नापिकीची सुगी न सरते
anant_yaatree
मृगजळाचा पूर , माझे
भग्न तारू
नापिकीची सुगी न सरते,
काय पेरू ?
उत्सवांचे ढोल ताशे
गगनभेदी
कर्णबधिरांचीच आता
रोज सद्दी ?
व्यापुनी अवघ्यास कृ बु
अतृप्त उरली
मानवी सृजनास आता
कोण वाली?
अजूनही क्षितिजावरी
अस्पष्ट तारे
अंधकाराची फिकीर मी
का करू रे ?