काय, हवय तरी काय? :) :)
फार मागे मिसळपावावर एक निबंध स्पर्धा जाहीर करण्यात आली होती कोणत्या तरी बिगरसरकारी संस्थेतर्फे. त्या स्पर्धाविषयातून आलेलं हे आमचं स्वगत.
.
वा! उत्तम!
http://www.misalpav.com/node/8765 ("विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा") भन्नाटच दिसतय!
एकाहुन एक असले "विषय" दिसताहेत निबंधासाठी.
(
निबंधस्पर्धेचे विषय
१) विवाहांतर्गत आनंदी सहजीवनाच्या वाटा
२) विवाहप्रथा आणि स्त्री-पुरुष समता
३) विवाहबंधन गरज कि सक्ती
४) विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक
५) आंतरजातीय विवाह जातींचा मेळ कि झळ
६) विवाह असुनही एकाकी
७) एक पालकत्व- संकट कि स्वातंत्र्य
८) अविवाहित स्त्री-पुरुषांचे सहजीवन (लिव्ह इन) - निरुपाय कि उपाय
९) घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे
१०) अनाथांच्या विवाहाचा प्रश्न
)
आणि त्यातही "विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक"
हा भलताच भारी विषयप्रकार दिसतोय.
च्यायला पण आता आपल्या सारख्या गरिबाला हे सगळच (तूर्तास अविवाहित आणि "कुमार" असल्यानं)नवीन आहे.
.
जरा धीर गंभीर भाषेत मोठ्ठा निम्बंध्/प्रबंध लिहुन आपणही माराविकी फुशारकी .
पण आपल्याला कळलय ते बरोबर आहे का? काही प्रश्न पडताहेत तिच्यायला. आणि उत्तरही अर्धवट दिसताहेत.
आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरं
.
१. प्रश्न १:- शीर्षकात "शरीरसंबंधांचा " असं लिहिलय. पण
कुणाचे कुणाशी संबंध? म्हणजे समजा जॉर्जचं लग्न ठरलय. आणि लग्न होण्यापुर्चीच त्याने होणार्या बायकोशी, कोंडोलिझाशी संबंध ठेवले तर कुणाला काय प्रॉब्लेम आहे(तिला आणि त्याला सोडुन)?इथं ते अपेक्षित आहे का?
की जॉर्जचं जिच्याशी लग्नं ठरलय तिच्या आणखी कुणाशी तरी असलेल्या संबंधाबाबत बोलोताहात?
उत्तर :- मनोबा, गाढवा, कुणाच्या विवाहापुर्वीचा अनुभव रे? हे काय सॉफ्ट्वेअर टेस्टिंग वाटलं काय रे येड**? फायनल प्रॉडक्शन ला डीप्लॉय करण्यापुर्वी पब्लिक काय इतरांकडुन टेस्टिंग करुन घेणारेस जोडिदाराचं? अकलेचं दिवाळं निघालयं का तुझ्या.
.
प्रश्न २:- :- नाही तर ते तसं नसेल बुवा... जोडिदाराचं नाही...पण मी जॉर्जने त्याच्या "ह्याचं " टेस्टिंग केलं तर बिघडलं कुठं?
उत्तर - मला सांग एखादी "चविष्ट" गोष्ट कुणालाही कराय्ला/खायला आवडते का तिचं वर्णन करायला आवडतं बे?
अबे आज म्हणतोस "टेस्टिंग" झालेलं बरं......
उद्या म्हणशील "लोड टेस्टिंग" सुद्ध व्हायला हवं. मग काय "विवाह पुर्व सामुदायिक प्रणयक्रियेचे फायदे" ह्यावर भाषण देशील काय बे आँ?
अरे , मला सांग विवाहापुर्वी जोडीदाराचं ह्ये प्र्याक्टिकल कुठं झालं असेल तर त्यातुन दुसर्या जोडिदाराचा काय फायदा बे?
साल्या हे सांग आधी के "विवाह पुर्व" संबंध विवाहानंतरही कायम राहिले तर "विवाह बाह्य" ठरणार नाहित का? अकलेच्या आंद्या, ते कुणालाही कसे काय "सफल वैवाहिक जीवनाकडे" नेतील बे? आँ?
जॉर्ज काय अभिमानानं पुस्तक प्रकाशित करशील काय "माझ्या बायकोचे विवाहपुर्व समृद्ध अनुभव जीवन" ह्या विषयावर?
"तसलं" काही आधी असणं वेगळं आणि त्याल अभिमानानं मिरवणं वेगळं.
प्रश्न ३:-
"विवाह पुर्व "म्हणजे विवाहापुर्वी एखाद्या वेगळ्याच व्यक्तिशी (तेव्हढ्यापुरते )असलेले संबंध की विवाहा पुर्वीपासुन असलेले(आणि विवाहानंतरही कायम राहिलेले ) संबंध?
उत्तर: - अरे गाढवा आज कित्येक तुझ्या सारख्या संभोग निरक्षरांना विवाहोत्तर ही धड संबंध ठेवायची अक्कल नाही. खरी समस्या ती आहे.तिकडं बघ.
विवाहपुर्व संबंध चालु राहिले तर हे तथाकथित "अनुभव" जीवनांदात भर घाल्ताहेत असं म्हणशील का?
प्रश्न ४:-
समजा एखाद्या सलिमचं हे तिसरं लग्न होतय, तर त्याची आधीची दोन लग्नं म्हणजे ह्या केस मधे विवाहापुर्व संबंधच झाले की!
उत्तर :- ही "केस स्टडी " समजुन ह्यावरच एक अख्खा निबंध होउ शकतो ना...
एकाच व्यक्तीचे अनेक विवाह हे "विवाहपुर्व संबंधां"चं उत्कृष्ट उदाहरण नाही का?
विचार काय करतोस, घे पेन आणि कर सुरुवात जोरदार....
प्रश्न ५:-
बरं विवाह पुर्व संबंध म्हणताय, पण विवाहापुर्वीचे कुठले संबंध? भिन्नलिंगी की सम्ल्लिंगी?
उत्तर :-
मला एक सांग "विवाह पुर्व समलिंगी संबंधांचा " भिन्नलिंगी विवाहात काय घंटा उपयोग होणार?
म्हणजे गृहितक हेच दिसतय की विवाहापुर्ची चे स्त्री चे पुरुषाशी (किंवा पुरुषाचे स्त्रीशी) संबंध!!
बाप्याचे बाप्याशी किंवा बयेचे बयेशी संबंध इथं मोजलेलेच दिसत नाहियेत.
अरेच्चा! हो की!
आणि हो...
प्रश्न :-६
समजा माझ्या मित्रांच्या "प्रगत" देशात(की संयुक्त "राज्यात") हे लग्न होतय...
समजा जॅक चा बाप आहे जॉन तो करतोय लग्न लिंडा शी....आणि जॅकची बाहेर अनंत लफ्डी आहेत..
तर जॅकच्या "होणार्या आईला"(!!!!),लिंडाला आपल्या विवाहापुर्वी आपल्या मुलाने बाहेर ठेवलेले संबंध चालतील का
असा हा विषय आहे? (जॉन आणि लिंडा ह्यांच्या विवाहापुर्वी त्यांच्या मुलाचे इतरत्र असलेले संबंध! )
प्रश्न :-७
कित्येकदा "पॉर्न फ्यांटसी" म्हणुन पाहिलेल्या मूव्हीमंध्ये होणार्या व्याह्यांमधेच एखादी रात्र "मजा ' मारली जाते.
म्हणजे जॅक आणि लिझा ह्यांचं लग्न ठरलय, तर नेमकं त्यानिमित्तनं परिचित झालेले जॅकचे वडील (जॉन)आणि लिझाची आई(लिंडा) ह्यांच "प्रकरण" जे सुरु होतं ते म्हणजे जॅक्-लिझा च्या "विवाहापुर्वीचे संबंध" म्हणजे विवाहपुर्व संबंधच झाले की!
म्हणजे प्रगत राज्यातल्या व्याह्यांमध्ये होउ शकतं म्हणा असं.
काय हे?
ही गृहितकं नेहमी अशीच असतील काय?
स्पष्ट विषय मला कधी मिळणारच नाही काय?
पब्लिकला हा विषय हवाय काय?
नक्की हवय तरी काय?
वरील पैकी एखादी भलतीच "केस" घेउन लिहिलं तर चालेल काय?
लिहिलं तर बक्षिसाची अपेक्षा धरता येइल काय?
नसेल तर लिहिण्यात काय मतलब आहे काय?
आपलाच,
संभ्रमित्,भ्रमिष्ट्,बक्षिसाभिलाषी,
कुठल्याही गोष्टीचा नको तसा नको तितका विचार करणारा
मनोबा
;)
फार प्रश्न पडतात बॉ तुला! ;)