दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२० एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार ओदिलाँ रेदाँ (१८४०), चित्रकार जोन मिरो (१८९३), संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य सोनोपंत दांडेकर (१८९६), उडिया लेखक गोपीनाथ मोहंती (१९१४), 'याहू'चा सहनिर्माता डेव्हीड फिलो (१९६६)
मृत्युदिवस : 'ड्रॅक्युला'चा लेखक ब्रॅम स्टोकर (१९१२), बासरीवादक पं. पन्नालाल घोष (१९६०), 'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य (१९६८), कवी शकील बदायुनी (१९७०), 'रुचिरा'कार कमलाबाई ओगले (१९९९)
---
४/२० - आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.
१२३३ : 'इन्क्विझिशन'ची सुरुवात.
१६५७ : न्यूयॉर्कमधल्या ज्यू लोकांना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
१७७० : कॅप्टन कुकच्या जहाजांना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
१८६२ : लुई पास्चर आणि क्लोद बर्नार यांनी अचानक जीवोत्पत्तीचा सिद्धांत खोडणारा प्रयोग पूर्ण केला.
१८६५ : समुद्र वा तलावातल्या पाण्याची पारदर्शकता मोजू शकणाऱ्या सेची चकतीचा पहिला प्रयोग पियेत्रो सेचीने दाखवला.
१९०२ : मेरी आणि पिएर क्यूरी यांनी रेडियम क्लोराईड पिचब्लेंडमधून वेगळे केले.
१९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
१९७२ : इंजिनातल्या बिघाडावर मात करून अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
१९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
१९९९ : कोलंबाईन रक्तपात - अमेरिकेतल्या कोलंबाईन शाळेत दोघांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांच्यासह १५ मृत. शस्त्र बाळगण्याचे अमेरिकन स्वातंत्र्य त्या निमित्ताने चर्चेत.
२००१ : चीनमध्ये मानसिक आजारांच्या यादीतून समलैंगिकतेला वगळले.
२००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
२०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
२०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिअॅक्टर बंद.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- अबापट
- 'न'वी बाजू
दुपारी एक दीड नंतर लैच पालटलं
दुपारी एक दीड नंतर लैच पालटलं चित्र. कटटूकट फाईट आहे मुंबईमध्ये. फडणवीस आजचे मॅन ऑफ द मॅच. लातूरमध्ये म्हणे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कॉंंग्रेसचा पराभव.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
चला , खुर्ची वाचली म्हणायची
चला , खुर्ची वाचली म्हणायची त्यांची !!!
बाय द वे , अभ्या नि सोलापुरात कोणाची पोश्टर/ पॅम्फ्लेट केली होती ? भाजप असणार बहुतेक !!
बापटाण्णा, फडणवीसांपेक्षा
बापटाण्णा, फडणवीसांपेक्षा माझं अभिनंदन करा. जेवढ्यांचे कॅम्पेन डिझाईन मी केले ते सगळे आले. एकही पडला नाही. सगळे सेना.
दाखवा रे दाखवा
हा हा हा. इकडे सॅम्पल तरी द्या तुमच्या 'त्या' कामाचं!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नको नको जंतुराव. मला धंदा
नको नको जंतुराव. मला धंदा करता येत नाही, कस्टमरच्या विचारांचा आदर करता येत नाही हे इथंच ऐकलय. आता कस्टमरांची प्रायवसीही जपता येत नाही म्हनून ऐकावे लागेल.
या एकदा सोलापूरला. सगळा पोर्टफोलिओ दाखवेन.
.
बापटाण्णा, थ्यांकू बरका. एक पार्टी घ्या माझ्याकडून. कवाबी, कसलीबी.
अभिनंदन अभ्या! स्वतःच्या
अभिनंदन अभ्या!
स्वतःच्या चांगल्या कामाची झैरात, प्रअँमा करण्यात का हिचकीचाहट? क्लायन्टशी जे काही काँन्फीडन्शीअलीटी, प्रायवसीचे T&C ठरलेत ते ब्रीच न करता स्वतःला प्रमोट करता येइलच की!
अजोंच माहीत नाही पण मी फक्त माझं मत सांगत होते की 'ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीबद्दल पीठपिछे नावं ठेवणं मलातरी योग्य वाटलं नाही'.
एनीवे ओळखीतल्या पुरोगाम्यांना पोर्टफोलियो दाखवायची आयड्यादेखील छान. तुला आवडतील असे ग्राहक त्यांच्यामार्फत मिळाले तर चांगलेच आहे. त्यासाठी शुभेच्छा! मग बिनधास्त डंप त्या प्रतिगामी ग्राहकांना आणि घाल काय शिव्या घालायच्यात त्या
(या विषयावर ही शेवटची पोस्ट)
अभ्या शेठ , जरा कंफ्युजन आहे
अभ्या शेठ ,
जरा कंफ्युजन आहे इथे. तुम्ही कस्टमर करता पब्लिसिटी मटेरियल तयार केलं होतत . कस्टमर नि पब्लिसिटी केली आणि जिकला . आता कस्टमर नि जगाला दाखवलेली गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवल्याने नक्की कसली प्रायव्हसी ब्रीच होणारे , काय समजलं नाही . कस्टमर फार तर अभ्याशेठ नि सोत्ताहून प्रचार केला म्हणेल . ( त्याचे वेगळे हजार रुपये आणि बिर्याणी सोडू नका !!! तवा लावा हितं पोश्टर ते !!!
आणि " मला धंदा करता येत नाही, "वगैरे काय भानगड आहे ?
बापटाण्णा, कॅम्पेनिंग आजकाल
बापटाण्णा, कॅम्पेनिंग आजकाल विकासाचे थोडीच होते? प्रतिस्पर्ध्याच्या वीक पॉइंटावर इलेक्शन खेळल्या जातात. याचेच कॅम्पेनिंग सोशल मिडीयावर केले जाते. लोक वाईटातला चांगला हुडकतात. आम्ही आमच्या ग्राहकाच्या प्रतिस्पर्ध्यांना जास्त वाईट करतो. आणि सांगायचे म्हणजे ते प्रतिस्पर्धी अजून जिवंत/अॅक्टीव्ह आहेत. मलाही राह्यचेय.
होय अभ्या, हार्दिक अभिनंदन
होय अभ्या, हार्दिक अभिनंदन !!!
शिवसेनेला शेवटच्या आधी
शिवसेनेला शेवटच्या आधी दिसणार्या लीड सीट्सवर काँग्रेसने शेवटी शेवटी अगदी थोडक्या मार्जिनने हरवलेलं दिसतंय.
आधी कल २००च्या आसपासच्या सीट्सचे दिसत होते. उरलेल्या २०-२२ पैकी भाजपाने खूप मारल्या आणि शिवसेनेच्या ६-७ तरी काँग्रस/एन्सीपीच्याकडे गेल्या असाव्यात.
आता राज्यसरकार पडत नाही! हुश्श!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
>>आता राज्यसरकार पडत नाही!
>>आता राज्यसरकार पडत नाही! हुश्श!
शिवाय "लोकांच्या मनातल्या" मुख्यमंत्र्यांचा सुद्धा पत्ता कट झाला
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
?
मुंडे का खडसे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada...
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा हा हा, फडणवीसांचा
हा हा हा, फडणवीसांचा सुंठेवाचून खोकला गेला.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
वन डे
मुंबईतल्या निकालाचा शेवट, वन डे मॅच सारखा वाटला. शिवसेना जिंकते असे वाटत असताना अचानक ९३ वरुन ८४ वर घसरली आणि भाजपचे कासव ८२ पर्यंत पोचले.
उद्धव ठाकरे म्हणतात की हा भाजपाचा पैशाचा विजय आहे, पण लोकसत्तेत रोज भाजपाच्या फुल पेज जाहिरातीबरोबर यांची दोन फुलपेज जाहिरात असायची.
अरे, प्रचार साहित्य होतं ना ?
अरे, प्रचार साहित्य होतं ना ? ते प्रायवेट कसं असलं ? कसला धंदा करता येत नाही ? कोण ते ?