राजकीय

महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस

झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!

बातमीचा प्रकार निवडा: 

कोविडनंतरची चिनी डिप्लोमसी; मास्क, व्हॅक्सिन आणि मैत्री - डॉ. अविनाश गोडबोले

कोविडच्या प्रसारानंतर चीनविरोधी जनमताचे प्रदर्शन जगभर दिसून आले. चीनच्या जागतिक महासत्ता बनण्याच्या इच्छेला कोविडमुळे लगाम लागू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी आता चीन 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' वापरत आहे. त्याविषयी सांगत आहेत चीनचे अंतर्गत राजकारण आणि परराष्ट्र धोरण ह्या विषयांचे अभ्यासक डॉ. अविनाश गोडबोले.

प्रशासन नावाच्या हत्तीच्या अंतरंगातून - कौस्तुभ दिवेगांवकर

उस्मानाबादेत आणि पुण्यात कोरोनाचे आव्हान कसे पेलले हे सांगताहेत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगांवकर.

ट्रम्प मतदारांची कैफियत

ट्रम्प समर्थकांचे प्रश्न हे रोजीरोटीचे प्रश्न आहेत. डेमोक्रॅटिक समर्थकांना त्यांच्याबद्दल सहवेदना (empathy) निर्माण होत नाही ही खरी शोकांतिका आहे. तुमच्या नामशेष होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांबद्दल ट्रम्प समर्थकांना तरी बंधुत्वाची, आपलेपणाची भावना कशी निर्माण होऊ शकेल? यांच्या अस्तित्वाचाच हा प्रश्न झाला आहे.

महासाथीकडून काय धडे घ्यावेत? - डॉ. विनय कुलकर्णी

एचआयव्हीसारख्या व्हायरसच्या साथीचा अभ्यास, रोगावर प्रत्यक्ष उपचार आणि रोगाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचाही अभ्यास अशा वेगवेगळ्या अंगांनी अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. विनय कुलकर्णी सांगताहेत - करोनाच्या महासाथीकडून आपण कोणते धडे घ्यायला हवेत?

प्रशांत भूषण, सर्वोच्च न्यायालय, कंटेम्प्ट वगैरे

Supreme but not Infallible

EMS नम्बूद्रीपाद एकदा म्हणाले की सुप्रीम कोर्टाला वर्गीय बायस आहे आणि ते शोषणाचे साधन आहे. त्यांना contempt jurisdictionमध्ये शिक्षा दिली होती. कालांतराने सुप्रीम कोर्टाचे जज (आणि निकालात अवघड इंग्लिश वापरा शाळेचे महागुरू) कृष्णा अय्यर देखील तेच म्हणाले. व्यक्तिगत पातळीवर जजला मूर्ख म्हणणे, शोषक म्हणणे, अमुक तमुक म्हणणे हे देखील चिरंतन काळ चालू आहे. ह्यात न्यायालयाचा अवमान होत नाही.

बखर....कोरोनाची (भाग २)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

बातमीचा प्रकार निवडा: 

समलैंगिक संबंध गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय

अनेक उपप्रतिसाद झाल्यामुळे चर्चा वेगळ्या धाग्यात हलवली आहे.

सोप्पंय - सगळं खापर उदारमतवाद्यांवर - प्रताप भानू मेहता

Good Morning Liberals

(प्रताप भानू मेहता यांच्या 'Blame it on the liberals' ह्या लेखाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद)

पाने

Subscribe to RSS - राजकीय