निराश–हताश राजकुमार
काही दिवसांपूर्वी एक स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणवणारा मला भेटला. मी त्याला सहज विचारले: “तुमच्या राजकुमाराने जो नवीन ड्रामा सुरू केला आहे, त्याचा पुढील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला काही लाभ होईल का? तुमचे राजकुमार प्रधानमंत्री बनतील का?”
त्याने उत्तर दिले: “नाही. आमचे राजकुमार २०१४ नंतर पक्षाला मजबूत करण्याऐवजी आघाडीतील सहयोगींनाच मजबूत करत राहिले आहेत. २०२९ च्या निवडणुकीत आमच्या पक्षाला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू आणि महाराष्ट्र मिळून जास्तीत जास्त ४०–५० जागा लढवायला मिळतील. बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात स्थानिक पक्ष विधानसभा निवडणुकीत पराजित झाले, तरी त्यांची जागा घेण्याचा काहीही प्रयत्न राजकुमार करत नाहीत. या ८८ जागांपैकी बंगालमध्ये फायदा झाला तरी जास्तीत जास्त १०–१५ जागा मिळतील. उरलेल्या जागांपैकी ६० टक्के जागा जिंकल्या तरी १५० आकडा गाठणे शक्य नाही.
राजकुमारांना हे कळून चुकले आहे की २०२९ मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून ते सत्तेत येऊ शकत नाहीत. राजकुमार हताश आणि निराश झाले आहेत. त्यांच्या जवळपास कोणीही खरा निष्ठावंत उरलेला नाही.”
अति बुद्धिमानसल्लागारांनी राजकुमारांच्या मनात भरवले आहे की लोकांच्या मनात प्रजासत्ताक व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करून, निवडणुकीविना सत्ता मिळवता येऊ शकते. काही हजारांची भीड जमवून देशात अराजकता माजवता येईल, न्यायालयावर दबाव टाकून सरकार बरखास्त करता येईल आणि आपले सरकार स्थापन करता येईल.
राजकुमार डोळे बंद करून यावर विश्वास ठेवत आहेत; पण हे निव्वळ दिवास्वप्न आहे, वास्तव नाही. तरीही राजकुमार या घटकेला उत्तर प्रदेशात प्रचार करण्याऐवजी दिल्लीत ठाण मांडून बसणार आहेत. २५ ऑक्टोबरपासून रामलीला मैदान बुक केले आहे. दिवाळीच्या दिवसांत स्थानिक दुकानदारांची नाराजी ओढवून घेणार आहेत. येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात पराभव झाल्यावर पुन्हा निवडणूक आयोगालाच दोष देण्यास मोकळे होतील.
समरसतेचा विजय असो...
२०२४ च्या निवडणुकीत "सनातन धर्म" चा उन्माद चिंताजनक पातळीवर पोचला तेव्हा मला देशाची एकंदरच चिंता वाटायला लागली होती. सनातन धर्माचा जयघोष करणारे अनेक नवे बाबा-बुवा यावेळेला उदयाला आले.
"सनातन धर्म"चा उन्माद अशासाठी की कोणत्याही निश्चित विचार, सिद्धान्तातून ही कल्पना उदयाला आलेली दिसत नव्हती. त्यामुळे या कल्पनेविषयी शंकानिरसन करणारे कोणतेही अधिकारिक लिखाण वाचायला मिळाले नाही. शंकराचार्यांची यावर असलेली मते तपासली तेव्हा त्यांच्याबद्दल असलेला उरला-सुरला आदर संपला.
आता "सनातन धर्म" चे नारे आणि वारे बर्यापैकी शांत झाले आहेत. त्यामुळे मला त्याच्याशी देणंघेणं नाही. कोणत्याही उन्मादातून "...चारसो पार"चे लक्ष्य साध्य होणार नाही. हिंदूराष्ट्र निर्मिती तर दूरच राहीली.
याच सुमाराला संघाची शताब्दी साजरी झाल्यामुळे मात्र मला सूक्ष्म-चिंता निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. चिंता निर्माण व्हायचे कारण म्हणजे संघाचे शीर्षस्थ नेतृत्व आणि तळागाळातले कार्यकर्ते यांच्यातील वैचारिक तफावत. पंतप्रधानांनी अनावश्यक खर्च टाळा सांगितल्यावर एक दिवस मंत्रालयात मोटरसायकलवरून येण्याचा देखावा केला गेला. नंतर सगळीकडे सामसूम...
संघकार्यकर्त्यांकडून मॉरल-पोलिसींग याच सुमारास करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. कन्यादान आणि गोत्र इ० कालबाह्य संकल्पनांच्या पुनर्स्थापनेचे प्रयत्न, तसेच ’मुलींना शिकवू नका’ कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत असा एक मौलिक विचार अशाच एका दबा धरुन सोशल इंजिनीयरींग मध्ये गुंतलेल्यांकडून ऐकला तेव्हा मात्र मी पूर्ण हादरलो होतो. त्यात त्या सुमारास ललित कलाकेंद्राचे रामायण घडले तेव्हा ’द रेप ऑफ प्रोसर्पिना’ हे बर्निनीचे शिल्प आणि वॅसिलि शुझलेन्कोचे ’सार्वजनिक शौचालय’ हे तैलचित्र पुरावा म्हणून दिल्याबद्दल एका ’’भक्तवत्सल’ ग्रुपमधून मला हाकलण्यात आले होते. केव्हढी ही समरसता...
या सगळ्यांमुळे मला तेव्हा संघाच्या मर्यादा समजायला सुरुवात झाली होती. ठराविक सामाजिक कामाच्या पुण्याईला पणाला लावून वेगवेगळ्या पुड्या सोडत राहायच्या आणि गोंधळ उडवून द्यायचा हा त्यात ठळक पॅटर्न मला तेव्हा दिसला.
त्यानंतर औरंगाबादमध्ये एक घटना घडली आणि आंबेडकरवाद्यांनी मोठे मोर्चे काढले तेव्हा एक निश्चित झाले. संघ अजून समाजातल्या मोठ्या वर्गाला आपलसं करून घेण्यात असमर्थ ठरला असल्याचे निश्चित झाले. भारत कधीही हिंदू राष्ट्र बनू शकत नाही याची तेव्हा खात्रीच पटली.
वनवासी कल्याणाची पुण्याई, पुरग्रस्तांसाठी मदत इ० गोष्टी कितीही उगाळल्या तरी ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव, अन्नधान्य भेसळ, परीक्षांमधला गोंधळ इ० असंख्य विषयावर संघ फक्त ’सावध भूमिका’ घेतो, मैदानात उतरत नाही. अंबानीच्या घरच्या मेजवान्यांचे व्हिडीओ बघून रस्त्यावरचा उपाशी तृप्तीचे ढेकर देऊ शकत नाही आणि कुठल्या तरी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे धार्मिक उत्सवातला विकृतपणा विसरता येत नाही.
मात्र आता जेन-झीने संघाला परत एकदा त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली असल्याने मला आशेचा किरण दिसत आहे. जेनझीशी शीर्षस्थ नेतृत्त्वाने कितीही गप्पा मारल्या तरी तळागाळातले संघकार्यकर्ते त्यावरून बोळाच फिरवतील. संघाचे उधळलेले वारू आपोआप अडवले जाईल...
देशातील एकही विद्यापीठ जगात १ल्या १० मध्ये नाही आणि तशी शक्यता दूरान्वयाने नाही, तरी अजुनही ’विश्वगुरु’ची स्वप्ने बघणार्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे...
टीप - मागे मोहन भागवतांना एक खुले पत्र लिहीले तेव्हा माझी मिपावरून हकालपट्टी झाली आणि संध्याकाळी मला घाबरवण्यासाठी दोन स्वयंसेवक पूर्वसूचनेशिवाय माझ्या घरी येऊन धडकले होते. आता परत तसं काही झालं तर सांगेनच...
समरसतेचा विजय असो...
नशीबवान आहात. आम्ही…
नशीबवान आहात. आम्ही इतक्यांदा आरेसेस बद्दल थेट वर्तमानपत्रातुन सुद्धा यथेच्छ टीका केली पण साधे काळे कुत्रे फिरकले नाही. मी तर वाट पहात आहे... गेल्या ३५ वर्षांत कुणीही आले नाही. उलट मीच त्यांच्या घरात जाऊन त्यांना वैचारीक हाणून येतो. वर चहापोहे खाऊन येतो.
आणि तुम्ही म्हणता लेख लिहिला म्हणून हाकलले? शक्यच नाही. ते ठिकाण एकेकाळी उजव्या विचारांचे होते. आता तिथे डाव्यांचा हिणकस प्रभाव आहे. अर्थात तुम्ही कुणावरही लिहिले म्हणून हाकलले जाणार नाही. फक्त तिथले संपादक आणि एक तद्दन बेअक्कल बिनडोक आणि लाळघोट्या प्राध्यापक तसेच त्यांचा एक मुर्ख अनुयायी यांच्यावर टीका केली तर तुमचा आयडी उडवला जाणार.
कॉँग्रेसच्या निष्ठावंतांना…
कॉँग्रेसच्या निष्ठावंतांना वाटते कांग्रेस ने स्वबळावर लढावे. त्याशिवाय 2029 सोडा 2034 मध्ये ही राजकुमार सत्तेत येऊ शकत नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश 50-70 जागा देणार. त्या जागा स्वीकार कराव्या लागतील. स्वबळावर लढायचे असेल तर आत्ता पासून तळ ठोकून बसावे लागेल.
आता इथले डावे तुमच्यावर अजून…
आता इथले डावे तुमच्यावर अजून भडकणार... वाजवली तुम्ही त्यांच्या गालावर.