लेखन प्रेरणा उपक्रमाची माहिती
सर्व लेखकांना सस्नेह नमस्कार.
मी तुम्हाला आज एका उपक्रमाची माहिती देतो आहे. त्या उपक्रमाचे हे चौथे पथक आहे. तुम्हाला नवी आव्हाने आणि नवे प्रयोग आवडत असतील तर तुम्हाला हा उपक्रम देखील आवडेल.
सुरपाखरू लेखक समुदाय नावाने एक मराठी लेखकांचा समुदाय आहे. त्या समुदायातर्फे ३० दिवसात ३० हा उपक्रम आयोजित केला जातो. तुम्ही उपक्रमासाठी नोंदणी केलीत तर तुम्हाला एका व्हॉटसॅप गटात इतर सर्व नोंदणी करणाऱ्या सहलेखकांसोबत जोडले जाईल. त्या गटात ३० दिवसात ३० उपक्रमाची चर्चा आणि लेखक संवाद होतील.
करायचे काय असते?
जुलै महिन्या १ तारखेपासून ३० तारखेपर्यंत - रोज एक किमान २५० शब्दांचा लेख लिहायचा आणि तुमच्या आवडत्या संकेत स्थळावर म्हणजे अर्थात इथे पोस्ट करायचा. २५० ही किमान मर्यादा आहे कमाल कितीही शब्द लिहू शकतो आपण. विषयाला बंधन नाही फक्त रोज एक लेख आणि तो त्याच दिवशी इथे पोस्ट होणे इतके पाळायचे.
वाचनखुणांमधे सुरपाखरू ३०दिसात३० अश्या वाचनखुणा (हॅशटॅग) नक्की लावायचे.
त्या व्हॉटसॅप गटात असलेले सगळे लेखक हेच करतील आणि तुमची प्रगती रोज एका चित्रात मांडलेली तुम्हाला दिसेल, तुमच्या नावापुढे रोज एक हिरवा टिपका याप्रमाणे ३० हिरवे टिपके शेवटी दिसतील
जुलै २०२६ मधल्या चारही रवीवारच्या दिवशी रात्री ८ ते ९ एक ऑनलाईन गुगल मीट माध्यमाने चर्चा आणि संवाद अनुभव कथन सत्र होईल त्यात इतर लेखकांचे अनुभव ऐकायला मिळतील तुमचे सांगायची संधी मिळेल.
हा उपक्रम रोज लिहिण्याची शिस्त लागायला उपयोगी ठरतो असे या आधीच्या पथकांमधल्या लेखकांचे अनुभव आहेत
गुगल फार्म: https://forms.gle/oMXBZXujqFV9PEHY9 —> या लिंक वर असलेला फार्म भरून नोंदणी करू शकता.