जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

तुमचं असं कधी झालंय का की तुम्ही एखादा पिक्चर "आवडायला हवा" हे ठरवूनच पिक्चर बघायला गेलाय? असं झालं की थोडी गोची होते.

"जॉनी गद्दार" बघून राघवनची भयंकर स्तुती केल्यावर नंतर त्याचा "एजंट विनोद" आला तेव्हा मी थेटरात धावलो होतो.

कसला कमाल चित्रपट असणारे अशी डोक्यात उगाच एक कीड होती.

पयल्या सीननंतरच ती मेली. एजंट विनोद आवडला नाही म्हणण्याइतका नावडला. एरवी आपण "बरा आहे तसा" "एकदा बघायला ठीक" अशा गुळमुळीत वाक्यांनी समीक्षा करतो. पण राघवनकडून माझ्या उंचावलेल्या अपेक्षा त्याने सपशेल खोट्या ठरवल्या असल्याने मी लोकांना मुद्दामच "अजिबात बघू नका" असेल सल्ले दिले.

मग बदलापूर आला. मी थोडा धसका घेऊनच बघितला. आवडला, पण जाम नाही. वरूण धवन नावाचं उर्मट वाटणारं कार्ट असल्याने असेल कदाचित.

पुल (अजून कोण?) म्हणतात तसं "ज्याला बघून उगाच एक ठेवून द्यावीशी वाटते" अशा चेहेऱ्याचा माणूस आहे वरूण धवन. बघूनच त्याच्या चहात थुकावंसं वाटतं. नवाज आणि हुमा कुरेशीमुळे उरलेला पिक्चर एन्जॉय केला मी. नावाला मात्र मनापासून दाद - "बदलापूर". लोललोललोल

मग राघवन गुल झाला. मी पण खूप पिक्चर पाहिले नाहीत थेटरात, सामोसेसुद्धा थेटराशिवाय बाकी ठिकाणी सहज मिळायला लागले आणि तेही एक कारण कमी झालं. माझा एक मित्र अम्रीकेत सामोसे खायचे झाले की एका कळकट थेटरात जाऊन हिंदी पिक्चर बघायचा. "बॉबी जासूस" हा चित्रपट त्याने केवळ सामोश्यासाठी पहिला. असो.

मग अगदी अचानक "अंधाधुन" अशा नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर व्हॉटसअँपवर येऊन पडला. आई शप्पत न सांगता कळलं की राघवन परातलाय.

आधी मी पिक्चरचं नाव "अंदाधूंद" असं वाचलं आणि मग ते "अंधाधून" आहे असं समजलं.

मी असं ऐकलं की श्रीराम राघवनला चित्रपटाचा ट्रेलर पूर्ण काळोखात दाखवायचा होता. पण बाकीचे लोकं (प्रसिद्धी वगैरे) म्हणाले की नको म्हणून. तसं केलं तर कदाचित लोकांना कळणार नाही. खरं खोटं राघवनलाच ठाऊक, पण त्याच्या कल्पनेतला ट्रेलर बघायला मजा आली असती.

====*====

ष्टोरी वगैरे सांगण्यात काही मजा नाही. पण काही गोष्टी बेहद्द आवडल्या त्यांची यादी देतोय.

सुरूवातीलाच "चित्रहार" आणि "छायागीत" ह्यांना चित्रपट अर्पण केला आहे, ते मेजर आवडलं.

राघवन त्याच्या सगळ्याच पिक्चर्समधे जुन्या हिंदी चित्रपटांचे रेफरन्स पेरीत असतो. कित्येकदा ते उघड असतात (जॉनी गद्दारमधला अमिताभचा रेफरन्स) किंवा मग थोडे छुपे. अंधाधूनमधला उघड रेफरन्स आहे तो आपला एकेकाळचा सर्वोत्कृष्ट नट अनिल काकासाहेब धवन ह्याचा. त्याचे जुने सीन्स, गाणी आणि आजकालचा खराखुरा धवन हा त्याला स्वत:लाच पडद्यावर जगतो असं वाटतं. आपलेच चित्रपट दिवसातून १० वेळा पहाणे, गाडीत स्वत:चीच गाणी लावणे, यूट्यूबवर लोकांच्या कमेंट्स पहाणे इ.इ.

एकंदरीत अनिल धवनला "प्रमोद सिन्हा" हे क्यारेक्टर देऊन राघवनने जब्री मजा केलीये.

====*====

छुपा रेफरन्स मला वाटला तो पिआनोचा. जुन्या काळात कितीही फालतू हिरो असला तरीही तो पियानोवर गाणं वाजवून पोरीला बॉलरूममधून बेडरूमपर्यंत सहज घेऊन जाई. गरीब असला तर निदान पियानोच्या आजूबाजूला घुटमळत गाणं म्हणून आपली अगतिकता दर्शवून देई, कारण हिरवीणच पियानो वाजवी. ((बघा- धीरे धीरे मचल ए दिले बेकरार ह्या गाण्यातील अफाट अफाट चुत्या नायक.) १९५०-१९७० पर्यंतच्या पियानोसहित गाणी असलेल्या चित्रपटांचं एकूण चित्रपटांचं गुणोत्तर काढलं तर ते ०.५ च्या वर जावं असा एक अनभ्यस्त अंदाज आहे. म्हणजे जवळपास अर्ध्या अधिक चित्रपटांतून लोक पियानो वाजवीत.

एवढा पापिलवार असलेला पियानो अमिताभच्या हाणामारीत बहुतेक मोडला तो मोडलाच. आणि साडेसहा फुटांची शिडी पियानो वाजवेल तरी कशी? तेव्हा तेही बरोबरच आहे म्हणा. पण पियानो पूर्णपणे गुल झाला नसावा. कारण नंतरही चाकलेट हिरोंपासून ते अगदी सुनिल शेट्टीनेसारख्यानेसुद्धा त्यावर आपले हात साफ करून घेतले.

अशा पियानोचा राघवनने अंधाधूनमधे खुबीने वापर केला आहे. चित्रपटाच्या शेवटी क्रेडिट्सच्या वेळी राघवनने ही कल्पना अधिक स्पष्टपणे (ऐसीवरच्या उच्चभ्रूंनी मुरडलेली नाकं इथे कल्पावी) मांडली होती. पण थेटरात साला रिलिझच झाला नाही हा सीन. मी जवळपास प्रोजेक्टर थांबेपर्यंत वाट बघितली आणि तरीही सीन नाही म्हटल्यावर हातातला चिंगमचा कागद तसाच थेट्रात निषेध म्हणून टाकला.

====*====
एवढं सांगूनही पिक्चर न बघता इथपऱ्यंत वाचलंत तरी ठीके, पण पुढचे वाचू नका प्लीज. साला, मलाच तुमची काळजी.

पिक्चरमधले दोन सीन अतिउच्च वाटले मला. एक तर तो प्रेताची विल्हेवाट लावण्याचा सीन. केवळ अप्रतिम. माईम का काय म्हणतात ते. बॅगेतून हात बाहेर काढून मग घड्याळ आणि आंगठी काढणे, सिमी आत गेल्यावर आकाश आणि महेंद्रचं ऑकवर्ड पद्धतीने एकत्र असणं इ. इ.

दुसरा सीन म्हणजे सिमी आकाशला भेटायला येते तेव्हाचा किचनमधला भाग. कॅमेरा आकाशकडून सिमिकडे वळतो तेव्हा सिमीने "scream" सारखा खुन्याचा मुखवटा चढवलेला (आपल्याला आणि 'आंधळ्या' आकाशलासुद्धा) दिसतो. त्यानंतर उगाच खाकरून दिलेले एक्स्प्रेशन लाजवाब! हे क्यारेक्टर इरफान किंवा दीपक दोब्रिआलने वगैरे केलं असतं तर काय मजा आली असती- असा एक उगाच हावरट विचार माझ्या मनात आला तेव्हा.

====*====

बऱ्याच लोकांनी "इंटर्वलनंतरचा भाग" इतका आवडला नाही बुवा असं म्हटलंय, आणि ते थोडंफार खरंय. पहिल्या भागात आकाश, सोफी, सिमी, प्रमोद एवढ्या लोकांभोवती घुटमळणारा सिनेमा नंतर एकदम वेगळं वळण घेतो.

मला हा बदल सूक्ष्म बोचला, पण डॉ.स्वामी ह्या माणसाने जिंकलं आपल्याला. सॉलिड धमाल केलीये झाकीर हुसेनने -ह्याला मी कित्येक वर्षं शार्दूल ह्या त्याच्या जॉनी गद्दारमधल्या नावानेच संबोधायचो.

निव्वळ पैशांसाठे बेलाशक कुणाच्याही दोन्ही किडनी काढून विकणारा पण बायकोशी घरातल्या केबल कनेक्शनबद्दल वाद घालणारा बोलणारा डॉक्टर नंतर जेव्हा स्वत:ला "बेसिकली आय ॲम अ डिसेंट म्यान" म्हणतो, तेव्हा मला ते थोडं पटलं.

आणि नेहेमीप्रमाणे राघवनच्या सिनेमातली सगळी पात्रं चापलूस आहेत, कुणीही सरळसोट भाबडा म्हणता येईल असा एकपदरी आयुष्य जगणारा नाही. "everything is fair in survival".
प्रत्येकजण काहीतरी फसवेगिरी करतोय- नाईलाजाने किंवा सवयीने.

आणखी एक म्हणजे चित्रपटाच्या शेवटाबद्दल- मला राघवनची मुलाखत ऐकायचीये किंवा मग त्याच डिरेक्टर्स कट बघायचाय. डॉ. स्वामी आणि आकाश गाडीत बसून जाताना -
डॉ स्वामी "what is life? it depends on the liver" असा एक शेरा मारतात आणि मग आपल्याला गाडी लांबवर जाताना दिसत रहाते आणि एका झाडापाशी दिसेनाशी होते.
हा माझ्या मते चित्रपटाचा वरिजिनल अंत - द एंड असावा. कारण तो पर्फेक्ट आहे.
नंतरचा भाग "चिकटवला" आहे हे माझं मत. पुढे आलेलं स्पष्टीकरण, मग त्यातली अपेक्षित ट्विस्ट हे जुळून आलं तरी तितकसं नैसर्गिक वाटत नाही.
पण तरी मग सशाचा सीन कुठे फिट करायचा हा प्रश्न उरतोच.
जाणकारांनी (चिंजं- विषारी वडापाव साहेब..) ह्यावर प्रकाश टाकला तर उत्तम.

शिवाय पहिलेछूटच माहिती होतं की चित्रपट एका फ्रेंच शॉर्टफिल्मवर आधारित आहे. शंका- हे चित्रपटाच्या शेवटच्या क्रेडिट्समधे येतं. ते आधी यायला हवं का? पण ही खुस्पटं चित्रपट पाहिल्यावर डोक्यात आली.

पण एकंदरीत जियो राघवन !

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

चित्रपट पाहात नाही म्हणून लेख वाचला. सहमती/विरोधी मत नाही म्हणून एक तारा चिकटवला.
केवळ वामा कशाला म्हणून ही खरड. या खरडीला केराच्या टोपलीत किंवा दरीत फेका.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"चित्रपट पहात नाही" - कुठलाच नाही? हे माझ्यासाठी एकदम नवीन आहे.
रिस्पेक्ट! ( तिरंगातले निवडक सीन्स बघितले तर तुम्हाला चित्रपट आवडू लागतील...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा एक मित्र अम्रीकेत सामोसे खायचे झाले की एका कळकट थेटरात जाऊन हिंदी पिक्चर बघायचा. "बॉबी जासूस" हा चित्रपट त्याने केवळ सामोश्यासाठी पहिला. असो.

खी: खी: खी:, शंकर पाटलांच्या एका कथेतलं 'शामोश्यांची शमश्या' आठवलं Smile

आणि साडेसहा फुटांची शिडी पियानो वाजवेल तरी कशी?

चित्रपटाच्या शेवटी क्रेडिट्सच्या वेळी राघवनने ही कल्पना अधिक स्पष्टपणे (ऐसीवरच्या उच्चभ्रूंनी मुरडलेली नाकं इथे कल्पावी) मांडली होती.

हे खास अस्वली बेअरिंग!
मात्र 'साला, मलाच तुमची काळजी.' हे वाचून हळवा होऊन पुढे वाचलं नाही. पिच्चर पाहून झाल्यावर परत वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारएन्डी परीक्षणे खूपच आवडायची. पण हल्ली बऱ्याच दिवसांत, त्यांच्याकडून काही नवीन आले नाही. आता बरं झालं. त्याच तोडीची परीक्षणे लिहिणारे अस्वल आले. तुम्हीतरी नियमित लिहित जावा हो. त्यांच्यासारखं, ताटकळत नका ठेवू आम्हाला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता फारएण्डी परीक्षणं आली नाही ते बरंच झालं. इकडे चित्रपटाने इतक्या आठवड्यांतच इतका **कोटींचा गल्ला गोळा केला अशा बातम्या. पैसे गुंतवलेले खुश तर परीक्षणंही उटपटांग विनोदीच हवीत. न पाहणाऱ्यांची तरी करमणूक.
--
Dw documentaries मात्र आवडीने पाहतो॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिक्चर मरू दे , ते बघतच नाही फार. पण लिहिताय झकास. चालू राहू देत.
अस्वलराव आता लिहिणं थांबवलंत तर तर तुम्हालाच गुदगुल्या करायला लागतील .
नख वाढवायला लागलोय , तेव्हा सावधान ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा बघितलेला नाही, पण बघायचा आहे म्हणून अर्धा लेखच वाचला. सामोसे काय, चहात थुंकणं काय, पियानोचा विद्रटपणा काय... अस्वल पेटलंय.

'जॉनी गद्दार' मलाही आवडला होता. खून कोणी केला, हे सुरुवातीलाच समजूनही खून का केला, हे बघत बसावंसं वाटतं. ढेरेबुवांनी मध्यंतरी आठवण करून दिली, 'एक हसीना थी'सुद्धा श्रीराम राघवनचाच. तोही आवडला होता. बाकी दोन हिरे मी बघितले नाहीत.

'अंधाधुन' नेटफ्लिक्सवर येईस्तोवर आता वाट बघावी लागणार. स्थानिक थेट्रांतले भारतीय सिनेमे म्हणजे 'घाशीनाथ काणेकर' (आजच एक शो) किंवा 'ठग्ज'. दोन्ही बघण्याची इच्छा नाही. सालं आपलं टायमिंगच चुकलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चर्चेत भर म्हणून इथलं वाचावं अशी शिफारस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुल (अजून कोण?) म्हणतात तसं "ज्याला बघून उगाच एक ठेवून द्यावीशी वाटते" अशा चेहेऱ्याचा माणूस आहे वरूण धवन. बघूनच त्याच्या चहात थुकावंसं वाटतं.

ख्याख्याख्या.. बिचाऱ्याची किती ठासाल!
हुम्मा!!!!!! वाह!! हुम्मने तब्बुचा रोल फर्मास केला असता असे मला वाटते.

मला अंधाधून जॉनी गद्दारपेक्षा जास्त आवडला. जॉनी गद्दारमध्ये अनेक सिन्स गरजेपेक्षा अधिक एक्स्प्लेन करत बसतात असे वाटते. अंधाधून योग्य ठिकाणी स्पष्ट-अस्पष्ट होतो. तब्बुच्या कॅरेक्टरमधला थंड क्रूरपणा, तिची व्हल्नरेबिलिटी, बुद्धीबळातल्या चाली खेळल्यासारखी विचारपद्धती फार अफाट पद्धतीने दाखवलीये राघवनने.

हा माझ्या मते चित्रपटाचा वरिजिनल अंत - द एंड असावा. कारण तो पर्फेक्ट आहे.

एकदम बरोबर. तसेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

@अदिती- तू बघच "काशिनाथ घाणेकर..." आणि लिही एक परिक्षण. होउ दे खर्च.
@अमुक - सर तुम्ही बेस्ट आहात. ही लिंक वाचून बरंच बरं वाटलं. Smile
@पुंबा- खरंच वरूण धवन डोक्यात जातो राव. तबू मला पण जाम आवडते. ह्या पिच्चरमधेपण मस्त काम केलंय पण "त्यात काय, ही तर तब्बू आहे, तिने मकबूल केलाय तेव्हा .. " असं वाटलं.
अंताबद्दल वर अमुकसरांनी दिलेली लिंक बघा नक्की!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळी अंकाचं काम सुरू असताना, ऑस्टिनात घाशिनाथ काणेकर येणार असल्याची जाहिरात दिसली. मी मोठ्या हौसेनं ठरवलं, सिनेमा बघायचा. सुदैवानं, एकमेव शो होता त्याच्या ५-६ दिवस आधी काम संपलं, आणि मती ठिकाणावर आली. तेरा डॉलर, चौदा सेंटचं फार पडलेलं नव्हतं; पण दोन तासांचा सिनेमा आणि वरकड वेळखर्च वाचला.

तब्बू मलाही आवडते. 'चीनी कम' बघितल्यापासून मी तिच्या प्रेमात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@अमुक - सर तुम्ही बेस्ट आहात. ही लिंक वाचून बरंच बरं वाटलं.
...चित्रपट पाहिला नसल्याने तुमचा आणि दुव्यातलाही लेख वाचलेला नाही. तुमच्या लिखाणावर लौ असणाऱ्या एकांनी तुमचा हा धागा वाचून त्या दुव्याची शिफारस केली म्हणून तो इथे इमानेइतबारे डकवला. त्यामुळे सर-बेस्ट वगैरे आदरसत्काराने तुडुंब अवघडलो. तुम्ही बहाल केलेला 'सर' क़िताब त्यांच्याकडे तुरंत बाइज्जत रवाना किया हैं. आम्हांला अमुक-एक-कुणी राहू द्यात. तुम्हांला दुवा वाचून बरं वाटल्याने आम्हांलाही बरं वाटलं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक सर, असे अवघडून जाऊ नका हो. तुमच्याबद्दल आदर आहे इथे लोकांना. घरचे प्रेम आहेर समजा आणि त्याचा स्वीकार करा.
विलायतेत राहून मोठमोठ्या विषयांमधे संशोधन करीत असूनही विनम्रपणे इथे सामील होणाऱ्या लोकां बद्दल लोकांबद्दल आदर वाटतो मंडळींना ..
अवांतर:आपल्यासारख्या प्रमाणभाषिक लेखकाच्या पोस्ट मध्ये लौ हे अक्षर रोचक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंधाधून १६ डिसेंबरनंतर नेट्फ्लिक्सावर येणारे अशी बातमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेटफलिक्सात आला आणि पाहिला. तुफान भारी! जियो राघवन.

शेवटाबद्दल : तब्बूच्या कॅरेक्टरचं काय झालं ते कळत नाही तोपर्यंत शेवट अनेक शक्यतांनी होऊ शकतो. म्हणजे तो ओपन आहे.

बाकी तपशिलात नंतर लिहितो. (परत एकदा पाहून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल पुन्हा एकदा चित्रपट पहिला.

डॉ स्वामी "what is life? it depends on the liver" असा एक शेरा मारतात आणि मग आपल्याला गाडी लांबवर जाताना दिसत रहाते आणि एका झाडापाशी दिसेनाशी होते.

या प्रसंगानंतर जो भाग ' चिकटवला ' आहे, तो आकाशने केलेला खोटारडेपणा आहे असे वाटते. आंधळ्या आकाशच्या स्टोरीत आलेला ससा हा त्याला त्याच्या काठीवरच्या सशामुळे सुचलेली थाप असावी.

आणि दुसऱ्यांदा पाहताना काही loopholes लक्षात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशहाणा - हो, बऱ्यापैकी तसंच. काठीवरला ससा वापरून त्याने उरलेली गोष्ट तयार केली (नेहेमीच्या संशयितातल्या कॉफीमगप्रमाणे).

आकाश धुतल्या तांदळाचा नाही आणि तोही इतरांप्रमाणेच "सर्व्हायवर" आहे- तेव्हा डोळस होण्यासाठी तो का-ही-ही करील ह्यात मला तरी शंका नाही.
शेवटला भाग आकाशने स्वत:ची छबी उजळवण्यासाठी केलेली बतावणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रसंगानंतर जो भाग ' चिकटवला ' आहे, तो आकाशने केलेला खोटारडेपणा आहे असे वाटते.

चित्रपट सुरू होताना मग जे शॉट्स आहेत ते का दाखवलेत मग? आयुषमानला सशाबद्दल ऐकूनही माहीत होऊ शकते. त्याला तो दिसण्याची काय गरज? त्यामुळे त्याने सशाची काठी वागवणें यात काही विशेष नाही. ( किंवा त्याला ब्रेल लिपीतील प्लेबॉय मासिकं वाचायचा छंद असावा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

४८०पी एमकेव्ही प्रकारात उपलब्ध आहे. हवा असल्यास दुवा धाडेन. व्यनी करा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

दुवा धाडेन, व्यनि करा वगैरे आढेवेढे कशाला. इथे एचडी क्वालिटी उपलब्ध आहे - https://einthusan.tv/movie/watch/3ShE/?lang=hindi

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशहाणपणाबद्दल धन्यवाद. पण तुमचा दुवा अतिफालतू आहे वाटतं नीट उघडत नाही. अतिशिघ्र दुरुस्ती करावी अशी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

गुगलवर सर्च करताना, index of *चित्रपटाचे नाव* असे सर्च करा. शक्यतो पहिल्या लिंक मध्येच उतरवून घेण्यासाठी बऱ्याच फॉरमॅट मध्ये उपलब्ध असणारा पर्याय मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लेख आणि सिनेमा भारी आहेत.

दुरुस्ती : महेंद्र नाही. मनोहर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुसु - दुरूस्ती आणि शिडीदर्शनासाठी धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0