प्रतापगडाची उलटवलेली बाजी - अफ़झलखानाचा पुर्व परिचय - भाग २

1

1

1

भाग १ विषय प्रवेश

शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारले. या लढ्याची मांडणी अफजल खानाच्या बाजूने मांडण्यातून त्याच्या चाली काय होत्या यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न…

इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो असे म्हणतात.
जे हारतात त्यांची बाजू काय असेल? त्यांच्या हातून काही गफलत झाल्या त्यामुळे जिंकलेली बाजी हरायची वेळ आली? याचा ओहापोह करायला हवा असतो.
तो केला जातोच असे नाही. शिवाय केला तर आपल्या चुका इतरांना कळून येऊ नयेत म्हणून असे *अहवाल दाबून ठेवले जातात. काही काळानंतर हार झालेल्या संग्रामातील मनुष्य, धन, वैभव, प्रतिष्ठा यांची हानी झाली तरी ती लढाई खरे तर आम्हीच जिंकली होती असे स्वतःची पाठ थोपटून म्हणण्याचा प्रघात पडतो. मराठ्यांच्या पानिपतच्या लढाईचा संदर्भात असे काहीसे लक्षात येते. असो.
इतिहासाच्या पानांवर बरेच काही लिहीलेले नसते. कारण तसे पुरावे अनुपलब्ध असतात. पण ते समजावून घेणारे डोळे आणि कान असतील तर छोट्या टिंबाना जोडून काही शोधता येईल का असा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

शिवाजी महाराजांना सुपर मॅन बनवले जाऊ नये. कल्पकता, चातुर्य, साहस, मिळालेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करणारे, विपरीत परिस्थितीत मानसिक संतुलन ठेवण्याची कला प्राप्त अशा गुणांचे थोर सेनानी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जावे. दरवेळी नव्या युक्त्या वापरून समोरच्या व्यक्तीला, सेनेला नामोहरम करण्याचे कसब त्यांना जागतिक कीर्तीचे महान सेनापती, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करायला सदैव तत्पर चारित्र्यवान राज्यकर्ता म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देते.
त्यांचे विरोधक अशा सद्गुणांचे नसतील तर काय होते ते आपणास माहित आहे. म्हणून त्यांनी तयार केलेल्या संकल्पना, युद्ध नेतृत्वाची दखल घेतली पाहिजे. पुढच्या काही भागात अफझलखानाच्या संदर्भात असाच एक शोध.

….

*अलिकडच्या काळात पाकिस्तानने सन १९७१ च्या पराजयाची कारणे शोधायचा अहवाल, सन १९९९ कारगिल युद्धातील घटना व हानी यांचा अहवाल प्रकाशित केले नाहीत. २५ /११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा शोध अहवाल का उघड केला जात नाही? असा प्रश्न खुद्द नवाज़ शरीफ पंतप्रधानपदावरून काढून टाकल्यावर मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स बोलावून विचारत होते!
१९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारतीय लष्कराने तयार केलेला टॉप सीक्रेट अहवाल फक्त 'फॉर युवर आईज ओन्ली' असा शिक्का मारून एका अर्थाने लपवला जातो. लेफ्टनंट जनरल शेकटकरांनी तो पाहिल्याचे सांगताना तो अहवाल सेनेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पहायला अशक्य असल्याचे नोंदवले आहे.

1

एमबेडेड कोड टाकून हा भाग २ सादर केला आहे. वाचायला कसा वाटतो ते सांगा...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

देऊन तयार करण्यात आलेल्या कामात फोटो टाकत बसायचे काम वाचते. हवा तो फॉन्ट वापरता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0