहेत हे त्यांना जाणवत नाही का ? 'ऐसी अक्षरे हे हुच्चभ्रु लोकांचे हुच्चभ्रु संस्थळ आहे' अशी वार्ता मध्ये एका विहिरीच्या काठावरती बेडूक पकडत असताना कानावरती पडली. त्यामुळे हा चर्चा प्रस्ताव इथे मांडण्याचे धाडस करीत आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न :-

हुच्चभ्रु म्हणजे नक्की कोण ? त्यांची व्याख्या काय ?

उपप्रश्न :-

१) हुच्चभ्रु लोक्स असे वागून नक्की काय समाधान मिळवतात ?

२) सामान्य लेखकांनी / सामान्य लोकांनी अशा हुच्चभ्रुंची संगत कशी टाळावी ?

३) भिकार लेखनाला कंटाळून सदर लेखकांना बाद करण्यासाठी अशा सुपार्‍या हुच्चभ्रुंना दिल्या जात असाव्यात काय ?

४) दारू ऑफर करणारा प्रत्येकजण हुच्चभ्रु ह्या सदरात गणावा काय ?

५) नक्की कुठली दारू ऑफर केल्याने एखाद्या व्यक्तीला 'हुच्चभ्रु' असा सन्मान पात्र होतो ?

६) अशा हुच्चभ्रुंना आपण जेवायला बोलावून त्यांना गोमूत्र ऑफर करावे काय ?

ह्याच अनुषंगाने आपली संस्कृती व हुच्चभ्रुंची संस्कृती, तसेच दारू चांगली का वाईट इत्यादी चर्चा विस्तार देखील अपेक्षीत आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

आम्हाला आजपर्यंत कोणत्याही हुच्चभ्रु यजमानाने जेवायला घरी बोलावून वारूणी पाजली नसली तरी आम्हाला हुच्चभ्रुंबद्दल काहिही तक्रार नाही. आपण आम्हास घरी जेवायला बोलावल्यावर प्रश्नांची उत्तरं देता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

>>नुकतेच एका संस्थळावरती असे वाचनात आले, की <<

बास. यापुढे काही वाचायची गरजच नाही. अहो, संस्थळांवर (आणि त्यात मराठी) वाट्टेल ते लोक येऊन खूप थिल्लरीकरण करतात हे तज्ज्ञांचं मत माहीत नाही का? त्यामुळे थिल्लरपणा कमी असतो अशा एखाद्या ठिकाणी जाल तर आपोआप उत्तरं मिळतील.

- हुच्चभ्रू लोकांकडून ज्ञानार्जनाच्या प्रतीक्षेत थिल्लर जंतू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कधी बोलावताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हुच्चभ्रु इतरांना व्यसनी बनवतात का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

आधी तुमच्यासाठी काही प्रश्न आहेतः
१. व्यसन फक्त दारूचंच लागतं का?
२. हुच्चभ्रूंना इतर व्यसनं नसतात का?
३. असतील तर त्यांचं एकच व्यसन का बरं इतर लोकं उचलतात?
४. दारूत वाईट काय आहे?
५. हुच्चभ्रू सामान्यांना हुच्चभ्रू बनवू पहात आहेत तर त्यात काही वाईट आहे का?
६. सामान्य हुच्चभ्रूंना सामान्य बनवण्याचा प्रयत्न करतात ते आणि हुच्चभ्रू सामान्यांना हुच्चभ्रू बनवू बघतात यात तत्त्वतः काही फरक आहे का?
७. हुच्चभ्रूंची संस्कृती असते हे तुम्हाला कसं माहित? एखादा पुरावा वगैरे देऊ शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या अर्थी हा प्रतिसाद आला आहे, त्या अर्थी:
१. नाही.
२. असतात.
३. उच्चभ्रूंची मर्यादा.
४. कुठं काय?
५. सामान्यांना तसं वाटू शकतं.
६. अजिबात नाही. येऊन जाऊन ढवळ्या-पवळ्याच.
७. तुमचा प्रतिसाद!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना आपल्या घरी जेवायला बोलावतात आणि दारू ढोसण्याचा आग्रह करतात.

माननिय पराजीरावसाहेब,

हे प्रश्न तुम्ही पटलावर मांडल्याबद्दल तुमचा अत्यंत आभारी आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे आता माझ्यासाठी फार महत्वाचे झाले आहे, कारण जे तुम्ही वाचले ते मीही वाचले होते. ते वाचल्यापसून मला, त्या अनुषंगाने, 'कोssहम' हा प्रश्न सतावू लागला आहे. तुम्हाला कारण माहिती आहेच, तुम्हाला मी घरी (माझ्या) बोलावून दारू ढोसायला (हे तुम्ही वाचल्याप्रमाणे, अदरवाईज चांगली सिंगल मॉल्ट देऊ केली होती) लावली होती.

त्यामुळे तुम्ही हे प्रश्न मांडल्यामुळे, इथल्या ज्ञानसागरात काही ज्ञानाचे कण वेचायला मिळून 'कोssहम'चे उत्तर मिळेल ही आशा आहे.

- (प्रश्नांकित) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पीनेवालोंको पीनेका...'
या न्यायाने पाहिलं तर व्यसनीही कसला ना कसला बहाणा शोधत असतात. 'हुच्चभ्रुं'चे आमंत्रण हा त्यातलाच एक.
खरं बघितलं तर 'अगं अगं म्हशी,मला कुठं नेशी...' !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा परा कधी कोणाची कशी फजिती करेल काही सांगत येत नाही.
(संध्याकाळचा चहा+मोनॅको बिस्किटे खात आंतरजालावर भटकणारी)रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या उत्तम चर्चेला प्रतिसाद द्यायचंच राहिला.

दारू ऑफर करणारा प्रत्येकजण हुच्चभ्रु ह्या सदरात गणावा काय ?

मला वाटतं 'दारू ऑफर करणारा तो हुच्चभ्रु' ही व्याख्याच गंडलेली आहे. हुच्चभ्रु लोकांना चर्चा, कीस काढणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भ्रुवा सगळ्यात उंच दिसतील याची काळजी घेणं यात रस असतो. दारू प्यायल्यावर भ्रुवा वर चढवलेल्या ठेवायला त्रास पडतो, त्यामुळे हुच्चभ्रु दारू पीत नाहीत, आणि पाजत तर नाहीतच. दारू देणारे लोकं म्हणजे श्रीमंत लोक आणि भाई लोक. पुरावा म्हणून गणपत, चल दारू ला हे गाणं पहावं.

एकदा हे स्पष्ट झाल्यावर बाकीचे बहुतेक प्रश्न बाद होतात.

सामान्य लेखकांनी / सामान्य लोकांनी अशा हुच्चभ्रुंची संगत कशी टाळावी ?

हुच्चभ्रु लोकांची संगत टाळण्याचे अनेक मार्ग आहेत. एक म्हणजे ते लोक जिथे असतात तिथे जाऊ नये. पण त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर आक्रमण होत असल्याने तो उपाय मला आवडत नाही. ओडोमॉस लावून डास पळवावे तसं काही क्रीम दुर्दैवाने मिळत नाही. पण मला एक अभिनव उपाय दिसतो. तो म्हणजे आपल्या भुवया काढून टाकाव्यात आणि त्याजागी उंच भुवया रंगवून घ्याव्यात. त्यांना बघून सर्व हुच्चभ्रूंना ''भला उसकी भ्रू मेरी भ्रू से उच्च कैसे?' अशी जलन होते. आणि मग तेच आपली संगत टाळतात. सुरूवातीला कदाचित तुम्हाला त्यांच्याकडून भुवयांशी संबंधित नसलेली चेष्टा ऐकून घ्यावी लागेल... पण तिच्याकडे दुर्लक्ष करायचं.

असो. सध्या इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुवया काढून टाकण्यात आपल्या स्वातंत्र्यात बाधा येते शिवाय उच्चभ्रू/हुच्चभ्रूंना आवडणार्‍या मोना लिसाशी तुलना होण्याचा धोका निर्माण होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भुवया काढून टाकण्यात आपल्या स्वातंत्र्यात बाधा येते

भुवया काढून टाकणं हे प्रतीकात्मक आहे हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. 'नथिंग इज सेक्रेड' म्हणायचं. मग त्यात स्वतःचा उच्चभ्रूपणालाही वगळायचं नाही. त्याचीही चेष्टा करायची. तसं केलं की आपल्या रंगवलेल्या भुवया कायमच वर राहातात. मग स्वतःच्या भुवया तूप लावून, पिळून उच्च ठेवणाऱ्यांची पंचाईत होते. थोडक्यात काय, नंगेसे खुदा भी डरता है, तसंच काहीसं.

शिवाय उच्चभ्रू/हुच्चभ्रूंना आवडणार्‍या मोना लिसाशी तुलना होण्याचा धोका निर्माण होतो.

छे छे, भुवया रंगवल्या की असं दिसायला होतं...

(चित्र जालावरून साभार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0