Skip to main content

चटकदार मसाला पापड

चटकदार मसाला पापड
साहित्य
१. पापड
२. चीज
३. १ लिंबू
४. १ कैरी
५. १ कांदा
६. १ काकडी
७. १ टोम्याटो
८. बारीक शेव
९. कोथिंबीर
१०. १ चमचा चाट मसाला
११. १ चमचा लाल तिखट
१२. पिठी साखर चवीप्रमाणे
१३. मीठ चवीप्रमाणे

कृती
प्रथम पापड (मोठा) तळून घ्यावा. कैरी. कांदा, काकडी टोम्याटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. चीज किसून घ्यावे. तळलेला पापड एका पसरट प्लेट मध्ये ठेवा. त्यावर बारीक चिरलेले कैरी. कांदा, काकडी टोम्याटो, कोथिंबीर व किसलेले चीज घाला. त्यावर चवीप्रमाणे चाट मसाला पिठीसाखर,लाल तिखट, मीठ घाला व बारीक शेव पसरा. हवे असल्यास वरून लिंबू पीळा.असा हा चटपटीत मसाला पापड लगेच खायला घ्या.

आवड/नावड

सुनील Tue, 24/03/2015 - 16:20

हम्म.

मसाला पापड 'नुसताच' कसा खायचा? त्यातून अजूनही मंगळवारच चाललाय! :(

(विकांतोत्सुक) सुनील

ऋषिकेश Tue, 24/03/2015 - 18:15

In reply to by आदूबाळ

प्रयत्न केलाय. पण तो तळल्यासारखा नाही होत आणि तेल सर्वत्र नीट लागत नाही (तेलात बुडवूनच काढावे लागेल त्या साठी).

अतिशहाणा Tue, 24/03/2015 - 18:21

In reply to by ऋषिकेश

मायक्रोवेव्ह आणि तळणे या दोन्ही रासायनिक प्रक्रियात फरक आहे. त्यामुळे तो तळल्यासारखा (खुसखुशीत+कुरकुरीत)होणारच नाही. मात्र दोन्ही बाजूंना किंचित तेल लावून मायक्रोवेव केला तर खाण्यायोग्य होतो.

अतिशहाणा Tue, 24/03/2015 - 18:25

In reply to by ऋषिकेश

हॉटेलात सपाट तळला जाण्याचे कारण मोठी कढई असावी असं वाटतंय. तव्यावर तेल टाकून तळण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी सपाट तळला जातो.

मिसळपाव Tue, 24/03/2015 - 23:16

In reply to by ऋषिकेश

तेल सर्वत्र नीट सहज लावता येईल. तेलात बुडवायला नको - बोटाने चोपडलं तरी जमेल. पण मायक्रोवेव्ह रॅडीएशन काहि 'उजेड' पडल्यासारखं एकसमान नसतं ओव्हनमधे. 'हॉट्स्पॉट्स' असतात. त्यामुळे एक ईंचाचा पापड कदाचित सारखा होईल पण मेहेमीच्या आकाराचा पापड नाही. एक ईंचाचा करून बघतो हां नंतर...