Skip to main content

इतर

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:

आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

ललित लेखनाचा प्रकार

नामाची महिमा न्यारी


नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.
(संत. तुकोबाराय)

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते. भगवंतापेक्षा, त्यांचे नाव जास्त परिणामकारक होते.

ललित लेखनाचा प्रकार

शतशब्दकथा - सोपा निर्णय

शतशब्दकथा हा कथेचा प्रकार मी एका संस्थळावरती वाचला. मला आवडला व त्यानुसार प्रयोग करुन पहाते आहे.
अन्य कोणाला अशी कथा (१०० शब्दात) मांडायची असेल तर या धाग्याचा उपयोग करावा.
________________________________________________
ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तिला प्रश्न पडत नसतील?
इतकी देवभोळी नाही ती.
तिलाही गूढ जाणून घ्यावेसे वाटते. पूजा केल्यानंतरही ती विचार करते - तू आहेस का?
अन नसशील तर? माझ्याच हाती सर्व निर्णय? मी स्वतंत्र ? ना कोणाचा अंकुश ना कोणाचे सार्वभौमत्व. मी म्हणेन ते होणार. मी म्हणेन ती दिशा आयुष्याला देऊ शकेन.
.
खुडबुडीच्या आवाजाने ती दचकते. हा आवाज तिच्या परिचयाचा आहे.

ललित लेखनाचा प्रकार

भयकथा - शिकारी साखळी

(कथा वाचण्यापूर्वी एक निवेदन - ही कथा मी पूर्वी लिहिलेल्या शिकारी रात्र या कथेची सुधारीत आवृत्ती आहे. कथा कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा फक्त प्रतिक्रिया पूर्वग्रहदूषित नसाव्या ही माफक अपेक्षा!)
***
मध्यरात्र उलटून गेलेली असते.
वातावरणात खूप थंडी असते.
एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते.
अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो.

बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो.
बैलगाडी हाकणारा (नंदू) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्‍या माणसाला (हरी) म्हणतो,

ललित लेखनाचा प्रकार

कोरा कागद निळी शाई!

ललित है तो पूर्वप्रकाशित हैच! ;)

***

कोरा कागद निळी शाई!

हुंकारभुता बोल काही
अळीमिळी सोडून देई
इतके सारे बोललो तरी
घरभर उरून राही –

कोरा कागद निळी शाई!

कागदाच्या चल होड्या करू
तो बघ झाला पाऊस सुरू
दिवस गेला लिखा-पढी
सोड की रे अढी-बिढी –

चल आता मडके भरू!

कसली अढी कसले काय,
फक्त थोडा रुसलो हाय!
सगळा धडा पाठ आहे
मान माझी ताठ आहे –

पण गाण्याचा शेवट नाय?

ताठ मान हवी खरी
पण आता पुरे तिरीमिरी
म्हणतो राती परतीन घरी

ललित लेखनाचा प्रकार

मुझे तो हैरान कर गया वो...

नासिर काजमीने खूप गजला लिहील्या. भारतातल्या अंबाल्यात रचला गेलेला हा कवी पुढे पाकिस्तानात गेला. फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच. पण अगदी "हंगामा", "चुपके चुपके" वगैरे ग्लॅमर लाभलेल्या चार गजलांवरच मैफिलीतून उठलेल्यांनीसुद्धा नासिरची "दिलमें एक लहेरसी उठी है अभी" ऐकलेली असते.

"कुछतो नाजुकमिजाज है हमभी
और ये चोटभी नयी है अभी"

ही अवस्था नासिरच्या काही गजल्स पहिल्यांदाच ऐकल्यावर अन वाचल्यावर झालेली असते. पण ते सर्वांना नाही जाणवणार कदाचित. अशातली एक गजल इथे आज घेतो.

गए दिनोंका सुराग लेकर किधरसे आया किधर गया वो
अजीब मानूस अजनबी था मुझे तो हैरान कर गया वो

ललित लेखनाचा प्रकार

सुप्त मन

.
अबौद्धिक व चाकोरीबद्ध, वारंवारता अति असलेलं काम करणार्‍या व्यक्तीची इच्छा असू शकते की आपल्याला बौद्धिक किंवा निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारे काम मिळावे. आपण महत्त्वाचे निर्णय घावेत. आपल्यात तो करीष्मा असावा लोकांची मते बदलण्यात आपण महत्त्वाचे प्यादे ठरु. "ऑल्सो रॅन" च्याहूनही काहीतरी आहे अन ते यश आपले व्हावे. अनेकांनी आपली वाहवा करावी.
.

ललित लेखनाचा प्रकार

ओळख - काही उचलगिरी करणाऱ्यांची

मराठी सृष्टीवर ‘तुमच्या मनातल्या लेखकाला जागे करा” हे आव्हान स्वीकारून मी मराठी लेखन करायला सुरुवात केली. बहुतेक वेळा ‘मराठीसृष्टी’ किंवा; मी मराठी’ वर लेख टाकल्या नंतर आपल्या ब्लॉगवर टाकीत असे. कालांतरानंतर ‘मी मराठी’ वेबसाईट बंद पडली. ‘प्रेम म्हणजे काय’ हा लेख प्रथम मराठी सृष्टीवर (१३.७.२०१०) टाकला होता आणि नंतर आपल्या ब्लॉग वर.

ललित लेखनाचा प्रकार

ना गंवाओ नावक ए नीमकश..

फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच.

ललित लेखनाचा प्रकार

शायद कभी ख्वाबोंमे मिले..

अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती.

गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता.

ललित लेखनाचा प्रकार