रक्तदाब, नाडीचे ठोके यांसंदर्भात शंका

या प्रश्नांची गूगल करून उत्तरं मिळतील याबद्दल खात्री आहे. पण नक्की काय गूगल करायचं आणि कोणावर विश्वास ठेवायचा इथपासून थोड्या शंका आहेत, शिवाय बराच आळस आहे म्हणून इथेच धागा काढलाय.

सामान्य स्थितीतला माझा रक्तदाब आणि नाडीचे ठोके सरासरीपेक्षा कमी असतात. सहज चालण्याची जी गती आहे त्या गतीने तासभर चालत डेंटिस्टकडे गेल्यावर तिथे रक्तदाब, नाडीचे ठोके मोजले जायचे ते १२०/८०, ७२-७५ असे यायचे. रक्तदाब नियमितपणे मोजायचं उपकरण माझ्याकडे नाही. नाडीचे ठोके ट्रेडमिलवर मोजता येतात. वीसेक मिनीट ४.५ मैल/तास (~ ७.२५ किमी/तास) या वेगाने धावल्यावर ठोके ~ ९०/मिनीट एवढे असतात.

यात प्रश्न असे आहेत की सामान्य रक्तदाब, नाडीचे ठोके सरासरीपेक्षा कमी असणं चांगलं असतं का त्यामुळे काही फरक पडत नाही?
सरासरीपेक्षा रक्तदाब/ठोके कमी असणं हे मुळात हृदयाची शक्ती जास्त असणं आणि/किंवा रक्तवाहिन्यांचा व्यास अधिक असण्याचं लक्षण आहे का?
धावताना व्यवस्थित दम लागतो इतपत कष्ट घेऊनही ठोके १०० पर्यंत जेमतेच पोहोचतात याचा अर्थ माझ्या स्नायूंना कमी ऑक्सिजन पुरतो असा आहे का?
हा प्रश्न उगाच कुतूहल म्हणून - वरच्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर मला वजन कमी करायला तुलनेत अधिक काळ कष्ट करावे लागतील का?

या विषयाबद्दल सहज समजेल अशी विश्वासार्ह माहिती कुठे मिळेल? (इथे मराठीत लिहिली तर आणखी उत्तम.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

तुमच्या फिजिशियनला विचारा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यात प्रश्न असे आहेत की सामान्य रक्तदाब, नाडीचे ठोके सरासरीपेक्षा कमी असणं चांगलं असतं का त्यामुळे काही फरक पडत नाही?

चांगलं असावं बहुतेक. मला तरी असं वाटतं. कारण सांगते - एकदा प्रचंड ट्रान्स्/रिलॅक्सड मूडमध्ये मी डोक्टरांकडे गेलेले. नर्स ने ठोके तपासले खूप कमी आले होते व ती म्हणाली यु आर लकी. आय विश माइन वॉज सेम.
.
माझं बी पी ११०/६५ किंवा ११०/७० असतं. पण नर्स म्हणते छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नर्स ने ठोके तपासले खूप कमी आले होते

माझ्याबाबतीत, नर्स तपासते तेव्हा ठोके हमखास वाढलेले आढळतात!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आमेली'नंतर तुम्हीच. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

:::यात प्रश्न असे आहेत की सामान्य रक्तदाब, नाडीचे ठोके सरासरीपेक्षा कमी असणं चांगलं असतं का त्यामुळे काही फरक पडत नाही?
सरासरीपेक्षा रक्तदाब/ठोके कमी असणं हे मुळात हृदयाची शक्ती जास्त असणं आणि/किंवा रक्तवाहिन्यांचा व्यास अधिक असण्याचं लक्षण आहे का?:::
मानसिक कणखरपणामुळे कशाची भीती वाटत नसणे,लगेच प्रतिकार करण्याची इच्छा नसणे ,लवकर न चिडणे अशा लोकांना कमी रक्तदाब असतो असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या बाबतीत भीती वाटत नाही हे बऱ्यापैकी ठीक. पण "लगेच प्रतिकार करण्याची इच्छा नसणे, लवकर न चिडणे" या सर्वथैव अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत.

अजूनतरी रक्तदाबाचा त्रास मला होत नाही. अनुवांशिकतेने होण्याची भीती बरीच आहे (मला ती भीती वाटते, म्हणून मी नियमितपणे व्यायाम करते). माझे प्रश्न सर्वसामान्य, निरोगी लोकांबद्दल आहेत. मुळातच रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी असण्याबद्दल मला शरीररचनाशास्त्रसंबंधी कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धावायला जाताना आपली किती प्रोग्रेस होतीये हे बघण्यासाठी फिटबिट नामक हातावर घालण्याचा अ‍ॅक्टिविटी ट्रॅकर घेतला... आता त्यात हृदयाचे ठोकेही मोजले जात असल्याने नवीन माहीती कळाली की माझी रेस्टींग हार्टबीट ५० च्या आत आहे. हे ऐकल्यावर कलीग्जनी आ वासला आणी म्हणे हे अ‍ॅबनॉर्मल आहे... जरा शोध घेतल्यावर कळाल की ब्रेडीकार्डीया नावाचा काहीतरी प्रकार असतो. वर हेही कळाल की प्रशिक्षित अ‍ॅथलीट लोकांचे ठोकेही कमी असतात कारण ह्र्द्याची क्षमता चांगली असणे... आता अस्मादिक इतकेही धावण्यात वाकबगार नाहीयेत की एखाद्या अ‍ॅथलीट सारखी ह्रदयक्षमता असावी... तर आता फिजिकल करायला जाईन तेव्हा डागदरास्नी इचारु म्हणुन प्रश्न तुर्तास बाजुला ठेवला आहे...

अवांतरः धावताना सर्वोच्च दम लागलेला असताना ठोके पाहिले असता अगदी १८८ ते १९३ सुद्धा होतात!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या थोडक्या ज्ञानावरुन ही उत्तरे देते. हे फक्त नाडीच्या ठोक्या बद्द्दल.

१. शरीराची ऑक्सीजन ची गरज आणि हृदयाची रक्त ( ऑक्सीजन ) पुरवण्याची क्षमता आणि रक्त वाहीन्यांची कंडीशन ह्या वर कीती नाडीचे ठोके गरजेचे आहेत हे ठरते.

२. शरीर काही कारण नसताना कुठल्याही अवयवाला कामाला लावत नाही. ह्या केस मधे हृदयाला.

३. तुम्ही २० मिनिटे हळु पळुन सुद्धा जर ठोके ९० पर्यंतच जात असतील, आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला दम लागणे, डोके दुखणे अशी कुठलीही लक्षणए दिसत नसतील तर तुमचे हृदय ९० वेळा पंप करुन पुरेसे रक्त पोचवते आहे असे मानावे. हे चांगलेच आहे.

आता तुम्ही ह्यात काही बदल होतो आहे का ह्यावर लक्ष ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आमचे एक परिचित डॉक्टर "खबरदार! इंटरनेटवर काहीबाही शोधुन घाबरून माझ्याकडे उगाच आलास तर! तुला काय होतंय हे मला दाखव, इंटरनेटवर शोधत बसलात तर नुसताच घाबरशील" असे म्हणतात.

नी इथे डॉक्टरच इंटरनेटची लिंक देतायत! Wink

ह घेणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रेस्टींग हार्ट्बीट्स कमी असणे (ब्लड प्रेशर नव्हे) हे हृदयाच्या चांगल्या कार्यक्षमतेचे लक्षण आहे पण अचानक एखाद्या कारणाने कमी होणे हे चांगले नव्हे.
कमी हार्ट्बीट (रेस्टींग) म्हणजे कमी सायकल्समधे शरीराला आवश्यक रक्त (व्हॉल्यूम आणी दाब) पुरवता येणे..
कमाल ठोक्यांची मर्यादा जितके जास्त परीश्रम करून नियमितपणे वाढवता तितका रेस्टींग हार्ट रेट खाली येतो..

समजा एखादा धावताना साधारणपणे २-३ तास सतत १६०-१९० पर्यंत बीपीएम वाढवू शकतो.. असे वर्षभर केल्याने रेस्टींग हार्ट रेट ६५-७० वरून ५०-५५ वर येउ शकतो
तसेच जेवढ्या वेगासाठी वर्षापूर्वी हार्ट्बीट्स १९० बीपीएम पर्यंत जात असेल तोच वेग आता १७० बीपीएम मध्ये साध्य होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोशी म्याडम, तुम्ही सायकोपॅथीक असाव्यात, किंवा antisocial तरी, घाबरुन राहिलं पाहीजे ब्वॉ तुम्हाला सर्वांनी

http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2756992/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

माझंपण ब्लडप्रेशर कमी असतं कधीकधी. ९६/६६ आलवतं एकदा. त्यानंतरही एकदा रक्तदानाला गेलो असताना असंच कमी होतं. पण मला त्रास काहीच होत नाही सो आय इग्नोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रक्तदाब अधूनमधून पार्‍याच्या बॅरोमीटरवर मोजून पहा. डिजिटल इन्स्ट्रुमेंटवर फार विश्वास चांगला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तब्येतीला चांगलं का वाईट यापुढे थोडे जास्त (भोचक) प्रश्न आहेत. ते बहुतेक धाग्यात नीट मांडलेले नाहीत.

१. रक्तदाब कमी असणं नक्की कशामुळे होतं? कमी रक्त/प्राणवायू पुरतो म्हणून का रक्तनलिकांचा आकार मोठा असतो म्हणून?
२. ठोक्यांच्या बाबतीतही हाच प्रश्न.
३. रक्तदाबसंबंधित विकार होतात तेव्हा रक्तदाबातला फरक महत्त्वाचा असतो का तो निरपेक्ष आकडा? म्हणजे १२०/८० हा सामान्य रक्तदाब समजला जातो आणि समजा १५०/९५ हा काळजी करण्यासारखा आहे. ज्यांचा रक्तदाब मुळातच ११०/७२ असा काहीतरी आहे, त्यांच्या बाबतीत १५०/९५ काळजी करण्यासारखा म्हणणार का ३०/१५ असा फरक काळजी करण्यासारखा?

(स्वतःच्या आरोग्याबाबत मी फार काळजी, चौकशी करत नाही. नियमितपणे व्यायाम करते, खातापिताना काळजी घेते. त्यापलिकडे वजन, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, नाडीचे ठोके यांचं जे व्हायचं ते होईल, गरज पडली तर औषधं घेईन आणि एक दिवस मरायचंच आहे असा माझा विचार असतो. मला निव्वळ शैक्षणिक कुतूहल आहे म्हणून हा धागा काढला. त्यापलिकडे कोणाला या धाग्यावर संबंधित विकार-आजारांबद्दल चर्चा करायची असेल तरी हरकत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आडकित्ता यांनी दिलेल्या साइटवर खणल्यावर हे पान सापडलं.

A lower heart rate is also common for people who get a lot of physical activity or are very athletic, Stein said. Active people often have lower heart rates because their heart muscle is in better condition and doesn’t need to work as hard to maintain a steady beat.

तिथेच रक्तदाबाविषयीही हे पान सापडलं.

Optimal blood pressure is less than 120/80 mm Hg (systolic pressure is 120 AND diastolic pressure is less than 80). Within certain limits, the lower your blood pressure reading is, the better. There is no specific number at which day-to-day blood pressure is considered too low, as long as no symptoms of trouble are present.

रक्तवाहिन्या आतून बारीक झाल्या की रक्तदाब वाढतो, तेव्हा रक्तदाब कमी असणं हे रक्तवाहिन्या पुरेशा रुंद असल्याचं लक्षण मानता यावं. (हा माझा अंदाज) मात्र मला हे इंजिनियरिंगच्या परिभाषेत समजावून सांगणारं काही मिळालं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रक्तवाहिन्या आतून बारीक झाल्या की रक्तदाब वाढतो, तेव्हा रक्तदाब कमी असणं हे रक्तवाहिन्या पुरेशा रुंद असल्याचं लक्षण मानता यावं. (हा माझा अंदाज) मात्र मला हे इंजिनियरिंगच्या परिभाषेत समजावून सांगणारं काही मिळालं नाही.

भौतिकशास्त्र.

कॉलिंग आडकित्ता आणि/किंवा धनंजय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा रक्तदाब ०७०/११० असताना हि अनेकदा सुंदर नर्सेसचा सहवास प्राप्त झाला आहे. हृदयात स्प्रिंग आणि नंतर छुरी सुद्धा काळजावर चालवावी लागली. आत्ताच रक्तदाब तपासला ७०/११५ होता.

रक्तदाब कमी असणं हे रक्तवाहिन्या पुरेशा रुंद असल्याचं लक्षण मानता यावं. (चक्क खोटे आहे- चार चार नसा ब्लॉक असताना हि रक्तदाब छान होता.). (शल्य चिकित्से आधी अन्जिओग्राफी सरकारी हॉस्पिटल मधेच झाली होती अर्थात RLM)

बाकी हृदयाचा विज्ञानाशी काही एक संबंध आहे, मला तरी वाटत नाही. दोन्ही जग वेगळे आहेत.
काळजी करू नका. खा प्या मस्त रहा. वेळ आली नसेल तर रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या माणसाला हि दिल्ली सारख्या शहरात हि शीघ्र मदत मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी हृदयाचा विज्ञानाशी काही एक संबंध आहे, मला तरी वाटत नाही. दोन्ही जग वेगळे आहेत.

खरंय तुमचं! मलाही हे आधीच समजलं असतं तर बरं झालं असतं. पण आता हृदय आणि विज्ञानाचा संबंध आहे अशी अंधश्रद्धा रुजली ना डोक्यात!

रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या माणसाला हि दिल्ली सारख्या शहरात हि शीघ्र मदत मिळते.

मदत तर माझ्या वडलांनाही ठाण्यात मिळाली होती. जिथे चक्कर येऊन पडले तिथे समोरच हॉस्पिटलही होतं, पण तिथले डॉक्टर म्हणाले, "अॅडमिट करू नका. उगाच पोस्टमॉर्टम करत बसावं लागेल. वारसांचा खर्च फुकट जाईल."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जमतंय का पहा, अन मग व्हिडो द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

वीसेक मिनीट ४.५ मैल/तास (~ ७.२५ किमी/तास) या वेगाने धावल्यावर ठोके ~ ९०/मिनीट एवढे असतात.

४.५ मैल/तास (१३.३ मिन्/मैल) ही गती ठोके वाढण्याकरता तशी कमी आहे.
१० मिन्/मैल या वेगाने ३० मिनिटे पळून ठोके किती पडतायत हे बघा.

फिट्नेस मोजण्यासाठी अजुन एक टेस्ट म्हणजे
3 Minute Step Test

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१० मिन्/मैल या वेगाने ३० मिनिटे पळून ठोके किती पडतायत हे बघा.

पंधरा वर्षं उशीरा भेटलात ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडं विषयांतर :
माझे वजन ६१ कीलो , उंची ५:४ ईंच , वय ३७
बाकी प्रक्रुती च्या तक्रारी नाहीत, डॉक्टरांनी थोडे वजन आटोक्यात ठेवा असे सांगीतले .
चालण्या चा व्यायाम सुरु केला आहे.
वजन कमी करण्या साठी रोज कीती चालावे ? कोणत्या स्पीड ने चालावे?
अनुभवींनी क्रुपया मार्गदर्शन करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वजन कमी करण्यासाठी रोज साधारणपणे १० किमी (दोन तास) चालावे. चालण्याचा वेग ताशी ५ किमीपेक्षा जास्त असावा. चालण्यासाठी हलक्या वजनाचे - पायाला न लागणारे - बूट आवश्यक आहेत.

(अनुभवी) अतिशहाणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !!!
सुरवात केली आहे.
माहीतीपूर्ण प्रतीसादा साठी धन्यवाद .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी सध्या आठवड्यातून तीन/चार दिवस प्रत्येक वेळेस ४५ मिनीटं, ५ किमी एवढं जॉॅगिंग/चालते; दोन/एक दिवस स्नायूंसाठी अर्धा तास व्यायाम करते. ह्यासाठी चांगले बूट अत्यावश्यक. हवा बरी असल्यामुळे सध्या थोडं बागकाम वाढलं आहे. यातून आठवड्याला सरासरी १०० ग्रॅम वजन कमी होतंय. वजन कमी होणं गेले दोन महिनेच नियमितपणे सुरू आहे.

वजन कमी होण्यामागचं मुख्य कारण आहार हे असावं. कारण गेले ६-८ महिने, नियमितपणे असा व्यायाम सुरू होता. पण खाण्यावर काही ताबा नव्हता. वजन जैसे थे होतं. खाण्याची पथ्यं पाळायची; ती सगळ्यांना माहीत असतातच - एका वेळेला कमी खायचं, अजिबात उपाशी रहायचं नाही, तेल, तूप, साध्या शर्करा (साखर, भात, पोहे, साबुदाणे, बटाटे, मैदा) कमी करायच्या. त्याजागी भाज्या, फळं अशा चोथायुक्त आणि अंडी, दही, चणे-दाणे अशा प्रथिनयुक्त गोष्टी खायच्या. मी घासफूस असल्यामुळे मांसाहाराबद्दल कल्पना इल्ले.

मी जरा गांभीर्याने व्यायाम सुरू केला कारण माझं ब्याड कोलेस्टेरॉल वाढलं होतं; आता ते सगळं आटोक्यात आहे. आता फक्त दोन वर्षांपूर्वीच्या जीन्समध्ये माझा कमरा (सानिया मिर्झाची असते ती कंबर, माझा कमरा) मावला पाहिजे. मी झेपेल तेवढ्या जोरात धावते/चालते. नियमितपणे व्यायाम करायचा असेल तर हीरोगिरी अजिबात करायची नाही, हे अनुभवातून लक्षात आलेलं आहे. त्यामुळे किती व्यायाम, हे आपापलं ठरवायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहीतीपूर्ण ,
त्यातल्या त्यात शेवट चे वाक्य अगदी पट्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीतीपूर्ण ,
त्यातल्या त्यात शेवट चे वाक्य अगदी पट्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यायाम/ चालणे सुरु केले कि काही दिवसातच पाय खूप दुखणे किंवा आजारी पडणे व यामुळे व्यायाम/चालणे बंद होणे हे टाळण्यासाठी काय करता येईल? शरीराला सवय नाही म्हणून ते सुरवातीला कुरकुर करेल आणि नंतर होईल सवय असे मानून व्यायाम/चालणे चालू ठेवावा का व्यायामामुळे शरीरात कशाचीतरी कमतरता निर्माण झाली आहे व ती भरून काढण्यासाठी आहारात काही बदल करावा? ( बदल करायचा असल्यास काय बदल करावा?)
बर्याच वेळा आजारी पडून व्यायाम बंद केला कि नंतर काही त्रास होत नाही. यामुळे व्यायाम करण्यास उत्तेजना मिळत नाही.
चालू आहे ते बरे चालले आहे असे वाटते. मुलाला सकाळी शाळेत सोडायला जाताना लोकांना व्यायाम करतान पाहून आपण कधी असे करणार असा विचार येतो. बहुतांशी वेळा डॉक्टरांनी सांगितल्यावरच (म्हणजे आता व्यायामाशिवाय काही उपायच नाही) आपण असे करू असे वाटते.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी माझे अनुभव सांगू शकेन, पण तुमच्या बाबतीत काय करायचं हे सांगण्याची माझी पात्रता नाही.

अगदी सुरुवातीला चालताना पोटऱ्यांच्या खाली दुखायचं. ते स्नायू मजबूत झाल्यावर दुखणं बंद झालं. स्नायू दुखणं किंवा दमणं निराळं.

मला ज्या दिवशी हात/पाय/अंग खूप दुखण्याचा त्रास होतो, थोडक्यात सकाळी उठूनही दमलेली असते, तेव्हा मी सुट्टी घेते. अपूर्ण झोप, अति परिश्रम, सवय नसताना अति उन्हात व्यायाम/काम केल्याचा त्रास होतो. ऊन नसलं आणि फार घाम आला तरीही बरंच दमायला होतं. अशा वेळेस शरीराचे फीडबॅक्स ऐकून शांत बसणं हा माझा पर्याय. पुन्हा नॉर्मल वाटलं की नेहेमीसारखा व्यायाम करते.

ह्याउलट सवय नसताना बराच व्यायाम केल्यामुळे, ठराविक भागातले स्नायू ओढले, वापरले गेल्यामुळे पाय-पोट कधी दुखतात तेव्हा सुट्टी घेत नाही; झेपेलसा इतर काही व्यायाम करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक्स्पर्ट जरी नसले तरी अनुभवातून आणि वाचनातून मिळालेले ज्ञान म्हणून इतकेच सांगेन की सुरवातीला खूप व्यायाम करू नका. थोडा करा आणि हळूहळू वाढवत न्या. जेणेकरून स्नायुंना सवय होईल आणि त्रास कमी होईल.
प्रथिने योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. कदाचित त्यामुळे थकवा जाणवत असेल.
आणि मुलांना शाळेत सोडायला जाताना झपाझप चालल्याने व्यायाम होऊ शकतो. अंतर कमी असेल तर ते थोडे वाढवा की झाले. चालणे हा सगळ्यात चांगला व्यायाम समजतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

ठोके हे हृदयाचे आरोग्य दर्शवतात. रक्त पंप करायची परीणामकारकता.. तर रक्तदाब हा रक्त आणी रक्ताभिसरणाचे आरोग्य दर्शवतो..

रक्ताची घनता आणी रक्तवाहीन्यांचा क्रॉस सेक्शनल एरीआ यामुळे रक्तदाब कमी जास्त होतो. कोलेस्टरॉल वगैरेमुळे रक्तवाहीन्यांचा क्रॉस सेक्शनल एरीआ कमी होउन दाब वाढतो. तेव्हा रक्त पातळ करण्याची औषधे देउन तो नियमित केला जातो. पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे. कोलेस्टरॉलचे आवरण काढून रक्तवाहीन्या पूर्ववत करणे हाच दीर्घकालीन उत्तम उपाय. त्यासाठी आहारनियंत्रण महत्वाचे.. आणी शेवटची पायरी म्हणजे अँजिओप्लास्टी.

अतिअथवा कमी दाबामुळे हृदयाच्या कार्य्क्षमतेवर परीणाम होतोच.. जसे पाण्याच्या पंपाच्या पाणी बाहेर सोडण्याच्या पाईपामध्ये चोक अप झाल्यास पंपावर अतिरीक्त ताण येतो तसा. त्यामुळे रक्तदाब व हृदयविकार यांचे जवळचे नाते असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****प्रश्न****

१. रक्तदाब कमी असणं नक्की कशामुळे होतं? कमी रक्त/प्राणवायू पुरतो म्हणून का रक्तनलिकांचा आकार मोठा असतो म्हणून?
२. ठोक्यांच्या बाबतीतही हाच प्रश्न.
३. रक्तदाबसंबंधित विकार होतात तेव्हा रक्तदाबातला फरक महत्त्वाचा असतो का तो निरपेक्ष आकडा? म्हणजे १२०/८० हा सामान्य रक्तदाब समजला जातो आणि समजा १५०/९५ हा काळजी करण्यासारखा आहे. ज्यांचा रक्तदाब मुळातच ११०/७२ असा काहीतरी आहे, त्यांच्या बाबतीत १५०/९५ काळजी करण्यासारखा म्हणणार का ३०/१५ असा फरक काळजी करण्यासारखा?

उत्तर-
१) ह्रुदय कमकुवत असतं.दमदारपणे रक्त ढकलत नाही.

२) ठोके वाढणे याचा अर्थ ह्रुदयाची रक्त ढकलण्याची वारंवारता वाढली.शारिरीक आणि मानसीक प्रतिक्रीया असावी.
२ अ) शरीराकडून पळणे वगैरे हालचाल जलद झाली की अधिक रक्तपिरवठा व्हावा म्हणून,
२ ब ) आता काहीतरी विचित्र /धोकादायक गोष्ट होईल तर पळण्याच्या तयारीत राहा असा मेंदूकडून संदेश आल्याने,
२ क ) नवीन कप फुटला-आई मारेल या भीतीने. अभ्यास करून नाही आणला -शिक्षक ओरडतील या भीतीने.

३) शरीराची हालचाल न करण्याच्या स्थितीतही हात, पाय, डोके वगैरे लांबच्या अवयवासही लागणारे रक्त कमी पडते आहे असा संदेश मेंदूकडून ह्रुदयास मिळतो आहे म्हणून आणि आकुंचन प्रसरणाची गती वाठवूनही रक्त जात नाहीयै तर जोर लावून ढकलले जातेय=रक्तदाब वाढणे.

{ दुसय्रावर } चिडणे आणि { स्वत:वर }चिडणे =त्रागा करणे यात परक असावा.त्रागा अधिक त्रासदारक ठरत असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपेक्षेप्रमाणे, अदिती ताईंनी आमच्या प्रतिसादाला निरर्थक असे ठरविले. आजकाल प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या माणसाचे विचार निरर्थक ठरविल्या जातात, हेच खरे. तरी हि, आज हृद्य रोगांचे मुख्य कारण तणाव हे आहे. ECG आणि नाडीचे ठोके उत्तम असले तरी हि हृदयाघात होऊ शकतो. काही आनुवंशिक करणे हि असू शकतात). मोठ्या इस्पितळातल्या मोठ्या डॉक्टरानां हि वास्तविक कारण सांगता येत नाही. कदाचित अजून आपले ज्ञान अपुरे असेल ह्या मुळे हि. असो.

बाकी तुमचा दुसरा प्रतिसाद

वेळ आली नसेल तर रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या माणसाला हि दिल्ली सारख्या शहरात हि शीघ्र मदत मिळते.
वेळ आली नसेल तर हे शब्द गाळण्याचे कारण काय.

तुमच्या वडिलांना मदत मिळाली नाही. हजारोंच्या संख्येत अपघात ग्रस्त लोकांना वेळेवर मदत मिळत नाही. आपल्या देशात तरी हे कटू सत्य आहे.

जगविणे आणि मारणे हे ईश्वराच्या हातात आहे. ज्याला जगवायचे आहे, त्याची मदत करायची ईश्वरीय प्रेरणा रस्त्यावर चालणार्या माणसाना मिळते. अन्यथा नाही.. हे सत्य स्वीकार केल्यावर तुमच्या मनाला शांती लाभेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0