अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ

गविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्‍यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली. त्याची अजून सवय व्हावी, सारखं सारखं शब्दकोशाकडे न धावता लिहीता यावं अशी खूप इच्छा आहे, आणि ऐसीवर पडीक राहून गेल्या दोन तीन वर्षांत बरीच सुधारणा झाली आहे. पण पारिभाषिक शब्दकोशही ठराविक विषयांवर भर देतात - कोलोकियल शब्दछटांचा सुरस अनुवाद नसतोच.

उदा: flag-waving patriots हे मराठीत इडियमॅटिकली कसे म्हणायचे? फॉर दॅट मॅटर इडियमॅटिकली चा चांगला मराठी शब्द काय आहे?
मराठीतली समाजशास्त्रीय परिभाषा इंग्रजीतून थेट अनुवाद करून तयार झाली आहे, आणि बोजड वाटते. अर्थपूर्ण, पण सुरस मराठीत लिहीणे जमायला पाहिजे.
irredeemable (इथे "मदतीच्या पलिकडे" अभिप्रेत आहे, पण शब्दकोशात बँकिंग शब्दावलीचे चेक रिडीम करण्याचे पर्याय दिसतात)
compromising position / in flagrante delicto (याचा अर्थ फ्रेंच/लॅटिन धागा-धुरंधर नंदन सांगेल)
cultural transmission (पिढ्यांपिढ्या सांस्कृतिक ज्ञानाला पास ऑन करणे)
kiss of death

असे बरेच आहेत, दुसर्‍यांनी ही भर टाकावी...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

आखीव वा रेखीव हा शब्द कँडिड ला न्याय देईळ का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो बरोबर विरोधी अर्थाचा नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कँडीड म्हणजे प्रांजळ.

पण कँडीड फोटो मंजे साधा, न आखडता, हावभाव न करता (ज्याचा फोटो काढला जात आहे त्याने) काढलेला फोटो. घरगुती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नेमका हाच शब्द विसरलो होतो. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रांजळ खास आहे! घरगुती मात्र नेहमी लागू पडायचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कँडिडमधे प्रामाणिक + स्पष्ट असा एकत्रित भाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मते किंवा विचार या शब्दांच्या संदर्भात 'परखड' हे विशेषण चपखल ठरेल. थोडा कठोर भाव व्यक्त करणारे 'सडेतोड'ही चालू शकेल. फोटोसाठी मात्र 'सत्यदर्शी',वास्तवदर्शी' याखेरीज दुसरे काही डोळ्यांसमोर येत नाहीय्. हे दोन्ही शब्द तसे समर्पक नाहीतच. 'वास्तव' शब्द वेगवेगळ्या तर्‍हांनी वापरला गेलाय. उदा. वास्तववाद वगैरे. फोटोच्या बाबतीत 'वस्तुनिष्ठ' चालू शकेल.
'यथासत्य', यथातथ्य' हे थोडेसे बोजड शब्दही संदर्भानुसार वापरता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेसावध क्षणी टिपलेले चित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनमोकळे, मोकळेढाकळे, अघळपघळ, बिनधास्त असे काही पर्याय सुचले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनमोकळे हा पर्याय उत्तम वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"अवचित क्षणीका"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

जसे आहे तसे टिपलेले छायाचित्र.
(उगाच कठिण का करायची भाषा Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

euphemism आणि trope ला चांगले शब्द आहेत का? "पर्यायोक्ति" आणि "अर्थालंकार" प्रतिशब्द म्हणून माहित आहेत, पण नेमकी हवी ती अर्थछटा बसत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यूफीमिझमला पर्यायोक्ती??? बिलकुलच योग्य वाटत नाही. न्यूनोक्ती किंवा उनोक्ती (हा शब्द ऐकल्यागत वाटतोय पण खात्री नाही) हा चपखल वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा शब्द कदाचित उनो खेळताना ऐकला असावा. हातात एकच पान शिल्लक असताना त्यात खेळणार्‍याने जोरात 'उनो' असे ओरडून इतरांना आपण लवकरच सुटणार असण्याचा इशारा द्यायचा असतो. मग बाकीची खेळणारी लोकं तो सुटणार नाही असा प्रयत्न करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा ROFL

या हिशेबाने पाहता रिकी मार्टिन साहेबांची उनोक्ती लैच्च फेमस होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह अजून एक आठवलं - speaking truth to power याला मराठीत चांगला शब्दसमूह किंवा चपखल प्रयोग आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्तेपुढे शहाणपण सांगणे हा वाक्प्रचार तर एकदम चपखल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी पोस्ट एडीट करायला गेले होते पण तेवढ्यात प्रतिप्रतिसाद आला बुच बसला होता.
"सत्तेला आरसा दाखवणे" हा प्रयोग कसा वाटतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, चालू शकेल कदाचित. नक्की कशा संदर्भात अन कसा वापर केला जातोय यावर याचा परिणाम जोखला जाईल.

बाकी कान टोचणे, कानपिचक्या देणे, ताशेरे ओढणे, इ. वाक्प्रचार आहेत पण त्यांना वरिष्ठ भूमिकेवरून केलेल्या उपदेशाची स्पेसिफिक छटा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"सत्तेपुढे शहाणपण" कसं वाटतय. पण हा सत्तेपुढे शहाणपण काय कामाचं अश्या नकारात्मक पद्धतीनेच वापरलेला पाहिलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे" हा त्याच लायनीवरचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.

अन हे "हू विल बेल द क्याट" चे सर्रळ सर्रळ भाषांतर आहे अगदी कॉपी टु कॉपी, माशी टु माशी म्हणतात तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सत्तेला सत्याचा मार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने