Skip to main content

सिल्क स्मिता, विद्या आणि भारतीय पुरुष

आज सिल्क स्मिता आणि तिच्या जीवनावर एक चित्रपट निघाला आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असेल (नसेल तर आता कळले असेलच). त्याच अनुशंगाने आजच्या DNA या वृत्तपत्रामधील एका रिपोर्टमधे भारतीय पुरुषांना नाजुक, नजाकतदार सौंदर्यापेक्षा 'भरगच्च सौंदर्य' अधिक आवडत असं दिलंय. शिवाय हा रिपोर्ट असा दावा करतं की भारतीय मध्यमवयीन पुरुषांमधे हे एका प्रकारचं वखवखलेपण तरुणांपेक्षा अधिक आढळून येतं. तुमचं या प्रकारचा चित्रपट आणि या दाव्याबद्दल काय मत आहे?

आजचा इपेपर इथे पीडीएफ स्वरुपात वाचता येईल. पहिल्या पानावर शेवटची बातमी

-- मुळातली सिल्क स्मिता आणि विद्याची सिल्क स्मिता यांची तुलना करता तुम्हाला कोण अधिक 'अपिलिंग' वाटली ;)
-- वरच्या रिपोर्ट मधील निरिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटत?
-- तुम्ही Dirty Picture बघणार का? असल्यास कोणत्या कारणासाठी?
-- बाकी, या विषयावर एखादी जनरल टिप्पणी काय कराल?

-- सदर लेखन मौजमजा सदरात टाकले आहे
-- चर्चा ऐसीअक्षरेवर (किंवा खरंतर कोणत्याही सार्वजनिक मंचावर) अशोभनीय वाटेल अश्या भाषेत होणार नाहि अशी आशा बाळगतो. तसे झाल्यास संपादकांवर पुढील कारवाईची जबाबदारी ढकलतो ;)

1234 Fri, 02/12/2011 - 14:42

हा धागा फक्त पुरूषांसाठी आहे का? ;)

कारण आम्हाला कोण अपिलिंग वाटते सांगितले की आमच्यावर भलभलते आरोप होणार.

मुळातली सिल्क स्मिता आणि विद्याची सिल्क स्मिता यांची तुलना करता तुम्हाला कोण अधिक 'अपिलिंग' वाटली

आम्हाला कोणच अपिलिंग नाही वाटली. :)

-- वरच्या रिपोर्ट मधील निरिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटत?
खरे आहे. भारतीय पुरूषांच्य मनातील स्त्रीसौंदर्याच्या कल्पनांविषयी घरातल्या :) आणि मित्रमंडळांतील चर्चा ऐकून कल्पना आहे. मध्यमवयीन पुरूष जास्त वखवखलेले असतात असं क्लिनीकल निरीक्षण आहे आणि त्याची हार्मोनल,बायॉलॉजिकल आणि सायकोसोशल कारणे आहेत.

-- तुम्ही Dirty Picture बघणार का? असल्यास कोणत्या कारणासाठी?
प्रोमोज चांगले वाटले म्हणून.इम्रान हाश्मी आणि नसिरसाठी (तुम्हाला काय वाटलं,तुश्शार कपूरसाठी? शी: ) तरिही थिएटरवर जाऊन बघता येणर नाही कारण मी जिथे राहते तिथे सो कॉल्ड सभ्य लोकांनी जाऊन बघण्यासारखे थेटर नाही.हैद्राबादेत एवढ्यात जाणे झाल्यास बघेन नायतर टाटास्कायवर विकत मिळेल तेव्हा.

-- बाकी, या विषयावर एखादी जनरल टिप्पणी काय कराल?

हा सिनेमा ८०ज च्या मानसिकतेवर आहे. तेव्हा अशा ढळढळीत सौंदर्याची खरेच क्रेज होती.
आत्ताच्या मुलांना कत्रिना (पण) आवडते. हे पाश्चात्य सौंदर्यविषयक कल्पनांचे आपल्यावर अतिक्रमण आहे.
कुठल्याही प्राचीन भारतीय कलाकृतीत बघा सुबक ठेंगण्या, ठसठशीत आणि थोडंफार पोट सुटलेल्या बायकांच्याच प्रतिमा दिसतील.

बाकी मला तर त्या एफ टी व्ही वरच्या रँपवरच्या मॉडेल्स बघून त्यांना टिबी,एच आय वी किंवा हायपरथायरॉईडिझम झाला असावा का अशी शंका येते. :)

मन Fri, 02/12/2011 - 15:41

In reply to by 1234

कत्रिना माठी, ठोंबी व हिंदीवर अतिप्रसंग करणारी म्हणून वैताग आणते. पण तिचे फिजिक सुंदरच आहे,सुडौल आहे.
बिपाशा बसू, झीरो फिगरच्या नादी लागलेली करिना*,मरतुकडी दीपिका ह्यांना तुम्ही हडकुळ्या म्हणा लागलच तर.

कत्रिना मिलिटरीच्या कुठल्या तरी शिबिराला भेट द्यायला हे सेलिब्रिटी आळिपाळीने जातात तेव्हा गेलेली टी व्ही वर दाखवली होती.
ती मिलिटरी छाप हिरवट्-पिवळट पट्टे असनारी पँट व वरती स्लिम फिट टी शर्ट ह्यामध्ये तिला पाहिल्यावर तिचे शरीरसौष्ठव सहज दिसत होते.पोरगी सुंदर असली तरी बर्‍यापैकी खात्यापित्या घरची व मजबूत आहे. यु के मध्ये जितक्या तरुणी दिसल्या त्यातल्या बहुतेकांचीच शरीरयष्टी मजबूत होती, मग सामान्य मुलगी का असेना किंवा रूपगर्विता का असेना. अगदि तस्साच बांधा कत्रिनाचा, उच्च फिटनेस आहे. निव्वळ बघूनच हे जाणवते.

मूळ लेखावर फारसे भाष्य करण्याचे कष्ट घेत नाही. कारण ज्याची त्याची शरीरयष्टी असते.सामान्यपणे काही आमच्यासारखे लोक "सडपातळ"प्रकारात मोडनारे असतात, काही "डबल हड्डी" प्रकारात मोडणारे असतात. अमुक उंचीला एक्झॅक्ट इतकेच वजन "आदर्श" असणे मला खुळचटपणाचे वाटते. अरे कशासाठी "आदर्श"? वजने उचलण्यासाठी की भरपूर धावण्यासाठी की भरपूर पोहण्यासाथी कि दैनंदिन व रात्रीची कामे करण्यासाठी? सगळेअजण स्वतःच्या "नॉर्मल" वजनावर सुंदर दिसू शकतात, कुणी स्वाभाविकपणे शिडशिडित असेल(ब्रूस ली,अजित आगरकर हे फिट आहेत तसेच) तर कुणी डबल हड्डी आपल्या मूळ रुपात(सनी देओल). हेच फिल्मी हिरोइन्सनाही लागू व्हावे.

हा माझ्या तालमीचा शिक्षक(gym instructor) रोज माझ्याकडे चिंतायुक्त्,सहानूभूतीपूर्ण कटाक्ष ताकत वजन वाढवायचे सल्ले देतो. धावणे, सायकलिंग कमी कर म्हणतो. का तर म्हणे "तुझा BMI (फक्त)२१च आहे. आपण ७-८ किलो वजन वाढवत २३.५ ते २४ च्या जवळ नेउन ठेउयात." हे म्ह्ण्जे कैच्या कैच वाटत होतं. माझी त्या २१ बद्दल तक्रार नाही, काही व्याधीही नाही, खाण्यापिण्यात आणि भूक लागण्यातही काही अडचण नाही पण ह्यालाच ती कोण काळजी लागलिये.
असो.

हा धागा फक्त पुरूषांसाठी आहे का?

नाय ब्वा.सिल्कस्मिता ह्या महिलेबद्दलचा हा धागा आहे. तो फक्त पुरुषांसाठी कशाला असेल?

कारण आम्हाला कोण अपिलिंग वाटते सांगितले की आमच्यावर भलभलते आरोप होणार.
काहीही.कोण कशाला आरोप करेल. वाटतय ते लिहा की सरळ.

* दहा वर्षापूर्वीची "रेफ्युजी" व "मुझे कुछ कहना है" मधली करीना बर्‍यापैकी हरीभरी होती.

ऋषिकेश Fri, 02/12/2011 - 15:36

In reply to by 1234

सपष्टिकरणः

हा धागा फक्त पुरूषांसाठी आहे का?

नाहि .. सगळ्यांसाठी आहे :)

हे पाश्चात्य सौंदर्यविषयक कल्पनांचे आपल्यावर अतिक्रमण आहे.
कुठल्याही प्राचीन भारतीय कलाकृतीत बघा सुबक ठेंगण्या, ठसठशीत आणि थोडंफार पोट सुटलेल्या बायकांच्याच प्रतिमा दिसतील.

असेल बॉ, पण तरीही ही आमची (काश!) कॅटी आहे ना हिच्यावर आमचा भारी जीव :P

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/12/2011 - 19:19

In reply to by 1234

कुठल्याही प्राचीन भारतीय कलाकृतीत बघा सुबक ठेंगण्या, ठसठशीत आणि थोडंफार पोट सुटलेल्या बायकांच्याच प्रतिमा दिसतील.

त्या सगळ्या उच्चभ्रू असाव्यात.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून कोणत्याही वेळेला फिरलं की साधारण माझ्या वयोगटातल्या सर्वसामान्य बायका-मुलींपेक्षा मी किती जाडी आहे असं मला दिसतं. खात्यापित्या घरची असले तरी मी फारच जाडी आहे असं मला वाटत नाही. कदाचित सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा भाग असावा; पण एकूणच भारतात सगळ्याच स्त्रिया ठसठशीत असतात हे पटत नाही.
उंचीचं म्हणाल तर आपल्याकडे अजूनही पुढची पिढी उंच होत जाते आहे; माझ्या ओळखीतल्या सगळ्याच मुली आपल्या आईपेक्षा निदान दोन इंचा (~ पाच सेंटीमीटर)ने उंच आहेत. एकेकाळची सुबक ठेंगणी आता निदान पाच फूट (१५२ सेमी) ची आहे. आणि आणखी पंचवीस वर्षांत ही उंची आणखी निश्चितच वाढेल. एकेकाळचे मुलगे सुबक ठेंगण्या पहात वाढत असले तरी शिल्पा शेट्टी आणि कत्रिना कैफ यांच्यासारख्या उंच मुली भारतातही कमी नाहीत.

व्यक्तिगत निवड, मलातरी शिडशिडीत, अ‍ॅथलेटीक दिसणार्‍या, असणार्‍या स्त्रियाच जास्त आकर्षक वाटतात; कत्रिना कैफ, दीपिका पदुकोण आणि सायना नेहवालही!

1234 Fri, 02/12/2011 - 14:46

आणि हो, या सगळ्या स्मितांत आम्हाला आपली स्मिता पाटीलच भयानक आवडते.
तिनेही काही चित्रपटांत उगाचच सेक्सी दिसायचा प्रयत्न केला आहे. पण आमच्या मते तिच्या चेहर्‍यात (आणि डोळ्यांत)च तिचे सारे सेक्स अपिल आहे.

गवि Fri, 02/12/2011 - 15:54

In reply to by 1234

कत्रिना सोडून स्मिता पाटील..

नॉस्टाल्जिया... ;)

नंदा प्रधान Fri, 02/12/2011 - 15:28

सिल्क स्मिता आवडते. तिच्या डोळ्यांत एक मादक अपील आहे.

योगप्रभू Fri, 02/12/2011 - 16:29

भारतातले पुरुष वखवखलेले असतात, हे प्रसिद्ध वाक्य आमच्या श्रद्धास्थान असलेल्या संत मांदियाळीतील ज्येष्ठ तपस्विनी पूजाताई बेदी यांचे आहे. कृपया त्यांना विसरु नका.

हा सर्व्हे अपुरा आहे. खर तर वयात आल्यापासून ते गलितगात्र होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पुरुष हा वखवखलेलाच असतो. उगा आपलं एकच एक मध्यमवयीन पुरुषाला कशाला धोपटायचं ते?

बाईमाणसाचा उल्लेख नाही ते चांगलय. गुणाच्या गं सगळ्या बाळ्या त्या ;)

एकतर 'ही' किंवा 'ती' असे पर्याय का देता?
क्यों दोनो रह नही सकती क्या? (वाक्य संदर्भ - चित्रपट : खोसला का घोसला)

ऋषिकेश Fri, 02/12/2011 - 16:37

In reply to by योगप्रभू

एकतर 'ही' किंवा 'ती' असे पर्याय का देता?
क्यों दोनो रह नही सकती क्या?

अगदी अगदी! दोन्ही असु शकतातच की? पन येक आवडती आस्ते की न्हायी? ;)

इथे (मराठी संस्थळांवर) 'पुजा' या शब्दालाच मोठा इतिहास असल्याने ज्याने त्याने पूजेबद्दलचं चिंतन खाजगीत करावे. ;) बेदींची पुजा म्हटल्यावर वेगळाच अर्थ निघायचा :P

आडकित्ता Mon, 05/12/2011 - 00:31

In reply to by योगप्रभू

गलित गात्र होई तंवर
सग्ळयेच वख्वख्तात हो! गात्रं गळली की परत पुढ्ल्या कार्यक्रमा जन्मा पर्यंत शांत!
ॐ शांती:

मी Fri, 02/12/2011 - 18:09

अतिशय महत्वाचा आणि खर्‍या अर्थाने अभिजात विषय चर्चेला आणल्याबद्दल आभार.

दाव्याबद्दलचं मत -
भारतिय पुरुषांमध्ये अढळणारे खवखव-तत्व ह्यात नुसती मानसिकताच नव्हे तर त्यामागे समजण्यास अत्यंत कठीण अशी जैवरासयनिक गुंतागुंत आहे,तसेच बायोइलॉजिकलता, सोशलसिग्मा, कौटुंबिकपास्मार, सोपसिरयली, पाश्चिमात्यवैश्विक, आकारलोलुपता असे अनेक कर्व्ह्स् आहेत, हि खवखव नसुन खाइखाइ आहे, ही खाखा सर्वव्यापी आहे, कॅडबरी सिल्क असो वा सिल्क स्मिता असो, ही खाखा कुठे आणि किती अढळुन येते हे सांगण्यासाठी सर्व्हेक्षणाची काही गरज आहे असे वाटत नाही.

-- मुळातली सिल्क स्मिता आणि विद्याची सिल्क स्मिता यांची तुलना करता तुम्हाला कोण अधिक 'अपिलिंग' वाटली
जात,पोटजात/धर्म/वर्ण सोडून इतर कुठल्याही भेदभावा(इनडिस्क्रिमीनेशन)बद्दल मला मला तिडिक आहे. (जात,पोटजात/धर्म/वर्ण बद्दल अति तिडिक असु शकते, तलवारी म्यान करा)
-- वरच्या रिपोर्ट मधील निरिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटत?
निरिक्षण मराठी वृत्तपत्रातिल नसल्याने त्याबद्दल विषेश तुच्छता वाटते.
-- तुम्ही Dirty Picture बघणार का? असल्यास कोणत्या कारणासाठी?
बघणार की नाही हा प्रश्न तुर्तास टॉरेन्ट कट्ट्यावरिल चर्चेचा प्रश्न आहे, योग्य वेळ आल्यावर त्याचे उत्तर देण्यात येइल.
-- बाकी, या विषयावर एखादी जनरल टिप्पणी काय कराल?
ह्यावर अख्खे भाषण देउ शकतो पण वेळे-अभावी फक्त ही टिप्पणी - असे समाजप्रबोधक, विचारप्रवर्तक, स्मरणरंजक, भावनोत्तेजक विचार दृक्-श्राव्य माध्यामातुन जास्तित-जास्त मराठी लोकांपर्यंत पोचावेत..जेणेकरुन त्यांची आवड बदलेल व ते अधिक खुल्या मनाने वास्तवाच्या सर्व कर्व्हसच्या मुळाशी जातिल, त्याचप्रमाणे तथाकथित राष्ट्रभाषेतिल हा विचार मराठीत अनुवादित करुन गाळातिल लोकांपर्यत पोचविला जाणे अतिमहत्वाचे आहे.

ह्यावर अधिक उद्बोधक विचारवंतांचे विचार एकवयाचे असल्यास मध्य पुण्यातिल कुठल्याही कट्ट्यावर जावे.

... Fri, 02/12/2011 - 23:15

डर्टी पिक्चर आम्ही कशाला बघू.
त्या ईम्रानला बघायला २५० रुपड्याची कशाला वाट लावा
मीतर अग्निपथची वाट बघतेय. हृतिक रोशन काय हँडसम दिसतोय प्रोमोत.

बाकी वरती म्हटल्याप्रमाणे आवडणारी एकमेव स्मिता म्हणजे स्मिता पाटीलच.

सोकाजीरावत्रिलोकेकर Mon, 05/12/2011 - 00:00

अतिशय टुकार धागा, आमच्या चेतन गुगळेंचा अशारिरीक प्रेम (Platonic Love) हा धागा वाचला असता तर असला टुकार धागा काढायची वेळच नसती आली

- ('विद्या'र्थी) सोकाजी

1234 Tue, 06/12/2011 - 01:00

लिहिण्यास कारण की डर्टी पिक्चरच्या दोन गाण्यांचं शूटिंग माझ्या गावात झालेलं आहे. म्हणूनही हा पिक्चर बघणार आहे.
त्यांच्या क्रू च्या बरेच जणांना इथल्या पाण्याने(बॉटल्ड हो बॉटल्ड!)इन्फेक्शन झालेले असल्याने :( त्या काळात माझं क्लिनिक शूटिंगवाल्या माणसांनी भरलेलं असे. :)
पन जळ्ळा मेला तो इम्रान नी ती विद्या काही आली नाही.
बहुतांशी लोक तेलगू असल्याने आम्हाला दुभाषे ठेवावे लागले होते.
त्यामुळे आमच्या गावात या पिक्चरचे अगदी वाजत गाजत स्वागत झाले आहे.
तर कृपया नोट की माझ्या पहिल्या प्रतिसादात पिक्चर बघण्याचे हे ही कारण अ‍ॅड करायचे आहे

धनंजय Tue, 06/12/2011 - 02:27

> -- तुम्ही Dirty Picture बघणार का? असल्यास कोणत्या कारणासाठी?

"डर्टी पिक्चर" कितपत चांगला बनवला आहे, माहीत नाही. परंतु एका पोर्न तारकेबाबत बनवलेला "डीप थ्रोट" जमला तर बघेन. तो चांगला आहे, म्हणे. (तिच्या एका पोर्नपटाचे नावही "डीप थ्रोट" आहे, परंतु तो बघण्याबाबत कंटाळा वाटतो आहे.)

Nile Tue, 06/12/2011 - 03:04

आज सिल्क स्मिता आणि तिच्या जीवनावर एक चित्रपट निघाला आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असेल (नसेल तर आता कळले असेलच)

तरीच म्हणतोय सगळे फेसबुकावर डर्टी पिच्चर डर्टी पिच्चर का कोकलताहेत!! नव्हतं माहीत राव.

त्याच अनुशंगाने आजच्या DNA या वृत्तपत्रामधील एका रिपोर्टमधे भारतीय पुरुषांना नाजुक, नजाकतदार सौंदर्यापेक्षा 'भरगच्च सौंदर्य' अधिक आवडत असं दिलंय.

म्हणजे आम्ही फक्त जन्मानेच भारतीय वाटतं!! ;-)

तुम्ही Dirty Picture बघणार का? असल्यास कोणत्या कारणासाठी?

शीडी पाठवणार असाल तर पाहू! ;-) आता फूकटात (तेही डर्टी!!) पिच्चर बघायला मिळणार असेल तर कोण सोडेल हो!!

ऋषिकेश Tue, 06/12/2011 - 09:13

In reply to by Nile

म्हणजे आम्ही फक्त जन्मानेच भारतीय वाटतं!!

हॅ हॅ हॅ ;)

शीडी पाठवणार असाल तर पाहू!

आपल्याला बॉ हवे ते (डर्टी) पिक्चर नेटावर कसे बघायचे हे अजिब्बात माहित नाहि, अशी प्रतिमा तयार करण्याचा क्षीण प्रयत्न ;)

गब्बर सिंग Sat, 23/05/2015 - 04:51

-- वरच्या रिपोर्ट मधील निरिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटत?

From men's stand point it is NEVER about white Vs. black, big Vs small, blond vs brunette, or slim Vs busty/bbw .....

From men's stand point it is always about new Vs old. Period.

____ Bill Maher

काव्या Sat, 23/05/2015 - 16:46

In reply to by गब्बर सिंग

From men's stand point it is always about new Vs old. Period.

झकास to the point उत्तर आहे. =)) वाक्य वाचून हहपुवा झाली.
.
खरे आहे पुरुष भ्रमर वृत्तीचे असतात. अन प्रत्येक सत्य/विधान चांगलं की वाईट या निकषावरती घासायचं नसतं कधी कधी फक्त स्वीकारायचं असतं.