Skip to main content

करोना

कोरोना लस (भाग २) - जनुकीय लस

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण जनुकीय लशींविषयी माहिती घेऊ.

माझ्या ई-पासाची कथा - मिलिंद जोशी

कठोर लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी ई-पास लागायचे. त्या काळात हे ई-पास प्रकरण एखाद्या काळ्या ढब्ब्या ढगासारखं सतत वर तरंगत असायचं. आमच्यासारख्यांना तर कायकाय त्या ई-पासासाठी यातायात करावी लागायची! हां पण हुशार लोकांसाठी मात्र...

महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी

एचआयव्हीसारख्या व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर प्रत्यक्ष उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. विनय कुलकर्णी सांगताहेत - करोनाच्या महासाथीकडून आपण कोणते धडे घ्यायला हवेत?

करोना साक्षात्कार : करू देत चार चार लोकांना तेच ते काम!

२२ मार्चला लॉकडाऊन झाला आणि (इतर दुकानांबरोबर) दारूची दुकानं बंद झाली. तत्पूर्वी महिन्यातून सरासरी पाच ते सहा वेळा ‘बसणे’ होत असे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यांत दोनदा आणि पुढच्या तीन महिन्यांत तीनदा ‘झूम बैठका’ झाल्या. तेव्हा घरीच पडून असलेली प्यायलो. दारू दुकानं बंद झाल्यामुळे माझं काही अडलं नाही.

कोविडोत्तर अर्थव्यवस्था : नवयुग चूमें, नैन तिहारे । जागो जागो, मोहन प्यारे ।

डोकीवर आणि दाढीत पांढरे केस उगवण्याचा एक तोटा म्हणजे सदरहू इसम हा मार्गदर्शन करणेलायक झाला आहे अशी एक गप्प ममव मार्केटमध्ये पसरते. विशेषतः दहावी बारावीच्या निकालानंतर मार्गदर्शनेच्छू लोकांचा सुकाळू होतो, आणि बऱ्याच जणांचा मुख्य प्रश्न असतो,

"सध्या स्कोप कशाला आहे?"

लेट मी क्ल्यारिफाय, विचारणाऱ्याच्या बाजूने या प्रश्नात चूक काहीही नाही. डोकीवर एकही पांढरा केस नसताना आणि दाढीचा उदय होत असताना मीही हा प्रश्न कोणा बेसावधाला पकडून विचारला असेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

क्वारंटाईन सेंटरमधून... (भाग २) - प्रियांका तुपे

क्वारंटाईन सेंटरमधून... (भाग २)
प्रियांका तुपे

काही दिवसांपूर्वी मी क्वारंटाईन सेंटरमधल्या अन्नाच्या नासाडीबद्दल इथे लिहिलं होतं, त्याचं पुढे काय झालं हे शेअर करावंसं वाटलं म्हणून आता हे लिहितेय.

Food Plates

सांख्यिकी आणि मशीन लर्निंग - भाग १ - तीस

Taxonomy upgrade extras

सांख्यिकी (statistics) विरुद्ध मशीन लर्निंग अशा प्रकारची चर्चा आमच्या ऑफिसात नेहमीची असते. हल्लीच त्यावर दोघांनी मिळून एक भाषण दिलं. त्यात त्यांनी वापरलेली पद्धत इथे वापरली आहे.

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)

कोरोना हा केवळ जास्त धोकादायक फ्लू आहे का? लशीकरण झाल्यानंतरही मास्क आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं लागेल का? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.

करोना आणि धारावीची गोष्ट : राजू कोरडे

"माझा जन्मच धारावीतला. त्यामुळे धारावीची पहिल्यापासूनच तपशिलात माहिती होती. त्यामुळे, कोविडकाळात काम सुरू करणं, त्यासाठी इतरांची मदत घेणं, लोकांपर्यंत पोचणं सोपं गेलं. माझ्या परिसरातील लोकांसाठी मी ते कर्तव्य भावनेनेच केलं." सांगताहेत धारावीतील रहिवासी राजू कोरडे.

करोना आणि धारावीची गोष्ट : कल्पना जगताप (आशा वर्कर)

"मी इथे धारावीतच राहते. गेली २५ वर्षं आशा वर्कर म्हणून काम करतेय. मार्चमध्येच कोरोनाच्या कामात आम्हाला रोज दोनशे-तीनशे घरांना भेटी द्याव्या लागायच्या. तेव्हाच मला कोविडचा पहिला रुग्ण मिळाला."