Skip to main content

एकारा

विसरायला काय होते तुला.. जीवनाचा ओघ.
वाळू निसटावी आणि फैलावी तशी सैल पडलेली तुझी धावपळ.

रूजलेली मुळें किती खोल आहे, या जीवनाची, तुला कुठे ठावूक आहे..

ऊन पडावे तसे तुला आठवणींचा पान्हा फुटतो आणि रात्र उजाडावी तशी जरा जीर्ण आकारशून्य निराशा वेढून घेते.

लाल रंगावर निळाई तरळते तसं तुझं शरीर. बालकवींचा औदुंबर जसा.
स्नायूंच्या चेतनाचे दरवाजे आतून बंद केलेले, की आतच ढकललेले.

बागेतल्या मकरंदावर दरोडा घालणारे भुंगे तुझ्या आयुष्यात आलेत,
बाग बनवून गेले आयुष्याला तुझ्या..

दुसरा नाही, म्हणून तू राहतो, निजतो, गुंडाळून घेतो एकारातच..
वाह!