करोना
ये दुख काहे खतम नही होता बे? – भाग १
‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. न संपणाऱ्या दुःखाच्या अनेक छटा आम्हाला लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच्या तीन महिन्यांत पाहायला मिळाल्या. तसेच लोकांबद्दल, व्यवस्थेबद्दल, स्वतःबद्दलदेखील खूप नवीन गोष्टी समजल्या. ‘साद प्रतिष्ठान'च्या कोरोनाकाळातील कामाविषयी सायली तामणे.
- Read more about ये दुख काहे खतम नही होता बे? – भाग १
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6835 views
करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ कैलास गौड
मुंबईतली धारावी. इथे एखादी घटना घडली की तिची दखल सगळं जग घेतं. कोरोनाची महामारी आटोक्यात आणल्याबद्दल आत्ता धारावीची चर्चा आहे. धारावीत गेली ३५ वर्षं वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि आत्ता धारावीने आरोग्यासाठी दिलेल्या लढ्यातले एक भागीदार डॉ कैलास गौड सांगाताहेत धारावीची गोष्ट.
- Read more about करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ कैलास गौड
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3959 views
क्वारंटाईन सेंटरमधून...
पुणे येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये होणाऱ्या अन्नाच्या नासाडीविषयी सांगताहेत पत्रकार प्रियांका तुपे
- Read more about क्वारंटाईन सेंटरमधून...
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3725 views
दवा, दुवा आणि देवा... - आशिष चांदोरकर
रविवार दिनांक १९ जुलै रोजी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येऊन बरोबर एक महिना एक दिवस झाला. एका महिन्यानंतर आता मी पूर्णपणे ठणठणीत असून, महिनाभरानंतर प्रथमच बाहेरही पडलो. १९ जून ते १९ जुलै हा महिना बरंच काही शिकवून गेला. त्याविषयी थोडंसं...
- Read more about दवा, दुवा आणि देवा... - आशिष चांदोरकर
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3628 views
करोनाव्हायरस - टेस्टिंग करून घ्यावे का?
करोनाव्हायरस : विविध वस्तूंवरच्या व्हायरसमुळे संसर्गाचा धोका
नक्की कशामुळे करोनाव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो, आणि तो टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? सांगताहेत डॉ. अनंत फडके.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about करोनाव्हायरस : विविध वस्तूंवरच्या व्हायरसमुळे संसर्गाचा धोका
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3514 views
करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?
कोविड १९ महासाथ येऊन सहाएक महिने झालेत. आता लोकांना इन्फेक्शन नक्की कसे होत असावे याबद्दल साधारणपणे एकमत होऊ लागले आहे. या विषयातील तज्ज्ञ लोकांच्या संशोधनाच्या आधारे जनहितार्थ घेतलेला हा एक आढावा.
- Read more about करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7053 views
मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
Taxonomy upgrade extras
पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.
- Read more about मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
- 17 comments
- Log in or register to post comments
- 10465 views
बखर....कोरोनाची (भाग ६)
इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ६)
- 99 comments
- Log in or register to post comments
- 40932 views
ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे
ICMR उर्फ Indian Council of Medical Research ही नामांकित भारतीय संस्था कोव्हिडसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीची लस दि. १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देणार अशी बातमी नुकतीच प्रसिध्द होताच अनेक भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे एक तर व्हायरसपासून मुक्ती मिळणार, तीही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या लशीने आणि तेदेखील स्वातंत्र्यदिनी! मात्र काही लोकांनी या जलदगतीविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या, पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.
पण लवकरच या आनंदाला तडा जाऊ लागला.
लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असलेल्यांना दि. २ जुलै रोजी ICMRने पाठवलेलं एक पत्र लवकरच लीक झालं -
- Read more about ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 5097 views